Powered By Blogger

Thursday, April 17, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-5)

क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-5)

स्वत:शीच नैराश्यात नकारार्थी मान हलवत अंबर त्या चॅट विन्डोकडे शुन्यात बघत राहातो. शरीर असत जागेवर पण मन..? मनाला कुठे आणि कसली बंधणे ते तर लगेच सात समुद्र पार करुन धारा जवळ धावत गेलं. लहान लेकराच्या हट्टांना-नखर्याला वैतागून आईची जशी अवस्था होते, तशीच अवस्था धाराची होती. किचनमधला बॅड कूक जसा त्याच्या अवजारांना दोष देत बसतो अगदी तसेच धाराकडून भांड्यांवर भांडे आदळत होते. कुठे तरी तिच्या मनात एक पाऊस दाटत होता अन् कुठे तरी आभाळ फक्त मिश्किल हसत होता.
जरा वेळाने पुन्हा असेल अंबर तर येवून बघते. युझर ऑफलाईन पाहून जरासे मन तिचे खट्टू होते. फक्त "sorry..!" वाचून तिची कळी उमलते. अजुन नको ताणायला म्हणत अंबरच्या प्रोफाईलचे पुन्हा निरिक्षण करते. अगदी नकळत ॲड् टॅबवर क्लिक होते अन् मैत्री प्रस्ताव तिच्याकडून धाडले जाते. तासाभरा पुर्वीचा चॅट पुन्हा पुन्हा वाचत उगाच स्वत:ला इडीयट स्टूपीड म्हणत हसत बसते.
क्षणभर थांबून अंबरचा प्रोफाईल पिक्चर चाळते. वाळलेल्या झाडावर नव्याने उमलून येणा-या पालवीला रसिका सारखी बघत राहाते. अव्यक्त भावना मग मंत्रमुग्ध होवून शब्दात व्यक्त होत जातात. बुद्धी तरी एकदा बुचकळ्यात पाडते अन् शेवटी डोक्यात धुडगुस घालून मनात रुतलेल्या त्या एका क्षणभरच्या ओलाव्यात स्वत:ला हरवून बसते.

"पहिली पालवी पाहिली
माझी मी मग हरवून गेली,
जगा वेगळी भेट तुझ्याशी
का माझी आठवण बनली

धिटाई तुझी मी ओळखली
अन् माझीच मी न राहिली,
काय तू न काय मी म्हणत
ही ओढ कसली रे लागली..!

कसे बसे उतावळेपणाने दोन घास घशाखाली ढकलून धारा पुन्हा अंबरच्या उत्तराची वाट बघत बसली. तिच्या मागे गेलेला अंबर आता परत यायला हवा होता. हुरहुर दाटलेल्या धाराच्या मनात एकदा डोकावून बघायला हवा होता. एकदा उशीराणे का असे ना किंवा घाईत गडबडीत का असे ना वेळ काढून ऑनलाईन येवून मॅसेज तरी वाचून जायला हवा होता.
उत्कंठेत धाराची ती रात्र सरते. पाहाटे उठल्या उठल्या पुन्हा तपासते. आलाच नाहीस ना यंत्राशी बोलते. अनइच्छेने अंबरचा विचार बाजुला ठेवून आवरुन ऑफीसला निघते. कामातही लक्ष कुठे असते तरी दुपारच्या वेळी आलेल्या त्या मॅसेजला आठवून हसते. आज दुपारी काय बोलेल, काय म्हणेल सोडून कसं वाटलं असेल याचा विचार करुन मोहरुन येते.
दुपार टळून सांज होण्यात असते. थोडा अवकाश काढून स्वत:च्या होम पेजवर फेरफटका मारते. अपेक्षीत असलेलं तेव्हाही काहीच नसत. बिझी असेल स्वत:ला समजावत कामात गढून जाते. सांज होते धावत पळत घर गाठते. चहा उकळायला ठेवत लॅप्पीच्या स्क्रिनवर वाट पाहाणारी धाराची नजर स्थिर होते. काहीच हालचाल नाही कदाचित मी लवकर आले म्हणते. फ्रेश होवून ब्रेड-चहा घेवून अंबरच्या स्वागतासाठी स्वारी काकूळतीने वाट बघत राहाते. चहा गार होवून जातो. ब्रेड तसाच राहातो वाट बघायची हद्द संपुन धाराचा तिळपापड उडतो.
"व्हेअर आर यू मिस्टर स्ट्रेंजर?..."
व्हेअर एव्हर यू मे आर जस्ट बी ऑलराईट..! बाय..!

रातीला निजतांना पुन्हा धाराची एक फेरी होते. काहीच नाही असं कसं? आहे कुठे हा नेमका? माझं तर काही चुकलं नाही पुन्हा सारे पडताळून बघते. चुक त्याचीच मी माझ्या जागी बरोबर पण हा असा अचानक गायब?... गेला तरी कुठे..? अंबरचा प्रोफाईल पिक्चर सेव्ह करुन धाराच्या लॅप्पीचा पहिला 'wallpaper' सेट होतो. "आहेस कुठे रे?.." न राहावून पुन्हा भावना उफाळून येतात..!

तुझी पहिली पालवी
खुरडून काढलीस का,
करुन पाकळी पाकळी
समाधान मानलेस का..?
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

(नोंद : कथा काल्पनिक आहे याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा..!)

No comments:

Post a Comment