Powered By Blogger

Saturday, April 5, 2014

कौतुक..!

क्षण..!

कौतुक..!

'स्व' स्तुती प्रिय कुणाला नसते ? मी फक्त मी जिकडे तिकडे मीच कोड कौतुक खोट का असे ना आपलंच असावे ज्याला त्याला वाटतच असते. कदाचितच्या धर्तीवर थोडा स्वार्थही आढळतो. यात वावग अन् वायफळ असे काहीच नसते..!

आपलं कौतुक कोणी केलं तर दुसऱ्यांच कौतुकही आपण करायला हवं कि नको ? असे केलं तर तो व्यवहार पण बनू शकतो अथवा, दुसर्याच कौतुक करण्यासाठी आपली जळजळ दाबून, छे! त्याला जमलं आपलं राहिलं विचारांचे अन् मनाचे पोक्त द्वंद्व आतल्या आत गिळून किती प्रामाणिक दुसर्याच्या कौतुकासाठी आनंदीत असतो त्यावरही दुसर्याच तोंडभर कौतुक अवलंबून आहे..!

जेव्हा तेव्हा, असेल नसेल, हवेच असेल तिथे ! जिथे अनपेक्षीत अचानक नकळत कौतुक येते ते नैतीक ठरु शकते. दरवेळी कौतुकाची अधीकाधी अभिलाषा बाळगून अपेक्षेच्या प्रतिक्षेत सतत राहणे तिथे आपली अनैतीकता अन् लोभ कार्यन्वयीत झालेला असतो. इथे केलेलं कौतुक एक उपहास अन् कोरडेपणाचा एक रुचकर नमुना वाटत असतो..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment