Powered By Blogger

Monday, July 13, 2015

दास..! :-)


♥ क्षण..! ♥

दास..!

नभात मंतरलेल्या चांदण्यांचा
पुनवेचा शुभ्र चंद्रसुद्धा दास आहे,

ओंजळीतच कोमेजून गेलेल्या
प्राजक्ताचा अजूनही सुवास आहे,

रुणझुणते अबोल पैंजण तुझी
मला आजही खोटा आभास आहे,

सावलीसुद्धा नाही काळोखात
तरीही सोबत तुझा सहवास आहे,

उगाच खेळून शब्दांशी कागदाच्या
हातातल्या हातात तसाच घास आहे,

नवा डाव मांडून-मोडूनही कितीदा
भातूकलीत रचलेलीही मी रास आहे,

मोकळेपणाने अडकले कित्येकदा
तुझ्या माझ्यात गुंतलेलेही श्वास आहे,

म्हणू नकोस तुझी आठवण काढली
कागदावर शब्दांना झालेला भास आहे,

आभाळभर चांदणं ओंजळीत वेचून
त्या आनंदाच्या वेदनेतही मी उदास आहे..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment