♥
♥ क्षण..! ♥
असंच केव्हातरी वाटतं..!
उसवलेल्या लाटेला किनारा विसरून जावा आणि मनात मग कसलाच तरंग नसावा. पान पिकल्यावर झाडंसुद्धा त्याला झटकते आणि वाऱ्याचा अलवार स्पर्श त्या पानाला झेलतो. अगदी तसंच जसा पावसाचा वेंधळा एक थेंब ओंजळीत जो तो टिपतो. असंच केव्हातरी वाटतं ओळखत असूनही तुला ओळखायचं नाही. लाख पुरावे दिलेतरी समोर उभे करायचे नाही. विणवत राहायचे, मनवत राहायचे सगळे गुन्हे माफ करत जायचे. कशासाठी? असंच केव्हातरी वाटतं झालं-गेलं मातीत मिळालं. उरलं ते कारणांत मिसळलं. शाबूत असलेलं आयुष्य ढवळून निघालं आणि उर्वरित सगळं अस्तित्व कोऱ्या कागदासारखं असंच केव्हातरी बरबटलं..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment