♥
♥ क्षण..! ♥
भुरळ पाडणारं नवं स्वप्नं..!
प्रसन्न मनाच्या गाभाऱ्यात आयुष्याचे गाणे गुणगुणत असते. शांत, निरामय वातावरणात आठवणींचे गंध दरवळत असतात. रोज उगवत्या सूर्याचे अंगणात विलोभनीय कवडसे पडतात. पानांवर साचलेले दवं लुभावणे सुवर्ण भासतात. पाहाट होते अन् किलबिलाट होऊन पाखरांची फुलाभोवती वेंधळे फुलपाखरे जमतात. मन तृप्त होतं असतं नसतं तोच क्षणभंगुर क्षणाने भारावून जाऊन हृदयात खोलवर होत असलेल्या वेदनेला चेहऱ्यावरच्या हसण्यात लपवलं जातं. पुन्हा काही मिळवण्याच्या इच्छेला गमवलं जातं. राहता राहिलाच एक श्वास, एक क्षण, एक दिवस, एक रात्र, एक युग कित्येक युगांतरापर्यंत अस्तित्वाची वास्तवात चालढकल करत राहातं. कशासाठी? तर आज समोर असलेलं माझं आयुष्य छान आहे म्हणून नव्हे भुरळ पडणारं नवं स्वप्नं आहे म्हणूनच..!
-------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment