♥
♥ क्षण..! ♥
कर्म माझे..!
तू द ग्रेट मृदुंग उर्फ क्षण आहेस..
ज्याला फक्त कागदावर ओळी
खरडायचा अधिकार आहे..
वाचकांच्या भावना सिंचन
करण्याचा अधिकार आहे..
पण स्वतःच्या भावना खुल्या
करण्याचा नाही...
---------- एक जाचक माफ करा एक वाचक
भावनांच्या ओघवत्या प्रवाहात निभाव कुठे लागतो स्वतःच्या संयमाचा...धागं धागं उसवून झिजतो कायमचा...आतल्या आत, मनातल्या मनात आणि गालातल्या गालात काय काय ठेवायचे...भर होते, व्याप्ती वाढते पण वर्तुळाचा परिघ तोडका पडल्यावर या कोणाचे त्या कानापर्यंत येणे जाणे होतेच...शब्दात जिवंत असायला आटापिटा करावा लागत नाही...श्वास नसलेल्या शब्दाला ओलावा देणाऱ्या माणसांची सवय व्यसन असते तर हे व्यसन मला माझ्यापश्चात ऋणानुबंधांनी जुळलेल्या नात्यांसाठी आहे तसंच ठेवतांना...कागदाची खंत म्हणून मोकळे होण्याचा आज खरोखर मला काही एक अधिकार राहिला नाही हे निश्चित...माझा प्रवाह प्रवाहाच्या विरुद्ध आणि प्रवासही उलट पावलांचाच आहे...याची पूर्ण जाणीव असूनही दिसणारी व खलणारी उणीव पोकळीक म्हणून भरण्याचा आज मला अधिकार नाही...एक एक अक्षर लिहितांना हजारदा तुटावे लागते...सातत्याने तुटूनही ओठांनी हसणे मला विसरायचे नसते...कागद..पेन..शब्द उधळून भावनाची दररोज टोकाला टोक लागणारी घडी बसवायची असते... कशासाठी? अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते "तू द ग्रेट मृदुंग उर्फ क्षण आहेस, तुला अधिकार नाही." हे माझं कर्म आहे ज्याच्याकडून फळाची अपेक्षा न करता उपेक्षा करणे आणि ती आहे तशीच चौकटी बाहेर ठेवणे सोईस्कर आहे...कारण फाटका बाहेर टाकलेला पोळीचा तुकडासुद्धा परत उचलून आणायचा नसतो कारण मला तो अधिकार नाही...का? तर कर्म माझे..! :-(
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment