वारकऱ्यांनी माझ्या कागदावरही फिरकू नये त्रास होईल हां..!
♥
♥ क्षण..! ♥
सावळा..!
दिवस आला सावळा, वैष्णवही झाले गोळा
बरस आता आभाळा, नुसता होतोस काळा,
मी केलाय पुन्हा कागदावर शब्दांशी चाळा
माऊली वदलो ना मुखानी म्हणतोस बाळा,
का? कशाला? विणावे मीच तुझ्यासाठीही
आरोपांच्या, पत-प्रतिष्ठांच्या सर्रास माळा,
जमलाय पुढ्यात तुझ्या जमाव मी नाही रे
दरोडा म्हणून केला प्रसादाचा नास सगळा,
आयुष्याची कुठली शिक्षा कसला गुन्हा हा
पुरावे देऊन केला नाशिबाचा ऱ्हास वेगळा,
हातावरची रेष नात्यांची भेग बघतोय काs?
विचारतो सभ्यतेने मी तू करतो दास भोळा,
ये! रे विटेवरुन उतरून समोर येऊन बोल
फुकट उभाये करून जीवास चोळामोळा,
एक मुखाने विसर एका क्षणाने आठव रे
तुझेही कधी का वय केलेले आहेस सोळा,
उपाशी पोटाणे का कुणा भेटतो तू देवाs
तरी दारात येऊन संपन्न सांजेस सोहळा,
लीन ना झालो धन्य ना झालो दगड आहे
समक्ष येऊन ऐक मी तुझा फास कोवळा,
आराधनेत केला आळ लागतो म्हणे लळा
पिंडीला स्पर्शनारा तो तूच होतास कावळा..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment