♥
♥ क्षण..! ♥
अनोळखी प्रतिबिंब.!
प्रेमाच्या ओलाव्याने नात्यांचा धागा गुंफला जातो. करुणेने सानिध्याचा मायाळू स्पर्श केला जातो. ओढ लागते मनाला, ध्यास लागतो प्रत्येक क्षणाला आणि आठवणीचा धुंद गंध प्रत्येकाच्या श्वासात दरवळतो. हळवी सर पापण्यांच्या दाराबाहेर रेंगाळू लागते आणि हृदयाचे स्पंदनांशी अनियंत्रीत कारभार होऊ लागतात तेव्हा आरश्यात धूसर दिसणारं आणि पाण्याच्या तरंगांवर विस्कटलेलं आपलंच प्रतिबिंब अनोळखी वाटते..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment