Powered By Blogger

Wednesday, July 8, 2015

समतोल..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

समतोल..!

आयुष्याचा एक क्षण आनंदाचा असतो, तेव्हा प्रत्येक क्षणाला आनंदी बनवायचे असते. उत्कर्ष होऊन वृद्धी होते जेव्हा आयुष्याची; तेव्हाच आनंदाच्या ओलाव्याला अनुभवायचे असते..!
------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Saturday, July 4, 2015

एक ओळ 2

एक ओळ
♥
मनातली सल दूर केल्याचा आनंद, प्रितिच्या नौकेला वल्हविण्यास खूप असतो..!
..!------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Thursday, July 2, 2015

एक ओळ..! :-)

♥
एक ओळ..!

चरितार्थाची चौकट पेलता आल्यावर माणूस जबाबदारीच्या आघाड्यांवर समर्थ असतो..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Sunday, June 28, 2015

छळवनूक / पिळवनूक..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

छळवनूक / पिळवनूक..!

आजच्या आधुनिक काळात नात्यांच्या जवळपास सगळ्याच नैतिक परिभाषा बदलत आहेत. एकटे, एकाकी आयुष्य अथवा लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा समाज व्यवस्थेनी मान्य केलेली लग्न व्यवस्था! या बदलत्या काळात आयुष्य आलबेल होण्यासाठी ठराविक कारण वास्तवात काहीच असत नाही. घरोघरी मातीच्या चुली आणि भांड्याला भांड लागून होणारा तीळ-पापड कुणासाठी नवीन असत नाही. नावीन्याच्या वेष्टनात गुंडाळलेली नात्यांची गाठ  सैल होण्यासाठी अवधी फार लागत नाही.
नव्याचे नवदिवस उडून जात नाही तोच, स्वभावाचे कांद्याच्या पापुद्र्यासारखे सगळे पैलू आपापले स्वभावधर्म ठळक उमटवन्याचा हेका धरण्यात यशस्वी होतात. सासर-माहेर एकाच चौकटीत आपले स्थान निश्चित करतात. समाजाने प्रश्न करायला नकोत आणि कुणाच्या लेखीसुद्धा नसलेल्या आपल्या प्रतिष्ठेवर डाग उमटायला नकोत अशी दोन्ही घराण्यांची मानसिकता बनून जाते. लाडोब्यात स्वैर झालेल्या आयुष्यावर चौकट लादताच कैद झालेल्या पाखरासारखी प्रत्येकाची अवस्था होते.
प्रेमाची बदलनारी व्याख्या आणि स्वप्नवत हव्या असलेल्या संसाराची वास्तविकता यांचा आपापसात कसलाच ताळमेळ बसत नाही. शब्दा-शब्दावर विकोपाच्या भांडणांचे स्वरुप होते, साध्या-सुध्या विचारणांचे स्वरुप शंकेखोर वृत्तीला प्रवृत्त करते. एखाद दुसऱ्याचा असेल स्वभाव दोष मन आपली समजूत काढते; माहेराची अनुभवी शिकवण सांगते. आपल्याकडे दुर्लक्ष करण्याचे आपल्यांचे सर्व प्रयत्न यशस्वी होतात. दिल्या घरातून तिरडीवर बाहेर पडायचे प्रांजळ सल्ल्यात हुकूम लादलेला असतो.
शरीराचे अनैछेने लचके तुटतात. करून सवरून तुच्छतेची वागणूक देतात. शोषण म्हणावे किंवा आवडत नसेल म्हणावे तर समाज व्यवस्थेचे काटेकोर नियम पाळलेले आढळतात. नातं निभावतांना मात्र उपकाराच्या फसवणुकीची जाणीव होते. काय करावं? कुणाला सांगावं? निर्णय घेण्याचे सगळे मार्ग बंद होऊन गेलेले असतात. वाढलेल्या शरीराच्या वयाचे दाखले 'सरतील हे दिवसही', या स्वप्नाळू अपेक्षेत छळवादात कुजुन जातात. माती ही शेवटी मातीतच जाते. आयुष्याच्या स्वप्नांच्या राखेवर मातीसोबत एकरूप होतांना सुखी सुंदर आयुष्याची कल्पणा ही एक कुचेष्टाच झालेली असते. स्वतःची मदत स्वतःला करता येत नाही. कुणी बाहेर जायचे-पडायचे मार्ग दाखवल्यावर आपल्या स्वतःतच पुन्हा जगण्याचे त्राण उरत नाही. आहे तेच नशिब, पदरात पडलं न धन्य झाले अशीच पिळवनूक होत राहाते-राहिल या आयुष्याची..!
------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
'क्षणातच'
जळगाव हेड पोस्ट ऑफिस,
जळगाव-४२५००१
7387922843

(नोंद: स्वतःचे आयुष्य कसे जगायचे हा मार्ग दाखवणारा मी मार्गदर्शक नाही. या आयुष्याला जगून अनुभवून शब्दात व्यक्त करणारा मी एक दर्शक आहे..!)

Friday, June 26, 2015

स्तब्ध..! :-)

स्तब्ध..!
♥
हल्ली पाऊस एकाकीच
माझ्या घरी येऊन जातो,
आठवत नाही म्हणताच
दाराशी उभा राहून जातो..!------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Thursday, June 18, 2015

कागत तुमचा आहे..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

कागद तुमचा आहे..!

वापरायची वापरा..
नाही वापरायची नका वापरू..,
शाई माझी आहे..
शाई माझी आहे कागद तुमचा आहे..!

कागद तुमचा आहे..
चुरगळलेल्या कागदावर..,
चुरगळलेल्या कागदावर..
उधळलेल्या शब्दांची शाई माझी आहे..!

शाई माझी आहे..
शाईतून उमटलेल्या..,
कागदावर शब्द माझे आहे..,
कविता मात्र ही तुमची आहे..!

वापरायची वापरा..
नाही वापरायची नका वापरू..,
अर्थ माझ्या शब्दाला आहे
शब्दात भावना मात्र तुमची आहे..!
------------------------ मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, June 13, 2015

आर्त प्राजक्त..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

आर्त प्राजक्त..!

पहाटे पांढऱ्या चांदण्यांचा
माझ्या अंगणात सडा पडतो,
गंधाळलेला बेधुंद गंध मग
घरभर यथेच्छ दरवळू लागतो..!

सुरेल ताण छेडते कोकिळ
अन् दिवस माझा बकुळ होतो,
कर्दळी पानांवर पापण्यांना
काजळ एक काळा ढग लावतो..!

फांदी-फांदीवर थेंब उतरतो
अन् ओंजळ माझी मागत राहतो,
थेंबातून एक हात पुढे येतो
आभास स्वप्नांचा फसवत राहतो..!

एक क्षण प्राजक्ताचाच पाऊस
मला त्याचे आयुष्य परत मागतो,
आणि मी त्याची राख बागेतल्या
मातीत पुन्हा-पुन्हा पेरत राहतो..!
------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Friday, June 12, 2015

प्राजक्त गंधाळतांना..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

प्राजक्त गंधाळतांना..!

प्रत्येकाचा प्रवास सारखा नव्हे! एकसारखाच असतो... लुभावण्या वाटेच्या प्रेमात जो-तो पडतो... ओळख होते... मैत्री वाढते... ओढ लावणाऱ्या क्षणांशी नाते घनिष्ट जुळते... प्रेम म्हणजे काय? हे समजन्या आधी स्वप्नांचे मनोरे सजू लागतात... अपेक्षांचे जाळे गुंता वाढवू लागतात... पावसाच्या पहिल्या सरेसारखा प्राजक्त ओंजळीत एकनिष्ठ होऊन गंधाळू लागतो... कुणाला आवडू लागतो मखमली स्पर्श... हवाहवासा वाटतो कोवळा गंध... मोह दोन क्षणांचा आयुष्य नासवतो... येणाऱ्या प्रत्येक लाटेवर श्वासांना तू-मी उसवतो... तरीही प्राजक्ताचा गंध रित्या ओंजळीत दरवळतो... कारण प्राजक्ताच्या फुलांचे बरेच पावसाळे भरल्या ओंजळीतच कोमेजुन गेले असतात... भर पावसात मग प्राजक्त उभा-उभा जळतो... कोणी आठवतं तर कोणी विसरतं... पावसाच्या ओल्या चिंब दिवसात... ओंजळीत मातीनंतर एक कोमेजलेला प्राजक्तच उरतो गंधाळतांना..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Tuesday, June 2, 2015

लुटावलं..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

लुटावलं..!

कंबरेत दोन्ही हाते उलटे बांधून निघाले ते सफरीवर. तांबूस झालेला चेहरा न पिंगट लाल डोळे. चुन्याचा पांढुरकाही त्या पिकलेल्या केसांच्या अधीन राहिला. राजहंसाची सावकाश पावले उचलत गावाची वेश त्या पावलाखालीच अदबिने आली. नजर शून्य झाली. वडाच्या पारंब्यांवर आठवणीचे झोके झुलू लागले. धागे होते वडा भोवती गुंफलेले. आयुष्याच्या गाठीचा धागा मात्र जगोजागी उसवत गेलेला. सांज रेंगाळून निघुन गेली. चेहऱ्यावर ताणलेल्या सुरकुत्या काळोखात हरवून गेल्या. मनात चल-बिचल झाली, पावलांखालची जमिन निसटू लागली. वडाच्या पारावर कसं-बसं शरीरातले सारे त्राण एकवटून बसत, खिशात कोमेजत आलेला पाहाटेचा धुंद वेचलेला प्राजक्त ठेवत; ओठांवर उसने हसू आणत स्वतःशीच ते पुटपुटले, 'आज वडाच्या झाडाला सावित्रीने पूजलं नाही.' म्हणून सत्यवान स्वतःच आला. पण दुरदैव बघितलेस सावित्रीची परीक्षा घ्यायला यमाकडे सवड होती, प्रश्ने होती, नियतीची प्रमाणे होती, प्रथा या संकल्पनेची प्रबळ कारणे होती. सत्यवानाकडे मात्र सावित्रीसाठी काहीच नव्हते. यमासोबत ना लढण्याचे बळ ना कठोर निर्णय क्षमता. मधाळ गोड बोलण्याची पद्धत आणि हट्ट स्त्रिचाच दागिना. पारावर बसलेल्या सत्यवानाच्या ओंजळीतून प्राजक्तही निसटला. घेणं नव्हे देणं माहित असुनही ओरबाडनं सगळ संपल्यावरही तुझं सुटलंच नाही. संपूर्ण आयुष्य नासलं छे! नासवलं तरी किळस काही या आयुष्याची येतच नाही. लुटण्याची आणि लुटावण्याची पद्धत अशीच अनुरूप असते. मी क्षण उधळत जातो तू कणकण वेचत जाते..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Sunday, May 31, 2015

विरत नाही..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

विरत नाही..!

हल्ली काहीच उरत नाही
रात्रही लगेच सरत नाही,

तू आणि मी याच घरात
काही पेच स्मरत नाही,

साठवलं मी ज्याच उरात
देणंही तेच परत नाही,

रितं होतं सगळचं क्षणात
काही मनेच भरत नाही,

लाटेला बांधायचं मनात
आजही हेच ठरत नाही,

तू आहेस तुझ्याच जगात
मी ही इथेच मरत नाही,

मरण गाणे सख्याच गात
तू ही अरेरेच करत नाही,

शेवटी स्वप्न उद्याच हातात
मी ही खरेच धरत नाही,
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Sunday, May 24, 2015

षंढ पेला..! :-)

♥
भलेभले येऊन गेले मला संपवायला;
मी पुरून उरले, तो भला संपून गेला..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

मदिरा + पेल्याला / बाटली + पेल्याला =  षंढ पेला..!

Friday, May 22, 2015

कोरडे मन..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

कोरडे मन..!

हल्ली तुझी-माझी दररोज भेट होते; तरीही रोज एकमेकांना न भेटल्यासारखे लाटेवर धावणारे समोर एक क्षितीज उभे असते..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Wednesday, May 20, 2015

प्रमाण..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

प्रमाण..!

अस्तित्वाचे श्वासांवर काय प्रमाण होते
बरबटल्या नाशिबावर काय समान होते,

करून मी चोख हिशेब प्रत्येक क्षणावर
उरले आयुष्यावर काय एकसमान होते,

दिली-पेललीत हजारो लक्तरे आजवर
हैरान धिंडवड्यांवर काय सन्मान होते,

माझे क्षण लूटवले मी जगाच्या पाठीवर
लचके तोडण्यात यार काय रममाण होते,

चालत-वाढवतचं गेलो मी अंतरे निरंतर
माझ्या षंढ रुतब्यावर काय ईमान होते,

भाकड स्वप्नांचेही काय स्वाभिमान फार
रुतले बाण हृदयावर काय बेईमान होते..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Sunday, May 17, 2015

ती दोघं..! (जंजाळ)

♥
♥ क्षण..! ♥

लिखानाची फर्माईश : वाचक / जाचक..!

विषय - ती दोघं..! (जंजाळ)

तो उलघडून न उलघडनारा. ती मन मोकळ्या स्वभावाची. मन प्रत्येकाला असतं, हृदय सुद्धा प्रत्येकालाचं असतं. आजच्या गतिमान काळात कुणी कुणाला भेटणे जेवढे सोपे आहे तेवढेच एकमेकांचे असूनही एकमेकांचे नसणे आधुनिक काळाची सगळ्यात सोपी संकल्पना आहे. तो आणि ती प्रगत झालेल्या सोशल जगात असेच एकमेकांना भेटतात. मैत्री करतात, एकमेकांना समजून घेतात. वेळोवेळी प्रसंगावधान राखून एकमेकांचे बनू लागतात. वेळेच्या धावत्या चकतीवर मैत्रीचे सुंदर आवर्तन गळून जाते. मैत्रीच्या रुजलेल्या बिजातून प्रेम नावाच्या अजस्त्र रोपट्याला हळूहळू पालवी फुटू लागते.
मैत्रीनंतर एकमेकांचे प्रेम उगवलेल्या रोपाला नियमित भांडणाचे, भावनांचे, जिव्हाळ्याचे, हळवेपणाचे, भावविभोर-क्षणभंगुर स्वप्नांचे स्वतःला जमेल तसं खत-पाणी देत राहाते. काळ थोडा-थोडका नव्हे, दिर्घकाळ सहवासाचा आनंद लुटू देऊन पुढे धावत राहातो. येणाऱ्या-जाणाऱ्या कित्येक आसवांच्या पावसाला मनातल्या मनात पेलून ठेवतो. कोवळया हृदयासोबत दगडाचे काळीज घडवू लागतो. दोघांना ठाऊक असतं आपण एकमेकांचे होऊ शकणार नाही. ठरवलं कितीही तरी आपले नाते जोडू शकणार नाही. नाते जोडले तरी दुखावलेली मने काळासोबतच्या प्रवाहात आपल्याला शल्य देणे चुकवणार नाही. तुला-मी, मी-तुला मिळवायचे म्हणून नाही, एकमेकांना गमवायचे म्हणून एकमेकांवर प्रेम करायचे.
लुभावण्या, निर्मळ, नैतिक नात्याला मग एक दिवस दृष्ट आपलेपणाचे सोंग घेऊन बसलेल्या समाज व्यवस्थेची लागते. विसरू न शकणारे दोघे एकमेकांना स्वतःचे मन मारून विसरून जातात. आपले आयुष्य कुणा परक्याच्या स्वाधीन असलेल्या चौकटीत समरस करून शरीराचे व्यवहार कोरडेपणाने चूकते करतात. ती ही तिच्या संसारात आणि तो ही त्याच्या कुटुंबात. मनातली पोकळी वेदना होऊन मुखावर देखाव्याची स्मित रेषा दोघेही बनवू लागतात. आपल्या इच्छेने व्यतित केलेला प्रत्येक क्षण समाज व्यवस्थेने नैतिक व्यवस्था विवाहात रूपांतरीत केलेल्या मालकी हक्कात एकमेकांच्या आठवणींना उजळा देऊ लागतात.
आठवण स्वतःचे सावट इतके प्रबळ करते की, पुन्हा दोघांना एकमेकांची ओढ लागते. मनाचे मनाशी असलेले, कुठल्याही अपेक्षेशिवाय निभावलेले प्रेमाचे नाते जगाच्या-समाजाच्या लेखी अनैतिक ठरू लागते. जग आणि समाज म्हणते तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराचा काय दोष? तुमचे प्रेम होतेच तर लग्न केले तरी का? गुंता अधिक वाढण्या आधीच एकमेकांना स्वीकारले असते. अजुन दोन आयुष्य बरबाद केले कशाला? या वरचढ तुमचा जोडीदार कुठे तुमच्याशी अप्रामाणिक आहे? की, तुमच्या जबाबदारीत, कर्तव्यात कमी पडत आहे?
मनात भरलेली बाहुली आणि मनात भरलेला बाहुला एकच असते/असतो. बुद्धी मनाला नियंत्रित ठेवत नाही. मन स्वतःचा हेका सोडत नाही. मनाला वाटते तेच बुद्धीजीवी माणसे करतात आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसतात. आयुष्य खेळणे नसते आपल्या मनासारखा खेळ खेळता आला नाही म्हणून भातुकली मोडायची नसते. मोडू पाहणारी भातुकली सावरायची असते. आपली चौकट स्वतः आखायची असते. कुणाच्या कुंपनात आपण अतिक्रमण करायचे नाही. कुणाला आपल्या चौकटीत अतिक्रमण करू द्यायचे नाही. राहाता राहिला प्रश्न एकमेकांवरच्या प्रेमाचा आयुष्याचा एक दुःखद काळ म्हणून आठणीत ठेवण्यापेक्षा आयुष्याचा एक सुखद काळ म्हणून लक्षात ठेवायचा. शक्य तेवढे अजुन निर्बंध घालायचे मनावर.
नात्यासाठी समाज मान्यतेचा आणि आपल्यांच्या ऋणांचा आदर म्हणून केलेल्या व्यवस्था विवाहाचा अपमान करणे आपल्यावर घडलेल्या संस्कारांवर बोट उचलते. आपली नाती आणि समाज यांचे एकत्रीत जग स्वतःत आपल्याला स्वीकारण्यापेक्षा स्वतःपासून तोडण्याची संधी शोधत असते. आपली संस्कृती निर्भिड जगायचे शिकवण्यापेक्षा दुबळे-कमकुवत-प्रतिकार शून्य पराधीन मनुष्य घडवत असते. आपले आयुष्य आपल्याला कसे जगायचेय हे पंख फुटतांनाच, पंखात जोर एकवटत असतांनाच निर्णय सक्षम आपण व्हायचे असते. आयुष्याचे चांगले होऊनही आणि आयुष्याचे वाईट होऊनही; आपण आपल्या लेखी 'जे चांगलेय ते चांगलेय, जे वाईट आहे ते वाईट आहे' असेच सर्वांचे हिशेब चूकते करतो मग हे जग आणि हा समाज आपल्यामुळे आपल्यासाठी आहे. त्यांच्या आधीन राहून गुलामी करणे पत्कारायची की, स्वतःच्या पुढ्यात समाज व जगाला झुकवायचे स्वतः ठरवायला हवे आहे.
प्रतिष्ठा समाज देत नसते. स्वाभिमान जग देत नसते. आपल्या स्वतःच्या वेगळ्या अस्तित्वामुळे विविध परिस्थितिशी झटण्यामुळे आलेला अनुभव आपला सन्मान करतो तेव्हा जगाला आणि समाजाला आपल्यामुळे स्वतःचे अस्तित्व आणि प्रतिष्ठा प्राप्त होत असते. या आपल्याच समाजाला आपल्या परजातीय किंवा प्रेम विवाह यांचा काय आणि कसला फरक पडतो? याचे उत्तर समाज भूषणांकडेही नसते. चालत आलेल्या फडतुस परंपरेच्या नावाखाली बहिष्कार करून वाळीत टाकण्याचा केविलवाना प्रकार होतो. फारफार तर समाजातून उपेक्षित केले जाते. असे समंजस निर्णय समाजाची गादी परंपरेनुसार पुढे नेणारे घेऊ शकत नाही. आपला कायदा हा प्रत्येक स्तरातल्या सामान्य माणसाचा कधीही म्हातारा न होणारा बाप आहे. फक्त या कायद्याला तंतोतंत पाळणारी कायद्याची पिल्लावळे ही स्वतःला विकत असतात यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे आहे.
आपल्याला आपल्या मनासारख जगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. ठरवायचे, स्वतःला स्थिर करायचे आणि मनासारखेच आयुष्य जगायचे किंम्मत मोजून किंवा मोबादला देऊन आज या आधुनिक जगाची समाजाप्रति, आपल्यांच्याप्रति अभिरुढ प्रथांच्याप्रति मनात कणवं फारसे उरलेले असतेही आणि नसतेही. प्रेम निभावता नाही आले हरकत नाही. आपल्यासोबत कोणी जगतोय आणि आपल्याला जगवण्यासाठी झटतोय त्याच्याशी बांधली गेलेली आपली गाठ सोडण्यात सूजाणता नसते. मोहाचा क्षण ओसरल्यावर अर्थ कशालाच उरत नाही आणि एकदा आयुष्याचे दूध नासल्यावर ते फेकण्याच्याच पात्रतेचे (लायकीचे)उरते बाकी आयुष्य ज्याचे त्याचे गरज म्हणून नाते जोडले तर गरज संपल्यावरही निभावायचे. प्रेम करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळत असते पण नशिबात प्रेम आयुष्यभर लिहिलेले नसते. मनातले न बोलताच समजणे व स्वप्नांचा एक मूर्तबिंदु कुणा एकातच पाहाणे हा हट्ट असतो. यात आपले प्रेम कितीही मर्यादेच्या चौकटीत बसवले तरी जग आणि समाज त्याला अनैतिक म्हणूनच हिनावते. योग्य वेळेचा योग्य निर्णय घ्यायचा आणि त्यावर आयुष्यभर ठाम राहायचे. आयुष्याची पुढची पाऊले मागच्या पावलांची ठसे मिटवूनच उचलायची भुतकाळाचा प्रभाव आपल्या वर्तमानावर पडू द्यायचा नाही. भुतकाळाला मागच्या मागेच सोडून पुढच्या आयुष्याची मुहूर्तमेढ रोवयाची तेव्हाच आपले स्वतःचे घर आणि आयुष्य आपण सुंदर घडवू शकतो. मनात भरलेली व्यक्ती येवढ्या सहजा सहजी मनातून निघत नाही. याचा अर्थ असा नव्हे की, निघूच शकत नाही. काळ उत्तम औषध असले तरी या औषधाचा परिणामकारक कडवट घोट हा भुतकाळातल्या आठवणींच्या साहाय्यानेच  स्वतःला पाजायचा असतो. आयुष्यात प्रेमाच अस्तित्व पुढे अप्रत्यक्ष स्वरुपातच असतं. त्याचा प्रत्यक्ष अट्टाहास करणे हा नैतिक ठरत नसतेच..!

"लेखकाला कुठला समाज नसतो आणि धर्म मुळीच नसतो". लिखानासाठी विषयाचा आशय दिल्याबद्दल वाचक / जाचकाचे आभार. उलघडूनही गुंता मुद्दाम तसाच ठेवलाय प्रत्येक ओळीचा स्वतंत्र अर्थ काढाल तर आयुष्य जगणे सोपे होईल. काय केलं होतं? यापेक्षा काय केलं आहे! या चौकटीत आयुष्याच्या प्रश्नांना ठेऊन उत्तरे स्वतःला द्यायची जगण्यात आणि जगू देण्यात मज्जा काय आहे तेव्हाच कळेल..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
*पत्र व्यवहारासाठी पत्ता :
'क्षणातच", पि.ओ बॉक्स क्रमांक 67, जळगाव हेड पोस्ट ऑफिस, जळगाव 425001

Monday, May 11, 2015

नाणे..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

नाणे..!

नाणे नवीन असते तोवर ते खणकते. नाणे थोडे जुने झाल्यावर प्रसंगावधान राखून चालते. नाणेच ते शेवटी अनुभवाचे व्याज स्वतःवर लावते. काळ पुढे जातांना गंज स्वतःवर ओढू लागते. चढले-उतरले-वधारले-घसरले कित्येक बाजार बसव्यांचे मोल स्वतःच्या अस्तित्वात ठेवते. कुठे रोखठोक खणकते, कुठे उधारीत अडकते. एक नाणेच आयुष्याचे अचूक हिशेब चूकते करते. याच्याकडून त्याच्याकडे हस्तांतरित होत राहाते. घरंगळत गेले जरी नाणे पावलाखाली कधी आले नसते. अदबीने झुकून कंबरेत अन् हातांनी ते नाणे उचलून माथे गाठले असते. काळ सरला तरी मोल त्याचे कधी घटले नसते. पुरातन वास्तुचे उत्खनन करतांना सापडले जरी तरी स्वतःच्या भविष्याचे मोल ते स्वतःच करुन श्रेष्ठ नाणे बनते. राजा असला तरी नाणे त्याचे गुलाम नसते. गुलाम असला तरी नाणे त्याचे राजे नसते. सत्ता काय? साधे विरोधी पक्षही त्याच्या पुढ्यात काही नसते. जागतिक मंदीत देशोदेश जातात नाणे आपले आपल्या जागी ठाम असते. एका बोटाने झुकत नाही, दोन बोटांनी वाकत नाही, मुठीत ठेवले घट्ट धरून तर मूठ बंद करत नाही. नाणे कुणाचेच असत नाही. आभाळात उडवले तरी दैवाचे ते होत नाही. प्रतिमेशी ठेवले दैवाच्या तरी हळदी कुंकवाच्या लाल रंगासोबत स्वतःवर घामाचे गंज चढवणे नाणे विसरत नाही. काळ मग मी माझा कसा म्हणू? बरबाद झाल्या नाण्यावर व्यवहार कसल्या भाकड भविष्याचे करू? गंज उतरवून शरीरावरच्या नाण्याचा नशिबाचा हिशेब उधारीने कसा फेडू? नाणे...नाणे...नाणेच तुझे काय? माझे काय? नाणे स्वतःचेही होत नाही..!

-------------------------- (पियुष)मृदुंग™
kshanatch@gmail.com

Sunday, May 10, 2015

"आई म्हणजे जखमेवरची हळुवार फुंकर"..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

"आई म्हणजे जखमेवरची एक हळुवार फुंकर"..!

काळ बराच पुढे गेलाय आजची आई आधुनिक काळातली कर्तबगार मॉम मध्ये बदलली आहे. स्त्री संरक्षण आणि सुरक्षा आजच्या काळात महत्त्वाचे असूनही आपल्या प्रशासनाची अवस्था केविलवानीच आहे. असो, प्रशासनाच्या दुखऱ्या नसेवर बोट नाही ठेवत. आज जागतिक मातृत्व दिन काल आणि उद्या मातृत्व स्वीकारणाऱ्या प्रत्येक स्त्रीला भरभरुन शुभेच्छा.
काळ बदला तसा आई या शब्दांमधला ओलवा देखील कोरडा पडत चालला आहे. आजच्या तडफदार तरुणाई सोबत आई देखील मॉम या सज्ञेत मोडर्न होण्यात एकरुप झालेली आहे. जागतिक स्पर्धा जगासोबत सुरु तर आहेच पण अलिकडे आईची मॉम होण्याची स्पर्धा विलोभनियतेने वाढली आहे. पूर्वी आईच्या पदराखाली मायेचा ओलावा, प्रेमाची छाया, करुणेचा सागर दुथडी भरून वाहत असायचा. आज आईच्या पदरात स्पर्धेचे टेंशन, अधुनिकतेची धडपड, शर्यतीत जिंकन्याचाच अट्टाहास आणि 'वेल मोडर्न कल्चर्ड एडव्हांस चाइल्ड' निपजून, स्वतःच्या सगळ्याच संवेदनांची आहुती देऊन, भावना शून्य होण्याच्या प्रगतीकडेे मॉमचे पाऊल पुढे पडत आहे.
याचे प्रमाण फार नसले तरी निदर्शनात न येण्यायेवढे कमी देखील नाहीये. धावत सुटलेय सगळेच! मातृत्व सुखाचे क्षण होण्या ऐवजी कोरडेपणाचे लादनेच झाले आहे. यात दोष एकट्या स्त्रीचा देखील नाही. पुरुष प्रधान देशात मुलगाच हवा या बुरसटलेल्या शुद्र विचारसारणीचा आहे. आजची मॉम सरकारी क्षेत्रात कार्यरत असो किंवा कार्पोरेट क्षेत्रात उच्च पद, बक्कळ इनकम पुरुषाच्या बरोबरीने कमावत-भूषवत आहे. हे वास्तव दिसायला जेवढे सुखद आहे या मागच्या काहाण्या तेवढ्याच काळजाला चरे पडणाऱ्या आहेत.
निव्वळ मुलांना जन्म दिल्याने पुरुषाचे आणि स्त्रीचे कर्तव्य संपत नाही. आपल्या मुलांना सभ्यतेचा मुखवटा ओढुन घडवण्यात सभ्य संस्कारांचा अंश पूर्वग्रह दूषितसारखा उपजत त्यांच्या वर्तनात व चरित्र्यात येत नाही. प्रगती म्हणून वंशवेल वाढवण्यापेक्षा संस्कारांची वृद्धी म्हणून एक पिढी घडवण्याची आजच्या युगाची खरी गरज आहे. बघा..विचार करा..मातृश्री म्हणून आपली कर्तव्ये निभवा. आईचीच कर्तव्ये म्हणून हे सांगणे नाही, आजच्या आईने अत्याचाराचा विरोध केला तर उद्याची आई सुरक्षीत या जगात श्वास घेईल तेव्हाच पुरुषाची पुरुष प्रधान मानसिकता बदलेल. आई म्हणजे जखमेवरची एक हळुवार फुंकर, आई म्हणजे घर, आई म्हणजेच पदर, आई म्हणजेच कोसळलेल्या आयुष्याचा न ढासळणारा शाबूत आदर. पुन्हा एकदा मातृ दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!

------------------------- (पियूष) मृदुंग™
kshanatch@gmail.com

Friday, May 8, 2015

उपाशी मरण..! :-)

♥
♥ क्षण..! ♥

उपाशी मरण..!

माझा असलेला कोरा पान देखील भरलेला आहे. तुला वाचयची भूक लागली तर डोळे उघड. उपाशी मरण येणार नाही तुला कधी..!
--------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com