क्षण..!
ओढ..!
त्या दिवसा नंतर आमच्यात फारसे बोलणेच झाले नाही...गरज तिलाही वाटली नाही न... आवश्यक्ता मलाही वाटली नाही...बस एकमेकांना पाहून नजरच चुकवत गेलो दोघेही...जणू गुन्हाच केलाय एकमेकांशी बोलूण...स्पष्ट असे काही नव्हतेच कधी काही...बस ओढ होती एकमेकांची...एकमेकांना जाणून घेतल्यावर शब्द कुठे आमचा एकमेकांना असा भिडलाच नाही..!
सुरुवातीची हुरहुर न कासावीस होणे एकदम बंदच झालेय...एकमेकांचा विचार करुन आता कुठे काय करत असणार माहित झालेय...अवाक्षर बोललो नाही ना जरी मुखाने तरी पानभर लिहिले जाणार हे कळतेच...क्षणभर येऊन ती आसवांचा पाऊस पाऊस खेळते...कागद चिखलासारखा करुन ठेवते...चुरगाळून मी ही कागदाला तिचा अश्रु बघुन घेतो..!
तक्रार नाही न मागणेही आता काहीच नाही...सुटत गेली प्रश्न म्हणून आता उत्तरासाठी एकही प्रश्न नाही...विचारावे काही तर उत्तर काय देणार हे आधीच माहित असते दोघांचे दोघांना...त्यामुळे आता आमच्यात तो औपचारीक प्रश्नही उरला नाहीये..!
तरी आम्ही दोघ एकमेकांची चातकासारखी वाट बघतो...बोलणार काहीही नसलो तरी कागद एकमेकांना देणार असतो...माझ्या माघारी ती तिच्या आसवांसकट उपस्थिती लावून जाणार अन् मी...तिच्या माघारी येऊन जुणा कागद नेवून दुसरा अजुन एक कागद ठेवून जाणार...दरवेळी माझा कागद एकच असतो...दरवेळी तिचा थेंबही एकच असतो...बरेच काही संपुनही आता बरेच काही सुरुही झालेय...तिला कागदाची ओढ लागलीये...मला तिच्या आसवांची ओढ लागलीये...दररोज नव्याने नव्या कागदावर एक क्षण असतो माझा...त्याच कागदावर ओघळलेला एक अश्रू असतो तो तुझा..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment