क्षण..!
असच काही तरी..!
कागदावर तसे कुठलेही विषय मत मतांतर होवून मांडले जात असतातच. तरीही एखादा विषय आवडीचा असतो किंवा खोलवर रुतला असतो त्याच्या चौकटीतला प्रभाव कागदावर अगदी सफाईदारपणे राजरोस उमटत असतात. यात एकाच विषयाची अथवा एकाच आशयाचा चोथा पुन्हा समोर आल्यासारखी कधी कधी आपली अवस्था होते. यात वावग असे काही एक नसते. बदल नेहमी अपेक्षीतच असतो परंतु त्या एखाद्या विषयाला सतत मांडून सराईत झालेला आपला हात इतर विषयांच्या मानाने त्या एकाच विषयात स्वत:ला सहज समरस करुन मोकळा अनुभवत असतो. कागदही संतुष्ट होत असतो अन् जे आधीच लिहून घडून गेलेय त्या शेवटात अजुन एक सुरुवात रुजलेली असते. त्यामुळे एकाच विषयाचा कंटाळा करण्यापेक्षा तो एकच विषय सतत चघळून साखरेसारख एक तर गरम चाहा मध्ये विरघळावे तरी अथवा त्या साखरेच्या दाण्यांना मुंग्या तरी लागाव्यात. कुठली तरी अर्थहीन गोष्ट एकदिवस अर्थपुर्ण अनुभव देतच असते कारण बस! आपण तोच विषय चघळायचा कि मुंग्यांची वाट पाहायची आपल्यावर असते..! (विनोदात घेतले तर साखरेची महागाई मुंग्यांच्या पोटात स्वाहा करणे आपल्याला रुचनार नाही चघळणेच न विरघळणेच त्याचा शेवट चव ठेवून अथवा घेवून)..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment