Powered By Blogger

Friday, March 28, 2014

स्वगत..!

क्षण..!

स्वगत..!

ज्या गोष्टी जिथे सुरु झाल्यात तिथेच वाळवी सारख्या वाढत असतात. कधी तरी येवून धुळ झटकून निटनेटके करावे तर सगळेच अर्थहीन झालेले असतात. तिथे हतबल होण्यापलीकडे काही एक करता येत नाही. डोळ्यासमोर असलेलं धुळीने माखलं असते तर हातात क्षणभर घेवून त्या आठवणी टवटवीत फुलासारख्या मनात हसत असतात. क्षणभरच हसणारे ते फुलं वास्तवात कोमेजलेलं असते. आयुष्याचे ते हाती लागलेलं पुडकं होतं तिथेच असण्यात मग सार्थ वाटते. व्यर्थच नको तिथे अतिक्रमण केलं अन् असलेलं सगळ पुन्हा बेढब करुन घेतलं असे नंतर मनात येतं राहाते..! उगाचच..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment