Powered By Blogger

Saturday, March 29, 2014

स्वगत..!

____/|\____
क्षण..!

स्वगत..!

हल्ली मैत्र प्रस्ताव फारसे पाठवत नाही. आलेले मैत्र प्रस्ताव स्विकारल्यावर अनामिक दडपण अन् एखादा दबाव पडलाय असे वाटून जाते. ओळख वगैरे पुढे फार अशी वाढत नाही. नमुद केलेली जुजबी माहिती तेव्हढीच वाचून घेतो. कदाचित माझं वजन वाढतंय कि लोकप्रियतेचा अजुन एक उंबरठा गाठतोय कळत नाही. समोर आलं स्विकारलं, वाटेत आलं ओळखीच बनलं, प्रवासात नकळत समोरा-समोर आलो म्हणून सहप्रवासी झालो. चालत राहिलोय म्हणून जरा थांबून मागचा राहिलेला एक श्वास घेतला. बाकी फार काही नाही ये-जा सुरुच असते. अवघडल्या सारखे कधी कधी वाटते पण ठीक आहे! फार काही असण्यापेक्षा येव्हढ तरी खुपच आहे..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment