क्षण..!
टोकं..!
नात्यांच्या धाग्याची टोकं मी सोडून दिली...ताणून धरुन काय करणार होतो...होय कदाचित थोडे मी ताणूनही धरले होते...वाटले होते तू तरी सैल सोडशील...पण कधीच वाटले नव्हते मलाच सोडायला भाग पाडशील...हवं होते जसे तुला तसेच तू शेवटी घेतलेस..!
ताणून इतके धरलेस कि ते तुटेल याची साधी पर्वाही तू केली नाहीस...माझा स्वभावही असा कि त्या टोकाची यातना मला पाहावली नाही...तुला जिंकायच छे! हरवायचे होते मला म्हणून मी धरून ठेवलेला माझा टोक सोडून दिला..!
त्या धाग्याला आठवणीत साधा स्पर्ष करायची मला पुन्हा इच्छाच झाली नाही...तुझं समाधान त्यावरही कुठे झाले...पुन्हा येवून त्या धाग्याला जागोजागी तू गाठी मारल्या...त्या गाठीत मला बांधून ठेवायचा प्रयत्नही केलास निश्फळ..!
गमवलं अन् संपलं सगळं बोलून माझ्यामुळे झालं 'आरोप'ही केलास...केलं ते ही मी सहन न दुर राहिलो...तुला जे हवंच होतं ते देवून मोकळा झालो...संतुष्ट तू त्यावर आजही नाहीस...एखादा दुवा मिळतो का माझ्या पर्यंत पोहोचण्याचा सतत शोधत राहातेस..!
आज मी ही तुझी पर्वा करत नाही अन् तुला साधी भिकही घालत नाही...जगातली फक्त एक व्यक्ती आहेस तू माझ्यासाठी...माझ्या आयुष्यात आज तुला कवडी मोलाचेही महत्व नाही...जिथे कुठे होते तुझे साम्राज्य ते बाटवून तुझं अस्तित्व खोडून बसलो आहे...येवून कितीही झट अथवा झगड माझ्याशी तुझ्या ओल्या शब्दाला माझी साधी नजरही आता दुजोरा देत नाही..!
कठोर झालोय अथवा निर्दयी झालोय म्हण...तुझ्या म्हणन्या बोलण्याने मला फरक पडत नाही...तू तुझी दिशा असलीस तर मी ही माझी नशा आहे...तुझ्यापेक्षा माझाच अंमल माझ्यावर आज जास्त आहे...शेवटी मी सोडलेलं टोक तुझ्या टोकापासून तू गुंडाळून घेतलेस...तो धागा आता कुजला आहे...जपून ठेवण्यात काही एक अर्थ उरला नाहीये...मी माझा समुद्र अन् किनारा बनलो आहे...तुझी तू लाट बनून फक्त आदळत असतेस...आज तरी टोक जुळतेय का बघत असतेस...टोकावरच पडलेली गाठ तू उगाचच माझा असा काठ मी...जिव लावून जिवाला तुझ्या...मिळवणार काय आहे मी...दोन टोकावरचे फक्त दोन बिंदूच...तळमळणे बघायचे तुझे सारे हेतूच..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment