Powered By Blogger

Monday, February 13, 2012

*♥* एक प्रेम कथा *♥* १४ फ़ेब्रुवारी,

*♥* एक प्रेम कथा *♥* १४ फ़ेब्रुवारी....

सगळ्यांबरोबर मी पण या दिवसाची अतुरतेने वाट पहात आहे... कारण तस खास नाहीच "प्रेम" या शब्दांपासुन लांब असलेला मी...नकळत कधी कसा जवळ आलो कळलच नाही...
"प्रेम" फ़क्त आईच्या पदरात, ताईच्या राखीत अन बाबांच्या रागवण्यातच मी अनुभवत होतो... आणि अनुभवत राहीलोही असतो...पण... एकट्या आयुष्याची जिवघेनी वळने घेतांना
अपघात होतातच...आणि तो अपघातही माझ्यासारख्या सरळ मार्गी मुलाच्या जिव्हारीच जखम करतो...काय नव्हत माझ्याकडे त्या अपघाता पुर्वी...रात्रीची सुखद निद्रा, विचरांच सुटसुटीत
जाळ, अयुष्याच्या सा-याच प्रश्नाची उत्तरे होती अगदी तोंड पाठ...बिंधास्त महाविद्यालयीन जिवन मनमुराद जगत होतो... मित्रांसोबत लेक्चर बंक करुन पाहीलेला सिनेमा, गाडी वरुन सुसाट ८०/९० च्या वेगाने हाय-वे वर बिंधास्त ट्रकला मारलेला "कट", पावसाच्या टपो-या थेंबात भिजत अख्ख शहर भटकायचो... दोन बाकांच्या कॅंटीन मधे पिलेली कॉफ़ी... कॉलेज मधे लेक्चररला माझ्या टवळक्यांनी केलेले हैरान...सार सार काही हरवलय... त्या "एका" अपघातामुळे...

१४ फ़ेब्रूवारीलाच सहसा कोलेज आणि क्लासला मी जायचो...प्रेमात असलेले माझे मित्र त्यांचे बेत आणि बंक मारायचे सर्वे प्रकार जमल्यास उधळुनच लावयचो... आपल्याला खटकायच बुवा प्रेम आहे दोघांच एकमेकांवर मग आजच्याच दिवशी का म्हणुन एन-ज्योय??? तसही ख-या प्रेमात प्रत्तेक दिवस हा नवीच सुरुवात रोज घेवुन येतो, अगदी भातुकलीच्या खेळासारख एकच डाव दोघांनी रोज नव्याने मांडायचा, हवतस रंगवयचा जोडीला स्वप्ने, सुख, दुखाची जोडनी करायची थोड हसत, थोड रडत, रुसत, मनवत प्रेमानीच डाव सावरायचा असतो...त्यात कशाला १४ फ़ेब्रुवारीचच निमित्त पाहीजे?? माझ्या या प्रश्नाची आणि उपदेशाशी माझ्या मित्रांना काहीही कौतुक नव्हत एकच उत्तर चिटकवायचे "प्रेमात पडशील ना कधी तेव्हा कळेल..." असा राग येयचाना एकेकाला उचलुन फ़ेकाव वाटायच...अगदी सध्याच्या "सिंघम" इस्टाईल "आईच्या गावात" {अन बाराच्या भावात} हीरोगीरी तशीपण कधी जमली नाही... कुनाच्या वाटेला कधी गेलोच नाही त्यामुळे मारामारी आणि थोबाड लाल होयची वेळच आली नाही... बाकी मित्रांच्या कॄपेने बरेच प्रसंग अनुभवायला मिळालीत..अगदी "फ़िल्मि" स्टाइल आणि "फ़्रि स्टाइल" ची पंगेबाजी त्यातही भांडन मुलीवरुनच असायची, चांगले वाईट सगळ्यांबरोबर माझी मैत्री त्यामुळे कोम्प्रोसाठी दोन्ही पक्ष मलाच बळीचा बकरा बनवयची, कारण एका मुलीचे चाहते दोन मुल असु शकतात...पण दोन मुलींना एकच मुलगा अवडेल अस कुठ होतच नाही... आलीया भोगासी अशीच अवस्था होयची शब्दा-शब्दावर हमरी तुमरी आणि मारामारीवरच येयची... उगाच दिवसाच खोब्र नको {आणि जमा झालेल्या जमावाला निराश परतवाव लागु नये} म्हणुन "आधी एकमेकांना यथेच्च तुडवुन घ्या त्या नंतर बोलुन सोडवावस वाटेल तर सांगा..." असाच पवीत्रा घ्यावा लागायचा नाही म्हंटल तरी उगाचच कोलेजच वातावरन दुशीत नको आणि ज्या दोघांच एकमेकांवर प्रेम आहे त्यांच प्रेम गुलदसत्यातच राहाव म्हणुन एकेकाशी थोड दुर जावुनच बोलाव लागयच... त्यात ज्या मुलीसाठी भांडन होत आहे तिची अवस्था बिकट आता माझा सोन्या मार खानार म्हणुन यमुना गंगेला डोळ्यातुन येयला पाचारन करायला सुरुवात... च्यायला काय कटकट आहे असा वैताग येयचा ना वाटायच मारा एकमेकांना साल्यांनो उगाचच मैत्री केली प्रेमात पडायच तर आलेला प्रसंग निस्तरायलापण धजवायच... कॉम्प्रो होणारच रे पण तुमच प्रेम आहे हे अख्ख्या जगाला कधी ना कधी माहीती पडणारच आहे...तुम्हीच छाती ठोकुन बोलतात ना बाहेर कोणी बघीतल तर "प्यार किया तो डरना क्या...जो होयेंगा देखा जायेंगा..." मग आता का?? निघाला तिच्यावर तुझ्या इतकच मनापसुन प्रेम करनारा एक वीर तर बिघडल काय?? तु हिम्मत करुन विचारलस {पटवलस} ना तिला आणि तिलापण तुच अवडलाय ना मग उगाचच भांडतोय कशाला?? जिच्यासाठी भांडाताय जावुन तिच्या समोर उभे राहा आणि विचारा आमच्या दोघांपैकी कोण {बनेगा तेरा पती} ??... तिच ज्याच्यावर प्रेम आहे ती त्याच नाव घेईल दुस-याने पुन्हा त्या रसत्यावर चालु नये जो त्याचा नाहीच आहे... तशी माझी मित्र चांगलीच होती विचार करनारी होती आणि विशेष माझ म्हणन एकनारी होती त्यामुळे समजवन फ़ारस अवघड जायच नाही... मुलींपासुन मी लांबच असायचो मैत्रीचे नाते सुद्धा नको बाबांची सक्त ताकीद होती अगदी ११वी जुनियर कोलेज मधे ऍड्मिशन नंतर कोलेजला जान्याच्या पहिल्याच दिवशी १ तासाच लेक्चर कोलेजच्या दुस-या वर्षापर्यंत तसच्या तसच लक्षात होत आता त्यातल्या दोन ओळीच आठवतात "मुलीच्या नादाला लागायच नाही, लागलाच तर जो रस्ता घरा पर्यंत येतो त्या रसत्यावरुन घरी येयच आणि सरळ सांगायच, पळुन जायचे, मरायचे, घर सोडुन जायचे प्रकार करायचे नाहीत...तु मुलगा म्हणुन तुला ही सुट नाही तर जबाबदारी आहे आमच्याशिवाय तु राहाशील रे पण आम्हाला तुझ्यासोबतच राहायचे आहे कळल जा आता... आता बाबांची एव्हडी सुट मिळाल्यावर मला अनखी काय हव होत?? रागीट बाप म्हणुन थोडी धाकधुक होती मनात पण आता तेव्हडी नाही राहीली... तेव्हाच ठरवल कधी प्रेमात पडेल ना, तर तिच्याच जी स्वताहुन मला प्रपोज करेल... मी प्रपोज केला तर मला नकार भेटेलच नाही असे नाही पण लाखोंना प्रपोज करुन एक होकार मिळवण्यापेक्षा जी मुलगी मला प्रपोज करेल ती पण लाखात एकच असेल ना बघुया नाहीतर आपल्या आई बाबांसाठी ठेवुया रिटयरमेंट नंतर राखीव काम मुलगी शोधण्याचे {पाहाण्याचे}... वेल मुली येव्हड्या पण बिंधास्त नसतात की येतील आणि प्रपोज करतील... साधी मैत्री करायला पण भाव खातात आणि प्रपोज छे...! मुलीच्या जातीला शक्यच नाही... कॉलेजच दुसर वर्ष लागल सगळ उत्तम रुटीन मधे चालु होत...तेच कॉलेज तेच मित्र सगळ काही तेच होत... लेक्चर करायचा माझा मुड नव्हता उगाचच माझ्या टवाळक्यांनी कंटाळून लेक्चररने मला बाहेर काढायला नको म्हणुन पार्कींग मधे गाडीवर बसलो होतो आणि तितक्यात माझ "अपघती वळन" {सुंदर असणा-या मुलींना माझी खास उपमा} कोलेज मधे दिसल कदाचीत नवीनच होती ती पहीले कधी दिसली नाही... पिंक कलरची सलवार तिच्या गो-या सडसडीत बांध्याला शोभत होती, नक्षीदार भुवया, चेह-यावर अलगत येनारी केसांची बट, लाल चुटुक होट एकदम झकास माझ मन अगदी प्रसन्न झाल तिला पाहुन...पण तस माझ लक्ष तिच्याकडे नव्हतच तिच्या मागुन घाई-घाईने येना-या माझ्या ताईकडे होत तिला क्लाससाठी उशीर होत होता आणि तिची गाडी सुरु होईना म्हणुन मला म्हणत होती क्लासला सोडुन दे आणि गाडी बघुन घे...मग काय ताई साहेबांची आद्ण्या कोन टाळनार चल म्हंटल आमच बोलन तस मित्र मैत्रिनीसारखच झाल्यामुळे माझ्या अपघाती वळनाला माझ्यात रस उरला नाही... काही विचारायच होत वाटत तिला पण तिथे तेव्हा तरी मी आणि ताई शिवाय दुसर कोणी नव्हत सगळे लेक्चरला... गाडी काढुन मी आणि ताई निघनारच होतो की, अपघाती वळन जवळ येयुन बोललं...
एक्सक्युज मी... थोडी मदत करता का?? {हाय काय गोड अवाज आहे.. एकदम फ़िदा}
{उगाच इज्जत चा पंचनामा नको म्हणुन मी लक्ष दिले नाही... मी काही बोलनार नाही म्हणुन ताई साहेबांनीच पुढाकार घेतला बोलण्याचा...}
ताई:- येस! काय मदत हवीये???
अपघाती वळन :- प्रिंसीपलांच ऑफ़िस कुठय, मी या कॉलेज मधे नवीन आहे कृपया सांगू शकता का??
ताई :- अम्म्म! ते बघ तो प्युन चाललाय दिसतोय का ?? हो त्याच्या मागे लेक्चर संपन्याची बेल वाजवायला चाललाय तो त्या बेल पासुन पुढे काही पावलावरच प्रिंसीपलच ऑफ़िस आहे जा लवकर...
अपघाती वळन बरच घाईत निघाल पुन्हा काही न बोलताच झपाझप चालु लागल... मी आणि ताई मग निघालो कॉलेजच्या गेट मधुन बाहेर आल्यावर मी ताईला म्हंटल... औपचारीक्ता विसरल्या आजकालच्या पोरी आभार पण मानत नाही काम झाल लागल्या चालायला...ताई साहेबांचा पारा चढला {कारण ताईचा स्वभावपण काहीसा असाच पत्तासमजला {मिळला की चालयला लागली} "धन्यवाद" चार शब्दही जड वाटतात म्हणायला.. गप्प रे ! गाडी चालव निट, घाईत विसरली असेल जावुदे...! मला घेयलापण याव लागेल तुला नाही तर गाडी आणुन देशील... बर! बर! सुधरली तर पत्राने पाठवतो... पोच पावती दे चल चॉकलेट काढ सोडुन दिलेय मी आणि पैसेपण दे तुझीच गाडी सुधरवायचीपन आहे... ताई {काहीशी वैतागुन} नालायका तु नक्कीच माझा भावुच आहेस ना, कर की कधी तरी खर्च खिशातुन टवाळक्या मित्रांसोबत सिगारेट फ़ुकायला पैसे आहेत तुझ्याकडे माझी गाडी सुधरवायला नाहीत काय?? ये ये सिगारेट बंद केलीये नाय ओढत तुला माहीतिये...काय नाय ओढत ओठ बघ किती काळे झालेत... ये ताई उशीर होतोय तुला चल काढ पैसे लवकर ताई पुटपुटलीच हलकट देते थांब...आधी चॉकलेट दे...ही घे खा... आणि पैसे नाहीत माझ्याकडे शंभरच आहेत क्लास झाल्यावर सिनेमाला जायचय मैत्रीनींसोबत...माझा चांगला भावु ना तु पैसे देवुन देशील ना गाडी वाल्याला प्लिज...प्लिज...प्लिज...! ओके...ओके गाडी सुधरली का इथेच आणुन देतो जा आता क्लास भरला... बाय !
ताईला सोडुन परत कॉलेजला नीघालो, जाता-जाता रसत्यातुन गॅरेज वाल्याला उचलल कोलेज मधे ताईची गाडी दाखवली म्हणाला पेट्रोल ओव्हर फ़्लो झालय... वाटलच मला कॉक बंद केला नसेल
बर! ती तशीच काढ आणि चल ये मागे-मागे...ताईची गाडी घेवुन पुन्हा तिच्या क्लास बाहेर पार्कींगला तिची गाडी लावली...आता चावी कशी देयची?? तर क्लासचा पार्कींगवाल्याने हटकल काय करताय रे इथे मुलांची पार्कींग समोर आहे काढा गाड्या तुमच्या... आवो काका माझ्या ताईची गाडी हाये वो खराब झालती सुधारुन आनली आताच... आता तिला चावी कशी देवु याचा विचार करतोय क्लास चालु झालाय ना... अरे पोरा मी कशालाय आन ती चावी मी देतो वर नेवुन काय नाव म्हनालास तुझ्या ताईच?? {मला आगवुपना सुचला} आवो काका आता येव्हड्या पोरान समोर तुम्ही ताईच नाव घ्याल आणि म्हनाल तुझा भावु आला होता गाडी देयला हे बरोबर नाय वाटनार सगळे हसतील वो तिला... मग आता काय करायच म्हणतो बिना नावाच मी ओळख्ननार कस?? एक सांगु...तुलाच इचारतोय मग मी सांग की...वर जा म्हणा ही चावी कुनाची आहे खाली पडली होती माझी ताई चावीला लावलेल किचन वळखेल आणि काय ते समजेल...बोलत बोलत ताईने दिलेली चॉकलेट काढुन थोडी त्या वॉचमन ला दीली आणि थोडी गॅरेजवाल्याला दोघांनपेक्षा थोडी जास्त मी खाल्ली आणि म्हनालो चावी घेयला येइल तेव्हा हळुच सांगा तिला पेट्रोल महाग झालय गाडी ओव्हर फ़्लो होते तरी जास्त पेट्रोल टाकु नको टाकलेस तर बचत कर कॉक बंद करत जा... बर! पोरा जा आता तु... असा कसा तुम्ही वरुन खाली या बघु मग मी जातो की {आभाळा कडुन जमीनीवर आलेला माझा हात बघुन गॅरेजवाला मागे फ़िरुन लय हसला}... ठीक आहे गाडी समोर घे मग तुझी तुझ्या ताईची राहु दे इथेच मी आलो वरुन... ओ काका !!... आता काय?? ही चावी तर घ्या... तनतन करत गेला काका एकदाचा वर...खाली येयुन काका मला म्हणतो तुला एक निरोप आहे तुझ्या ताईचा... त्यो ओ काय काका?? "नालायक" माझ्या ओठांवर विजयी हास्य तरळल चावी ताईलाच मिळाली होती... काकाचे आभार मानुन तिथुन निघालो गाडीवाल्याला सोडायचे होते... त्याला सोडल म्हनालो किती झालेत ओ?? तो म्हनाला राहु दे पैसे तसे झालेच नाही फ़क्त नळीतुन पेट्रोल काढायचे होते असु दे...तु दिलेल्या चॉकलेट मधे वसुल झाले आजकाल कोणी पानीपण विचारत नाही... जा तु काही असले का ये पुन्हा नाहीच जमले तर हे दुकानाच कार्ड ठेव फ़ोन केलास तरी चालेल मी येवुन जाईल... पण माझा फ़ोन आहे हे ओळखानार कस तुम्ही?? चॉकलेट वाला बोलतोय म्हण फ़क्त बाकी तुझ्या नावापेक्षा चॉकलेटवाला सोप जाईल तुला लक्षात ठेवायला...
नकळतच नविन नात जुळल होत गॅरेजवाला माझ्या आपुलकीच्या ऋणाने भारावुन गेला होता...शेवटी म्हणाला जसा आहेस तसाच राहा पोरा ये आता...त्यांचे आभार मानुन मी तिथुन निघालो पुन्हा कॉलेजला जायचा मूड नव्हता तरी मस्त गरम गरम कोफ़ी पेयची होती म्हणुन कॉलेज कॅंटीन मधेच जायच डायरेक्ट असा विचार करतच कॉलेज गेट मधुन आत आलो रोजच्याच माझ्या पार्कींगच्या जागेवर गाडी पार्क केली..माझी गाडी पाहुन मित्रांना कळेल तरी मी कॉलेज मधेच आहे.. म्हणुन ज्या पत्र्याच्या शेड मधे माझी गाडी होती त्याच जागेवर पुन्हा लावली...गॅरेजवाल्याचा चेहरा आणि त्याच बोलन आठवत कॅंटीनकडे माझी पावले पडु लागली... कशी असतात मानसे नाही, छोट्या छोट्या गोष्टीतुन जवळ येणारी, आपलेपनाची ऋण जन्मभर जपनारी... एक रजीस्टर आणि खिशात एक पेन व्यतीरिक्त कॉलेजला काहीही मला तरी लागायच नाही... ते विनापृष्ठ्याच रजीस्टर गोल पुंगळी करुन मागच्या खिशात कोंबलेलं असायच...कॅंटीन मधे नेहमी झाडाखालचा टेबल आणि खुर्ची मला लागायची आणि कॉलेजच्या कॅंटीन मधे तेव्हडी वट होती की माझ्यासाठी कॅंटीनवाला त्या जागेवर कुनालाच जास्तवेळ बसु देयचा नाही...पण आज माझ्या जागेवर मी ज्या टेबलाच्या विरुद्ध बाजुच्या खुर्चीवर बसतो त्याच जागेवर कोणीतरी आधीच बसल होत...म्हंटल जावु द्या आज दुस-या टेबलावर बसु... कॉफ़ी सांगायला मी मधे जानार होतो तेव्हड्यात कॅंटीनवालाच बाहेर आला मला पाहुन म्हणाला... या राव तुमचीच वाट पाहातोय बराच उशीर झाला आज?? माझी वाट आणि ती कशाला?? कॉलेज मधे नविन ऍड्मिशन प्रिंसिपलने तुला सोपवलिये म्हणाले काही झाले अथवा लागले तर कॉलेजच्या प्रतिनिधींनाच सांगा भेटुन बाकी ऍड्मिशन झालीये तुम्हाला भेटायलाच बाईसाहेब इथे थांबल्या आहेत...ओय काका आहो जाहो का करतोय मला तुझ्या मुलासारखा ना मी..?? ते आता कॉलेजच विद्यार्थी प्रतिनिधी सारखा अवजड शब्द तुझ्यासाठी आजच एकला ना म्हणुन... अरे आपनच बोलत बसलो काम राहीली तिकड तु या बाईसाहेबांन संग बोल तुझी काळी कॉफ़ी पाठवतो २ मिनटात आणि एक {काका जवळ येवुन कानात पूट्पूटला} सिगारेट फ़ुकु नाको बाई लय तापट हाये मगा दोन जनांना वाजुन इथे बसल्या आहेत... थोडी चिड-चिडच झाली माझी च्यायला कोणचा राग कोणच्या गालांवर... कॉफ़ी पाठवा आधी मी बघतो, हा आलीच बघ लगेच तुझी कॉफ़ी... काका गेला नाही म्हंटल तरी मुलींचे कान भारी तिखट असतात काकाच पुटपुटन ऎकल असेलच आणि माझा त्रागाही {मला खात्री होती}... थोडी संथ पावले टाकत टेबला जवळ जायला लागलो माझा अवतार तसा गबाळाच होता पण बरा होता माझ्या मते...बघु कोण आहे नविन अड्मिशन त्यापेक्षा जास्त कुतुहल कोण आहे दोन जनांना पहिल्याच दिवशी सनसनीत वाजवना-या जानुन घेयच कुतुहल मनात घोळायला लागल...झाडाला वळसा घालून टेबला जवळ गेलो तर काय "अपघाती वळन" क्या बात पहील्याच दिवशी घात-पात लय झ्याक... रागातपण सुंदर दिसते सांगाव वाटल तिला माझ्याच विचारात मी.. पण... कॉफ़ी पाठवतो म्हणनारा काका स्वताच कॉफ़ी घेवुन आला... आणि कपाचा चटका मला लावला आई ग!.. अहेम अहेम ! बाई साहेब... अपघाती वळन कसल्या तरी विचारातुन बाहेर आलं आणि जरा ओशाळल हे प्रतिनीधी तुम्ही यांचीच वाट पाहात त्यांच्याच जागेवर बसल्या अहात {काकाने उठवण्यासाठी मुद्दाम टोमना मारला..." असु दे काका मला खुर्ची प्रेम नाही आहे... आणि अपघाती वळनाच्या समोरच्या खुर्चीवर मी विराजमान झालो {तेही तिला नोटीस न करता}... काकाकडे मी रागानेच पाहील तसा काका नरमला म्हणाला तुम्ही बसा बोलत काही लागल तर हाक मारा... उगाच काही बोलायला नको आपन आधी गैरसमज होयचे नाही तर म्हणुन पुंगळी केलेलं रजीस्टर सरळ करुन टेबलावर ठेवलं समोर माझ्या कॉफ़ीचा कप होताच आणि माझ्या अपघाती वळनाच्या समोर "चहा",
रजीस्टर उघडुन नुकत्याच झालेल्या गॅरेजवाल्याची आठवन चारोळीत बंधीस्त करत बसलो... माझ्या समोर कोणी बसलय याचाही मला विसर पडलेला...माझ्याच विश्वात हरवुन गेलो...

काही मानस या जगात
नकळत जोडली जातात
आपलेपनाच्या धाग्यात
मनाने बांधली असतात...!

चारोळी लिहिल्यावर सवयीने स्वताशीच मोठ्याने वाचली आणि काय दाद चक्क समोरुन..."वा! छान".... नकळत माझ्या तोंडातुन "आभार..." तिनच शब्द निघाले आणि काय मी गोंधळलो... कोण आहे समोर म्हणुन पाहील तर "अपघाती वळन" माझ्या जगातुन बाहेर काय चाललय समजायला क्षणभर थांबलोच... सगळ समजल्यावर मी स्वतालाच एक चिमटा काढला आणि पुन्हा अपघाती वळनाकडे न पाहता "आभार" म्हणालो... अपघाती वळन जरा रिलॅक्स वाटली मगाशी चेह-यावर दिसनारा राग नव्हता अगदी निरागस दिसत होती... अपघाती वळन जरा जास्तच इंप्रेस झालं होत...अजुन एखादी ऎकवता??? नकळत अगदी नकळत तिने वन मोअर {वन्स मोअर वगळुन} मागीतलं...मी:- अजुन काय ऎकवु तुम्हाला?? अपघाती वळन :- काही पन ऎकवा तुम्हाला आवडेल ते... मी:- विचारांच्या जाळ्यात गुंतत गेलो अजुन काय ऎकवाव आता?? काही सुचायला हवे उगाचच लिहीले म्हणुन माझ डोक आपटत होतो... विचारांच्याच जाळ्यात पेनानी वहीच्या कागदावर काही लिहायला तयारच ठेवलं पण शब्द ते शब्दच उमटायला तयार नाहीत माझ अन शब्दांच भांडनच चालु होत... माझे डोळे म्हणत होते ऎव्हडा सुंदर चंद्र पाहुन या चंद्रावरच लिही काही... हृदायाची धडधड म्हणत होती तुझ्या प्रेमाची स्वप्नांची शिदोरी लिही...पण माझी बुद्धी म्हणत होती हे स्वप्न आहे वेड्या तुटलं तर... सगळे विचार मनातुन जायला तयारच नव्हते काही क्षण डोळे मिटुन खुर्चीत स्वस्थ बसुन राहीलो... मन नियंत्रीत झाले होते मी अलगत माझ्या पापण्या उघडल्या अन क्षणभर त्या को-या पानाकडे पाहीले...

...खुपच छोटासा असतो
सुखद आयुष्याचा प्रवास
मानुसकीने जोडुन मानस
कळतो सावल्यांचा आभास

लिहिले एकदाचे पण मोठ्याने वाचले नाही...मनातच वाचले अन तसच पेन बंद केलं, वही बंद केली अन कॉफ़ीचा कोमट झालेला कप उचलला आणि समोर पाहीले {आई गं! किती आतुरतेने वाट पाहतेय लिहिलेलं कधी वाचतो म्हणुन पण पुन्हा मी नाही वाचनार मोठ्याने}... आणि म्हणालो चहा घ्या गार होतोय...अपघाती वळन:-{काहीशी ओशाळुन} अं... अय्या! विसरलेच बघा...पण तुमची कवीता ऎकवा ना... मी:- {उगाचच} आश्चर्याने आहो! दोन दा वाचली मी... तुमच लक्ष नव्हत का?? बर, असो एक काम करा हे घ्या रजिस्टर आणि वाचुन घ्या प्लिज मी कोफ़ी पितो गार होतेय... आणि काय चक्क अपघती वळनाने हात पुढे केला...{मनाच स्वच्छंदी पाखरु लगेच उडायला लागत पुढे केलेला हात धरावा अन गुढग्यावर बसुन म्हणाव मला तु आवडलीस...तुझा हात मी कधीच नाही सोडनार} मी रजीस्टर तिच्या हातात ठेवलं... आणि कॉफ़ी अन वाचण्यात मग्न झालेलेल्या तिच्या चेह-याचे हाव-भाव टिपु लागलो पण चोरुन... उघड उघड सरळ पाहात राहाव अशी निसर्गाची सुंदर किमया पण नाही म्हंटले तरी मनाला आवर घालावा लागतोच...कारण सुंदर तरुणी म्हंणजे एकटी कधी नसेलच एखादा तरी प्रेमवीर असेल...कारण सुंदर तरुणी एकट्या कधीच नसतात कोणी ना कोणी प्रेमात यांच्या पडतच सुरुवातिला नकार देत-देत प्रेमात हारुन होकारही देतात... उगाचच थोबाड लाल करायची इच्छा नव्हती माझी... विचारांच्या शुण्यात हरवलेला मी जरा दचकलोच मला हे काय जानवतय?? हा कसला भास मला होतोय, कोणी माझं माझ्या हक्काच जवळ असल्याचा, एक अनामीक सावली जिची छाया स्वप्नात अंधुक दिसनारी प्रतीत होत होती, आज ती सावली इतकी स्पष्ट, मनात शांतता इतकी की ह्र्दयाची धडधड हातोड्याच्या आघाता सारखे भासताय, रक्ताचा प्रवाह एका खवळलेल्या समुद्रा सारखा होतोय... अन एका क्षणात सार शांत भयान शांत..जनु अर्जुनाच्या धनुश्यातुन सुटलेल्या सुची बाणाने हृदयाच्या धडधडीलाच शांत करावे...अन या शांततेत कानांनी अचुक वेध घ्यावा त्या घुमत असलेल्या आवाजाचा "खुप छान..." लिहिता तुम्ही...!
मी:- {फ़क्त हसलो...}सर्व प्रथम कॉलेज मधे सगळ्यांच्या वतीने तुमचे स्वागत आहे कुठल्या वर्षाला ऍड्मिशन घेतली आहे तुम्ही??
अपघाती वळन :- अं.... मी दुस-या वर्षाला वानीज्य शाखेत
मी:-{वा! म्हंणजे माझ्याच वर्गात} बर! कॉलेज मधे तुम्ही नवीन अहात आणि कदाची या शहरात पण...
अपघाती वळन :- हो.. माझ्या बाबांची या शहरात बदली झाली म्हणुन...
मी:- अच्छा! मग या अधी कुठे होतात??
अपघाती वळन :- या आधी मनमाडला
मी:- ओके! कॉलेज कस असत तुम्हाला माहीत असेलच विशेष काही नाही, आणि मित्र मैत्रीनी तुम्हाला स्वत: बनवावे लागतील.. आणि निवडावेही...फ़क्त काही मुलांचे त्रास, त्यांचे चुकीचे वागने या बद्दल तक्रार असेल तरच माझ्याशी संपर्क...तुम्ही परस्पर प्रकरन हाताळु शकता नाही असे नाही... आता थोड्या वेळा पुर्वी जसे त्या सिगरेट पिना-याना हाताळले तसेच बाकी कॉलेज कँपस मधे नव्या कल्पना राबवण्या बाबत कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास...तुमचे स्वागत असेल..!
अपघाती वळन :- वाव ! नविन काही सुचवायला आवडेल, नक्कीच सांगेल तुम्हाला
मी:- ठीक आहे ! माझी एक विनंती प्लिज मला अहो जाहो करु नका...
अपघाती वळन :- क्यु हम आपके हैं कोन???
मी:-{च्यायला कचरा झाला, या पोरींशी बोलण्यात कोणीच जिंकू नाही शकत} ते पण झालच असो सोमोरुन येनारा मुलींचा ग्रुप दिसतोय?? तो दुस-या वर्षाचा आहे बाकी माहीती तुम्हाला त्यांच्या कडुन मिळेल या तुम्ही...
{अपघाती वळन माझ्या या कोरडेपणावर सॉलीड गरम झाली गोरा चेहरा लाल झाला होता तरी उगाच स्वताला नियंत्रीत करुन जायला लागली}
तरी मी अजुन चिडवले आहो ते रजीस्टर माझंय आणि तुमच्या चाहाचे पैसे देवुन जा...अपघाती वळनाने एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकला, माझ्या चेह-यावर हसु पाहुन अजुन जास्त राग आला रजीस्टर चक्क टेबलावर अपटले चहाचे पैसे ठेवले अन गेली...! ब-याच वेळेची माला लागलेली सिगरेटची तलफ़ भागवु म्हणुन खिशातुन पाकीट काढुन टेबलावर ठेवल माचीस काही केल्या मला खिशात सापडेना... म्हणुन कँटीन~वाल्या काकाला आवाज दिला काका माचीस आणि एक कॉफ़ी... बोलन संपत नाही तोवर काका हजर...ही घे दोन पेक्षा जास्त नको घेवु... काका तो स्मोकिंग झोनचा बोर्ड आनुन ठेवा इथे नाही तर मी मार खायचो... गेल्या पावली  ग्रुपशी ओळख करुन परत येना-या "अपघाती वळनाला" पाहुन काकाला बोललो.. काका लगेच आत गेला आणि लगेच आला... बोर्डा मागे मी गायब झालो सिगरेट पेटवुन धुव्याच्या वलयात अपघाती वळनाचे बोलने आठवत राहीलो... टेबलावर रागाने आपटलेल्या रजीस्टरकडे पाहुन नकळत ओठांवर हसु उमटल जवळ ओढुन अलगत त्याची पाने उघडली... तर काय, माझ लक्ष नाही पाहुन माझ्या चारोळी खाली अपघाती वळनाने तिच्या वळनदार अक्षरात काही लिहीले होते...

आभासी सावल्यांत एक,
सावली अपलीही असते..
शोधतो जगभर, पण ती
आपल्याच सोबत असते...!

वा! अक्षरासोबत विचारही सुंदर आहेत... आई म्हनायची मला ज्याच अक्षर सुंदर त्याच मनही सुंदर असत... आज अनुभवले झकास! रजीस्टर बंद करुन पुन्हा सिगरेटच्या धुव्याच्या वलयात हरवुन गेलो...ब-याच मुली पाहील्या पण कधी कुणा मुली बद्दल अस वाटलं नाही हे आजच अस का होतयं माझ मन इतक विचलीत का होतयं... माझ्याच विचारांच्या तंद्रीत मी अनखी एक सिगरेट शिलगवली... आणि काका समोर तुला दोनच सांगीतल्या होत्या ही पाचवी आहे मरशील ना मुडद्या पुन्हा तेच ओठांवर हसु मेल्यावर नाही पिनार काका... तुझ्या जिभेला काही हाड..नाही ये काका कालच डॉक्टरकडे गेलेलो त्यांना म्हनालो माझ्या शरीरात २०८ प्रकारचे हाडे आहे त्यातले एक कामाचे नसलेले या जिभेवर लावुन द्या... मग काय बोलले ते डॉक्टर... डॉक्टर म्हनाले माझा हा शोध पुर्ण झाला तर माझ्या बायकोच्या जिभेला आधी लावेल नंतर तुझ्या जिभेच बघु... डोंबल तुझ आईकत का नाहीस रे तु का असा वागतोस... काका हसत होता काय करु काका सगळ्यांसारख मी पण आईकल तर तुम्ही बोलनार कुनाला?? तु नाही सुधरायच ठरवले आहेस का... हो तुमची बोलनी खायला अवडतात कॉफ़ी आणि चाहाचे किती झाले त्या बाईसाहेब चाहाचे पैसे देवुन गेल्यात माझे बोला आणि मागची उधारी पण सांगा... आताचे धरुन तिनशे सत्तर मी काकाच्या हातावर हजारची नोट ठेवली ये सुट्टे नाहीत रे वापस कुणाला हवेत पैसे वरचे सहाशे तीस तुमचेच आहेत
ये नको बाबा जेव्हडे होतात तेव्हडेच दे... काका मला अजुन देयचे होते पण आता इतकेच आहेत तुमच्या लहान मुलाची तब्बेत खराब आहे चांगल्या डॉक्टरकडे न्या म्हणुन दिलेत जरा जास्त पैसे तुम्हाला परत नाही केलेत तरी चालतील आजार मोठा असेल तर नक्की सांगा काही मदत करता आली तर मी नक्की करेल... बस! कर रे पोरा आधी जोक करुन हसवतो आणि अस काम करुन रडवतो... माफ़ करा काका पण तुमचा उतरलेला चेहरा नाही पहावत आज लवकर जा घरी उद्या सांगा माला काय झाल ते डॉक्टरच्या टेस्ट मधेच खुप पैसे जातात तरी हरकत नाही तुम्ही जा एकदा..काय बोलु रे पोरा तुला मला पोरगाच बोला अजुन काही नको या आता तुम्ही आणि हो या पैशाचा उल्लेख पुन्हा कधीही करायचा नाही आणि परतही देयचे नाहीत... अजुन एक कॉफ़ी देता का मला हवीये आणि एकच सिगरेट घेवु का प्लिज... दुसरी कॉफ़ी आनुन देतो ही थंड झालीये आणि या एक नंतर दुसरी एक असेलच तुझी तयार... नाही नाही एकच फ़क्त ठीक आहे घे पण दिवसभरात मग घेयची नाही पुन्हा कबुल?? ओके काsssक्का नाही घेनार कबुल... काका जाणार तेव्हड्यात अपघाती वळन पुन्हा पुढ्यात येवुन बसले माझ्या थोडी रडवलेली झालेली काकाला म्हंणटल काका एक चाहा पण आना यांच्यासाठी ठीक आहे... काका गेला पाहुन मी अपघाती वळनाकडे जरा प्रश्नार्थक नजरेने पाहीलं काय झाल गंगा यमूना का थांबल्या घा-या डोळ्यात वाहु दिल्या असत्या पण आज योग नव्हता कदाचीत काका चहा आणि कॉफ़ीपण घेवुन आला...आल्या आल्या बोलला बाईसाहेब हा घ्या चहा तुमचा, आणि ही तुझी कॉफ़ी सिगरेट ओढली नाहीस का?? कॉफ़ीसाठी थांबलेलो घेईल आता.. ठीक आहे मी जातो.. काका एक मिनिट काय रे चहाचे २ आणि कोफ़ीचे ३ असे पाच रुपये काकाच्या हातावर ठेवले... माझे मी देते {अपघाती वळन} हं! घ्या आता काही नाही लागनार मला तरी मी जाईल घरी ठीक आहे...बर पोरा निट जाशील.. मी निघतोच आहे आता... या काका....

काका त्याच्याच विचारात निघुन गेला कॉफ़ीचा कप हातात घेयच्या आधी सिगरेट लाईट कराणार इतक्यात अपघाती वळनाला उद्देशुन मी विचारलच सिगरेट ओढल्यास हरकत नाही ना तुमची?
अपघाती वळन:- नाही अजीबात नाही घे सावकाश..
मी:-{मला वाटल झाशीच्या रानीचा अवतार घेईल पण काय चक्क हो} धन्यवाद घ्या चहा घ्या... काही तरी गडबड आहे झाशीची रानी तापली का नाही, का हो म्हणाली आणि ही वापस कशाला आली?? विचाराव का सरळ काय झालं की नको उगाच संतापली तर... जाऊ दे बोलेल आपच काय झालं ते...चांभार चौकशा नको उगाच...
अपघाती वळन :- तु सांगीतले नाहीस मला तु पण दुस-या वर्षाला आहेस ते...
मी:- फ़क्त हसलो...
अपघाती वळन :- सॉरी हा सकाळी आणि आता थोड्या वेळा पुर्वीही मी तुमचे आभार न मानताच निघुन गेली...
मी:- सकाळी?? केव्हा आपण आतच बोललो ना ??{जानुन बुजुन इनोसंट मी}
अपघाती वळन:- अरे, सकाळी प्रिंसीपलांच ऑफ़ीस कुठय ते विचारल तेव्हा...तुझ्या सोबत एक मुलगी होती मैत्रीन का तुझी...? नाही असु शकते मैत्रीन पण खुपच फ़्री वाटली, दिसायला पण सुंदर होती, परत दिसली नाही ती कुठे घरी वगेरे सोडलस का??{ओय होय थोडा दम घे किती प्रश्न एकाच दमात विचारनार??}
ए तु बोलत का नाही ये?? केव्हाची मी एकटीच बोलतेय...
मी:- तुम्ही बोलु द्याल तर बोलेल ना मी...?
अपघाती वळन :- ऒह्ह! सॉरी सॉरी...बोल आता तु....
मी :- सकाळी प्रिंसिपलच ऑफ़ीस विचारले तेव्हा तुम्ही माझ्याशी नाही बोललात... जी मुलगी माझ्या सोबत होती आणि जिची येव्हडी स्तुती तुम्ही करताय ती माझी सख्खी बहीन आहे...तुम्हाला तिनेच ऑफ़ीस कुठय ते सांगीतलं...मी नाही...!
अपघाती वळन:- ओह्ह! सॉरी हा मला माहीत नव्हत...
मी:- हम्म्म! होत अस मोठ्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या गोष्टी होतच राहातात... असो तुम्ही परत कशाला आलात ओळख नाही झाली का ग्रुप सोबत?? आलात तेव्हा रडकुंडीला आला होतात कोणी काही बोलले का??
अपघाती वळन :- नाही सहज तुमचे आभार मानायला आले होते पण तुझे आणि काकांचे बोलने एकुन थोड मनाला लागलं... म्हणुन...
मी:- हसत सुटालो... आहो येव्हडा हळवे पणा शोभत नाही तुम्हाला थोड खंबीर व्हा!
अपघाती वळन :- ए तु मला अहो जाहो का करतोय?? मी तुला अरे तुरे करतेय ना मग तु का म्हणुन अहो जाहो म्हणतोय??
मी:- संसकार आहेत अम्हाला मुलींशी अदराने बोलावं {म्हणजे त्या दुर राहातात...वात्रट मुलांच मुलींना कौतुक फ़ार असत ना..}
अपघाती वळन :- {एकदम लाल बुंद झाली होती} म्हणजे तुला काय म्हणायचय अरे तुरे मधे संस्कार, मर्यादा नसतात का?
मी:- असतात पण त्यावर बंधने केव्हाही कसेही घातली जातात... त्या पेक्षा असे बरे नाही का?
अपघाती वळन:- तु सगळ्या मुलींशी असाच बोलतोस का??
मी:- सगळ्या मुलींशी बोलण्याचा योग अजुन जुळून आला नाही हो... सध्या तरी एकाच मुलीशी पहील्यांदा स्वताहुन बोलण्याचा योग जुळला आहे... तुमची कॄपा दॄष्टी अशीच राहीली तर नक्की तसा योगही लवकर येईल...
अपघाती वळन :- {गालात हसायला लागल} छान वाटल तुझ्याशी बोलुन, अच्छा चल जाते मी उद्या सकाळी लेक्चर ला भेटू..!
मी:- जातांना जाते नाही येते म्हणावं आपली संस्कॄती आहे तशी, अच्छा ये बाय!
अपघाती वळन :- चुकल बाबा माझ येते मी बाय !

जाता-जाता एकदा मागे वळुन बघेलच ही मला माहीत नाही का पण खात्री होती... जर बघीतल तर नक्कीच मनात काही तरी चाललंय, मनाच फ़ुलपाखरु फ़ुलाभोवती बागडतंय, काही क्षण फ़ुलावर अलगत बसतंय, कसलीशी चाहुल लागुन पटकन उडुन जातंय...आणि काय चक्क मागे वळली अपघाती वळन... जानुन बुजुन मी पाहुन न पाहील्या सारख केलं, टेबलावरच्या रजीस्टर मधे तोंड खुपसल... चोर नजरेने एकदा पाहीलं, पुर्ण पलटुन अपघाती वळन एकटक मला पहात राहीलं जनु कसला तरी निर्धार मनात करत होती, तिची नजर मला प्रेमळ वाटत होती, डोळे भरुन एखाद्या प्रियकराचे प्रतिबिंब हॄदयात बंधीस्त करत होती, उद्याच्या स्वप्नांच आमीष दाखवुन पावलांनी चालत होती, आयुष्याचा एक थांबा तिला भेटला होता, इथुन पुढे जोडीने चालायची स्वप्ने रंगवत होती...
आणि मी "आकर्षन" की "प्रेम" या वादळात गुंतलो होतो... तिला पाहाता क्षणी मनात असंख्य मंदीरातले घंटा नाद घुमले होते, आवाज एकुन मनी रोमांच उमटले होते, गही-या घा-या डोळ्यांत तिच्या मी स्वताला हरवले होते, उद्या पुन्हा इथेच भेटेल का या विचारात मनाशी भांडन जुंपले होते, पुढे काय, अन कस असेल, उद्या काय होनार, या विचारानेच मन हैरान झाले होते... मी उठायची लक्षणे दिसत नाहीत पाहुन अपघाती वळन पुन्हा मागे वळली... दोन-चार पावले चालुन पुन्हा मागे वळली... पण मी तिथे नव्हतो... ती वळली तस मी जागेवरुन उठुन कॅंटीनच्या मागच्या साईडने पार्कींग गाठल होते... मित्रांकडुन आजचे नोट्स घेउन गाडी स्टार्ट करत होतो... कॉलेजच्या गेट मधुन बाहेर येवुन घराच्या रस्त्याला लागनार होतो... इतक्यात समोरच्या रिक्षा स्टॉप जवळ अपघाती वळनाचे ओझरते दर्शन झाले होते रिक्षाची दिशा आणि तिचा पत्ता सांगतांना इशारा माझ्याच घराच्या रस्त्यावर होता... गाडीच्या आरश्यात तिला रिक्षात बसलेल पाहीलं आन रिक्षा मागे येवु लागली
पुढे मी मागे रिक्षा... कधी पुढे रिक्षा मागे मी... चोर शिपायाचा खेळ खेळू लागलो... खेळ तो खेळच वैताग येनारच... या खेळात सायकलवाले मला अन रिक्षाला मागे करुन पुढे जात होते, अंगाला झोंबनारा वारा मला हसत होता, सुसाट वेग अंगावर रोमांच उभा करत होता, हरुन मी माझ्या मनाशी रिक्षाला पुढे जावु दिल... स्वतावर ताबा मिळवुन गाडीवर नियंत्रन मिळवल होत... पुन्हा असा खेळ नको मनाला बजावल होत... गाडीचे गेअर उचलुण व्हिली मारुन अक्षरश: गाडीचा मागचा टेल लाईट रोडवर घासत रिक्षाच्या जवळुन पुढे आलो होतो... रिक्षावाला ओरडला होता मरशील रे...
तरी काही अंतर तसाच लाईट घासत पुढे आलो... हळूहळू रेस कमी करत गाडीच पुढच चाक जमिनीला टेकवल होत...पुढचा गेअर टाकुण भरधाव घर गाठलं होत...घराच्या गेटमधे आई उभीच होती... तिची नजर कासावीस झाली होती.. चेहरा घामाने भिजला होता...मला पाहुन डोळ्यात आसव दाटली होती... ताईचा गाडीवरुन अपघात झाला होता तिच्या मैत्रीनीचा घरी फ़ोन आला होता... दवाखाण्यात नेलय आईचा कापरा स्वर सांगत होता... माझ्या गाडीच्या मागे बसुन लवकर चल म्हणत होती... सुखाची अन दुख्खाची एकच गाठ आज झाली होती... कसेबसे हॉस्पिटल गाठले होते... ताईला जास्त न लागले एकुन बरे वाटले होते... गाडी पायावर पडल्यामुळे पाय पिळले गेले होते... पंधरा दीवस प्लास्टर लावुन पुर्ण आरम करावा डॉक्टरने सांगीतले होते... ताईला अन आईला रिक्षाने घरी पाठवले होते गोळ्या औषधीसाठी मी मेडीकल गाठले होते... तहान-भुक तेव्हा काही न सुचले होते... घरी येवुन बाबांचे लेक्चर सुरु झाले होते... निट गाडी चालवता येत नाही का? बोलत होते... न राहावुन बाबांना शांतपणे मी सुनवले होते... जे झाल ते होणारच होते.. थोड्यावर निस्तरेले म्हणुन देवाचे आभार मानले होते... आईची अन बाबांची तळमळ ताईला जानवली होती
मला जवळ धरुन ताई रडली होती... तिला शांत करण्यासाठी आइस्क्रीमची फ़रमाइश बाबांनी केली होती... लाडाची लेक माझी म्हणुन बाबांनी रागाला आवरले होते... आइसक्रीम आनायला जानारा मी बघुन सावकाश जा ओरडले होते... दोन दिवस आई-बाबा-ताई सोबत घालवले होते... हवे नको ते जातीने पाहीले होते.. डॉक्टरची व्हिझीट तब्बेतीत सुधारनावर विचारले होते... तनावातुन आज थोडे बरे वाटत होते... बाबांनी ऑफ़ीस गाठले होते ताईने मला कॉलेजला पाठवले होते तिच्या मैत्रीनींना घरी बोलवायचे होते... सांगण्या आधीच मैत्रीनी घरी जात होत्या...आईला काही हवे नको ते विचारले होते... काहीच नाही फ़क्त चहासाठी दुध मागवले होते... दुध आणून देवुन मुलींमधे घरी काय करावे म्हणुन आईला सांगुन मी पुन्हा कॅंटीन गाठले होते... गोंधाळात थोडी मनाला शांती तरी मिळेल...

गोंधळा इतकी शांतता मला
स्मशानातही मिळत नाही
कसली जाणीव नसते मज
वेदनेची कळही कळत नाही

दोन दिवसांनी कॅंटीन मधे मला पाहून काका धावतच आला आणि चक्क मला मिठीत घेवुन म्हणाला माझा पोरगा ठीक होतोयं आज तुला कॉफ़ी फ़्री आहे हवी तेव्हडी घे पण सिगरेटवर बंधने तिच असतील... बर काका दोनच घेईल काय म्हणतंय कॉलेजच हवा पानी काही नविन विशेष?? नाही काहीच नाही त्या बाईसाहेब दोन दिवसात पन्नास वेळा येवून तुझ्या बद्दल विचारुन गेल्या
तुझी वाट पहात काळी कॉफ़ी पण घेयच्या चहा नको म्हणतात आता...नुकत्याच गेल्या येतील थोड्या वेळाने परत, अरे पण तू होतास कुठे दोन दिवस?? आणि तुझा अवतार असा काय झालायं
डोळे किती सुजले आहेत कूठे दारु ढोसुन पडला होतास की काय?? तेच गुढ रहस्यमयी हस्य माझ्या ओठांवर उमटलं {ओठांच्या हसण्या मागे मला वेदना लपवण्याची सवयच होती} तस काही नाही काका गावी गेलो होतो सकाळीच आलो दगदग झाली झोप नाही झाली ना म्हणुन असा अवतार झालाय़ं बाकी काही नाही... आलो तशी तुमची आठवन झाली आणि आलो इकडे म्हंटल काका वाट पहात असतील... भले शाब्बास पण माझ्यापेक्षा त्या बाई जास्त वाट पहात आहेत तुझी काय केलेस का?? {काकाने डोळा मारला} छे! मी कशाला काही करु?? ते मला नाही जमत... हो रे सगळ्या पोरांत तुच एक आहे ज्याला असल काही येतच नाही पण माझा अनुभव सांगतो आता तुलाही ते जमेल वातावरन तुझ्या मर्जीने रंग उधळेल... आणि तु स्वच्छंदीपणाने त्या रंगात रंगून जाशील... आयला काका तुम्ही तर लयच रोमांटीक झालात...हो मी खुश आहे आज तु आलास म्हणुन तुझी नेहमीची जागा रिकामी आहे जावुन तुझ नळकांड {सिगरेट} पेटव मी आलो तुझी काळी कॉफ़्फ़ी घेवुन... मी माझ्या जागेवर येऊन बसलो मी बसत नाही तोच काका स्मोकींग झोनचा बोर्ड आणि कॉफ़्फ़ी घेवुन आला सोबत... हळूच कानात कुजबुजला बाईसाहेब येत आहेत... येवु दे काका आता बोर्डाची आवश्यक्ता नाही बाईसाहेब सुधरल्या नाहीत बिघडल्या चालत त्यांना आता... काका माझ्या तोंडाकडे पहातच राहीला... तु बिघडवलस का त्यांना?? येस येव्हड नेक काम माझ्याशीवाय अजुन कुणाला जमेल का काका?? मी तर नाही सुधरनार पण मला सुधरवणारे नक्कीच बिघडतील.. धन्य आहेस तु... मला हसु आलेलं {काकाने दोन्ही हात जोडुन नमस्कारच केला मला} हाहाहाहा...! मला पाहुन अपघती वळनाचा कोमेजलेला चेहरा टवटवीत झाला होता... निळ्या रंगाचा सलवार, निळीच ओढनी,  निळी टिकली, दोन्ही हातात निळ्या रंगाच्याच बांगड्या त्या पण सहा-सहा, उजव्या हाताच्या अनामीकेत निळ्या रंगाचीच अंगठी, बोटांना निळ्या रंगाचीच नेल पोलीश, निळ्या रंगाचेच कानातले, गळ्यात कानातल्यांच्याच जोडीतला नाजुकसा निळा नेकलेस आणि दाट केसांना लावलेली निळी क्लिप...सगळ निळ-निळ... निळा रंग तिच्या गो-या कांतीला अगदी शोभुन दिसत होता... एका नजरेत खुर्चीवर बसतांना मी तिचे येव्हडे निरिक्षन करुणच टाकले... मी काही विचारनार तेव्हड्यात काकाच बोलला बाईसाहेब काय आणु चहा की कॉफ़ी... कॉफ़ीच आना काका ती पण काळीच आवडली मला.. काकाने माझ्याकडे पाहुन डोळे मिचकवले, अन मी काकावर डोळे मोठे केले.., काका हसत हसत गेला, मी क्षणभर अपघाती वळनाकडे पाहीलं तिला पाहुन दोन दिवसाचा तनाव क्षणातच मी विसरुन गेलो, माझ अस एकदम एकटक पाहान पाहुन अपघाती वळन थोड अवघडल्या सारख झालं... मला तिच्या चेह-यावरचे संकोचलेले भाव बघुन कसतरीच वाटलं, इच्छा नसुनही मी माझ्या डोळ्यांचा मोह आवरला तिच्यावर रोखलेली नजर काढली आणि
काकाने टेबलावर आणुन ठेवलेल्या सिगरेटच्या पाकीटावर रोखली, मनातले विचार झटकुन पाकीट फ़ोडले एक सिगरेट काढुन अपघाती वळनाला न विचारताच पेटवली... एक दिर्घ कश मारुन क्षणांच्या अवधीने सावकाश धुर सोडला, तंबाकुचा उग्र दर्प वातावरनात पसरला... काकाने कॉफ़ी आणुन तिला दिली अपघाती वळनाने काकाला विचारले काय म्हणतेय तुमच्या मुलाची तब्बेत?
सुधारना आहे बाईसाहेब... बाईसाहेब नका हो म्हणु मला पोरी म्हणाल तर छान वाटेल... काकाने माझ्याकडे पाहील पण माझ मन सरल्या दोन दिवसांमधे हरवल होत... अपघाती वळनाने पर्स मधुन फ़ाईव्ह स्टारची कॅडबरी काढुन काकाला दिली आणि म्हणाली तुमच्या मुलाला द्या माझ्याकडुन... कशाला ग पोरी खर्च करतेस राहू दे तुला, नाही काका घ्यावीच लागेल तुम्हाला नाही तर आम्ही बोलनार नाही तुमच्याशी कट्टी... रागवू नको पोरी घेतो मी घे तु सावकाश कॉफ़्फ़ी घे मी जावुन बघतो काम पडलीयेत... विचारांच्या तंद्रीत हरवलेला मी पाहुन काकाने मुद्दाम मला खुर्ची सकट हलवल.. भानावर आलो मी तेव्हा उगाचच हसत अपघाती वळनाकडे पहात कॉफ़ीचा कप हातात घेवुन कॉफ़ी पियू लागलो... कॉफ़ी पिता पिता अपघाती वळनाने विचारलेच...
अपघाती वळन:- ठीक आहेस ना रे? दोन दिवस कुठे गायब होतास ना तु दिसलास ना तुझी ताई ? आणि हा असा काय अवतार झालाय तुझा, तब्बेत बरी नाहीये का तुझी? काय झालंय सांगतोस?
मी:-{पुन्हा तेच रहस्यमयी गुढ हास्य} काहीच नाही सगळे ठीक आहे, गावी गेलेलो प्रवासा मुळे झोप नाही झाली म्हणुन असा अवतार..
अपघाती वळन :- खोट बोलतोयेस तु... ओठांच्या हसण्यात कशाला दुख्ख लपवतोयेस, खोट बोलतांना तुझ्या डोळ्यात वेदनेची चमक दिसतेय, खर सांगतोस का काय झालयं?
मी:- काही नाही झालंय हो... सगळे ठीक आहे... तुम्ही सांगा दोन दिवसात पन्नास वेळा मला विचारुन गेलात तुम्ही काका सांगत होते, काही काम होते का?
अपघाती वळन :-{चिडली} का काही काम असल्यावरच तुला भेटायच का?? विनाकारण भेटू नाही शकत का?
मी:- विनाकारण भेटायला मी तुमचा मित्र अजुन तरी नाही, विनाकारण वेळ वाया घालवायला मला वेळ नाही...!
अपघाती वळन :- मग थांबलायेस का? हो की चालता इथुन? तुम्ही सगळी मुलं एकसारखीच... थोड आपलेपणाने काय विचारलं भाव खाता नुसते एखादी गोष्ट सांगायला, तुला काय वाटत रे मुर्ख आहे का मी तुला येव्हड्या काळजीने विचारायला....?
मी:- मला येव्हड्या काळजीने विचारायला, माझी येव्हडी आपलेपणानी काळजी करायला... "हम आपके हैं कौन???" {डोळ्यावरच्या भुवया उडवु तिला मी अनखी चिडवल...ओठांवर हसु रेंगाळतच होत}
अपघाती वळन {काही बोलनार इतक्यात कॅंटीन मधल्या रेडीओवर वाजत असलेल्या कैलास खेरच्या गान्याचे सुर अगदी स्पष्ट पणे माझ्या अन अपघाती वळनाच्या कानावर पडले} (तेरी दिवानी... दिवानी) काही न बोलता पापण्यांनी लाजत राहीली, गालावर तिच्या लाली अधिकच गडद झाली, डोळ्यासमोर मला पाहुन धुंद होत राहीली, मी एकटक तीला बघत राहीलो, संकोचलेल्या मनाचे भाव पुन्हा तिच्या चेह-यावर उमटले नाही, मी पहात राहाव असच म्हणुन जराही हलली नाही, तिच्या गही-या घा-या डोळ्यात गुंतुन गेलो होतो, डोळ्यांच्या कडांना लावलेल्या काजळाला नजर लावत होतो... सिगरेट ओढण्याचे मी विसरुन गेलो होतो...  जळत जळत जेव्हा बोटांपर्यंत आग आली अन मला चटका जानवला तेव्हा मी भानावर आलो होतो... भानावर येवुन अपघाती वळनाची क्षमा मागीतली... तुम्हाला अस पाहण्याचा मला काहीही अधिकार नाही माफ़ करा... प्लिज मला तुम्हाला अस पहायच व्यसन लावु नका...
अपघाती वळन :- का भिती वाटते का माझी??
मी:- हो,
अपघाती वळन:- ती का बर वाटते?
मी:- माहिती नाही
अपघाती वळन:- माझ्याशी मैत्री करशील?
मी:- नाही.
अपघाती वळन:- का? भिती वाटते म्हणुन
मी:- नाही, मैत्रीतुन जन्माला येणा-या प्रेमाची भिती वाटते म्हणुन
अपघाती वळन:- असे, काही होनार नाही...
मी:- तरी मला नकोय मैत्री मी एकटाच चांगलाय... मित्र आहेत मला माझ्या कामा पुरता, मैत्रीण पण असावी वाटत नाही...
अपघाती वळन:- तरी मला तुझ्याशी मैत्री करायचीच असेल तर...
मी:- मी उत्तर दिलंय, हवं तर कॉलेज मधे दवंडी पिटा हंगामा करा की तुमची मैत्री नाकारली म्हणुन.. पण मी मैत्री करनार नाही
अपघाती वळन:- {कापरा स्वर, ओठांची थरथर} अरे पण का? मी नाही पडनार तुझ्या प्रेमात..
मी:- तुम्ही पडल्या अहात, तुमच्या हातातला काळ्या कॉफ़ीचा कपच सांगतोय, अख्ख्या कॉलेज मधे विनासाखरेची काळी कॉफ़ी कुणालाच आवडत नाही... दोन दिवसात तुम्हाला आवडली कशाला? उद्या भेटु म्हणुन सांगुन गेलेला मी दोन दिवस कॉलेजला न दिसल्यामुळे मनात चाललेले नाही नाही ते विचार, गाडी चालवने माझे खराब आहे त्या दिवशी तुम्ही बघीतलेच काही झाले असेल का? या विचाराने रात्रीची उडालेली झोप, डोळ्याच्या कडांना गडद लावलेल काजळ डोळ्यांची सुज कमी करत नाही आणि लपवतही नाही...मला पाहुण उजळलेला तुमचा चेहरा, आधी भांडन करुन जाबच विचारुया कुठे होतास दोन दिवस, पण हा असा अवतार पाहुन काही तरी गडबड आहे म्हणुन स्वताला आवरले तुम्ही कशाला? मानुसकी म्हणुन शक्य नाही... आपलेपणा अजिबाद नाही... मग हा सगळा प्रपंच कशासाठी...? फ़क्त मैत्रीसाठी बिलकुल नाही...
अपघाती वळन:- काही न बोलता माझ्या मनातलं तुला कळलच आहे, आणि का ते पण... हो सगळ खर आहे... पडलेय मी तुझ्या प्रेमात कारण मी न बोलताच माझ्या मनात मला तुझ्या बद्दल पडलेली प्रश्न तुला कळली आहेत... हे सगळ फ़क्त अकर्षन नाही तु सोबत असल्यावर सा-या जगाचा मला विसर पडयला लागलायं, तुला तुझ्या ताई सोबत सकाळी पहील्यांदा पाहीले त्या क्षणा पासुन मी तुझ्या प्रेमात पडलेय, तुला पाहुन मनात अख्ख्या जगातले घंटा नाद घुमले होते, तु सोबत असल्यावर पुर्णत्वाची जाणीव मला होतेय, तिच जाणीव तुलाही होतेय पण सांगत नाही आहेस, दोन दिवस तु नव्हतास पण तु सोबत आहेस अस प्रत्तेक क्षणाला जाणवल होत.. तु नाहीयेस अस कधी वाटलेच नाही मला, तुझी चारोळी अधुरी आहे अगदी माझ्यासारखीच तुझ्यावहीवर मी ती पुर्ण केलीये... अन तुलाही... सांग मला हे सगळ चुकीच आहे...
मी:- {स्तब्धच झालो हे सगळे ऎकुन} पण... माझ्या प्रेमात पडायला तुम्ही मला जानताच किती??? ना मला तुम्ही ओळखता {माझ बोलनं अर्धवटच तोडलं अपघाती वळनाने}
अपघाती वळन:- मला तुझ मन आणि तुला माझ मन कळतय ओळखता येतंय, राहीलं तुझ वागनं, बोलनं, एका मनाला एक मन कळायला लागणंच प्रेमासाठी खुप आहे... तुझ्यासारख्या कवीला हे सांगायला नको... मी एका मनावर प्रेम केलंय त्या मना बद्दल तु एक शब्दही काही बोललास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही... तुझ मन माझच आहे आणि कायम असेल लक्षात ठेव...
मी:- हो तुझ्यापेक्षा दुसर कोणी वाईट असुही शकत नाही... माझ मन जे माझ्याकडुन हिरवुन घेतलंस...
अपघाती वळन:- म्हणजे...तुला म्हणायच काय आहे?
मी:- कोडं आहे माझ्या मनातल्या शब्दांच सोडवं... तुझ्याकडे मोबाईल आहे का??
अपघाती वळन :- कोडं मी सोडवेलच पण उत्तर कळु दे ना... हो आहे मोबाईल का रे?
मी:- सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुझ्या कडेच आहेत... नंबर दे तुझा एका कागदावर... हातावर लिहीला असता पण हाताला येणा-या घामाने पुसला गेला असता तुझा नंबर..म्हणुन कागदावर दे...
अपघाती वळन:- {खुप गोड हसलं} माझा नंबर तुझ्या पहील्या चारोळी खाली आहे घरी गेल्यावर बघ..!
मी:- शक्यच नाही मी चेक केले होते रजीस्टर त्यात असे काहीच नव्हते...
अपघती वळन:- रजीस्टर नाही, तुझी डायरी पिंक कलरची, तुझ्या नकळत तुझ्या ताईंनी तिच्या मैत्रीनीला वाचायला दिलेली, ताईंना काय झाले आणि तुझा अवतार असा का मला परवा सकाळपासुन माहीत होते, तु येतो म्हणाला पण आला नाही म्हणुन  ताई आल्या असतील तर त्यांना भेटुन थॅंक्स म्हनावे म्हणुन मी त्यांच्या डिपार्टमेंट मधे गेलेले..ताईंच्या डिपार्टमेंट बद्दल मला काकांनी सांगीतले...तिथे जावुन बघते तर तुझ्या डायरीतल्या एक-एक कवीतेचे वाचन चालले होते... शब्द तेच होते पण तुझे मन मला लगेच कळले... त्यांना डिस्टर्ब करत विचारलेच मी कुणाच्या कवीता आहेत... मग त्यानीं तुझ नाव सांगीतलं आणि ताईंन सोबत घडलेला सगळा प्रकार... तेव्हाच वाटलं तसच तुझ्याकडे याव पण...नाही हिम्मत झाली तुला अधार देण्या एवजी मिच कोसळले असते... म्हणुन तुझी डायरी सकाळी आणुन देईल म्हणून मी त्यांच्या कडुन घेतली रात्रभर वाचली..पण मन भरले नाही सकाळी येवुन त्यांना खोटी थापच मारली घरी विसरले म्हनुन... डायरी परत जागेवर ठेवायची होती त्यांना तुझ्या नकळत... ती आज सकाळी मी दिलीये आणि आता पर्यंत ती होती त्या जागेवर पोहचलीही असेल...
मी:- {हे सारे ऎकुन मी चाटच झालो..एव्हड अपघाती वळन ऍडव्हांस {आगावु} निघालं...} बर! ठीक आहे तुझा नंबर मिळाला की फ़ोन करतो घरुन..!
अपघाती वळन :- का रे मोबाईल नाहीये का तुझ्याकडे??
मी:- नाही त्याची तशी गरज आता पर्य़ंत वाटली नाही पण आता घ्यावा लागेल वाटत...
अपघाती वळन :- {गालात हसलं} एक कॉफ़ी मागवतोस का मला हवीये...
मी:- हो... आता एकाच कॉफ़ीत भागवू...{वाक्य अर्धवट सोडुन काकाला फ़क्त एक कॉफ़ीसाठी आवज दिला} {बाकी या वाक्याचा कोडं अपघाती वळनाकडुन काका कॉफ़ी घेउन आल्यावर सुटलं}
काका कॉफ़ी घेवुन आला, तोही एकच कप... माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने काकानी पाहीलं...ओठांनी हसुन अपघाती वळनाकडे पहात काकाला मी म्हणालो आता तुमच्या पोराला आणि पोरिला इथुन पुढे एकच कप कॉफ़ी लागेल...काका म्हनाला एकच का रे दोन का नाही?? मी म्हणालो एकाच कपातूण उष्टी कॉफ़ी पिल्यावर प्रेम जास्त वाढत म्हणे... अपघाती वळन सॉलीड लाजलं... काकाने माझ्याकडे पाहुन डोळामारला हसत हसत काका परत गेला... आधी तु कॉफ़ी पी वरुन माझ्यात आणि अपघाती वळनात प्रेमळ वाद काही क्षण चालला... शेवटी मलाच नमत घ्यावे लागले, कॉफ़ीचा पहीला घोट मी घेवुन कप अपघाती वळनाच्या समोर केला...पापण्यात तिच्या लज्जा होती, ओठांवर प्रेमाची लाली होती, हलका कंप हातात होता... पडु नये तो कप खाली म्हणुन दुसरा हात पुढे केला होता.. तो तिचा पहीला स्पर्श अस्तीत्वाची साक्ष देवुन गेला होता.. एक घोट पिवुन तिचा हात पुन्हा माझ्या हाता जवळ येत होता... तिच्या हातातला कप घेवुन बाजुला मी ठेवला होता... पुन्हा त्वरेने तिचा डावा हात माझ्या उजव्या हातात अलगत घट्ट मी धरला होता... तिच्या डोळ्यात पहात माझ्या डाव्या हाताने कप उचलला होता तिने उष्ट्या केलेल्या कॉफ़ीत साखरेचा गोडवा मला जानवला होता...कॉफ़ीचा शेवटचा थेंब तिच्या ओठांवर राहीला होता... लाल चुटूक जिभेने तीच्या अलगत टिपला होता... काही क्षण हातात हात घेवुन तसेच डोळ्यात बघत आम्ही बसलो होतो...

घरी जायची इच्छा मनातच ठेवत होतो... तसेच नि:शब्द आम्ही उठलो कॅंटीनच्या मागुन वळसा घालुन पार्कींगकडे आलो... गाडी तिच्या पुढ्यात नेवुन मी थांबलो होतो... बस! तुला घरी सोडतो बोललो होतो.. आई आणि ताई नंतर पहील्यांदा माझी प्रियसी मागे बसली होती... मोकळा रस्ता, बेभान वारा, रुसले होते, कुणासाठी तरी नकळत मी त्यांना दुर केले होते...माझ्या घराच्या आधीचे नवे पाचवे घर तिचे होते... तिला बाय करुन मी घरी आलो होतो माझ्य पुस्तकांच्या रॅक मधे माझी गुलबी डायरी शोधत होतो... दोन पुस्तकांच्या मधे दडलेली डायरी मला मिळाली होती... बेडवर बसुन अलगतच तिचे पहीले पान मी उघडले होते... माझ्या पहील्याच चारोळी खाली तिचा नंबर होता...

माझ्या या बोलक्या अबोल शब्दात
माझ्या प्रियसीचे बोलके प्रतिबिंब आहे
कधीतरी, कुठेतरी, कशीतरी भेटेल ती
माझ्या अश्रूंचे पसरलेले हलके थेंब आहे

९८******** तुझी प्रियसी...!

वाचुन मन प्रफ़ुल्लीत झाले होते... तिचा नंबर मला मिळाला होता... माझ्या बेडरुम मधला फ़ोन जवळ मी घेतला होता... क्रेडल उचलुन नंबर फ़िरवनार इतक्यात फ़ोन वाजला होता..बाबांनी ऑफ़ीसातुन फ़ोन केला होता... मुलीवर ओढावलेल्या प्रसंगाने मोबाईलचे महत्व त्या बापाला कळले होते, जेवन करुण अर्ध्या तासात ऑफ़ीसात ये नविन मोबाईल घेयला जावू ताईला सरप्राइझ देवु म्हणत होते...नशीबाच्या या योगाने माझ मन भरुन आले होते... उशाला घट्ट कवटाळून मन हलके मी केले होते, फ़्रेश होवुन, थोड खावुन गाडी बाहेर काढत होतो... नकळत गाडीचा हॉर्न मी वाजवला होता, माझ अपघाती वळन धावत गॅलरीत आलं होत, थोड्या वेळात फ़ोन करतो इशा-यात बोललो होतो.. बाबांच्या ऑफ़ीस मधे जावुन मार्केट मधुन दोन नविन मोबाईल आम्ही घेतले होते
त्यांच्याच ऑफ़ीस मधुन बी.एस.एन.एल. कंपनीचे सिम कार्ड घेतले होते, त्यांच्या मित्राने त्वरीत ते सुरु केले होते... सुरु होताच पहीला फ़ोन मी अपघाती वळनाला केला होता... तिचा मोबाईल नंबर   मी अपघाती वळन नावानेच सेव्ह केला होता... दिवसभर सोबत राहायचो रात्री एसएमएस वर बोलायचो, रात्रीची सुखद निद्रा मी इथे हरवली होती... विचारांच जाळ प्रत्तेक गोष्ट करतांना तिचा विचार करत होत, मित्रांसोबत बघीतले जानारे सिनेमे आत फ़स्ट डे फ़स्ट शो तिच्या सोबतच बघु लागलो, गाडीचा वेग आपॉप कमी झाला होता, गाडीवर तिच्याशी बोलत शहरा बाहेर भटकायचो, शहरातला गोंधळ नकोसा झाला होता, तिच्या सोबत शांत जागेत वेळ जात होता, पावसात भिजनं बंद झालं होत तिच्या सोबत जगायला तब्बेत ठनठनीत ठेवावी लागायची, कॉफ़ी स्लो पॉईझन असते म्हणुन कॉफ़ीची जागा चहाने घेतली होती, लेक्चरला टवाळक्या बंद झाल्या होत्या, एक जबाबदारी आयुष्यात आली होती, चांगल शीकुन बक्कळ पैसा कमवायचा होता, छोटी छोटी स्वप्ने पुर्ण करायची होती,
माझ्या वाढदीवसाला सगळ्या मित्रांच्या मैत्रीनींसोबत तिला पहील्यांदा घरी बोलवल होत, ताई आमच्या सोबत गप्पां मधे रमली होती, माझ अपघाती वळन किचन मधे आईला मदत करत होती, माझी आवड-नावड विचारत होती, माझ्या बालपनाच्या आठवनी, खोड्या, दंगा लहानपणाचे सगळे फ़ोटो पाहत होती... माझ्या घराशी नाते जुळवतांना प्रेमाची कमी नाही म्हणत होती, ताई-आई-बाबांच्या पसंतीला ती उतरली होती... मोठ्या बहीनीचे आधी म्हनुन वेटींग लीस्ट मधे आमची नोंद झाली होती... तिच्या घरी माझ्या आई-बाबा-ताई ची सरबराई झाली होती, जावई म्हणुन तिच्या आई-बाबांनी माझी निवड केली होती... अशातच ताईचे लग्न ऑक्टोंबरच्या दिवाळीत झाले होते... दिड महीन्याने आमच्या लग्नाचे अपील तिच्या व माझ्या आई-बाबांनी हातात घेतले होते... पहीलाच प्रेम विवाह म्हणुन आमच्या लग्नाची तारीख १४ फ़ेब्रुवारी पत्रीकेच्या शुभ महुर्तानुसार निघाली होती... मित्रांच्या, अप्तेष्टांच्या, थोरा मोठ्यांच्या अशीर्वादात आईची सुन मुलगी म्हणुन घरात आली होती...

_____________________________ समप्त _______________________________
.
मृदुंग