Powered By Blogger

Monday, December 26, 2016

स्पंदने.. त्या फुलपाखराची..! :)


♥ क्षण..! ♥

स्पंदने.. त्या फुलपाखराची..!

गॅलरीत बसल्या बसल्या कळलं नाही की काय होतंय आणि काय चाललंय? पण जे काही होत त्या रात्री भयंकर होतं. एक-एक थंड घाव होत असल्याचा भास. शरीराची शुद्ध तर नाहीच. थंड श्वासांचेही मग भान राहिले नाही. सुरु होत काहीतरी आतल्याआत. पण बाहेरच्या बाहेर सगळं गार पडत चाललं होतं. रगात वाहणार रक्तसुद्धा गोठतांना आपला प्रवाह थोपवत होता. पण झालं एकदाच काय व्हायचं ते. सगळं थांबलही आणि सुन्नही पडलं. जाणिवा पण बोथट होत गेल्या. नजेरेसमोरचा अंधार अलंकार होऊन लुप्त झाला. काही कळलं नाही मग पुढे काय झालं. डोळे उघडले तेव्हा बरंच काही तसंच होतं. जरा उजाडलं होतं. दुरुन कोणीतरी धावत येत होतं. त्राण नसलेलं शरीर एखादा बाण होऊन गप्प गार पडलेलं होते. नजर धूसर झाली होती आणि वाचा खुंटली होती. वेदना नव्हती ना संवेदना जाणवत होती. बस! स्पंदने त्या वेंधळ्या फुलपाखराची चुकत गेली आणि मग बंदच पडली..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Wednesday, December 21, 2016

कुचेष्टा..! :)


♥ क्षण..! ♥

कॅचेष्टा..! :)

बोलून झाल्यावर, आपण काय बोललो? याचा फेर विचार करत बसायची मला सवय नाही. त्यामुळे कदाचित, विचार करुन बोलायची सवय लावून घेतली आहे. अर्थात याला काही चौकट आखणे म्हणतात. मी ही म्हणतो. पण ही चौकट ओलांडण्याची इच्छा दुर्मिळ झालेली आहे. अंतर ठेवून वागल्यावर अंतर सहसा कमी होत नसते. ते अंतर वाढत जाते. आपण कोणत्या एका अनोळखी वाटेवर कुठवर चालत जाणार? त्यापेक्षा ओळखीची वाट थोडी फेऱ्याने पडली तरी ती चौकटीत नचुकता पावलांना उभेच करणार असते. मग आड मार्गावर किंवा वाटेत भेटलेले सहप्रवासी हे लुभावणारे स्वप्नदोष असतात. त्यांचं अस्तित्व अस्तित्वात खरोखर असतं. पण आपल्या स्वतःच्या आयुष्यात ती निव्वळ थट्टा आणि मस्करीच्या पुढे कुचेष्टा असते. ..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
7387922843

Tuesday, December 20, 2016

To be or not to be..? :-)


♥ क्षण..! ♥

To be or not to be..? :)

To be or not to be..?
एव्हढाच तर सवाल आहे...
Option ला काही नसून
सगळं equal झालं आहे...
Opportunityचं वादळ
Priorityत बदललं आहे...
Love नावाची अफवाच
Dirty बनलेली आहे...
दिसलेला स्पष्ट Picture
Capture होणं राहिलं आहे...
Happy आयुष्य मागतांना
Face बेक्कार पडलं आहे...
To be or not to be..?
Understanding खोटं
Reacting खरं झालं आहे...
ओळखणं social होऊन
Identity खाजगी आहे...
Tell you गप्प बसायचं
Moove on होऊन जायचं...
Restart करुन परत एकदा
स्वतःला Satisfy करुन घ्यायचं...
Try केलं होतं सगळं मनापासून
Unable झालं सोडून द्यायचं...
To be or not to be..?
जगायचं फक्त जगायचं आहे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Monday, December 19, 2016

ते दोघं..! :-)

माझ्या वॉलवर भेटलेल्या त्या दोघांना..! ;)

♥ क्षण..! ♥

ते दोघं..! :-)

सहज सूर जुळत नाही
न काही एक कळत नाही...
कशातही मन लागत नाही
आणि सहसा करमत नाही...
बऱ्याचदा कारण लागते
कधी तेही सापडत नाही...
हो-हो नाही-नाही असं नाही
पण थोडक्यात बरंच काही...
कधी धुंदी लागते आणि
बेधुंद तराने सुरेल वाटतात
पण उगाच समजत नाही
आणि मोकळं बोलत नाही..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

#आपण नको
#तुम्हीबोलायलाहवं #एकमेकांशी

Saturday, December 17, 2016

ही प्रीत तुझी मजला कळली नाही..! :)


♥ क्षण..! ♥

ही प्रीत तुझी मजला कळली नाही..!

मी अबोल होतो स्थिर होतो
तुझ्याशी अंतर ठेवून वागतो..
तू एक काही विचारल्यावर
मी बरंच काही नंतर सांगतो...

तू पिच्छा पुरवते मागे लागते
मी षंढ प्याला रिता करतो...
सगळं कळते मला-तुलाही
तरीही मग उगाच उरतो...

सैरभैर होतो अन् कोसळतो
पुन्हा मग मी सगळं आवरतो...
ओठांवरुनच परत परतवतो
मग कितीसा तुला कळतो..?

श्वास अनेक उसासा एकच
दिलासा तेवढा जवळ ठेवतो...
मितभाषा बोलून गोंधळ मांडतो
तरीही उगाच तुला छान वाटतो...

देणं-घेणं नसतं कशाचं नात्यात
नियमित व्यवहार हिशेबी राहतो...
वाचलं काय? उरलेलं काय होतं
रिता प्याला मग पुन्हा भरतो...

दोष घेऊन समारोप होऊन जातो
आरोप तरी जगजाहीर होत असतो...
तुला कळत नाही मी समजवत नाही
ही प्रीत तुझी मजला कळली नाही..!

तरीही...
काहीनाही
काहीही...
कधीही
केव्हाही...
जेव्हाही
तेव्हाही...
आणि
आताही..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com

Saturday, December 10, 2016

क्रिमरोल..! :-)


♥ क्षण..! ♥

क्रिमरोल..! :)

कुणीतरी: माझ्यासाठी एक छानसा रोल लिहून दे! अगदी लोकांना कायम लक्षात राहील असाच.
मी: प्रत्येक रोल चांगला आणि छानच लिहिला गेला असतो. स्वतःतल्या अभिनयाने त्याला न्याय दे. चांगल्या रोलच्या शोधात चाललेली भटकंती बंद होईल..!
कुणीतरी: म्हणजे? तुला म्हणायचं काय आहे? मी चांगला अभिनय करत नाही?
मी: अगदी तसं नाही. पण थोडं फार तसंच. तू एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेस. पण कुठला रोल आपल्याकडून काय मागत आहे. याचा थोडा विचार कर. ग्लॅमरच्या चकाकीत फक्त चमकत ठेवणारे रोल पितांबरी नाहीतर विमबार सोप सारखे रासायनिक असतात. त्यात अंगणात लागलेल्या लिंबाची ओरिजनल सर येत नाही. रुजावे लागते. उन्हाळे-पावसाळे सहन करावे लागतात. सहज मिळणारे खत दुरापास्त झाल्यावर उपासमार पण खरोखर अनुभवावी लागते. तेव्हा ती जिवंत आणि मनापासून उमटते.
कुणीतरी: आजकाल सहज सगळं मिळत असतांना एवढं कशाला करायचं? की तुला द्यायचं नाही?
मी: अभिनयाच्या गुणांची तू घमंड निश्चित कर. पण सहज चार पैसे मोजून विकत घेतलेला रोल चांगला होईलच कशावरुन? मला काय मी सहज देऊन टाकेल लिहून. पण तो रोलही तुझ्याकडून चांगलाच होईल याची खात्री आहे का तुला?
कुणीतरी: हो! निश्चितच. तू लिहिलेला रोल म्हणजे चांगलाच होणार. दे स्क्रिप्ट.
मी: तुला हवा तसा आणि शोभेल असा सध्या माझ्याकडे रोल नाहीये. काहीतरी द्यायला म्हणून पण माझ्याकडे रोल नाहीये.
कुणीतरी: तुला खरंच रोल द्यायचा नाही?
मी: पुणेतल्या मालपाणीचे क्रिमरोल आहे देऊ..?
कुणीतरी: याचे परिणाम खूप वाईट होतील. बघून घेईल तुला. (चरफडत गेली)

दिखावट्या सौंदर्यासाठी मी तडजोड केली नाही आणि शब्दांचा बाजार पण मांडला नाही. स्वतःच्या मिजासात ऐटीत असलेले बरेच उंबरठे पाहिले आणि अनुभवले पण आहेत. त्यांच्यापासून वेगळं होतांना स्वतंत्र आणि जगावेगळं स्वतःत जिवंत असतं. तेव्हा परिणामांची पर्वा ही वेळ करते. तेवढीपण मला आता सवड नाही एंटरटेन करायला..!
#जोहोगादेखलेंगे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com

Wednesday, December 7, 2016

मनावर..! :-)


♥ क्षण..! ♥

मनावर..!

हल्ली माझं बोलणं त्यापेक्षा जास्त माझं लिहिणं तिच्यासह सगळेच फार मनावर घेतात. मला काय वाटलं? नव्हे तुझ्याकडून काय हवं यात अपेक्षांची मग कोंडी होते. तुम्ही जेवढं मनावर घेता! तेवढं मी कागदावर पण ठेवत नाही. हे माझं सत्य आहे. माझ्या जाणिवा अजून जिवंत आहेत. पण तेवढ्याच उणिवा मी संवादासाठी मांडून ठेवल्या आहेत.
आपल्याला एकमेकांशी बोलायला एवढं एकच माध्यम आता उरलेलं आहे. अर्थात चौकट माझी मला जपायची आहे. तुझी/तुमची तुला/तुम्हाला यात अतिक्रमण कुणालाच करायचे नाही. निव्वळ ओघवते काही लिहून झाल्यावर येणारं सर्व काही अपेक्षित असते. हे ठरवून म्हणता येईल.
सोशल होतांना पब्लिकची काय टेस्ट आहे? हे कळायला यापेक्षा दुसरं माध्यम कागदावर तरी नसतं. सगळं काही ताटात वाढून बघावं लागतं. नेमकं काय आवडत? हे उघड माहीत असूनही नावडतच कागदावर लिहून पुढे वाढलं जात असतं. मुद्दाम कारण ज्याला तुम्ही वाचताय हे त्याचं कर्तव्य आहे की तो तुमची चॉईस आणि लाईक या दोघांच्या चक्रव्यूहापेक्षा सहज नजर गेली न वाचलं गेलं अथवा रिमाईंड झालं. चुकलं आणि ओढून ताणून बुद्धीला ताण दिलाय असं वाटतं ना! त्यापेक्षा जाणवतं. तेव्हा लिहिलेलं काहीही न समजणारेही स्वतःची उपस्थिती कागदावर नजरेतून देतात.
रटाळ अर्थहीन असलं तरी. वाचक असतो. श्रोता जागरूक असतो. रसिक नाराज असतो आणि प्रेयसी रुसली असते. कारण अनपेक्षित मांडलेलं अपेक्षाभंग करत असते. तरीही अपेक्षेवर आणि वेळेवर सर्वस्वी सोपवून चालढकल होत असते. चॉईस आणि लाईकच काहीतरी मिळेल म्हणून. व्हेरिएशन आणि व्हरायटी यातली कॉन्टिटी मार खाते. कारण ते कॉन्स्टंट नसतं. स्टेबल नसतं. ओघवतं असतं. म्हणून काही आवडलं नाही तरी ते आपल्याला आवडलेलं नसतं हे खरंय. तरी भावना आणि मनाचा विचार करून दुखापतीवर सॉरी ही फुंकर निर्थक असते.
मनावर घेतलं सरळ साधं सोपं ते तिथंच फुलस्टॉप लावतं. जे कळत नाही. आवडत नाही. तेच मनावर नजरेसमोर सतत येत. काय असेल? म्हणायचं काय असेल? काहीतरीच काय हे? असं का पण? प्रश्न तयार होतात. उत्तर माहीत असूनही. सहज विसरलं जातं थोडं लक्षात राहायला फार चुकावं लागतं अगदी असं तेव्हा कुठं कागदावरच असं मनावर घेतलं जातं. नाही का..?
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Monday, December 5, 2016

फ्लॅटमेट 3 :-)

#पुणे

#फ्लॅटमेट 3
ए! उठे! स्ट्रॉ कुठंय? दे पटकन..!
काय भाई? ती काय तिथं ठेवलीये...
हां सापडली..!
हॅहॅहॅ! काय भाई? काय चाललंय? स्ट्रॉ खिशात गुलाबाच्या फुलासारखं खोचून कुठं निघालायेस?
कुलकर्ण्यांकडे..!
परमेश्वरा! ते आणि कशाला?
कॉफी प्यायला बोलवलंय आणि काय हां त्यांना मी माझं लेखकीय नाव 'मृदुंग' हेच का म्हणून ठेवलं? या प्रश्नाचं उत्तर हवंय..!
हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. म्हणजे कुलकर्णी स्वतःच्याच कॉफीने स्वतःच तोंड भाजून घेतात. असे कसे भेटतात रे भाई तुला एकेक नमुने?
आपण कुठं आहोत..?
आपण पुण्यात! हे काय विचारणं झालं?
इथंच चुकलास बघ! आपण पुणेत आहोत आणि इथं फ्री मध्ये सॅम्पल जसा पेटीस व समोस्यासोबत देतात ना अगदी। तसेच पुणेत शोधले की नमुने भेटत राहतात..!
हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. कुलकर्ण्यांना जरा जपून आणि समजून घे भाई!
नको. मी गैरसमज दूर नाही करत कुणाचे तुला चांगल्याने माहीत आहे. झालेले समज आता आणखी वाढवून येतो बाकी नंतर कुलकर्णी गैर झालेत तरी आपलं काय जातंय..? ही स्ट्रॉ त्यासाठीच आहे. कॉफी पिऊन झाल्यावर सप्रेम भेट म्हणून उष्टी स्ट्रॉ द्यायला..!
अगं आई गं! भाई हे लय झ्याक होतं बग! हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. हॅहॅहॅ.
त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ये ही स्ट्रॉ..! चल जातो बाय..!
#एवढंच
✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com

Saturday, November 26, 2016

फ्लॅटमेट..! (2)

#पुणे
#समजदारफ्लॅटमेंट

(जोशी काकुंकडून आल्यानंतर)
तो : ए साल्या! काल जोशींकडून आल्यापासून तू एक अवाक्षर बोलला नाहीयेस. तिकडे ती प्रार्थना फोन उचलत नाही. इकडे तू बोलत नाही. समजू काय मी? वाट बिट लावलीस की काय? ए मेल्या बोल ना! पाया पडू का? (पाया पडतो)
मी : तथास्तू..!
तो : बोल ना भाई... काय झालं तिकडे?
मी : पुणेकर आणि पु. लं. चे परिचित जवळचे लोकं त्यांना #भाई म्हणायचे. अगदी त्यांची बायकोसुद्धा.
तो : तू कुठं कमियेस मग? माझा अंत नको पाहूस सांग पटकन.
मी : काही नाही रे, घर शोधण्यातच १ तास गेला. या जोश्यांच सदाशिवपेठ म्हणजे कुंभ मेळाच आहे तो ही दुसरा-तिसरा एकत्र.
तो : असं का म्हणतोस?
मी : नाही तर काय? कुलकर्णी किराणा दुकानाच्या बरोबर खाली थांबून जोशी काकूंना फोन केला. इथं थांबलोय. अपार्टमेंटच नाव आणि फ्लॅट नंबर सांगा. ते म्हणतात काय? कुलकर्णी किराणा दुकानात कोण येतं जातं सगळं दिसतं आम्हाला. तू थांबलेला कुठंच दिसत नाहीये. मी 8व्या मजल्यावरून खिडकीतून बघतेय.
तो : म्हणजे तुझं गटार अजून तुंबलं.
मी : नाहीतर काय? म्हटलं जोशी काकू असं मोठ्या आवाजात ओरडू का? साधारण किती जोशी काकू जमतील? त्यावर म्हणतात अख्ख सदाशिवपेठ एकत्र येईल. पुढं मी म्हणालो तरी तुम्ही आठव्या मजल्यावरची खिडकी सोडणार नाही हो ना? हो म्हणते बाई. सगळं दिसतं ना!
तो : मग काय खरंच आवाज ठोकलास काय?
मी : तुझी अपेक्षा तीच होती ना? पण नाही चिंटू दिसला. तुझा होणार साला बाईक कॉर्नरवर थांबवून खिडकीतून दिसणार नाही अश्या आडोश्यात सापडला!
तो : कोण होती सोबत?
मी : मला काय करायचंय? जी होती ती वात्रट होती. पण चिंटू चपापला रे मला पाहून!
तो : चला काहीतरी सापडलं.
मी : चिंटूला घरी चल म्हणालो. आलाच नाही. घरी काही सांगू नको म्हणाला. म्हटलं पत्ता दे तासभर झाला घर शोधतोय. त्याने पत्ता दिला तर नाही पण बिल्डिंग दाखवली दुरुनच. मग तो आणि ती वात्रट गेले निघून.
तो : मग एकदाचा घरात घुसलास ना?
मी : हो, पायातल्या जोड्यांसकट घुसलो.
तो : काहीच बोलल्या नाहीत?
मी : मी बोलू दिलंच नाही. घुसल्या घुसल्या प्रश्न डागले त्यांच्यावर. नको ती, नको ते अर्थहीन सगळे प्रश्न सोडले एकदम. उत्तर ऐकायची इच्छा नव्हती म्हणून पुढची प्रश्न सोडत गेलो. अशीच प्रश्न प्रश्न सोडत अर्धातास झाला. तेवढ्यात चिंटू पण आला. प्रश्न झाडत मी दाराबाहेर निघालो आणि लिफ्ट मधून जोशी काकूंना चिंटूचा आणि त्या वात्रटचा फोटो व्हॉट्सअप केला. मी लिफ्ट मधून बाईक जवळ येता येता आठव्या मजल्यावरून लय रडारड ऐकू येत होती खाली.
तो : कप्पाळ! करायला काय गेला होतास आणि करून काय आलास?
मी : असं झालं म्हणून सांगत नव्हतो.
तो : प्रार्थना पण फोन उचलत नाहीये.
मी : मी माझा फोन चेकवला प्रार्थनेचा मॅसेजमध्ये मला प्रसाद होता. "आईचं बीपी आता ठिके. बाबा उदास आहेत आणि मी मजेत. घरात पहिली मुलगी पर जातीतली येणार आणि मी पर जातीतील मुलाच्या घरात जाणार. माझ्या ठोंब्याला काही सांगू नकोस. संध्याकाळी थेट येऊन भेटणार आहे. तेव्हा सांगते मी माझ्या सोनूला..
#तेदोघेफ्लॅटबाहेरपडल्यावर
#इतकंच..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com

एकटेपणा..! :-)

https://youtu.be/ieeJiQUa_Cc


♥ क्षण..! ♥

एकटेपणा..! :-)

नातं नसतं तेव्हा ते नातं हवं असतं
नात्यांत जगणं मग नकोसं होत असतं...

दररोज कुणी काहीतरी शोधत रहातं
काही ना काही स्वतःच हरवत रहातं...

क्षणभरात काहीतरी सहज हाताशी येतं
लाडीगोडी लाऊन एक आयुष्य बनत जातं...

दिवस जातात. वर्षे बदलतात आणि मग
आपण आपलं म्हणावं असं काहीच नसतं...

ज्यांना आपलं म्हणावं त्यांच्यात अंतर असतं
जवळ कुणी बघावं तर सगळं जग परकं असतं...

आपला एकटेपणाच असा प्रामाणिक होतो
कितीही नाती... नवी, जुनी किंवा पुन्हा
जोडली तरी त्यांना सहज गुंफण जमत नसतं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
२६ नोव्हेंबर २०१६
७३८७९ २२८४३

Friday, November 25, 2016

फ्लॅटमेट..! :-)

#पुणे
#समजदारफ्लॅटमेट

तो : काय रे हा गावंढळ अवतार घेऊन कुठं निघालास?
मी : सदाशिवपेठेत जोशी काकूंकडे!
तो : अच्छा? म्हणजे त्यांचं बीपी वाढवून तू परत येणार.
मी : मी कशाला त्यांच बीपी वाढवू? असले आजार या जो.... श्यांना जन्मजात चिकटलेले असतात.
तो : मग आपल्या श्री मुखात ठेवणीतले शब्द, स्वभावात गोडवा आणि आचरणात सभ्यता घेतलीस ना सोबत?
मी : अवतार गावंढळ ओळखलास ते बरोबर होतं. त्यावरून समजायला हवं होतं तुला. माझ्या गटारीत सगळं काही तुंबल आहे.
तो : म्हणजे तू त्यांचं बीपी वाढवणार आणि या शुगर फ्री ग्लुकोजच्या बिस्कीटांनी उपकारपण करणार हो ना?
मी : अगदी बरोबर!
तो : अरे पण हे उगाच नाही का?
मी : आमंत्रण त्यांनी दिलंय मला.
तो : म्हणजे तू सोडणार नाही?
मी : मी सोडून दिलंय. आता तोडून येतो. दे गाडीची चावी.
तो : माझा नमस्कार सांग.
मी : कुणाला?
तो : जोशी काकांना!
मी : चल ना सोबत स्वतःच घाल नमस्कार! जावयाला पाहून आणखी बरं वाटेल त्यांना.
तो : मग मी तुला पुन्हा नाही दिसायचो.
मी : मला चालेल तसाही तुझा वैताग आलाय मला.
तो : फार बोलू नकोस हं.
मी : त्यांनी फार ऐकू नये अशी प्रार्थना कर! पण तुझं दुर्दैव असं की त्यांनीच त्यांच्या लग्नाचं फलित म्हणून प्रार्थना केलीये जी तुझ्या प्रेमात पडलीये. तिलाच आता तुला आयुष्यभर राटावं लागेल. बाकी जोशी आज चक्कर येऊन नक्कीच पडतील एवढी माझी खात्री..!
चल बाय..!
(फ्लॅटवरुन निघून चौकात थांबलो. स्टेट्स टाकला. पोस्ट झाली फोन बंद करुन पुढं मोर्चा वळवला)
#इतकंच
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com

Wednesday, November 23, 2016

विनाकारण..! :-)


♥ क्षण..! ♥

विनाकारण..! :-)

आपण जेव्हा एकटे पडतो. माणसं आपल्याला एकटे सोडतात तेव्हा आठवणी आपल्याला जगण्यासाठी बळ देतात. कधी रात्रीच्या गडद काळोखात डोळ्यातील अश्रू आपल्या सहवासाचा आधार होतात. तर कधी ओंजळीतून निसटलेल्या क्षणांचे सोबती होतात. अवचित नशिबाचे प्राक्तन म्हणून मिटल्या पापण्यांचे लुभावणे स्वप्ने होतात. म्हणूनच आयुष्याचा तेवढासा एकाकी प्रवास भावविभोर होत असतो. आठवणी दाटण्याचे आणि आठवणी आठवण्याचे आपल्याकडे एवढेच एक कारण विनाकारण असते..!
------------------------
पियुष (✍ मृदुंग®)
kshanatch@gmail.com

Monday, November 21, 2016

पाच वर्षे... 'क्षण' वर्धापनदिन..!

पाच वर्षे झालीत आता...
वर्धापणाची ही पूर्व सांज अजून एका जुनाट झालेल्या नव्या वळणाची... निव्वळ 'क्षण' तुझे + माझे = आपले..? :-( :-) ;)

क्षण वाचक, रसिक आणि शुभचिंतकांच्या ऋणानुबंधनात मी...
✍ मृदुंग®

Thursday, November 17, 2016

मी आणि माझी कॉफी..! :-)


♥ क्षण..! ♥

मी आणि माझी कॉफी..!

हे माझे ओठ आहेत ना...
ते एखादं सौंदर्य अथवा लावण्य पाहून शीळ घालतात...
डोळे प्रसन्न होऊन दिपुनही जातात...
पण... असलं काही दिसावं लागतं किंवा निदान
माझ्यासमोर तरी ते यावं लागतं... आणि मी ते बघावं लागतं...
जसं आता तुला या क्षणी, यावेळी मी बघतोय अगदी तसंच...
तेव्हा कुठे मग पुढचा प्रवास शीळ घालत सुरु होतो...
मग याला तू माझी रसिकता म्हण किंवा काहीही...
तुझ्यासारखी रंजकता सोबत असेल तर मग रगेल आणि रंगेल सगळंच होईल..!
#मीआणिमाझीकॉफी
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com

Wednesday, November 9, 2016

मृदुंग


♥ क्षण..! ♥

मृदुंग..!

आज हे नाव कमावल्याचं सार्थक छे! खूप वाईट वाटत आहे. 500 & 1000 च्या नोटा दुर्मिळ झाल्यात जमा नसूनही #पुणे येथे कुठलंही अमृततुल्य स्वीकारायला तयार नाही. खिशातील होती नव्हती चिल्लर (सुट्टे नव्हे) संपून गेली. टिश्यू (हा कायम इश्यू पेपर असलेल्या माझ्यासारख्याच्या) पोटातली आग पेपरवर शब्दांनी विझवायच्या पवित्र्यात होतोच. असंच काहीतरी उपाशी पोटातण दोन ओळी खरडल्या.. "पोटातली भूक भागवायला कालपर्यंत नोट सर्रास वापरली, आज अन्नाची ऐपत बघ नोटेलाही ती नाही परवडली - मृदुंग" असं लिहून तो इश्यू गोळा करून टेबलवर ठेवला. अमृततुल्यतली गर्दी कमी करायला बाहेरची वाट धरली. इथे उपाशी पोटोबा, काय नाव घेईल तुझं विठोबा..? स्वतःशीच बडबडत पार्किंग जवळ मरतुकड्या गाडीवर येऊन बसलो. पाच एक मिनिटं गेली असतील. तो इश्यू हातात नाचवत कडक इस्त्रीच्या कपड्यातला एक गृहस्थ माझ्याकडे संभ्रमाणे बघत उभा राहिला. माझ्याकडे बोट दाखवून जरा स्पष्ट आणि पुणेरी कणखर टोनिंगमध्ये बोलला मृदुंगss का? मी वदलो हो मीच नाईलाज आहे. तो गृहस्थ जवळ आला हात धरून अमृततुल्यात ओढत घेऊन गेला. जिथं बसलो होतो तिथंच मला बसवत स्वतःही बसला. इश्यू पेपर पुढं करत म्हणाला "ही अशी कागद सांभाळून ठेवत जा फार दुर्मिळ असतात."😢 त्यांचं वाक्य पुढं मी पूर्ण केलं "दुर्मिळ कागद पुढं विदीर्ण होतात आणि कालांतराने त्यांच्या अवस्थेची कोणी दखल घेत नाही. म्हणून स्वतःच झिजू लागतात." छान! मी म्हटलं होतं ना तुला (त्या गृहस्थांची सौ. त्यांच्या शेजारी येऊन बसल्या.) भयंकर आहे हा! ते गृहस्थ "हो, कळलं आणि पटलंही पुन्हा तुझ्या आवडत्या लेखकांच्या वाटेला नाही जाणार. या पामराला माफ करा." त्यांची सौ. 'पोटोबाचं बघा मग ठरवू!" मी आपला उठलो. उगाच रोमान्स कडवट करायची इच्छा नव्हती (त्यांचाच हं). पुन्हा त्यांनी टोकल अन् थांबवलं(जोडीने) 'जेऊन जा!" मी "उपकार नाही घेत मी पुण्यात तरी नाहीच. आभारी आहे." गृहस्थ काही बोलणार होते, त्यांच्या सौ.च त्यांना अडवत बोलल्या "चेंज तर घेऊ शकतोस? आणि चेंज मिळाल्यावर तुझं बिल तू देऊ पण शकतोस?" माणसाची दुखरी नस पकडून मतलबाची गोष्टी तिऱ्हाईताच्या गळ्याखाली उतरवणारी कायम दुसऱ्याचीच बायको असते. मी "मला चेंज दिल्यावर तुम्हाला काय उरणार?" सौ. वदल्या "हे बँकेत आहेत मिळतील सहज चेंज." मी आपला खात्री करायला "नक्की का?" ते गृहस्थ "हो, नक्कीच. अंतर्गत कामकाज सुरु आहे... पुढं निवांत बसत गप्पा सुरु झाल्या. ओळख झाली अर्थात त्यांनी पटवून दिली. भरीत, पिठलं, शेवभाजी भाकरी, भात फक्कड जेवण झालं." स्वभावानुसार चेंज घेऊन माझं मी बिल दिलं. पुढं ते एकत्र गेलं. जरा वेळ रेंगाळून अर्थात मोदी या विषयावरच्या चर्चेला कंटाळून त्या सौ.नी विषय बदलला. "पुण्यात आहेस तर हा हेकेखोरपणा सोड, नाहीतर उपाशी मरशील?" मी "छे, हा हेकेखोरपणा नाही स्वाभिमान आहे. कुणाचे उपकार का म्हणून मी घ्यावे? सुट्टे नव्हते. पण पैसे नाहीत असं तर काही नव्हतं. तसंही या पुण्यात आणि पुण्यातल्यांना जास्त करुन अहंकार आणि स्वतःच श्रेष्ठत्व पदोपदी सिद्ध करायची सवय आहे. त्यांनी ती जपली तसा मी माझा स्वाभिमान जपला. अंतर एवढंच ते पुणेकर अहंकाराने ताठ आहेत आणि मी स्वाभिमानाने." सौ."किती अवघड बोलतो, लिहितो तर लिहितो बोलतोही." मी "काय करु पुण्यात हे असलंच वागावं लागतं ते बदलत नाही आणि मी सुधारत नाही."
बाकी बरच मग इकडंच- तिकडंच-घरचं बोलून झाल्यावर गृहस्थ म्हणाले "ही सांगत असते बऱ्याचदा, सांगत काय वाचून दाखवत असते तुझं लिखाण. पुन्हा रितसर निमंत्रण देऊन घरी बोलावलं तर ये जेवायला. मी "हा आज झालेला दुर्मिळ योगायोग दीर्घकाळासाठी खूप आहे. घरीपण योगायोगानेच येईल." गृहस्थ "पण घरी हे इश्यू पेपर नाहीत रे." मी "म्हणून हा मी परत कुठं घेतला?" तिघेही हसलो. गृहस्थांनी मी दिलेली नोट परत केली आणि म्हणाले "लिही जरा यावर काहीतरी आता या क्षणाला फ्रेम करून लावेल घरात." "माझी ओळख कागदावरच्या शब्दांनीच झालेली आहे. मला जमत नसलेल्या व्यवहारांचा हिशेब मात्र या कागदावर आहे.. -मृदुंग."

गृस्थांच्या आणि त्यांच्या सौं.च्या आग्रहास्तव नाव नमूद करत नाहीये. त्यांचं नाव नाही म्हणून अमृततूल्याची जाहिरात करण्याची इच्छा नाही! बदलेली करन्सी, वेळ आणि ऋतू लक्षात राहून जातो. किती काळ? माहीत नाही..!
------- ✍ मृदुंग®
०९ नोहेंबर २०१६
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, November 3, 2016

जखमी चिता..! :-)


♥ क्षण..! ♥

जखमी चिता..!

ती जखम उसवल्यावर माझी ओठ उगाच हसली... कदाचित ओठांच्या हसण्यातच वेदना लपून गेली... तरी कळणाऱ्याला आतली कळ आणि कळकळ दोन्ही कळली... पण आपलंच मन सुखातही दुःख साजरे करत बसली... काहीतरीच होतं ते, खरं वाटलंही होतं. स्पष्ट तेवढंच खोटं अश्रूंच्या धुक्यात लपलेलं होतं. पापणीच्या ढगाला यातनेनं पोखरलं होतं... चित्कार काय काढणार आणि उद्धार कोणत्या नावाचा करणार? घश्याला कोरड पडली होती. तहान लागलेली पण प्रेमाची तळ आटलेली... चक्क सावलीतही निखाऱ्यांची चटके बसली... नजर जड होत गेली... शरीर सैल झाले... प्राणांचे ओझे मग भडाग्निच्या आधारावर हेलकावे खात गेले... कशाला? जखमी चितेचा अपमान नको म्हणून..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३