Powered By Blogger

Friday, January 29, 2016

शब्दनाट्य..! :-)


♥ क्षण..! ♥

शब्दनाट्य..!

नाटकाला गेल्यावर एक नाटक रंगमंचावर सुरु होतं आणि एक नाटक प्रेक्षकांमध्ये सुरु होतं. रंगमंचावरचे नाटक बघायला तिकिटाचे पैसे मोजावे लागतात आणि प्रेक्षकांमधले नाटक बघायला फक्त नजर व श्रवनिका संवेदनशील असावी लागते. रंगमंचाएवढेच प्रेक्षकांमधील नाटक रंगतदार आणि चपखल देखील असतं. त्यातील संवाद हे शिव्यांनी सुरु होऊन शिव्यांनीच संपणे ठरलेले असते त्यामुळे त्यांचे पाठांतर करावेच लागत नाही. रंगमंचकाची भव्यता आवश्यक असत नाही ना विद्युत रोषणाईचा गरज असते. बसं तापट डोकं, तिखट जीभ आणि आजूबाजूला स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्यांचे सुंदर गरीब चेहरे पुरेसे असतात. तिथे कोणीच लेखक नसतो, आयोजक नसतो आणि कलाकार तर मुळीच नसतो असतात ते नाटककार जे दोन्ही नाटकांचा भरभरुन आस्वाद घेतात आणि त्या रम्य सायंकाळला लक्षात ठेवतात. कारण नाटकाची नैसर्गिक रित आहे नाटक संपल्यावर खरं नाटक सुरु करायचं असतं आणि ठरलेल्याच संवादांवर नाटकाचा शेवट करायचा असतो कारण टाळी तेव्हाच मिळणार असते! कुणी कितीही शुद्ध भाषेत खटकेबाज संवाद लिहिलेत तरी त्यांना शृंगार दागिना म्हणून शिव्यांनाच स्वीकारावं लागत असतं. खटके उडविण्यात शिव्यांचे योगदान आजतागायत जे मिळत आहे याची कदर भाषेत झाली म्हणजे समजायचं प्रयोग करण्याआधी व रंगमंच चढण्याआधीच नाटक आपल्या जागेवर म्हणजे रस्त्यावर येऊन बसलं आहे ज्याला नजरा हजारो लाखो मिळत असतील पण पाठ थोपटून खूप छान नाटक आहे म्हणणारे प्रेक्षक, रसिक मायबाप आणि उत्साह भरुन साथ देणारा रंगमंच फार दुर्मिळतेने मिळत राहतो. नाटक करावीत, अगदी नाटकाला येऊनही नाटक करावीत पण आपलं नाटक कुठे कसं आणि कधी थांबवाव कळलं कि, नाटकातून मन उतरत नाही अन् मन भरतही नाही अगदी कागदावर रंगलेल्या या एका शब्दनाट्यासारखेच..!
---------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Tuesday, January 26, 2016

चोचीनेच तारलं होतं..! :-)


♥ क्षण..! ♥

चोचीनेच तारलं होतं..!

फांदीवर कुठल्या घरटं एक होतं
फासे पारध्याच जाळं तिथेच होतं,

नजरेत भरारी न पंखात बळ होतं
चौघांचेच कुटुंब ते किलबिल होतं,

दिवस दाणे वेचून सांजेत मन भुलतं
घरट्याचं आंगण प्राजक्तानेच सजतं

तुळशीचं वृंदावनही सदा हसत होतं
घरट्यात ते कुटुंब सुखाने नांदत होतं,

एकदा पारध्याचे नशिब फळफळलं
कोवळं पंख जाळ्यात सापडलं होतं,

घरटं उदास झालं हताश होऊन गेलं
मुक आक्रोशात नभही निनादलं होतं,

सावज झाला असा कोवळाचं जीव
मनात कुणाच्याही चुकचुकलं नव्हतं,

आभाळचं होता पिंजरा कळलं असतं
घरट्याचं जाळं कुणीच विनलंही नसतं,

वेंधळी पाखरं दुखासह दूर उडून गेली
सुखाची किंमत देत जीव उधारचं होतं,

उदार पाखरांची ही तर महिमा झाली
पारध्याला स्वतः चोचीनेच तारलं होतं..
चोचीनेच तारलं होतं..!
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Sunday, January 24, 2016

उद्धवा आणि राध्येय..! :-)


♥ क्षण..! ♥

उद्धवा आणि राध्येय..!

उद्धवा! कवितेची व्यथा तुलाही का न कळावी?
राध्येय! जो वाचतो आहे त्याचीच तीही व्हावी..!
उद्धवा! सांग मला, काय चुकलं माझं? कागदाचा उद्धार करुन शब्दांची आभूषणे देत आलो मी! कित्येक दागिने शब्दांनी कागदावर घडवत आलो मी! शब्दांचा नजराणा बहालही केला मी कागदावर आणि कागदाला महत्त्व शून्यातून महत्त्वपूर्णही करत आलो मी, बोल उद्धवा बोल...
राध्येय! कागद जरी कोरा होता, तो मुका होता! तुझ्या शब्दांनी त्याला वाचा दिली म्हणून तो महत्त्वपूर्ण झाला! तू अलंकारांची शब्दाभूषणे नजर केली कागदाने हसत हसत तीही स्वीकारली! तू कागदाच्या अंगा-अंगावर लेखणीच्या टोकाने कित्येक बारीक घाव कोरलेस सांग जराही का कागदाने कुरकुर केली? तू लिहिलेला प्रत्येक शब्द कागदाने जपून ठेवला पिढ्या न पिढ्या पुढेही नेला! कधी वि.सं., कधी ग्रेस, कधी ग्रेट भट, कधी कुसुमाग्रज आणि कधी विं. दा., तर कधी नुसतीच निंदा! प्रत्येकाने स्वतःच्या वेगवेगळ्या शैलीने कागदावर शब्दांचे आभूषणे मढवली, घडवली, अगदी कागदावर नटवलीसुद्धा तेव्हाच शब्दातून मन जिंकण्याचे यश ते अजरामर घेऊन गेलेत! आजही कशाच्या आधारावर जपलाय तुझा शब्द इतिहास? कागदाच्याच ना? काळ आधुनिक झालाय ऑडिओ, व्हिडिओ, रेकॉर्ड्स यांचा कॉमन बेस काय? कागद! शब्दांचा आधार काय? कागद आणि कवितांचा जन्म गाव काय? कागद! नो मॅटर माध्यम कोण आहे? शब्दांतून श्रोत्यांपर्यंतचा दुवा हा फक्त कागदचं आहे! जपून ठेवू नकोस कागदाला, चुरगाळेल! घडी करुन ठेवूही नकोस, हरवेल! हा कागद घे, भर आणि पुढे जाऊ दे.. छानसे पुस्तक म्हणून कागदांनाच हातात पडू दे! शब्दांच्या आभूषणांनी नटवशील तेव्हाच तर तुझ्याही कागदाला मोल आहे..!
उद्धवा! कळले मला, माझा जन्मदाता कागदचं मला तारतो आहे! माझा एकएक श्वास कागदावरच खेळतो आहे! शब्दाने भरुनही पुढचा कागद मला कोरा करतो आहे. कारण माझ्यानंतर माझा कागद शेवटीही कोराचं उरणार आहे! कुणाआधी माझा कागदचं मला कोरा करणार आहे. हेच माझ्या आयुष्याचं कागदाला दान आहे! मी कितीही शब्दांनी भरुन कागदाने मात्र कोरंच राहणं आहे..!
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

(यात या पामराणे थोर कवी व लेखकांची नावे थोडक्यात व तुटक वापरलीत ती निव्वळ या संवादांची आवश्यकता म्हणून विडंबन आणि विटंबन करण्याचा कुठलाही प्रयत्न यात नाही जर तसा आढळून येत असेल किंवा जाणवत असेल तर तो क्षमाप्रार्थी समजावा..!)

आयुष्य गुलजार आहे..! (भाग-4) :-)


♥क्षण..! ♥

आयुष्य गुलजार आहे..! (भाग-4)

कुठलेच नाते हे गॅरेंटी आणि वॉरंटी घेऊन येत नसते... एखाद्यासोबत वाईट झालं म्हणून आपल्यासोबत किंवा कुणासोबतही तसे काही होऊ नये अशी इच्छा प्रत्येकाची असते... पण वेळ आणि परिस्थितीच्या बदलांना स्वीकारायचे असते ते जमले कि सगळं काही सोप होतं... उदा आपण पोळ्या खातो त्या तव्यावर शेकूनच ना तिथे तव्याने तापू नये पण पोळी शेकून द्यावी असा हट्ट चालतो का आपला? नाही ना... लग्नही तसेच आहे एक चुकतो तर दुसरा सांभाळतो... कारण दुसरा बरोबर असतो म्हणून तो कायम चूका काढणार का? नाही ना किंवा दोघांनी चुकाच करायचे ठरवले तर आयुष्य बरोबर सुटणार कसं? तिथे नातं तुटणारच...
लग्न कुणाशीही करावं पण विश्वासाला तडा जाऊ देऊ न देता... नसेल बसत सहज विश्वास कुणावर म्हणून लग्नाला नाही म्हणता येतं... पण एक सांगा माणसाला समजून घ्यायची संधी दिली तर आयुष्य छान जाते की नाही?... हाताची पाचही बोटे एकसारखी नसतात आणि प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट ही वेगळीच असते एकसारखी नसते... आता ही गोष्ट लग्न करून लिहायची कि लिहायचीच नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न... पण मी म्हणेल लग्न करून प्रेमाने जगायचं असतं तिथे जबाबदार प्रियकरही नसतो आणि प्रेयसीही नसते...निदान प्रेमाला आपण संधीही दिली नाही असा पच्छताप आयुष्यभर तरी उरणार नसतो...
तारुण्य आहे तर म्हातारपण येणार आहेच... पाण्यासारख स्वीकारता आलं तर काहीच अडचण येणार नाही...जगण्याची संधी मिळते तेव्हा घ्यायची... संधीची वाट बघितली तर वेळ जाते आणि जगणे राहून जाते... प्रेमावर विश्वास नसेल तर अरेंज मॅरेज जरुर करावे पण याची खात्री तिथेही नाही कि तेही नातं टिकेल... टिकेल म्हणून प्रेमाच किंवा लग्नाचे नाते जोडू नये एक नाते आपल्याला आयुष्यभर प्रेमाने जपायचे आहे म्हणून नात्याला जपून बघायचं ते नातं निभावलं आपणच जाईल तेही सहज सूंदर आयुष्याने तेव्हाही कधी माझी आठवण आलीच तर... आयुष्य गुलजार आहे एवढं स्वतःलाच म्हणून बघायचं आणि संगायचंसुद्धा... नुसता विचार करुन हाताशी काहीच लागत नसते... जे हाताशी लागते ते कायम पळण्याच्या तयारीतच असते... आपण कुठे थांबायचं हे आयुष्यभर कळत नाही... जेव्हा कळतं तेव्हा कायम उशीरच झालेला असतो... हा उशिरसुद्धा स्वीकारायचा अन् आयुष्याला पुन्हा नवं आव्हान द्यायचं... तेव्हाच तर आयुष्य खऱ्या अर्थाने गुलजार होणार असतं..!
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Friday, January 22, 2016

पुस्तकात..! :-)


♥ क्षण..! ♥

पुस्तकात..!

आपल्याला हवं तसं कथानक पुढे नेता येतं... पाहिजे तो प्रसंग रंगवता येतो... उत्तरार्धात वाचकाला प्रत्येक शब्दावर जगायला अगदी भाग देखील पडता येतं... ओढ लागते म्हणतात प्रेमाची... तसं काहीसं लिहित असतांना जाणवलं कि, समजायचं हे कथानक वाचकांचे आहे... आपण लिहितो त्याला न्याय हीच लोकं देणार आहेत... त्यामुळे आपल्या लिखानाकडून आपण फारश्या अपेक्षा न ठेवता फक्त कागद भरायचा... कागदावरच्या प्रत्येक शब्दाला वाचकच रिता करतो... कारण लेखक कथानकात त्याची गुंतवणूक करतो आणि वाचक त्याची गुंतवणूक लेखकाच्या पुस्तकात करतो... म्हणून चोखंदळ वाचकाला ओळखून लेखकाने त्याच्या पुस्तकाची रचना केली किंवा बदलली तरी पुस्तकीचा शेवट हा पुस्तकाचा वाचकच असणार असतो... कारण दोघांना जोडणारे माध्यम हे पुस्तकच असते... आणि पुस्तकात असतात त्या संवादरुपी मूक संवेदना..!
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Tuesday, January 19, 2016

पुणे..! :-)


♥ क्षण..! ♥

पुणे..!

कुठे कितीही जपायचा प्रयत्न असला तरी कुठेतरी "पुणेरीपणा"पणा हरवलेला आहेच... अर्थात हे नाकारणार प्रत्येकजण आहे कारण स्वीकारायची वृत्ती ही पुणेरी बाण्यात जन्मतःच नाही... म्हणून ती वृत्ती फक्त इतर सांगत असते... जे चुकलंय ना ते आपलं आहे याची बेधडक धमक ही उसणीच आहे... स्मार्ट, आधुनिक आणि प्रतिष्ठेच्या भोवऱ्यात "पुणे" जरा लांबच राहिले आहे... कितीही पुणेरीपणा केला तरी पुन्हा-पुन्हा करायला इथे सवडीत आणि रिकामं फक्त "पुणे" आहे... पुणेकर म्हणून आवाज दिला तर ओ! आलो आलो म्हणून येण्याऱ्यांपेक्षा कोण आणि काय येऊन कडमडल/आडवं गेलं आयत्यावेळी अशी श्रद्धाळू माणसेच भेटतात... ते सगळे पुण्यात राहून पुणेकर स्वतःला म्हणवून देखील घेतात... पण फार असं "पुणे" आता राहिलेच किती आहे... इतिहासात नोंदवून नोंदवून उरला तेवढा "पुणे" आणि "पुणेकर" बाकी पुणे नाहीच पुण्यातसुद्धा..! :-)
---------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com

Saturday, January 16, 2016

कोराच राहतो..! :-)


♥ क्षण..! ♥

कोराच राहतो..!

माणूस एकटा असतो तेव्हा प्रखरतेने त्याला कुणाच्या तरी सहवासाची ओढ लागते... परक्या जगात सतत तो आपलं कुणीतरी कायम शोधत असतो... कुणी त्याच्यासारख त्याला हवं तसं मिळतंही... ठरलेली वेळ चांगली जाऊ लागते आयुष्यात पूर्णत्व मिळाल्याचा आनंद उतू जाऊ लागतो... संवाद प्रेमळ आणि फ्रेंडली होत असतात... प्रॅक्टिकल लाईफ कुठेतरी पर्सनल वाईफ बनत असते... पावलांशी पावले मिळतात... हातात हात नकळत गुंफले जातात... सवय होते म्हणतात माणसांची आणि बांधलेल्या कित्येक आठवणींच्या गाठी सैल सुटून जातात...
प्रवाहावर आयुष्य वाहात जाते... किनारे बरेच दूर राहिल्याची जाणीव हळूहळू होऊ लागते... कधी आवडत नसलेलंही मन तेही सहज करु लागते... वेळ फुलू लागते ऋतू बहरु लागतो... स्पंदनात गंधाळलेला श्वास बाधित मोगरा होऊ लागतो... हसतो अंगणात प्राजक्त वेळ कातर होऊ लागते... धुंद सांजेला मिठी उबदार वाटू लागते... मेहंदीने रंगलेल्या तळहातासारखे आभाळ तांबडे होऊन जाते... अखेरच्या क्षणी सांजेच्या गुलाबी आसमंत नजरेत लाजून जातो... एकटक बघणारा तो नजरा-नजरेत वरमुन जातो...
प्रेयसीवर प्रियकराने करावी वाटते तशी ती कविता होते... मी या गावचा नाही अशा अविर्भावात तो अख्खी गद्य कादंबरी लिहून जातो... व्यक्त होतो तरी अव्यक्तचं राहतो... मुक्याने हृदयाचे बेहाल असणे स्पष्ट करतो... तिच्या मदतीला लगेच लज्जेचा लाजाळू धावतो अन् रातरणीचा भर अंधारात जळफळाट होतो... कणकण तुटूनही क्षणक्षण वेचूनही कागद तेवढा हा कोराच राहतो..!
------------------------ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, January 7, 2016

शब्दवेडी..! :-)


♥ क्षण..! ♥

शब्दवेडी..!

माहीत नाही मला ती
शब्दवेडी कशी असेल.?
झाली तर एक कविता
सहज न लगेच करेल..
अन् संवेदनांना भाव-
विभोर करुन टाकेल..
पाऊले अडखळतील
वाटा येऊन मिळतील..
उधाण लाटा प्रेमाच्या
किनारा एक गाठतील..
माहीत नाही मला ती
शब्दवेडी कशी असेल.?
गुंफेल नात्यांना स्वतः
अन् धागा मला करेल..
मी वेंधळा वादळ न ती
हळवी एक पहाट असेल..
प्रेमाचं धागं कसं टिकेल
आहे तोवर फक्त जपेल..
कधी हे कधी ते लागेल
माहीत नाही काय मागेल?
तू कागदापेक्षा माझाच
प्रत्येक ओळीत सांगेल..
माहीत नाही मला ती
शब्दवेडी कशी असेल..
एक-एक क्षण वेचेल
की शब्द न शब्द जगेल..
मी पाऊस होऊन बरसेल
अन् ती सरीवर सर असेल..
मी कधी प्रेमिका म्हणेल
कधी तिला रसिका संबोधेल..
मग ती फक्त अंगणातील
तुळस म्हणून उगाच मिरवेल..
माहीत नाही मला ती
शब्दवेडी कशी असेल..
गुलमोहराची बहर जशी
रातराणीत सुगंधी वेळ तशी..
मी कान नसलेला कप
न ती सावरुन घेणारी बशी..
मी तुझी बेबंद-बेधुंद रात्र
आणि तू सातवणारा शशी..
थोडी अशीच असेल ती
शब्दवेडी जरा-जराशी..
कधी क्षणा-क्षणाशी अन्
कधी मना-मनाशी वास्तव
रेशिम बंधांचे अचूक जाणणारी
"शब्दवेड्याची ती शब्दवेडी..!"
------------------------ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Wednesday, January 6, 2016

उत्तरावर..! :-)


♥ क्षण..! ♥

उत्तरावर..!

कधी कधी फटकळ आणि जळजळीत लिखाण झाल्यावर शरीरातले त्राण निघून जाते. याला कारण इतिहासात घडून गेलेले थोर विभूती असतात. त्यांचं कर्म पाटीकोरी मूर्खांना सांगतांना अगदी शब्दांना पिळून आणि नाक दाबून कडूलिंबाचा बाळकडू मुखात ओतावा लागतो तरीही पाटीकोरी ती कोरीच. शेवटी सवयीच्या शब्दांच्या चाबकाने लाल झाल्याशिवाय कळत काही नसतं! काहीसा तसाच आज या कागदाचा अर्थ आहे. शांत न चौकटीत असणे म्हणजे मूर्खात काढणेही असू शकते. हे जर आता सांगून कळत असेल तर आपली पायरी काय आणि कुठे हे समजणारे गुर्मीत वावरतात आणि पायरी दाखविणारे गर्मीत कारण जाळ त्यांच्या अंगाशी येतो. बाकी विषयाच्या शोधात असलेली माणसे विषयाचाच विषय करतात म्हणून दरवेळी काहीतरी करुन वेगळा विषय हाताळून मला मांडावा लागतो त्याच काय आहे आपण फक्त मांडायचं त्याच पुढे काय हे प्रेमाच्या प्रस्तावाचा यथायोजित असलेल्या अपेक्षित उत्तरावर कळणार असतंच..!
------------------------ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Tuesday, January 5, 2016

कर्जबाजारी..! :-)


♥ क्षण..! ♥

कर्जबाजारी..!

आजकाल दोन-दोन, चार-चार दिवस आमचं बोलणं होत नाही... दोघंही एकमेकांना ऑनलाईन बघत राहतो... ती बोलेल, मी उगाच कशाला ना डिस्टर्ब... तसही आपण पिंग केलं का पुढे क पासून सुरु होणाऱ्या सगळ्या प्रश्नांना विचारावं लागेल... आणि काय औपचारिक उत्तरे मिळतील त्यापेक्षा नकोच काही! आठवण येते? छे! छे! आठवणीचं काय आलं यात? इथे दररोज काही असत नाही तिथे आठवण कशी आणि का म्हणून असणार? ठराविक औपचारिकता आटोपल्यावर ओळख तिथेच संपते... नातं जुळायला आणि जपायला औपचारिकतेची गरज अवचित जरी पडत असली तरीही ते नातं आहे... शाश्वत आणि शुद्ध तेवढच विश्वसनीय मग औपचारिकतेची आवश्यकता काय असते..? एक सुरुवात करायला! मग ती नात्यांची असो अथवा जगण्याची... सुरुवात ही प्राथमिकच करावी लागते... अंतर कमी करायला अंतर वाढवून राहणे मला कितीही पसंत असले तरी एक अंतर गळून पडायला अवधी आणि वेळ आपण देण्यापेक्षा हवा असेल तेवढा वेळ घेऊ देणे आणि बसं स्वप्नच आहे म्हणत स्वतःला दिलासा देणे हे निश्चित आपण करु शकतो... नात्यांच्या गुंतवणूकीत मोबदला मागायचा नसतो... नात्यांच्या ठेवींवरचे व्याजावर व्याज परतावा म्हणून द्यायचा असतो... कारण इथे तिच्यामुळे मी आणि माझ्यामुळे ती अजून तरी कर्जबाजारी नाही..!
------------------------ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३