Powered By Blogger

Thursday, March 24, 2016

इग्नोअर/टाळणं..! :/)


♥ क्षण..! ♥

इग्नोअर/टाळणं..!

"माणसाला इम्पॉर्टन्स मिळाले नाही तर ते तो सहन करु शकतो.. इम्पॉर्टन्स देऊन सपशेल इग्नोअर अर्थात टाळलं तर त्याचा इगो फार हार्ट होत असतो..!"

'याची कारण व्यक्तिशः वेगवेगळी असतील..'

किंवा, 'ज्या गोष्टीत एखाद्याची कुठल्याही प्रकारे गुंतवणूक होऊ नये असं वाटतं तेव्हा होणारी क्रिया आणि जाणवणारी प्रतिक्रिया म्हणजेच इंटेन्शन ओळखून सपशेल इग्नोअर किंवा टाळणंच होतं..'

'काही दुय्यम उदाहरणे द्यायची नाहीयेत..'

कारण, "हेच बघा ना म्हणायचं काय आहे हे कळलं असल्यावर शब्दाने कागदाला रंगवणे टाळलंच आहे.. याहून काही वेगळं इग्नोअर होऊ शकेल काय..?"

'नसेल किंवा नाहीही' पण

"आपल्याला इग्नोअर मुद्दाम केलंय याची झालेली जाणीव... बोंबा मारत असलेल्या परिस्थितीने करुन दिल्यावर... टाळणाऱ्या किंवा इग्नोअर करणाऱ्यांच्याबद्दल मनात द्वेष जन्म घेतो.."

"काळ जातो, टाळलं असल्यामुळे इंटरेस्ट नसतो. जे झोकून, लपवून मुद्दाम चोरून ती गोष्ट करत असतात त्यांना सक्सेस मिळत नसतो.."

मग ओघा-ओघानेच, "कॅन यु सॉर्ट इट आऊट? म्हणून पुढ्यात आयती ती गोष्ट वाढली जाते.."

"काय केलंय? हे बघतांना लक्षात येतं, माणसाला सरळ चालण्यापेक्षा उलट चालायला जास्त आवडतं.."

"सुरुवात शेवटी आणून ठेवली आणि शेवट सुरुवातीला कशाच्या नादात? तर क्रेडिट कमवायला..?"

"जे मिळवणं अशक्य आहे त्याचा ध्यास नक्की धरावा आणि करावाही पण त्यात मिळणार अपयश पचवून बिघडलेले थिंग्स सुधारित प्रेझेंट होऊन ऍक्सेप्ट झाल्यावर श्रेय लाटतांना त्यात शेअर ठेवणे ही नैतिकता असते.."

"कुणाला पडलंय, काम झालं जो तो आपापल्या वाटेने आणि क्रेडिटच्या मागे चाटूगिरी करत थोबाडावर न शोभणारी स्माईल घेऊन फिरत राहायचं.."

"हे असंच ये, मतलबी मत तयार झालं असतं."

जरा वेळात त्या विषयातून आपला काढता पाय पण होतो!

"मग, सिनिरचा ओव्हर स्मार्ट सिनिअर जवळ येतो आणि म्हणतो, आय लाईक द चेंजेस यु मेड ऍट लास्ट मोमेंट व्हेरी इंप्रेसिव्ह! मेट मी इन माय कॅबिन.."

तिथे सिनिअर तोंड पाडून एसीत घाम पुसत बसतो आणि ओव्हर स्मार्ट सिनिअर त्याच्याकडे तुच्छतेने बघत तुम्हाला हुकूम देतो, "यापुढे नावाला तो प्रोजेक्ट हेड आहे पण या क्षणापासून पूर्ण प्रोजेक्ट तुझ्या अधिकारात पूर्ण कर! जे काही हवेय ते थेट मला सांग आणि कुणी टांगमध्ये टाकली तर दे तोडून!"

तेव्हा सिच्युएशनचा पूर्ण लाभ। मनातल्या मनात घेतला जातो आणि नंतर खूप नम्रतेने तुम्ही म्हणायचं, "आय हॅव अनादर इम्पॉर्टन्ट प्रोजेक्ट ऍण्ड वर्क टु बट फाईन आय विल डु बोथ प्रोजेक्ट्स सेम टाईम!" या ठिकाणी काही गोष्टी तुम्ही टाळल्या किंवा इग्नोअर केल्या..

वर्क फिनिश होतं, पुन्हा एक प्रोजेक्ट पुन्हा तेच इग्नोअर आणि पुन्हा तेच सगळं कशासाठी?

महत्त्व न देऊन महत्त्व वाढवण्याचा हा नवा फंडा आहे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Tuesday, March 22, 2016

का.. कळे ना..! :-)


♥ क्षण..! ♥

का.. कळे ना..!

तोंडाला फुटेल ते
तू काहीही म्हणावं,
नाम मात्र अपेक्षा
मी सगळं निस्तराव,
तुझं सगळं म्हणणं
उगाचच मान्य करावं
आणि खोटं तेच तू
सत्य म्हणून जपावं
अन् सरते शेवटी
"का कळे ना..
असे का व्हावं..?"
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
सात तीन आठ सात नऊ दोन दोन आठ चार तीन :-)

Wednesday, March 16, 2016

तू..! :-)


♥ क्षण..! ♥

तू..!

काजळ नयनी, लाली ओठांवर
नखशिखांत सजलेली नार तू...

शृंगार लेऊन, आली अलवार
हृदयी छेडलेली प्रेमळ तार तू...

सौंदर्य झरा, तरंग पाण्यावर
खोडकर उथळ लाट धार-धार तू...

कट्यार कामनीय देहाची देहावर
मिलनातूर केलेला पलटवार तू...

लाल-गुलाबी, आरक्त या गालांवर
बेधुंद रातीतला प्रणय प्रहार तू...

मुक्त हे केश, शेष रंग स्पर्शांवर
मखमली सुखाची उभी मदार तू...

तू.. आतुर, फितूर क्षणा-क्षणावर
क्षणभंगुर क्षणाची मोहिनी, अंगार तू...

आसमंत-धरणीच्या मध्य सागरावर
रुणझुणलेला नादमय झंकार तू...
..."नादमय झंकार तू..!"
................ तू..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, March 10, 2016

काही मागचं थोडं..! :-)


♥क्षण..! ♥

काही मागचं थोडं..!

मी माणसं वाचायला कधी शिकणार? अशी खंत माझ्या कुटुंबातल्या काही सदस्यांना एकेकाळी होती...

माणसांना वाचून व्यक्त करायचं नाही असं तत्व मी जपलं आणि जोपासूनही पाहिलं..

काहींना मी व्यक्त करावं अशी अभिलाषा होती तर काहींसाठी मी कुणालातरी व्यक्त करावं अशी अपेक्षा होती...

अर्थात गुणाचा तेवढा हा स्वभावच होता आणि आज आहेही की या पैकी स्वतःला व्यक्त करण्याशिवाय मी काही एक केलं नाही...

माणसं वाचायला शिक म्हणण्यामागे कदाचित बाळबोध समज असाही झाली की, एखाद थोर व्यक्तिमत्त्व, भोंदू, पिर, आदरातुल्य गुरु किंवा प्रेरणास्रोत एखादा मी निवडावा आणि वाटचाल करावी...

प्रत्येक पावलावर स्वतःचा मतलब घेऊन दारात उभे राहिलेल्यांची गर्दी एकसारखाच अनुभव देत गेली ती तोच अनुभव अजूनही देत चाललीही आहे...

पण मी संधीला फारसं दवडलं नाही.. गालावर नाही जमलं तर कागदावर व्रण मी कोरुन ठेवली...

त्याचा परिणाम म्हणून माझी सुरुवात   प्रत्येकवेळी नव्याने होत गेली... याच्या माघारी आमच्यामुळे असं श्रेय स्वतःच स्वतःला देणारी माणसे फार उरलीच नाही...

जी माणसे उरली ती मी टिकवली नाही आणि जी माणसे टिकवली त्यांना मी विचारलं नाही... स्वार्थ जेवढा माझा त्याहून अधिक व्यवहार मात्र कुणाचा होता याचा हिशेब नक्कीच लाऊन बघणार काहीजण...

या सगळ्याचा आज उलगड यासाठी की, मी मागची पानं फक्त चाळतो त्यांना वाचलंय असा भ्रम बाळगला तर ठीक आहे... कारण माझं आयुष्य अजून त्याच उंबरठ्यावर उभं आहे जिथे पुढ्यात एवढं काही येतं की, मागचं मागच्याच मागे कुठेतरी राहून जातं मग ती माणसं स्वतःत माणसंच असली तरीही...

त्यामुळे पैसा कसा कमवायचा कसा गमवायचा हाताचा मळ वगैरे सगळं जुनं झालं...

कुठं कोणती माणसं कमवायची.. गमवायची.. धरायची.. सोडायची आणि सोडून द्यायची यापेक्षा...

आपण आपली पावलं सांभाळायची कारण ती धरायला आणि ओढायला कोण किती मातीतल्या धुळीत असेल सांगता येत नाही...

आणि राहिलं मी तर मी एक 'क्षण' म्हणून कधीच निसटलोय... स्वतःच्या हातातूनही आणि एपतीतूनही...

मग मागचं पुढचं करायला काहींना अवधी मिळाला की वेळ जायला त्यांचं फावतं... कारण त्यांना वाटतं की माझा पुढचा प्रवास यांच्यातर्फे झालाय पण ज्याला प्रत्येक प्रवास मग तो रोजचाच का असेना नव्याने कसा करावा हे कळत असेल तर त्याच्या वाटेतील प्रवासी तुम्ही असता आणि तो म्हणजे मी स्वतःच एक प्रवास होऊन उरतो... आणि बदलतोही नव्याने व कदाचित वेगळ्यानेही... कुणास ठावूक...

वाटेत भेटलेल्या जवळपास सगळ्यांनाच मी तरी विसरलोय पण या सगळ्यात खरी मज्जा येत किंवा येणार आहे ती मला लक्षात ठेवणाऱ्यांची...

कारण, कुठे थांबायचं आणि कुठे थांबवायचं स्वतःला हे मला चांगल्याने कळते... मग तिथे पुन्हा शून्यापासून प्रवास सुरु करावा लागला तरी हिशेब पुन्हा नव्याने स्वतःला बरबाद करण्याचाच केला गेलाही आणि जातोही... आपल्याकडे अजून काहीतरी आहे पुन्हा उधळायला मग ते शब्दांच्या जीवावर असलं तर त्याचे मानकरी पहिले भाषिक मन होते.. मग लेखणीतली शाई होते.. नंतर कागदाचा भू प्रदेश होतो.. नंतर अक्षरं होतात आणि शेवटी एक संथ प्रवाहाला बघणारी नजर होते...

काळानुसार मी कागद बरीच बदलूनही शब्दांची घरंदाज एट बदललीच नाही... कारण माझे शब्द स्वार्थी नसले तरी स्वाभिमानी निश्चित आहेत म्हणून काही फार मागचं बाकी राहातचं नाही आणि नव्याने सुरु होणारा प्रवास संपत नाही..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Wednesday, March 9, 2016

काही.. बोलायाचे आहे..! :-)


♥ क्षण..! ♥

"काही.. बोलायाचे आहे..!"

बंद ओठातून.. मिटलेल्या पापणीशी..
गहिवरल्या कंठाने काही बोलायाचे आहे,

कोऱ्या कागदातून.. सपाट चेहऱ्यांशी..
मनातले बंद पेटारे काही खोलायाचे आहे,

देऊन सुख सारं.. घेऊन दुःख उराशी..
हिशेब ते पावसांचे काही लावायाचे आहे,

अबोल राहून सांगू.. की बोलते मौनाशी..
उघड गाव-चर्चेला काही चावायाचे आहे,

अंतरं मैलांची.. तरी सांगड पावलांशी..
वळणावळणावर काही थांबायाचे आहे,

म्होरं हे पदर पसरुन.. प्रेमाने उराशी..
मरणासमोर काही कवटाळायाचे आहे,

घोर जीवाला लाऊन.. नातं वौराग्याशी..
स्वतःचे स्वतःला काही टाळायाचे आहे,

मोह त्यागून.. लक्तरे घेऊन.. पायरीशी..
देहाशिवाय पूजाया काही जायाचे आहे,

ओंजळ करुन.. अमृतसम प्राक्तणाशी..
नीलकंठ, रुद्र असं काही बनायाचे आहे,

मागायाचे, द्यावयाचे, घ्यावयाचे..नशिबाशी
काय सरळ मोकळं काही विचारायाचे आहे,

मुक्या जाणिवांतून.. बोथट लेखणीशी..
तुला, मला, प्रत्येकाला काही बोलायाचे आहे,

.."काही.. बोलायाचे आहे..!"
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Monday, March 7, 2016

काळोखाचं अस्तित्व..!


♥ क्षण..! ♥

काळोखाचं अस्तित्व..!

दुरुन बघण्यातही मज्जा येते...
जवळ जाऊन शोकांतिका होते..

दुरुन काय काय चांगलं दिसतं?
तर चंद्र.. चांदण्या.. चष्मा नसेल आणि डोळे शाबूत असतील तर काजवे.. काळोखाला नजर सरसावली तर वेंधळ्यासारखी इकडून तिकडे उडणारी वटवाघळे... याच्याही फार जवळ जाऊन अगदी समाधी लागली ना बघण्याची तर नक्षत्र दिसत तू समोर आणलेलं... काही क्षण लुब्ध होऊन पुन्हा स्वतःच अस्तित्व दाखवत... म्हणतं... ही लुभावणी कल्पना आहे.. जरा व्यवस्थित बघ काळाकुट्ट काळोख आहे... पण नजर तेच नक्षत्र शोधत काळोखात पुन्हा हरवून गेली असते...

शेतात...अंगणात किंवा टेरेसवर... रातकिड्यांची किरकिर ऐकत पापणी मिटण्यापूर्वी नजरेसमोर आणखी काय येतं..?

उपहास! काळोखाने चांदणीचा केलेला आणि त्यावर चांदणीने चंदेरी रंगाचा मिनमिनता उजेड पाडत काळोखाला दडपण्याचा केलेला दुबळा प्रयत्न... सगळं उपहासात्मकच आहे...

याचं कारण..?

काळोखाचं स्वीकारलेलं आणि तेवढाच शाश्वत असलेलं स्वतःच वेगळं अस्तित्व..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com

Friday, March 4, 2016

अथांग..! :-)


♥ क्षण..! ♥

अथांग..!

काही नाही रोजचंच आपलं काहीतरी... चोथा झालेला एखादा विषय काढायचा आणि चघळत बसायचं.

"वास्तवात कुठल्यातरी एका विषयावर बोलणं होण्यासाठी एक मत कुणाचं झालेलं असतं..?"

"नाण्याच्या दोन्ही बाजू या एकमेकांबद्दल विरोधाभासच दर्शवतात.."

"काहीतरी काढायचं मात्र, बोलायला नाही सुचलं नाही सुचलं; सगळं अवसान एकवटून भांडायला सज्ज तरी राहायचं.."

"काय? मिळत काय एवढ्याने..? तुझा वेळ की माझा वेळ..?"

"मिळतं काय..? तर आपला वेळ.."

'प्रेमाचे गुलाबी दिवस हे, पंख लाऊन भर्रकन उडून जातात.. मागे ना छाटलेल्या पंखांची तडफड नाहीतर.. बळ निघून गेलेल्या पावलांची दुखणी उरलेली असतात..'

"म्हणून का असं आपणही जगायचं..?"

"छे! म्हणून तर सगळं बळ एकवटून पुन्हा उडण्याचा प्रयत्न तोही निकराचा.."

"अन्यथा, दार उघडं असूनही न उडणाऱ्या पाखरांची खंत पिंजऱ्यालाच कळते.."

"जरातरी स्वतःच्या मनाचा थांग लागू द्यायचा माणसाने..."

"तो लागला तर त्या माणसाला अथांग समुद्र कोण म्हणणार..?"

"खोलात जाऊ द्यायचेच नसते तर गाभा कशाला उघडायचा..?"

"उघडे असलेलं प्रत्येक दार आपल्यासाठीच उघडलेलं असतं असं नसतं ना..."

"मग दिसणाऱ्या आणि लुभावणाऱ्या गोष्टींचा देखावा कशाला मांडायचा..?"

"सहज, भुरळ पडली याचा अर्थ मोह आहे आणि मोह आहे म्हटल्यावर ओढ असणारच नस..!"

"कधीतरी सहज उलघड, फक्त एकदाच..."

"नको..!"

"का नको..?"

"तू पुन्हा प्रेमात पडशील..!"

"नाही पडणार प्रॉमिस..."

"म्हणजे तू आधीच पडलेली आहेस हे तू मान्य करतेस..?"

"शब्दात पकडू नकोस मला, बजावते आहे..."

"हो..? की मी स्वतःचा विचार न करता तुला सोडून देईल याची खात्री आहे..?"

"जा रे तू.. नाही बोलायचं मला तुझ्याशी..."

"मला जायला सांगून तुला स्वतःला निघून जायचं आहे..?"

"गप्प बसतो का आता..?"

"हो म्हटलं तर आणि नाही म्हटलं तर..?"

"गप्प ना रे, का सतवतोय..?"

"मी कुठं काय केलं..?"

"माझंच चुकलं, जाते मी..?"

"जातांना जाते नाही, येते म्हणावं संस्कृती आहे आपली ती! फार नाही पण थोडतरी जपावं..."

"बरं, येते..."

"कशाला येते? नको येऊ.. असं रात्री अपरात्री यायचं नाही...!"

"तुझ्या नानाची टांग..."

"का तुझ्या नानाला नाहीये का..?"

"ए! माझ्या नानावर जायचे नाही..."

"मला कुठंच जायचे नाही, तुम्हाला जायचे आहे..."

"मंद, बावळट..."

"तारीफ का शुक्रिया..!"

"तू ना... खरंच..."

"वाईट आहे फार, दूर हो..!"

"ए! माझं मी ठरवेल तू नको सांगू मला..."

"नेहमी प्रमाणे काही स्वतःहून विचारलेच नाही तर सांगायचं तरी काय..?"

"काय झालंय सांग..."

"नाही काही..!"

"काय झालंय सांग..."

"काही नाही..!"

"काय झालंय सांग..."

"जर लागला असता कुणाला काही थांग... तर समुद्राला उगाचच कोणी म्हटले असते का.. अथांग..?

"नाही सुधारणार..?"

"कधीच नाही, तू मात्र बदलणार... खूप बदलणार..."

"माझ्या बदलण्याचं कारण तूच असणार हे लक्षात ठेव..."

"माणूस आपल्या कर्माची फळ विसरत नाही, हा तर प्रेमाचा बगिचा आहे... ओवाळू कुणावर तरी जो आपलं बनवून ठेवेल..!"

"म्हणजे तुला खात्री आहे..?"

"हो! त्या बगिच्यात हिरवळ दिसेल पण फुल काही कुठल्याच झाडा-वेलीला येणार नाहीत..!"

"फजिलपणा करू नकोस..."

"अनुभवशील तेव्हा मला दोष देऊ नकोस, सांगितलं नाही म्हणून..?"

"फुलं येणार..."

"गंध आणि सौंदर्य नसलेली फुलं कुरवाळायला शिकून घे मग..!"

"दुष्ट..."

"आहेच, लहानपणापासून..!"

"सांगतोस की, नाही..?"

"नाही..!"

"शेवटचं विचारतेय सांगतोस की, नाही..."

"नाही..!"

"चालू लाग मग..."

"थांबणं प्रवाहाला माहीत नसतं, काही असतं तर थोडं थांब...काही दे... काही माग... काही सांग... आणि बाकी सगळंच अथांग..!"
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, March 3, 2016

लिहा-बोला= उधारीवर..! :-)


♥ क्षण..! ♥

लिहा-बोला= उधारीवर..!

तसं लिहायला म्हणा किंवा बोलायला बरंच काही आहे. कुठून सुरुवात करायची हे नक्की झालं की, कागदाला भरायला वेळ लागत नाही अन् बोलायला असलेल्या एका विषयातून सगळे विषय कसे व्यक्त झाले हे ओघवत्या प्रवाहात कळतही नाही. यांच्यात एक 'पण' मात्र निश्चित आहे. कागदावर लिहिलेलं स्वतःजवळ लपवून ठेवता येतं. बोलतांना मात्र कुणाशी? का? कशाबद्दल? कशासाठी? एवढंच काय ऐकणाराही निवडावा लागतो. त्यानंतर विषयाची बोलण्यात सुरुवात होते. त्यापेक्षा एक कोरा कागद जवळ असलेलं उत्तम! चार भिंतींशी किती आणि काय बोलायचं याचा दररोजचा प्रश्न उरणार नाही आणि आपलं बोलणं जरा जास्तच लांबले याची खंत उरणार नाही. तेव्हा कोरा असलेला एक कागद भरतांना जाणीव होईल आपण बोलणं सोडून दिलं हे फार बरं केलं. निदान कागदावर चुकलेला शब्द खोडता तरी आला. बोलून रंगलेली स्वप्ने आणि सजलेली क्षण आठवण म्हणून सतत रुतत तरी नाहीत अन् जगण्याचं शल्यही देत नाहीत. बसं हा अबोला असाच कायम ठेवायचा आणि आधीच वाढलेल्या अंतरात अजून मैलांची भर करुन बेरीज करत राहायची. हिशेब न करता रंगणारा एक डाव शेवटी एकदमच सोडून द्यायचा असतो. त्यात नुकसान झाले की नफा याची दखल घ्यायला एक लांब पल्ल्याचा श्वास कोण उधारीवर देणार असतो..?
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Tuesday, March 1, 2016

कादंबरी..! :-)


♥ क्षण..! ♥

कादंबरी..!

'ती' एकच गोष्ट! तिचे चाहते कैक झाले. 'ती' त्याचीही झाली पण त्याच्या गोष्टीचे तिला होता आले नाही. म्हणून लोकांनी त्या गोष्टीतल्या तिचं नावही 'अधुरी' ठेवलं. काहींना ते अधुरे पणही आवडलं तर काहींना रुतलंही! ज्यांनी अधुरी म्हणून नाकारलं, त्यांनी 'त्याच्या' शेवटानंतर तिला अदबीने पुढे सिंहासनावर बसवलं. हे पाहायला तो नव्हता! 'ती' तशीच होती अधुरी पण पूर्ण कारण 'ती' त्याच्या आयुष्यातल्या वगळलेल्या संदर्भांची एक 'कादंबरी'च होती..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३