Powered By Blogger

Saturday, April 30, 2016

जगण्यात मज्जा आहे..! :-) (कविता)


♥ क्षण..! ♥

जगण्यात मज्जा आहे..!

मी नसतो तू असतेस
मी असतो तू नसतेस..
धावपळीच्या जीवनात
का जगाला दोष देतेस..
परिस्थितीची दोन बाहुले
एक होकार एक नकार..
त्यात तू तर घर न कहर
मी मात्र फार तर प्रहर..
थोडं थोडं वेचण्यात मज्जा आहे...

तुझ्याशी मन सहज जुळत
माझ्याशी मात्र फक्त काकुळत..
काही ओढीने न बऱ्याच रागाने
बाहुपाशात सारंच विरघळत..
तू आवरते सावरते न सांभाळते
मी थोपवतो लादतो न डावलतो..
तरी तू कसबीने सारं ओवाळते
मी स्वीकारुन झिडकारून देतो..
थोडं थोडं तुटण्यात मज्जा आहे...

कधी आवडत कधी आवडलं
आपण फक्त आपलं म्हणायचं..
गुलाबाची कळी प्राजक्ताचा लळा
गंधाशिवायही सुगंधीत व्हायचं..
अर्थातून काय अर्थात शोधायचं
जमलंच तर शेवटी सांगायचं..
स्वतःला.. असंच!
थोडं थोडं जगण्यात मज्जा आहे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

Tuesday, April 26, 2016

पाखरं..! :-)


♥ क्षण..! ♥

पाखरं..!

ती दोघंही चाकर आहे
सुखासीन पाखरं आहे..

इन्स्टॉलमेन्टचं घरटं न
व्याजाचेच डोंगर आहे..

आधुनिक ते पॅरेन्ट्स न
खर्चाची काटकसर आहे..

कधी चिऊ-माऊचा लळा
तरी हिशेबात पुरेपूर आहे..

सोनू, राजा चौकट झाली
सोन्यासारखा संसार आहे..

ती दोघ कोण..?
जरा बाहेर येऊन बघ..
ही हकीकत घरोघर आहे..

काही साक्षर काही निरक्षर
दोघंही कर्तव्यात अग्रेसर आहे..

मी अजून वि'चार काय सांगावे?
सुखाचे हे दिवस थोडेफार आहे...
सुखाचे हे दिवस थोडेफार आहे.!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

Sunday, April 24, 2016

मी मेल्यावर..! :-)


♥ क्षण..! ♥

मी मेल्यावर..!

मी मेल्यावर ना तू परत ये
स्वप्नांचे उगाच आश्वासन दे..

प्रेतवस्त्रातला उठावदार देह
डोळेभर बघ न पाठ करुन दे..

काही आठवेल काही रुतेल
फक्त वाट मोकळी करुन दे..

काही अधुरे काही अधांतरी
किनारेही एकाकी करुन दे..

आठवेल मी पण नसेल मी
अस्तित्वही माझं खोडून दे..

तुझ्यासोबत तुझ्याशिवाय
असणं अन् जगणं लिहून दे..

तू वेड लावलं न फसवलं
आरोपही खुशाल करुन दे..

मी मेल्यावर माझ्या राखेला
अश्रूंची गंगा तेवढी देऊन दे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

Thursday, April 21, 2016

एवढ्यावरच फावते..! :-)


♥ क्षण..! ♥

एवढ्यावरच फावते..!

काही खोटे होते
काही खरे होते..
खरं सांगायचं तर
सर्व नखरे होते..

तुझ्यापासून तर
माझ्यापर्यंत ते..
धगधगत विझले
तप्त निखारे होते..

तुला पर्वा नाही
काळजीही नसते..
तरी उगाच दररोज
काळीज करपते..

सांगावं वाटतं न
मनाला सर्व पटते..
खोटेच वास्तव
डोळ्यापुढे घडते..

प्रेम म्हणावं तरी
कुणाचे काय जाते..
आपलं घर भरलं
एवढ्यावरच फावते..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

Friday, April 15, 2016

काठाशी येऊन..! :-)


♥ क्षण..! ♥

काठाशी येऊन..!

एक संथ न शांत वेळ... डोळ्यासमोर समुद्र अन् मनात लाटांचे थैमान... चलबिचल होते काळजात आणि अनवाणी पावलाखालून वाळू निसटू लागते... वारा शरीरभर रेंगाळतो... कधी भूतकाळाचा तर कधी भविष्याचा वेध जो तो घेऊ लागतो... काठाशी आलेल्या लाटेवर काही दुरुन वाहत आल्याच किनाऱ्यावर भासत...  काही युगायुगांच्या प्रतीक्षेनंतर किनाऱ्यावरून लाटेवर स्वार झालेलं दिसतं... सांजेचे सोहळे उदास की, प्रसन्न हे चित्त थाऱ्यावर असलेल्याला विचारावं वाटत पण स्वतःतच हरवून गेलेला जो तो कसं काही व्यक्त करणार..?
कधी लाटेतून लाट वेगळी होतांना दिसते तर कधी समुद्राचा आक्रोश खळखळतांना दिसतो... लाट आणि समुद्राचा मध्यस्थी किनारा आपला फक्त अंतर करुन उरलेला दिसतो... पावलाखाली जमीन? छे! वाळू असते... हातून मग कित्येक क्षण निसटल्याची जाणीव होते... काहीसे मन हळवे होते... पुन्हा स्वतःपासून वेगळे होते...
काही गोष्टी वेळेनंतर अर्थहीन होतातच! काही गोष्टींना वेळ देऊन अर्थ येतो याची प्रचितीही येते... वेळेचे गुणधर्म पेलणे अवघडही मग वाटत नाही... पावले जड होतात... नजर धूसर होते... हातभर अंतरावरचेही काही दिसणे मुश्किल होते... शरीरावर रेंगाळणारा वारा मग अलगद चेहऱ्यावरची ओल टिपतो... शहारा उठतो न मन तीळ तीळ तुटते... आपलं अस्तित्वसुद्धा कोणी असंच लुटत...
काठाशी येऊन सगळं शांत होतं... मन उधाण होतं आणि क्षितिजाशी उगाच द्वंद्व जुंपत... लाटेच ठीक दूर समुद्रात प्रवास नाहीतर किनाऱ्यावर बस्तान... आपलंच अडलंय... ना समुद्र गिळता येतो... ना लाट थांबवता येते... काठाशी येऊन उगाच स्वतःची फसगत करावी लागते..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३