Powered By Blogger

Monday, June 30, 2014

द्वंद्व..! :-)

क्षण..!

द्वंद्व..!

बरेच दिवसांनी तिची माझ्याशी भेट झाल्यावर, तिचं स्वत:ला सतवत असलेलं द्वंद्व बाहेर पडलं. औपचारिकता संपवून प्रश्नांची नात्याची गाठ सोडवून घेणं मग तिलाही जमलं. जाते-जाते, येते-येते आठवण. स्वत:वर ताबा ठेवण्याचा प्रपंच नेहमीच तिला नडला. मी काय बोलणार-करणार होतो? होवू देत तुझ्या मनासारखं सांगून गेलो. काही दिवस जात नाहीत तोच 'इतका कसा रे तू बदललास?'
हसलो फक्त अन् दुर्लक्ष केले. इथेही तिला रुतले. अवघड आहेस कि, समजण्यापलिकडे गेलायेस काहीच कळत नाहीये. वाटेत कसा धुळीने बरबटलेला एखादा दगड लागतो, अगदी तसेच किळसवाणे तिची रोखलेली नजर ती फेरुन घेते. निश्चिल होवून तो तसाच वाटेत राहातो. काही काळाने एक वाटसरु येतो. दगडावरची धुळ झटकून शेंदुर फासून जातो. आसपासच्या परिसरात श्रद्धा जागी होते. चार भिंती अन् घुमट उभारुन पवित्र पायरी रचली जाते. अंगणात हिरवळ सजते रात्र जागराची बनते. लाथाडलेल्या दगडा जवळ एकदिवस तिच माथा टेकते. 'मी काळजी अन् वाट सोडली त्याची, तार आता तुच त्याला ओळख त्याची मीच विसरली'..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, June 28, 2014

अपयशी.. ! :-)

क्षण..!

अपयशी..!

नात्यांची विन कधी-कधी गैरसमजुतीने विस्कटली जाते; आणि आपण तिच विस्कटलेली विन पुन्हा पुन्हा विनण्याचा प्रयत्न करत राहातो...अपयशी..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, June 27, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-10)

क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-10)

बोलायला नको वाटत असलेल्या विषयाला टाळायला; विषयातून बरेच विषय निघत जातात. बोलणे वाढत जाते आपसुक पण! घुसमटण्याची सल मनातच सलत राहाते..!

"काय बोलावं अन् काय सांगावं". या विचारात स्वत:ला सावरत असलेली धारा, सहज मग विषयांतर करते.

धारा : जावू द्या ना, मला नाही वाटत या विषयाला ताणून हाती काही लागणार आहे. टेल मी समथींग अबावूट यू!..

अंबर : नथींग स्पेशल..!

धारा : तरी पण काही तरी असेल..

अंबर : माहित नाही, सर्व सामान्य मनुष्य आहे मी...

धारा : आणि या सर्व सामान्य मनुष्याच्या फॅमेलीत कोण-कोण आहे?..

अंबर : कुणीच नाही, गेल्या पंधरवाड्यात बाबा होते फक्त... आता तेही नाहीत एकटाच आहे. नात्यातून सुटका छे! सोडवणूक केली गेलीये माझी आणि आठवणी गणती झालीये माझ्या नात्यांची..!

बराच वेळ रिप्लाय येतच नाही. जरा वेळ वाट बघत अंबर विचारतो..

अंबर : तुमच्या फॅमेलीत कोण-कोण आहे..?

धारा : आई-बाबा-लहान भाऊ आणि मी!..

अंबर : अरे वा! लहान भाऊ आहे तर, जितका खोडकर वाटत असतो त्यापेक्षा जास्त समजदार असतो. हे फार उशीराच कळते नाही का..?

धारा : हो तेही आहे. पण खरं तर वेळ आल्याशिवाय कळतच नाही कोण किती समजदार आहे ते!..

अंबर : किंवा जगातली माणसे समजुन घेतांना आपण आपल्याच माणसांना समजुन घ्यायला वेळ काढत नाही..!

धारा : पण जर आपल्याच माणसाला जग बनवून घेतले तर मला नाही वाटत कि, वेगळा असा वेळ काढायची गरज वाटावी!..

अंबर : हम्म्म! तेही झालेच, पण आपण जग बनवतो कि, कुणी आपल्यात जग बनवतो याची वाट आपण बघतो..?

धारा : छेsssss! मी नाही पाहात!..

अंबर : :-) मग आपण बनवलेल्या जगात. आपण नेहमी असंतुष्ट आणि नाराज का राहातो? एखादे महत्व किंवा गरज आधार म्हणुन अवलंबून का ठेवतो स्वत:ला..?

धारा : तुम्हाला नॅार्मल नाही का ओ बोलता येत? किती तो गंभीरपणा प्रत्येक शब्दात!..

अंबर : बोलुण झाल्यावर सहसा मी फेर विचार करत नाही. मी काय बोललो? बोलण्या आधी आपण काय बोलतोय याचा विचार करुन बोलणारा मी साधा गरीब व्यक्ती आहे..!

धारा : ओह्ह! म्हणजे विचार करुन शब्द खर्च करता तुम्ही!..

अंबर : अर्थात म्हणू शकता असे तुम्ही. दरवेळी झालेली चुक उसणावून दाखवण्यापेक्षा, एखादी होणारी चुक कुठे तरी या माध्यमात टाळता येत असते. असे मला तरी वाटते..!

धारा : अच्छा! असेच आहे तर मग ते सुरवातीला 'दोस्तीला नाजायज' म्हणाला होता ते विचार करुन बोलला होतात का?..

अंबर : हो..! तुमच्या प्रोफाईल पिक वर असलेला. मैत्रीचा पिवळा गुलाब पाहून, एव्हढा साधा विचार निश्चित मी केला. कि, मैत्रीच्या बाबतीत तुम्ही पझेसिव्ह आणि अग्रेसिव्ह असाल. दुखरी नस म्हणा अथवा समोरच्या व्यक्तीच कुठले नाजुक बटन दाबले कि, तो आक्रमक होतो आणि प्रतिसाद देतोच-देतो. किंवा त्याला दोन जास्तीचे शब्द अजुन बोलावे अथवा सुनवावे सतत वाटत असते आणि रुतत असते. म्हणुन बोललो 'मैत्रीला नाजायज'..! ;) :)

धारा : पण! असे नाही वाटले कि, समोरच्याने थोबाडीत मारली तर?..

अंबर : त्यासाठी मी डोक्यात हेलमेट टाकून बसलो होतो. समजा मारलीच तर म्हणून. पण श्या! समोरच्याने मारलीच नाही ओ..!

धारा : ॲक्च्युली, समोरच्याला दगड फेकून मारायची इच्छा होती. पण श्या! दगड भेटलाच नाही!..

अंबर : घ्या..! आयत्या वेळी दगड न भेटायला देव्हारा नजरे समोर तरी का ठेवावा मग माणसाने..?

धारा : सगळे डोक्यावरुन गेले हां तुम्ही आता जे बोललात ते.. ( मृदुंग = वाटलेच! पण माझा वाचक नक्की समजेल हे..) मला वाटत मी भेटल्यापासून तुमच्यातल्या लेखकाला जरा जास्तच खडाडून जाग आलीये!..

अंबर : दिले शेवटी? दिलेच ना स्वत:ला श्रेय? मुठभर मांस जास्तही चढले असेल, अजुन कॅालर असती तर ताठ झाली असती. मोठी माणसे अशीच असतात..!

धारा : मग काय? अभिमान असायला नको स्वत:चा? आणि काय आहे आजकाल स्वताहून श्रेय देणारे उरलेच नाही जगात. लगेच नाक खाली जाते त्यांचे. मग मी स्वत:चे श्रेय स्वत:च ओरबाडून घेते!..

अंबर : अगदी बरोबर! मांजर आणि तुमच्यात फक्त आवाजाचाच काय तो फरक उरला असावा माझ्या मते. बाकी स्वभाव तर औक्षण करण्यासारखाच आहे तुमचा..!

धारा : अच्छा! लगेच कळाला पण का माझा स्वभाव?..

अंबर : हो म्हणालो तर आणि नाही म्हणालो तर..?

धारा : तर काय?...

अंबर : तर नखाने मलाच जखम होणार आहे..!

धारा : :D :D

अंबर : आसुरी आनंदच झाला तुम्हाला तर..!

धारा : हो.. बट डोन्ट वरी माझे नेल्स बारीकच आहे. ओरबाडूनही जखम नाही होणार!..

अंबर : भरोसा नाही! उजव्या हाताचे नखं बारीक न डाव्या हाताचे नखं चांगलेच धार लावलेले असतात. मला रिस्क नाही घ्यायची..!

धारा : दोन्हीही बारीकच आहेत... बट तुम्ही तर फारच घाबरताय जखमांना!..

अंबर : नाही तर काय? काही जखमांचे व्रण पुन्हा जखमी करतात. आणि त्यावर मलम व फुंकर कुणी घालतच नाही. वेदनाच काय ती असह्य. जिव घुसमटवते फक्त, जिवाची सुटका मात्र होत नाही..!

धारा : प्रत्येक जखम सारखी नसते. काही जखमांच्या आठवणीही गोड असतात!..

अंबर : आठवणी निश्चित गोड असतात. पण! प्रत्येक जखमेची कोवळी वेदना एकसारखीच असते..!

धारा : ते तर जखमेकडे बघण्याची नजर ठरवते आणि आठवणी गोड असल्या कि, वेदनाही फार खडतर वाटत नाही!..

अंबर : छान आहे तुमच्यातली लेखीका. खडतर रस्ता आणि खडतर वेदना. जखमेच काय तर सपाट मैदान नाही का..?

धारा : माझ्यासाठी जखम ही वाट आहे जी वेदनेच्या आधाराने चालायची!.........

अंबर : अरे वा! किती अंतर चाललात मग? आणि पोहोचलात कुठे? नैराश्याच्या पानवठ्यावरच ना..?

धारा : अजुन तरी प्रवास सुरु आहे. पोहोचले कि सांगेल तुम्हाला कुठपर्यंत आले ते!....

अंबर : बरं! अजुन काय? घरचे कसे आहेत? सॅारी जरा उशीराच विचारले...!

धारा : नशिब विचारायचे आठवले तरी... अन् मजेत आहेत ते!....

अंबर : आणि तुम्ही?

धारा : मी ही...

अंबर : ओके..!

धारा : खुपच बोलणे झाले ना आज आपले... ते ही कसले कसले विषय...

अंबर : हो ना..! ऑफीसचे काम करुन एव्हढी बोटे दुखवली नाहीत कधी, जेव्हढी चॅटींग मध्ये दुखवली गेली. नाही का..?

धारा : खरी मजा आपल्या भाषेत बोलण्यात असते पण परदेशात असे व्यक्ती फार कमी भेटतात. म्हणून असे झाले असावे..... कदाचित!..

अंबर : किंवा कुणाकडे काही बोलता यावे असे कुणी अजुन भेटलेही नसावे... आपल्याला..!

धारा : अगदी बरोबर..!

विषयातून विषय निघत जातात. मनाचे धागे सुटसुटीत होवून गाठी पडत जातात. साधेसे बोलणे असते कुणाचे, गांभीर्य असते क्षणाचे. ओढ लागते अनामिक जिवाला. सवय मग ती जगायला आवडून जाते. मोबाईल ॲप्स मध्ये फेसबूक इंस्टॅाल होते. सवड काढून प्रत्येक अपडेटची दखल घेतली जाते. माना झुकवून कमेंट्स पास होतात. क्षितिजावर भेट ठरण्या आधी, इंटरनेटच्या जाळ्यात गुंता-गुंत वाढते.

दिवस-रात्र उलटून जातात. महिन्या पुर्वी झालेली ओळख, युगांपुर्वी झालेली ताटातुट म्हणतात. आपल्यातलेच आपणही काही असेच, प्रत्यक्षात भेटण्या आधी 'स्क्रिन वर फेस टू फेस' भेटत असतात..!

आधी ओळख झाली
रुपांतरीत मैत्री झाली,
ओढ असतेच जिवाला
खात्री मग कशाची दिली..?
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

(नोंद : कथा काल्पनिक आहे. याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळून आल्यास तो निव्वळ योगा-योग समजावा..!)

Wednesday, June 25, 2014

चालायचंच..! :-)

क्षण..!

चालायचंच..!

बरेचदा असे झालेलं आहे. माझे होते जे जे, ते ते परकं झालं आहे. तरी समजण्यासाठी धडपडतो आहे मी या आयुष्याला. नेमकं काय बरं याने माझ्यासाठी निवडलं आहे. भय वाढत जाते जिवाचे, आक्रोश उरणार असतोच का मागे..?
--------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, June 24, 2014

दारं..! :-)

क्षण..!

दारं..!

स्वभावाशी रोज तडजोड करत; नात्यांत कित्येक भिंती उभ्या राहिल्या. मनाला काय वाटते त्यापेक्षा चार लोकं काय म्हणतील-बोलतील यावर, मनाचे स्वच्छंद दार बंद करुन; त्या ये-जा करणा-या जागेवर भिंती उभ्या राहिल्या. चार भिंतीतल्या खोलीत मग नैसर्गीक मोकळी हवाही येईनाशी झालीये. गारव्यासाठी ए.सी. नावाची कृत्रीम यंत्रणा कार्यन्वयीत करुन सगळे कसे मोकळेच झाले आहेत.
माणसे..! माणसे मग भिंती अलिकडले अन् भिंती पलिकडले घुसमटलेले श्वास घेत. एखादे दार असते तर डोकवण्याचा किंवा आत जाण्याचा आगावूपणा तरी करता आला असता.पण! छे भिंतच शेवटी. विभक्त अन् वेगळा स्वार्थी कारभार. ठरलेल्या वेळेवर भिंतीतल्या भेगेतून बाहेर निघुन गजबजलेल्या रस्त्यात आणि मोकळ्या आभाळात एकटे-एकाकी. स्वत: भिंती उभ्या करुन सहवासाला तरसत राहाणारी. काय चुकलं होतं सुरक्षेच्या अनुशंगाने जर भिंती निवडल्या होत्या?
चार भिंतीसोबत जर चार भिंतीत चार दारंही निवडली असती तर? पळ काढायला अन् मदत मागायला चार वाटा नसत्या का मिळाल्या? एकाच दारातून मरणं आणि जगणं असते. पण! जगायच्या चार वाटा असतात, तर मरणाची एकच वाट असते. एकच वाट अन् एकच लाट करत सोईस्कर जरी वाटत असले तर मग जगण्याची इच्छा अन् गुदमरणं स्वत:च स्वत:ला का एव्हढे खुपत असते? चार भिंतीतल्या नात्यात ओलावा का नसतो? असतोच कि, असल्याचा आव आणला जातो? विचार एकदा स्वत:लाच. वेळ प्रसंगी तू दार तर उघडू शकतोस पण भिंत कशी पाडशील? कर चिंतन कर..!
तुला जे हवंय ते आज नाही उद्याच उपभोगता येणार आहे. लाख प्रयत्न कर आज मोकळ्या हवेसाठी पण! ती स्वच्छंदी मनमौजी हवा तिच्या इच्छेने दारातूनच आत येणार आहे. भिंतीतून फक्त पाली-झुरळं आणि जाळे विनणारे कोळीच निपजतील. राहा! त्यांच्यातच मग त्यांच्याच सारखे समदु:खी. मोकळीकतेला तरसत अन् भिंतीवर आठवणी(फोटो) टांगत..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, June 21, 2014

अनुभवातून..! :-)

क्षण..!
अनुभवातून..!
तो बराच वेळ बोलत होता माझ्याशी... बोलतं त्याला असेही मी केलं नाही...त्याच्या खांद्यावर हात ठेवला माझा अन् ध्यानस्त बगळ्यासारखा पायावर पाय ठेवून बाजुला बसलो... हट! यार, ती समजते काय स्वत:ला? आताच्या आता सिनेमाला ने, शहरा बाहेर दुरवर फिरायला ने, भसम्या झालाये अशी भुकेने कावरी बावरी होते अन् ढगभर मागवून चतकुरच खाते साध अर्धही खात नाही. चहा-कॅाफी--कोल्ड ड्रिंक काय साधी पाण्याची बाटली दोन घोट रिचवून बाकी तसंच टाकून देते. काय करावं कसं समजवावं काहीच कळत नाही. बोललो काही तर मन भरलेय कि समधान झालेय तुझे अन् शेवटी तुझं माझ्यावर प्रेमच नाही या निष्कर्शावर येवून सगळा सोक्ष-मोक्ष लावण्याचा पवित्रा घेते...इडियट..!
बोलणे सुरुच होते त्याचे न तिचे आगमन होते. तिला पाहून त्याचा पारा चढतो अन् तो उठून निघून जातो. चारचौघात त्याचं तिला असं लाजीरवाणं करणं तिच्या मनाला फार लागतं. डोळ्यांमधल्या पावसाला मग आभाळ कुठे हवं असतं? काही क्षण ओलाव्यात मोकळे होवून असाच आहे तो म्हणत आजुबाजुच्या दुकानातल्या गर्दीत तिची नजर हरवते.
एक साधारण चिमुरडी गर्दीशी झगडत दुकानदाराला चकोबार मागते. पैसे मोजून गर्दीशी झगडत थोडी बाजुला थांबते. वेष्टण उघडून चकोबारचा पहिला अस्वाद घेणार तोच पाठीमागच्या गर्दीतुन कुणाचा तरी नकळत धक्का लागतो. कोवळ्या हातातुन चकोबार निसटून मातीत विरघळू लागतो. एकटक त्याची होणारी अवस्था बघत जागीच खिळून उभी राहाते. त्या चिमुरडीची मजा बघत बसलेली ती लगेच जागेवरुन उठते. झपाझप पाऊले उचलत चिमुरडीला गाठते. लाडीगोडी लावून गर्दीशी झगडत ती चिमुरडीसाठी पुन्हा एक चकोबार विकत घेते.
चिमुरडा हात हातात धरुन होती त्या जागेवर तिला घेवून येते. जवळ बसवून स्वत:च्या चकोबार वेष्टणातून मोकळा करुन तिच्या हातात देवू लागते. इवलेसे मन संकोच तरी करतेच. हतबद्धपणे चकोबारला पाहात इच्छा मारुन नकारात मान हालवते. समजुत घालत कशी बशी तिची शेवटी चकोबार चिमुरडी फस्त करते. हसतात  तिचे डोळे अन् मन भरुन येते. कुठल्या शब्दात काय बोलावे. शोध घेणारी आई समोर पाहात लगबगीने जवळ जाते. तोतळ्या बोलांनी हात ओढून जवळ आणते अन् आईला झालं-गेलं सगळे सांगते. दिदीला थॅंक्स बोल बेटा अन् व्यवहार आई संपवू लागते. आढे-वेढे घेत तिलाही शेवटी स्विकारावे लागते. जाता-जाता ती तोतळी बोलते. "अर्धवट पिले होते दुध गार आईस्क्रिम कसे केले तू फस्त. पुर्ण दुध पि आणि राहा मग तू मस्त".
गर्दीत तो ही हे सगळे दुरुन पाहात असतो. त्याच्या आधी फक्त तिला पोहचलेले पाहातो. निरोप घेवून चिमुरडी निघून जाते. अन् तो तिच्या शेजारी येवून बसतो. आजचे छे! नेहमीचे तुझे आठवतेस का जरा? अधुरे ताट तू किती होते ठेवले? सांगीतलेस तर सहज ग्लासभर दुधाचे तू महत्व, मग तू विसरतेस कशी भरलेल्या ताटल्या दाण्यांचे अस्तित्व..? दातांच्या मधोमध ती तिची जिभ चावते. हातांनी तिचे दोन्ही कान पकडते. पुन्हा नाही असे होणार आश्वासन देते. हसतो तो न मोकळा श्वास घेतो. दोघांची नजर मग माझ्यावर रोखली जाते. पायावरुन पाय बाजुला करत उठून मी उभा राहातो. दोघांकडे पाहात प्रत्येक गोष्ट समजवून सांगण्याची वेळ सुंदर असते. पण! त्या वेळेपेक्षा सुंदर वेळ ती गोष्ट अनुभवातून समजवून घेण्यात मजा असते..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, June 20, 2014

कोरं पान..!

क्षण..!

कोरं पान..!

स्वत:च्या मागे भरमसाठ व्याप वाढवल्यावर, एखादे कोरे पान समोर काढून लिहायला सज्ज झाल्यावर, मन अगदी कोरं करकरीत होत असते. कदाचित शांतच बसावं शब्दाने हे तर ते कोरं पान सुचवत नसते..?
--------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, June 9, 2014

निष्पन्न..! :-)

क्षण..!

निष्पन्न..!

शांततेत बोलुन फक्त प्रश्न सुटतात; मनातली अढ आणि संशयात जन्मलेल्या शंकेची बसलेली चिवट गाठ सुटत नाही..!-------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, June 6, 2014

अवलंबून..! :-)

क्षण..!

अवलंबून..!

वेलीसारखे आयुष्य निवडायचे कि, झाडासारखे आयुष्य घडवायचे. आपले आपण ठरवायचे असते. सुरुवातीलाच वेल निवडली तर 'अवलंबून' राहावे लागते. अन् सुरवातीलाच कुंडी सकट झाड निवडले तर पाने,फुले,फळ ओघानेच वेल आणि घरटे यासोबत आश्रीतासाठी सावलीही घडवता येते. त्यातही वेलीलाच सुंदर फुलं, नाजुक काया अन् पोकळ बांधा घेवून नजरेला लुभावेल एव्हढेच गुण असतात. या व्यतीरिक्त वेलीला लागणारे फळे उदा. : टरबूज, भोपळा तिच्या आकारमाणाने मोठी अन् तिला स्वत:लाच त्यांचा भार न पेलवता येण्यासारखी असतात. कुठेतरी पायाशी सतत लोळण घेत बसण्यापेक्षा उंच अन् ताठ उभे असलेले झाड परवडते. कारण त्या एका पुष्ट झाडावर सगळे 'अवलंबून' राहातात अन् स्वत:चे स्वाभिमानी अहंकारी गुणधर्म विसरुन जातात. का? तर ते 'अवलंबून' असतात. एखाद वेळेस अंधारली वाट म्हणून बोट धरुन वाट दाखवण्यात अर्थ असतो स्वार्थ अन् गर्व नसतो. पण सतत परिस्थितीशी स्वत: न झगडता आयता सहज सोपा पर्याय निवडून वेलीसारखे पायघड्या पाडत ''अवलंबून' असणे अन् आधार मागत विणवन्या करणे कितपत योग्य आहे? नाहीच ना! म्हणून 'अवलंबून' राहाता येईल अन् ठेवता येईल असे निस्वार्थ झाड बनन्यात तथ्य आहे. नसेल वेलीशी काही कर्तव्य झाडाला तर मुकाट उभे-उभे जळून विरोध पक्तारुन आयुष्य त्यागता तरी येईल..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Thursday, June 5, 2014

वादळ..! :-)

क्षण..!

वादळ..!

वादळ उठले उठले
हुंदके अनावर झाले,
आसवांच्या सरीवर
डोळे हे भिजूनी गेले

लाट ओलांडून अशी
जावू चल त्या पल्याड,
जेथे होते क्षण चुकार
सर करु आज पाहाड

का गहिवरुन मन गेले
सरसावून सामोरी गेले,
झुकली नजर उपेक्षेने
वादळं असे चोरी गेले

नको आता कसला आधार
जेव्हा श्वासही माझा उधार,
सरते शेवटी कर तू उपकार
तुझा नव्हतो मी घेवून माघार..!
----------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com
(रान उठले उठले ऐकत सुचलेले..!)

Wednesday, June 4, 2014

चिमुरडी..! :-)

चिमुरडी..!

रुसुन बसली जराशी
भांडून माझ्या घराशी,
किलकिल्या डोळ्यांशी
हिरमुसलेल्या चेह-याशी,
अंथरुणावर भेट छोटीशी
झगडूनच माझ्या मिठीशी,
हसली गालात धरुन उशी
करुन बटेची पिळदार मिशी,
सरसावली लगेच माझी कुशी
नखरेबाजांची एव्हढीच खुशी..!
----------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com