Powered By Blogger

Sunday, December 4, 2011

तू कुठे आहेस ???? :-(

तू कुठे आहेस ???? :-(

तू कुठे आहेस ????

ये सांग ना आहेस कुठे तू?? मला तू दिसत नाहीयेस.. कुठे आहेस तू?? नको ना अशी सतवू. ये ना अशी समोर कधी बघून मला कधी पापण्यांनी ओशाळ...वाचते आहेस ना तू ?? तुझ्यावर बघ मी काय काय लिहिले....तुला आवडत माझ लिहीण म्हणून आणि तू बसलीयेस अशी रुसून...सांग ना काही चुकले का माझे... का आता मला तुझ्यावर काहीच नाही सुचत... माझ्यात असूनही तू मला का कुठेच नाही दिसत...बोल ना काहीतरी काय झालंय... विचार ना कधी कसा आहेस??... जेवलास का आज तरी वेळेत काय बनवलं होतस जेवायला....माझी खूप इच्छा आहे रे तुझ्या हातच जेवण खायची .... भरवशील ना मला तुझ्या हाताने.... बोल ना रे... भरवशील ना??हट्ट कर ना तू...का अशी शांत बसलीयेस... भांड ना माझ्याशी...रागव ना मला... काळजी घे ना माझी... आता रुसवा सोड ना...!

तुझी खूप आठवण येते ग... सांग ना का गेलीस अशी मला एकट सोडून... का ?? तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी तुला माहितीये
तरी का... का मला एकट सोडलस... हे जग बघ मला छळायला लागलंय...मला विचारतंय काय रे काय झालं एव्हडा दुखी का आहेस
काही प्रोब्लेम आहे का... इतक्या वर्षात एव्हडा इमोशनल लिहिलेलं तुला कधी पहिले नाही... या दिवसात तुझे दुखी शब्द सरळ मनावर जखम करतायेत
का इतका निराश झालायेस तू... बोल रे काही.. तुझे मित्र / मैत्रिणी आहोत आम्ही घरच्यांशी तू या विषयावर नाही बोलणार कमीत कमी आम्हाला तरी सांग रे काय झालंय तुला
का आम्हालापण तुझ्या दुखा पासून दूर करतोय... तू नाही सांगितलेस तरी सध्या तुझ्या शब्दांमधून कळतंय तुझ्या कवितेत आम्हाला थोडस दुःख जाणवतं...कोणालातरी हरवल्या सारखं किवा समोर असून जे आपल्याला सापडत नाही आहे आणि त्याचा विसर पडावा म्हणून तू घेतलेला शब्दांचा आधार कळतोय रे आम्हाला पण तो तुला जास्त छळतोय... सांग ना काय झालंय प्रेमात कोलमडून पडलास का?? तोल गेला का तुझा??
बोल रे कधी तरी मनातलं काही विचारले का एखाद्या तळ्यातल्या ध्यानस्थ बगळ्यासारखा शांत बसतो...काय झालंय काहीही कळायला मार्ग नाही... मित्र तू जास्त बनवत नाही ज्यांना बनवतो त्यांना जवळ करत नाही...मैत्रिणींशी मर्यादेतच बोलतो ते पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची एका वाक्यात उत्तरेच देतोस... स्वताहून तू काही विचारात नाही आणि बोलत तर अजिबात नाही... एव्हडा शांत कसा रे तू राहू शकतोस... फेसबुक, ओर्कुटवर दुनियाभरच्या लोकांची अपडेट वाचत राहतोस... तुझे करत राहतोस चाट रूम मध्ये बोलतोस तर बोलतो ते पण कोणी बोललं तर नाही तर आहेच तुझ्या स्मायली...नाही तर चारोळी...ग्रुप चाट मध्येही नाही नाही ते बोलतोस... समोरच्याला वाटत बिनधास्त... मन मोकळे व्यक्तीमत्व आणि काहीसे घमंडी :-/ स्वत मधेच रमलेल... त्यांच्यासाठी कधी जोकर बनून...कधी लहान बनून...थोडा वेळ करमणूक करून येतोस... आणि नंतर तीच शून्यात हरवलेली नजर... पाणावलेले डोळे...आणि भिजलेला तू... येव्हड तुला बोलत आहोत तरी तू शांत... अरे बोल ना काही इतका कसा रे दगड तू... काही जाणीवच नाही का तुला...??

"आपल्याला जे हवे असते ते कधीच पाहिजे त्या वेळेवर मिळत नाही
आणि जेव्हा वेळ निघून जाते आणि ती गोष्ट घडते त्याला अर्थ राहत नाही......"

"आपल्या मनासारखं कधी होत नाही
कधी होईल याची खात्री पण असत नाही......"

सांग आता तू काय उत्तर देवू मी ?? तुझ्या बद्दल कस अन काय सांगणार मी... तुटलेल्या स्वप्नाची कहाणी कोणत्या शब्दांनी सांगणार मी?? लिहीण सोडायचा विचार कितीदा ठाम केलेला मी...अगदी शेवटचंच लिहून
ब-याचदा निरोपही घेतला शब्दांतून...पण तूला कोरे कागद पहिलेच जात नाही माझे... अगदी माझ्या मनातल्या शब्दांतून तू कागदावर उमटतेस...कधी भर भरून प्रेम करतेस तर कधी राडाच करतेस... पण माझ्या सोबत असतेस....शरीराने नसली तरी मनानी... अबोल असलीस तरी बोलक्या शब्दांनी... तुझ्या-माझ्या आठवणींच्या ओल्या थेंबांनी... तू असतेस सोबत माझ्या... खर तर आता कवितेच्या तकरारींनीच आहेस सोबत अजूनही...शब्दांत बांधून ठेवलेली तुझी आठवण.... माहित नाही तू वाचत आहेस का नाही हे लिहिलेले... वाचत असशील तर तुला देयची आहे ही आठवण फक्त तुझ्यासाठी लिहिलेली तुझ्यासाठी बनवलेली... माझ्या मनातली तुझ्या कल्पनेत नसलेली एक भेट... 






आवडली तर सांग...

 तसही माझ लिहीण सध्या खराब होत चाललंय सॉरी... या दिवसात तुला बराच मिस केल... काय करत असशील ठीक असशील का नाही....
अन काहीच नाही... दिवस माझा तुझ्या नावाने सुरु होतो आणि संपतोही आहे... एक क्षण फक्त कुठे तरी हरवला आहे...तुझ्या स्वप्नात जगलेला अन स्वप्न म्हणूनच तुटलेला...तरी पुन्हा जगायला हवाहवासा वाटणारा एक "क्षण"... रोजच तुटाव वाटणारं एक स्वप्न...कारण शांत राहून मी तुझ्या सोबत असतो तू सोबत असल्यावर मला अजून कोणी-कोणीच नाही लागत...तू आहेस ना माझ्याशी बोलायला....माझ्या बोलण्यापेक्षा माझ शांत राहाण ऐकायला... तुझ्यासारख माझ शांत राहाण कुणालाच नाही समजत म्हणून कुणाशी काही बोलाव वाटतच नाही... बोलून काही कळण्यापेक्षा न बोलता काहीही न कळलेलं चांगल... तेव्हडीच तू आणखी जवळ येशील...माझा अबोला सोडवायला... येशील ना आता तरी अगदी शेवटच अन कायमच... फक्त माझ्या जवळ...मला माहितीये कदाचित पूर्वीसारख तुझ्या माझ्यात काही नसेलही...पण...

माझ्या पावलांशी पावले मिळवत तू असल्यावर काय हवं
माझ्या हातात तुझा हात असल्यावर मला आणि काय हवं...
उद्याच्या चिंतेत न जगता आज मध्ये जगल्यावर काय हवं
तुझ्याच मिठीत काही क्षण विसावल्यावर आणि काय हवं
काही क्षण स्वप्नाच्या पलीकडे जगल्यावर आणि काय हवं
तुझ्या मिठीत शेवटचा श्वास घेतल्यावर मला आणि काय हवं.... आणि काय हवं .... आणि काय हवं ...

मृदुंग

कधी कधी वाटत......... :-/

कधी कधी वाटत देवाने उगाचच मन दिले नको तितके हजारो आपल्या काहीही कामाचे नसलेले विचार मनात येत राहतात
कधी जुन्या आठवणी मनात अडतून येतात तर त्याच त्याच रटाळ जगण्याची सवय ओठंना उगीचच हसायला लावतात

मनाची एकग्रता करावी तरी कशी साल ! कळतच नाही आपल्याच तंद्रीत असलेले आपण  पाठी
मागून कधी कुणाची थाप पडते आणि एखाद
श्वान गाडीखाली सापडल्यावर त्याची जशी केवीलवाणी अवस्था होते तशी कधी कधी आपलीही होते कुठे हरवत हे मन तिच्या विचारात.... ???

छे कहीतरीच काय ती कुठे तू कुठे काही ताळ मेळ तरी आहे काय?? तिचा अस विचार करण्या इतपत तू तिला ओळखतोस काय?? काय माहिती आहे तुला तिच्या बद्दल??
जे माहिती आहे ते खरच आहे कशावरून ती खोट बोलत असेल तर ?? तू तरी कुठे खर खर तुझ्या बद्दल सांगितले आहेस तुझे ही अफेअर होते ते.... मी सांगितले आहे तिला माझ्या बद्दल सगळे खरे
खरे !! अगदी सुरुवाती पासून आता पर्यंत जे काही झाले ते सगळ सांगितलंय मी तिला....यात माझ मन थोड स्वार्थी झालाय मला मान्य आहे मी माझ मन माझ्या मनातली घुटमळ कुणाला तरी
सांगायची होती अगदी एकटा किती रे सहन करणार किती काळ मनातच ठेवणार होतो मी ते सगळ असह्य झालंय अजिबाद सहन नाही होत आता खूप झाल ज्याला पाहव तेव्हा तेव्हा माझ घर ठोठावणार नाही ठोठावणार सरळ आत येणार आणि काय सगळाच लुटून जाणार ?? माझ जन्म काय देण्यासाठीच झालाय का मला नसेल का वाटत कुणाला दोन क्षण माझ मन काळाव
मला समजून घ्याव !! मला नाही का हक्क माझ मन हल्क करायचा माझ टेंशन कुणाला देयाचा ?? मी किती ऐकून घेणार किती समजावणार अजून किती त्यांच्या अडचणी माझ्या मनात कोंबणार ....?

त्यांनी याव भडाभडा मनातले सगळे गा-हाणे सांगावे आणि काय करू आता विचारावे ?? मी का सांगू तू अस कर---तस कर हे करून बघ सगळ ठीक होईल??

त्यांना आलेल्या अडचणी साठी माझ्याकडे उत्तरे आहेत पण माझ्या अडचणींना मी का म्हणून लपून ठेऊ का मी नको सांगू कुणाला?? का ?? का हे माझ्या सोबतच होत??

का??

मृदुंग

Sunday, November 20, 2011

मला स्वप्न एकच पडतय रोज ते अशा प्रकारे :-/

मला स्वप्न एकच पडतय रोज ते अशा प्रकारे :-/

माझा मृत्यू झालाय यमराज रेड्यावर बसून मला घेयला येतो { मला जरा हसूच येत सांड रेड्यावर बसून आल्यासारखं वाटल} आणि वर घेऊन जातो वरती चित्रगुप्ता समोर रांग लागलेली असते
चित्रगुप्त कोटा भरत असतो नरकाचा आणि स्वर्गाचा म्हणजे लोकांचा पाप पुण्याचा शेवटचा हिशोब लाऊन प्रत्तेकाची सोय करत होता

सगळ्यांचे नंबर झाले माझा नंबर आला

चित्रगुप्त : नालायक माणसा आलास ये तुझीच वाट बघत होतो
कुठे ठेऊ तुला मी देवाने प्रत्तेक माणसासाठी १० ग्रंथात १०० वर्षाचा हिशोब लिहायला सांगितले आहेत {५ - पुन्याचे आणि ५ पापाचे}
तुझे १० पण ग्रंथ अगति तुडूंब भरले आहेत एकही ओळ एकही शब्दाचा फरक नाही अगदी समतोल आहे तुझ पण आणि पुण्य बोल कुठे ठेऊ मी तुला
काय इच्छा आहे तुझी स्वर्ग हवा कि नर्क??

मी :- चित्रगुप्ता कुठे राहायचं मला ते नंतर ठरवू आधी माझ्या प्रश्नच उत्तर देता का

चित्रगुप्त :- {छाती फुलवून} अवश्य विचार विचार
मी :- चित्रगुप्त तुला देवाने सगळ्यांचा पाप पुण्याचा हिशोब लिहायला बसवला आहे हाच हिशोब स्वतः देवाला लिहायला काय धाड भरली आहे का ??
कशाला तो देव आहे मग फक्त पार्वतीच्या बाजूला सरस्वतीच्या शेजारी लक्ष्मीच्या सोबत सोबत जोडीने मिरवण्यासाठी का ? तुला तुझी काही काम असतील ना
सुटी हवी असतील ना तुझी पण पोर बाळ असतील ना कशाला तू देवाची चाकरी करतोस? सांग दे माझ्या प्रश्नाचे उत्तर

चित्रगुप्त :- ये ये अरे असा विचार मी अजून केला नाही थांब देवालाच याचा जाब विचरतो धन्यवाद धन्यवाद आज जाब भेटला तर ठीक नाही तर राजीनामाच तोंडावर फेकतो

{ झालं देवाला तातडीने फोन लाऊन बोलावले गेले अख्या स्वर्गात नरकात हंगामा उभा झाला}

शेवटी दैवाने त्याच्या कुटील स्वभावाने आणि दैवी शक्तीच्या बळावर काळ वापस मागे लोटला मझा मृत्यू झाला त्या क्षणा पर्यंत !!

सकाळ झाली नेहमीच्या सवयीने आधी मोबाईलचा इंबोक्स चाळला माझ्या मोबाईल मध्ये मेसेज होता मित्राचा {मला तरी वाटत कि देवानेच माझ्या मित्रा तर्फे त्याचा निरोप सोडला असेल}

तुझ्या सारख्या मनुष्याला कुठेही जागा नाही आहेस त्याच परिस्थितीत आणि अवस्थेत हजारो मृत्यू अनुभवशील हाच तुझा योग्य मृत्यू आहे !!

स्वप्न संपले पुन्हा नव्याने दोन वेळा पहिले आज शब्दात बांधून ठेवले 


मृदुंग

!! क्षमा प्रार्थनीय !! {Story}

!! क्षमा प्रार्थनीय !!

आज तुझा मिस कॉल आला ब-याच दिवसांनी आधी वाटल चुकून दिला गेला असेल म्हणून मी इग्नोरच केल म्हंटल उगाचच कशाला कॉल करावा
बोलून बसली तर चुकून दिला गेला एका मैत्रिणीचा नंबर शोधात होते त्यात तुला चुकून लागला म्हणून तू का लगेच कॉल ब्याक केलास ???

काय बोलणार होतो मी या प्रश्नावर अच्छा ठीक आहे आणि फोन कट {आणि मनात त्रागा कशाला केलास लगेच फोन गरज काय होती तुला आणि काय काय जस्ट शिट यार}
पाच मिनिटांनी पुन्हा कॉल चक्क कॉलच केला विचार झाला तसा उचलावा पण.... माझे विचार चालूच होते बहुतेक कॉल ची मर्यादा संपून कॉल कट झाला पुन्हा एक नवा मिस कॉल

का कॉल केला असेल आज चक्क एक वर्षांनी तोच नंबर आणि तीच व्यक्ती अस्तित्वातली पण स्वप्नवत भेटलेली असा म्हणतात मोबाईल चे क्रमांक सतत बदलत असणारे व्यक्ती खूप बदललेले असतात
एकच एक नंबर असलेली व्यक्ती आहे तशीच असते प्रामाणिक, कर्तव्यदक्ष..... प्रेमळ कदाचित !!

का कॉल केला असेल आता अर्धा तास झाला फोन करून विचारू विचारलाच का नाही उचलला माझा कॉल तर सांगता येईल सायलेंट वर होता आणि कादंबरी वाचत होतो लक्ष नव्हत म्हणून
करूयाच फोन बघू या काय म्हणते....
ती : हेल्लो,
मी : हाय ! कशी आहेस ?
ती : {कापराच स्वर आला कानी} मी ठीक आहे आणि तू कसा आहेस
{सांगू का याला आता तुला नकार दिला कितीकी मोठी चूक केली ती अजूनही जिथे प्रपोज केलास
तिथच रोज असते मी...... माझी मलाच दोष देत अन........ तुझ्या शिवाय आयुष्य जगत...........}
मी : माझ सोड तुझा आवाज सांगतोय काही तरी बिनसलंय काय झाल सांग... सगळ ठीक आहे न...??
{पुरुषाला कितीही अनावर झाल तरी भावनांना आवरता येत म्हणून कदाचित माझ्या सारख्या पुरुषांना हृदयच दगडाचे आहे म्हणून हिणवले जात असेल}
ती : नाही काही नाही सहज तुझी आठवण आली म्हणून फोन केला
{अजूनही आहे तसाच आहे आज एक वर्ष नंतर माझा आवाज एकला तरी कळल याला मी ठीक नाही आहे ते मग मी प्रेम करायला लागलीये याच्यावर हे कसे याला अजून कळले नाही}
मी : बर ! मी ठीक आहे कसा चालू आहे तुझा अभ्यास शेवटच वर्ष नाही आता तुझ इंजीनिअरिंगच ??
ती : {बरीच सावरून बोलत होती आता} हो शेवटच आणि मस्त चालू आहे तुझ जॉब कसा चाललाय ??
मी : अरे हो तुला नसेल कळाल मी जॉब सोडलाय आणि जमले होते ते सगळे पैसे आणि बँकेच थोड लोन घेऊन बिझनेस टाकला आहे इव्हेंटसचा
जोरात नाही पण चालू आहे चांगला "दिक्षा इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड"
ती : काय हिक्षा इव्हेंट कंपनी तुझी आहे खूपच नावाजलेली आहे आणि तू का सांगतोस जोरात नाही चालू आहे बिझनेस
मी : {नकळत बोलूनच गेलो} तू नाहीस ना... तू असतीस तर मजाच आली असती....
ती : मी आहे अजूनही तुझ्या सोबत अगदी जिथे सोडून गेला होतास तिथेच कळत नव्हत मला तुला कस सांगू यायचं होत मला तुझ्या सोबत
पण तू .... माझ्यावर अवलंबून राहिला असतास ते मला नको होत तू एकटाच तुझ वेगळा विश्व बनवलेस हेच पाहिजे होत मला आणि आता तू फार मोठा झाला आहेस रे फार मोठा
तुझ्या प्रेमाला झिडकारण्याचे हेच कारण होते माझे होता विश्वास मला तू पेटून उठशील तळमळशील पण मला फक्त मला दाखवण्यासाठी का असे ना पण खूप मोठा बनशील आणि तू बनला आहेस
दुस-यावर अवलंबून असणे तू विसरला आहेस खंबीर बनला आहेस खरच खूप छान वाटत आहे मला.....
मी: मी बनलो तर आहे मोठा पण तुझ्या शिवाय मी काहीच नाही अगदी कशाचीच गरज वाटत नाही फक्त तू आणि तूच हवी असे वाटते

ती : मी अजूनही आहे तशीच आहे आणि तुझीच आहे रे तुझ्या वर अगदी जीव ओतून प्रेम करते रे पण तू अवलंबून होतास दुस-यावर हे मला नको होत खरच नको होत
मला जास्तची कधीच अपेक्षा नव्हती अगदी थोड जरी असल ना तरी पुरेस होत पण शेवटी तू एक पुरुष आहेस तुझ्या नोकरी मध्ये तुला जो पगार मिळायचा एव्हडा पगार मला माझ्या इंजीनिअरिंग च्या अनुभवाच्या काळात मिळणार फक्त आणि तुला आयुष्यभर तुलाच तुझी चीड वाटली असती तुझ्या पेक्षा मी जास्त कमवते हे तुला सहन कधीच झाल नसत म्हणून केले हे सगळे प्लीज मला माफ कर !

मी : नाही तुला माफी देणार नाही मी तुला आयुष्यभर आता फक्त माझीच म्हणून राहावे लागणार आहे उद्याच हो उद्याच मागणी घालायला येतोय मी तयार आहेस ना??
ती : ..............................................................
मनाचा बांध तुटला होता
ती मनसोक्त रडत होती
मनापासून हसत होती
अन स्वप्ने रंगवत होती

समाप्त
अजूनही आपल्या आजूबाजूला असे असंख्य जोडपे आहेत ज्यांच्यात याच करणा वरून वाद विवाद होत असतात ऑफिस मध्ये बॉस सोबत प्रमोशनसाठी हुज्जत घालतात बरेच पुरुष पण कधीच स्त्री चा पगार त्यांच्या पेक्षा जास्त असलेला खपवून घेत नाहीत स्त्री चा मानसिक छळ सोबतच मार झोड पर्यंत ही पोहोचलेले असतात बरेच कौटुंबिक कलहही आणि घटस्फोटाचे कारण सुद्धा हे एकाच आहे करा ना बे धडक मान्य की हो एक स्त्री एका पुरुष पेक्षा जास्त कमवते पुरुषाशी खांद्याला खांदा मिळवत बरोबरीने चालू शकते कमवू शकते एखादी स्त्री एखाद्या पुरुषा पेक्षा जास्त तर यात चुकीचे असे काय आहे लिखाण काल्पनिक आहे आणि विषय सुद्धा जरा नाजूक आहे जेव्हडे सांभाळता आले सांभाळून घेतले आहे तरी काही ठिकाणी चुकलो असल्यास अथवा कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास.....

!! क्षमा प्रार्थनीय !!

मृदुंग

@~ चलबिचल दोन मनांची ~@ {Story}

सकाळी सहाचा गजर झाला आणि तो झटक्यातच उठला खर म्हणजे त्याला झोप तशी लागलीच नव्हती कारण सकाळच्या ८:३० च्या ट्रेण ने "रश्मी" येणार होती तशी तीने त्याला तार केली होती आणि फ़ोन ही केला होता घेईला ये म्हणाली होती म्हणुन तो रात्रभर झोपलाच नाही सकाळच्या जवळपास कुठे डोळा लागला होता त्याचा आणि गजर झाला........
.
अर्ध्या तासात सर्व आटोपुन त्याने गाडीची चावी घेतली आणि घराला कुलुप लावुन गाडी रस्त्यावर आणली......
गाडी स्टार्ट करुण स्टेशनच्या रस्त्याने सुसाट तो निघाला....
तशी घाई नव्हतीच ट्रेन येयला अजुन दोन तास अवकाश होता.......बाहेर मस्त सोनेरी किरणांची सकाळ सजत होती पण त्याचे संपुर्ण लक्ष गाडी चालवण्यावरच होते........लवकरात लवकर रेल्वे स्टेशनवर पोहचायचे होते त्याला.......अनायसे ट्रेन लवकर आली तर.....
.
पंधरा मिनिटात तो त्याची गाडी स्टेशन पार्किंग मधे लावुन पळत पळतच प्लेट्फ़ोर्म तिकिटासाठी रांगेत लागला....... गर्दी तशी तुरळकच होती अप-डावुनवाल्यांची...... नेहमी गजबजल्या राहना-या स्टेशनवर जास्त गर्दी आज नव्हतीच....... प्लेट्फ़ोर्म तिकिट काढायला त्याला मोजुन ४/५ मिनिटेच लागली असतील तसाच तो निघुन प्लेटफ़ोम कडे जायला निघता निघता इंक्वायरीत थांबला त्याला हवी असनारी ट्रेन वेळेवरच धावत होती........ तसाच वळुन तो प्लेट्फ़ोमच्या दिशेने निघाला आज खुप खुशीत होता.....अनायसेच ओठांमधुन शिळ घलत होता...
.
आवोगे कब तुम ओ बालमा..............प्लेटफ़ोमच्या वेटींग रुम मधे जवुन बसला वेटींग रुम मधेच थांबयला लवले होते रश्मीने त्याला घड्याळाकडे एक नजर वेळ पाहुन घेतली त्याने.....७ वजुन पाच मिनीटेच झाली होती..... अजुन अजुन दिड तास सुद्धा त्याला एका काळा प्रमाने वाटु लागला त्यालाअ.... येतांना सोबत त्याने रश्मीची तार पण घेतली होती पुन्हा एकदा त्याने ती तार काढली वाचायाला...."Hi I am Comming To Jalgaon on 14th june. By Train Kolhapur Gondia Maharashtra Exp. Pick-Up me at 8:30am yours Rashmi".......रश्मीच्या वळनदार अक्षरांवर त्याचे डोळे स्थिरावले...........नकळतच तिच्या जुन्या आठवणी त्याला आठवल्यात रश्मी त्याची बाल मैत्रीन.............
रश्मी अगदी त्याच्या घरासमोरच राहयची तिचे बाबा आणि त्याचे बाबा दोघेपण जिवश्च कंठश्च मित्र आणि त्यांच्या मुलांनी तर मैत्रीत त्यांनाही मागे टाकले दोघांची आवड एकच पसंत एकच शाळा एकच, वर्ग एकच, आणि कॉलेज...कॉलेज मधे पण सगळ एकच.....खुप अटुत नात होत त्यांच पुढे MBA साठी रश्मीचा नंबर पुण्याच्या कॉलेज मधे लागला आणि त्याचा नागपुरला "शिक्षन क्षेत्राची" जनु नजरच लागली.....MBA ची दोन वर्ष एकमेकांशीवाय काढायला दोघांना कसतरीच वाटत होत......तरी मनाचा हिय्या करुण गेली दोघ......दोन दिशांना पण पत्र आणि मोबाईलवर बोलन चालुच होत...एकमेकांच्या टच मधे होती दोघ.... त्याची MBA च्या शेवटच्या वर्षाची परिक्षा रश्मीच्या परिक्षेच्या १५ दिवस आधीच संपली होती म्हणुन मी लगेच जळगावला येयुन रश्मीच्या येण्याची वाट बघत होतो आणि आज तो दिवस उजाडला होता या दोन वर्षात मला कळुन चुकले होते की मी रश्मीवर प्रेम करायला लागलाय तिच्या शिवाय मी राहुच शकत नाही...पण रश्मीला...हे वाटल नसेल का??????? तिला सुद्धा माझ्या सोबत रहाव वाटत नसेल का?? कि उगाचच मी गैरसमज करुण घेतोय कस सांगु रश्मीला?? याच विचारात पडलोय तिच्या येण्याचीच वाट बघत होतो आज ति येनार आल्या आल्या सांगन बर नाही पाहु एक दोन दिवसांनी..... एकांतात भेट होईलच ती म्हणालीच होती खुप काही सांगयचय तुला...खुप विचारुन देखील नाही सांगीतले तिने मी आल्यावर सांगील म्हणाली......काय सांगयच असेल रश्मीला या विचारातच तो हरवुन गेला होता........
प्लेट्फ़ोम वर सामानाची ब्याग सावरतच रश्मी ट्रेन मधुन उतरली आणि सरळ वेटींग रुम कडे चालु लागली आजुबाजुला पहायचा प्रश्नच नव्हता कारण तिची वाट पाहणारा वेटिंग रुम मधेच असेल याची तिला खात्री होती नक्किच "अमर" जुन्या आठवणीत गुंतला असेल नाही तर ट्रेन आली आणि हा अजुन बाहेर नाही आला यावरुनच तिला समजल होत.....तिच तिला तरी कुठे कळल होत पुण्यापासुन ते जळगाव पर्यंतचा प्रवास कसा झाला ते सहप्रवासी एक होती सहज ट्रेन मधे ओळख झाली होती कुठ जानार वगेरे बोलन झाल होत तिच्या सोबत म्हणुन सांगितल होत जळगावला जातेय तिने हाक नसती दिली तर विचारतुन आपण काही बाहेर आलोच नसतो तिच अभीवादन/ धन्यवाद करुण ट्रेन मधुन उतरत होती ती........
.
.
.
वेटिंग रुमच्या दरवाज्यातुनच तिला अमर दिसला अगदी तसाच आहे बस थोडा तब्बेतीने बारीक झालाय तसाच तरतरीच चेहरा, शांत नजर.....कुनालाही सहज आकर्षीत होईल अगदी तसाच....विचारांतच रश्मी त्याला पहातच रहीली होती किती घाई-घाईने आला आहे हा केसांचा भांग ही नाही पाडला याने रात्र भर झोपला देखील नाही डोळ्यांवर झोपे अभावी सूज दिसत होती तिला.....वेटिंग रुम मधे येना-या एका प्रवाशाचा धक्का लागुन रश्मी विचारांतुन बाहेर आली आणि स्वताशीच खुदकन हसली आणि अमर जवळ गेली.....
म्हणाली एक्सक्युज मी! मिस्टर अमर कोणत्या विचारात अहात तुम्ही??? आम्हाला ओळखल का???
कि विसरले??? कुठल्या विचारांत आहात आपण???
तिच्या या अचनक प्रश्नांमुळे अमर भानावर तर आला पण त्याला खरच कळले देखील नाही केव्हा रश्मी त्याच्या समोर येवून उभी राहिली....तिच तेच बालीश हसन,मोकळे केस, टपोरे डोळे,तजेल चेहरा तिला जेव्हाही पहायचा फ़्रेशच वाटायची ती........तिच्या प्रश्नांना उत्तर देण्या एवजी त्याने नुस्त स्मित केल आणि त्याचेच प्रश्न विचारले कशी आहेस???? कसा झाला प्रवास??? काहीच बदल नाही तुझ्यात अगदी आहेस तशीच आहेस पकावू......त्यावर तिने डोळे मिचकवले.........दोघांच हे नेहमीचच असंख्य प्रश्न विचारतील एकमेकांना पण उत्तर कोणीच देत नाही.......त्याने तिला पाहील गालातच हसला तुझी ओळख पटली असेल तर घरी जवुयात काय????....मनोमन तो सुखावला होता रश्मी आहे तशीच आहे काहीच बदल झाला नाही तिच्यात.....त्याने तिची ब्याग उचलली आणि स्टेशनच्या बाहेर....चालु लागला बरोबर रश्मीही चालु लागली......सोबत तिच विचारने चालुच होते घरी कळवले नाहीस ना मी येतेय म्हणुन मला सरप्राइझ देयच होत सगळ्यांना पण तुलाच का म्हणुन सांगीतल माहीत नाही.....तुलाही देयच होत मला पण........पण (अमर बोलला मधेच) पण काय आहे ना तुझ्या सामानाच ओझ वाहनार कोणी तरी हवाच होता ना.......किती जड आहे ती ब्याग काय आणलय काय इतक????..... मी ना खुपशी शॉपिंग केलीये (वाटलच चांगलीच केलेली आहे की अमर मनातच बोलला)
अच्छा !! अरे वा......बोलता बोलता दोघ गाडी जवळ आलेत....बर आता सांग कुठे चलायच डायरेक्ट घरी सोडु का कुठे कॉफी घेयची आधी मग घरी जयच????
.
अम्म्म्म !! कॉफी घेवुनच जवुयाना.....एकदा घरी गेल्यावर मम्मी काय लवकर सोडायची नाही ब-याच दिवसांनी येतेय ना तिच मन भरत नाही तोपर्यंत काही बहेर येता येनार नाही........हो तेही आहेच.....मला तरी कुठ सोडल बाहेर लगेच चांगले चार दिवस घरातच होतो....वैतागला नाहीस का मग....अरे खरच या वेळेस अजीबाद वैताग नाही आला त्याच त्याच प्रश्नांचा.........तुझ मात्र बरय आता तुला वैतागवायला माझे आई बाबा आज संध्याकाळी येतील कालच गावी गेलेत....मला मात्र चौघांनी जाम पिडला......त्याने तीची जड ब्याग डिक्कित ठेवली आणि ती लॉक केली........गाडीच फ़्रंट डोर उघडुन रश्मीला म्हणाला बाईसाहेब आसन ग्रहन करा........!!
.
एखाद्या राजकुमारी सारखीच ती गाडीत बसली......गाडीला वळसा घालुन तो स्वत: ड्रायव्हींगला बसला गाडीत बसल्या पासुन ती दोघ एकमेकांशी बोललीच नाही..........त्याने गाडी मद्रास कॅफे जवळ थांबवली नेहमीचेच ठीकान होते त्यांचे.....कॅफेत गेल्यावर त्याच त्यांच्या नेहमीच्या टेबलावर जावुन बसली दोघ...वेटरला दोन कॉफी ऑर्डर केल्या आणि एकमेकांकडे पाहुन उगाच हसलेत.....बोलायला सुरुवात रश्मीनेच केली.....
रश्मी : अमर ही दोन वर्ष कशी गेलीत एकमेकांशीवाय काही कळलच नाही
.
अमर : हो ना काहीच कळल नाही
.
रश्मी : कसे गेलेत हे दोन वर्ष तुला????
.
अमर : तुला जसे गेलेत तसेच..... {मुद्द्यावर तुच ये}
.
रश्मी : अरे काय रे मला बिलकुल चांगले नाही गेलेत रे प्रत्तेक क्षणाला तुझी आठवन येयची खुप मिस केल तुला
.
अमर : मी पण तुला खुप मिस केल ग...
.
रश्मी : आणि बाकी सांग कस चाललय
.
(अमर काही बोलणार तेव्हड्यात वेटर कॉफी घेवुन आला वेटरने कॉफी टेबलावर ठेवली आणि तो निघुन गेला)
.
दोघही एकंमेकांकडे पहात होते जणु चेह-या वरचे अबोल भाव समजण्याचा प्रयत्नच करत होते....
.
या वेळेस अमर ने बोलायला सुरुवात केली...
.
अमर : रश्मी कुठ हरवलीस??? कॉफी घे ना थंड होतेय...
.
रश्मी : उगाचच हसत हम्म्म्म घेते....!!
.
अमर : रश्मी !! {तिने फ़क्त त्याच्याकडे पाहील} काय झालय काही त्रास आहे का??? एकदम अशी गप्प का बसलीस.....
.
रश्मी : आपण जरा थोड निवांत ठीकाणी जवुयात का आता मला तुझ्याशी काही बोलायच आहे....
.
अमर : अग पण घरी.......
.
रश्मी : प्लिज घरी सांगता येयील दुस-या ट्रेनने आली ते.....त्याच्या संमतीची वाट न पाहताच ती उठली...
.
अमर ने काही न बोलताच न पिलेल्या कॉफीचे बिल पे केल आणि उठला.....
.
काही न बोलताच रश्मी गाडीच्या फ़्रंट सिट वर बसली त्यानेही गाडी चालु केली गाडी एखाद्या निवांत ठीकाणी पोहचे पर्यंत गाडीत नुसती शांतता होती....
.
नकळतच अमर ने गाडी लव्हर्स पोईंटलाच वळवली होती कारण निवांत बोलण्यासाठी तिच एक जागा होती.....नयन रम्य निसर्ग....भर उन्हातही थंड वारा सुटला होता.....बरच उंच ठीकाण होत ते....जळगाव पसुन ४० किलोमिटरवर तसे ते खुप वेळा गेलेले त्या पोईंटला पण आज काहीतरी वेगळच वाटत होत अमर ला....
.
त्याने पुन्हा गाडी पार्क केली संपुर्ण प्रवासात रश्मी काहीच बोलली नाही विचारांत एकदम गुंतूनच गेली होती ती.....गाडीची गती जशी मंदावली तशी ती भानावर आली......... गाडी लॉक करुण ती दोघ डोंगरात लपलेल्या सुंदर तलावाजवळ येवुन बसलीत.....
.
अमर काही विचारणारच होता तेव्हड्यात रश्मीच बोलली......
रश्मी : अमर तसे तर आपन या पोईंट्ला बरेचदा अलोय पण आज काही वेगळच वाटतय ईथे येवुन.......अमर काहीच बोलला नाही माहीत नाही एकदमच अस का वाटल ते पण वाटल.....तुझ्या शिवाय दोन वर्ष कशी काढलीत माझ मला माहीत....खुप वेळा वाटल रे......सगळ सोडुन तुझ्याकडे याव परत पण तु.......तु एकदाही बोलला नाहीस मला निघुन ये......पुण्याला Admission झाली कळल होत तुला.....स्टेशन वर सोडायला देखील आलास......पण रश्मी तु जावु नकोस अस का नाही बोललास रे????? नसती गेली मी......सांग मला का नाही बोललास उत्तर दे... का नाही थांबवलस मला???........नकळतच तिच्या डोळ्यात पाणी आल.......
.
.
!! मनाचा बंध तुटला होता अमरला बिलगुण ती मनसोक्त रडत होती...आणि अमर सुद्धा......!!
.
.
दुर कुठेतरी रेडीओ वाजत होता......
.
.
"दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके......."
अमर : रश्मी !! मी तुला का नाही थांबवल.....कसा थांबवणार होतो मी तुला??? तुझ स्वप्नच नव्हत का हे शिकायला पुण्यालाच जायचे...... आणि मी कोण तुझ्या स्वप्नांच्या मधे येणारा??? तुझ्या आनंदातच तर माझा आनंद होता वेडे.... हो फ़ार दु:ख झाल मला तुझ्या पसुन दुर झाल्याचा पण तितकाच आनंदही झाला तुझ स्वप्न पुर्ण झाल्याचा....
तुला गाडीत बसवुन घरी गेल्यावर माझ्या रुम मधे खुप रडलो मी लगेच तुला फ़ोन करणार होतो...पण....मला तुझ्या स्वप्नांच्या मधे नव्हत येयच.....तसही म्हणतात ना जवळची व्यक्ती जितकी दुर जाते तितकीच अधीक जवळ येते...हे पटलय आता....तुझ्या या प्रश्नांच्या भिडीमारावरुण आणि हे तुझ्या माझ्या ओल्या पापण्यांवरुन.....तुला नाही वाटत का अस???....रोज बोलायचो आपण फ़ोन वर एक-एक तास अगदी....ज्या दिवशी तुझ्याशी बोलन नाही ना झाल तो दिवस अगदी चुकल्या सारखाच वाटायचा...दर पंधरवड्यावर एकमेकांना पत्र सुद्धा लिहायचो....अगदी निबंध च्या निबंध....रश्मी आपण दोघ दुर असुन सुद्ध खुप जवळ होतो....अगदी हाकेच्या अंतरावर नाही म्हणता येणार पण
आपल मन....एकमेकांच्या खुप जवळ होत आणि आहे.....तुला नाही वाटत का अस????
.
.
रश्मी :मला काहीही कळल नाही तु काय बोललास ते समजेल अस बोल नेहमी कोड्यातच का बोलतोस रे तुला माहितीये मला नाही समजत.....सरळ सांग ना....
(रश्मीला सगळ कळुन देखील न कळल्याच दाखवायची सवय आहे हे अमरला चांगलेच ठावुक होते तो काही बोलला नाही........त्याला समजले आता जस्त बोलण्यात काही अर्थ नाही....रश्मी पुर्ववत झालीये ब-याच दिवसांनी तिच्या चेह-यावर निरागस स्मित उमटले होते....अगदी पहील्यासारखे......)

अमर : बाकी सांग कोणी भेटला का नाही पुण्यात गळ्यात पाडायला?????
(अमर ने नकळतच विचारला प्रश्न)
रश्मी : (या प्रश्नावर रश्मी बळेबळेच हसली) म्हणाली हो मग भेटला ना पण पुण्याचा नाही हो मुंबईचा......
अमर : कोण अमिताभ बच्चन का भिकारी????(या वर दोघेही मनसोक्त हसले)
किती निरागस निस्सम होते तिचे ते स्मित अगदी लहान मुली सारखे काही क्षण अमर तर गुंतूनच गेला होता तिच्या त्या हसण्यात नकळतच
तो भान हरपला होता त्याचे...गुंतून बसला होता जुन्या आठवांत तेव्ह्ड्यातच...तेव्ह्ड्यातच रश्मिनेच त्याला विचारला जावू या का आता घरी
बराच वेळ झाला मला भूक पण लागलीय अरे आहेस का लक्ष कुठेय तुझ ??कुठे हरवला होतास??...

अमर : काही नाही बस तुझ्या हसण्यात हरवलो होतो फार छान हसतेस तू....

रश्मी : छे काहीतरीच काय तुझ आता मधेच चाल जाऊ या वापस !! ..... :-))

Friday, July 29, 2011

क्षण......


!!! ओढ !!! भाग - (२)

ही ओढ कसली लागलीये मला
हे मला न उमजे
सांग सखे या ओढीलाच सगळे
प्रेम का समजे

तुझा सहवासाच्या क्षणात रमावेसे वाटते
हॄदयात मझ्या तुझीच साठवण
मझ्या मनाची गुंतागुंत वाढवत राहते
व्याकुळ करते तुझीच आठवण

बस आता नाही सहन होत दुरावा
सखे सोड आता तरी हा अबोला
येवुन विरघळ मझ्या मीठीत
सामवून घेईल माझ्यातच तुजला

उघड्या डोळ्यांसमोर माझ्या
तुझ्याच आठवणींचा पडदा पडतो
जगाचा विसर पडतो मला
असा तुझ्यातच कसा मी गुंततो


कसली ओढ लागलीये मला
तशीच ओढ लगलीये काग तुला
सांग सखे आज तु मला
विरह नाही ना सहन होत तुला

पियुष
२४/१२/०९



मन माझे.....

उदास मनावर उदासीनतेची पडली आहे
सावली ओठावर हसू आज येतच नाही

मनात हुंदका दाबून जागा समोर प्रयत्न करतोय
हसण्याचा सारखा, पण साल ! जमतच नाही

माझी उदासीनता न सांगताच कळली होती तिला
नेहमी प्रमाणे जरा एकांतात राहायचे होते मला

शब्दांनी न बोलताच डोळ्यांनी बोलली फक्त, जास्त
विचारात राहू नकोस वेड्या स्वप्न तुझीपण तुटली

उदास स्वप्नांची ही शीदोरी असेल नशिबी
मनच नसते ठिकाणावर तरी स्वप्न पाहायचे कसबी

पुन्हा उदासीनता झटकून पांघरून घेईल आनंदी
कुणाच्या सुखासाठी का असेना राहील सदा आनंदी

सदानंदी राहतांना क्षणिक उदास राहते मन पण
आठवणीत सदा कुणासाठी तरी झुरत राहते मन

पियुष
१७/१२/०९

तूच माझी.........

माझे पहीले वहिले प्रेमपत्र
तुझे झिडकारून फाडणे
माझे ते घायाळ हृदय
तुझे ते मघाळ बोलणे

तुझे मेघांसारखे बरसणे
तुझी ती घट्ट मिठी
तुझे सौंदर्य मला मोहने
तुझे वर्णन माझ्या ओठी

माझ्या एकांताचे पेटते मन
तुझ्या विरहाची गाणी
माझ्या विरहाचे दान
तुझी भिजलेली पापणी

तुझ्या त्या गुलाबी ओठांना
माझे ते ओघळत स्पर्शने
तुझ्या मनाची घालमेल
माझ्या आनंदाची स्पंदने

तुझा डोळ्यातला लटका राग
तरी माझे तुलाच पाहणे
माझ्या नुसत्या खोड्या
तुझे ते सुमधुर लाजणे

तुझ्या ओठातले अबोल बोल
माझ्या ओठातले शब्दाश्रू
तुझ्या पायातले ते काटे
तुझ्या डोळ्यातले ते अश्रू

तुझे ते क्षणातील गूढ हसणे
जणू गालावरची मोहक खळी
माझे अंगभर नुसते शहारणे
जणू गुलाबाची नाजूक पाखळी

तुझ्या हृदयातले माझे प्रेम
तुझ्या सवेत जीवनाचे नवीन रंग
तुझ्या माझ्या आठवणींचे क्षण
आयुष्यभर राहतील माझ्या संग

ते चित्र तुझे माझ्याच नयनी
तुझ उदास माझ्याविना बसने
डोळ्यात माझ्या तुझेच प्रतिबिंब
दिसत समोर मी तुझे मोहरणे

तुझ्या सवेत प्रेमाची नवी सुरुवात
तुझ्या सवेत जीवन जगण्याचा अर्थ
तुझ्या प्रेमाच्या मनमोहक सुगंधात
तुझ्यातच गवसलेला माझा परमार्थ

तुझा चेहरा म्हणजे चांदण्यातील चंद्र
तू माझे एका रात्री पाहिलेले स्वप्न
शीतल प्रकाशातील मनमोहक दृश्य
तु माझे सकाळी तुटलेले अधुरे स्वप्न

जुन्या अनुभवातून नवीन शहानपण
जुन्या रडकथे नंतर नवीन हास्य कथा
पुन्हा तोच फुलपाखरू उमलत्या कळीवर
तुझ्या प्रेमाच्या बेरीज अन वजाबाकीची गाथा

नभात मेघ दाटुनी पडलेली अंधारी
एका दवबिंदू प्रमाणे माझ्यात तुझे ओघळणे
क्षणात पावसाच्या आलेल्या जणू सरी
एका थेंबा प्रमाणे माझ्या मिठीत तुझे विरणे


मृदुंग
०३.०१.२०१०

!! ओंजळीत माझ्या !!

नात्यांचे नाजूक धागे
प्रेमाने गोंजारले तिने
सोबत देऊन तिला
माझे नवे जीवन गाणे
.
तुरु तुरु चालत
येते मिठीत माझ्या
तोतळ्या बोलांनी
गुंतवते मनास माझ्या
.
आहे थोडीशी खट्याळ
पण गोष्टी करते समजुतादारीच्या
मोठ्यांना सुद्धा खडसावून सांगते
महत्व आनंदी क्षणांच्या
.
सावली सारखी सोबत
मागे पुढे तिची बाहुली
शोधू कुठे तिला
जगाला या रुसून बसली
.
जीवन तरी जगणे चालू आहे
भेटेल तिच्या सारखे कोणी
पण त्या वेडीला नाही समजले
हृदयात तिची जागा नाही घेवू शकणार कोणी
.
ओंजळीत ठेवून गेली माझ्या आठवणी
हृदयाच्या चोर कप्प्यात तिच्याच आठवणी
का असा देव दुष्ट व्हावा
ओंजळीनेच तिच्या प्रेताला मुठ-माती मागवा !!
.
मृदुंग
०५.०३.२०१०

!! तरी आज खंत नाही... भाग -(१) !!

तरी आज खंत नाही
लेखनी हरवली तरी
कोरले जातात शब्द
मनावर घाव उमटले जरी
.
सहन करुन अयुष्याच्या
शेवटी काय उरनार
पैसा, संपत्ती सर्वेकाही
मातीचे मोल मातीतच जानार
.
दुरावले नाते आपले
काही क्षणांच्या अविश्वासाने
जरी असलो आपन असमंजस
पुन्हा एकत्र येवु विश्वासाने
.
नाविण्याने सुरुवात करु
नात्यांच्या नाजुक साखळींची
जोडणी देवु तयांना
भावरस काव्याच्या ओळींची
.
नात्यांचे फ़ुल आपुले
सरत्या काळानुसार बहरेल
सोबत राहा तु फ़क्त
एव्हडेच तुला मागीतले
.
मॄदुंग
०६.०३.२०१०

तरी आज खंत नाही (भाग -२)

.
तु मझ्या सोबत नसलीस तरी
आठवणी राहातील सदा सोबती
.
काळानुसार सरत गेलो जरी
परतुन तुझ्या समोर उभा रहील
.
कॉलेज मधे पहील्यांदा पाहीले
तुझे साधे निरागस डोळे तरी
.
ओठांना शिवन अबोलाची
स्पर्षाची भावना न कळे मज जरी
.
पहील्यांदाच भेट झाली
माझी एकांतात तुझ्यशी तरी
.
काय बोलवे तुझ्याशी
अजुन कळले नाही मला जरी
.
अबोला हाच आपल्या दोघांमधे
मंगळा सारखा असला जरी
.
एक दिवस शितल चांदण
आपल्या नात्यात पडेल तरी
.
जगुया याच आशेवर
भेटू परत त्याच वळणावर जरी
.
परतू आठवणीत परत तुटलेले
स्वप्न तु माझी असलीस तरी
.
मृदुंग
०३.०३.२०१०

!! आई म्हणजे आई !!

आई म्हणजे आई
वात्सल्याची दाई
प्रेमाची शाई
अशीच असते आई....
.
मुलांची तळमळ बघून
अश्रू गाळणारी आई
पोटच्या मुलाच्या सुखासाठी
"स्व" अपेक्षांचे बलिदान देणारी आई....
.
जन्मल्या पासून एका
फुला प्रमाणे जपणारी
भरारीचे पंख फड्कवतांना
डोळे भरून पाहणारी आई....
.
आजारी पडल्यावर रात्र
रात्रभर उशाशी बसणारी
मुलांची पोट भरून स्वतः
अर्धपोटी निजणारी आई....
.
मुलांच्या सुखी आयुष्याची
तोंड भर स्तुती करणारी
सुनेलाही मुली सारखी
वागणूक देणारी आई....
.
खरच आईला जे जमत
ते कुणालाच जमत नाही
आई विना काहीच नाही
आई पुढे देव ही लागत नाही....
.
मृदुंग
११.०५.२०१०

काही मनातल काही विचारांतल !!

लिहावास वाटत आहे काही तरी
काही मनातल काही विचारांतल
.
उमटवावेस वाटत आहे काहीसे
काही मनातल काही विचारांतल
.
सांगावस वाटत आहे कुणाला तरी
काही मनातल काही विचारांतल
.
समजवावेस वाटत पुन्हा एकदा
काही मनातल काही विचारांतल
.
जगावस वाटत आहे पुन्हा एकदा
काही मनातल काही विचारांतल
.
बघतोय लावुन आयुष्याचा हीशोब
काही मनातुन काही विचारांतुन
.
जोडली जातात काही नाते असेच
काही मनातुन काही विचारांतुन
.
प्रेम की मैत्री समजव एकदा
थोड मनातुन थोड विचारांतुन
.
स्वप्नच तु सत्यात उतर आता
थोड मनातुन थोड विचारांतुन
.
जा तोडुन टाक बंध समाजाचे
काही मनातुन काही विचारांतुन
.
घेयची आहे उंच भरारी आता.
काही मनातुन काही विचारांतुन
.
जग आता निवांत नभाकडे पहात
काही मनातुन काही विचारांतुन
.
.
मृदुंग
०७.०६.२०१०
.
{मनाला आणि विचारांना तसा अंतच नसतो लिहिल जितक
काही मनातुन किंवा काही विचारांतुन तितक
बरचस काही लिहायच राहुनच जाईल.......}
.
"खुप काही मनातल खुप काही विचारांतल"

!! मृदगंध !!


काळ्या ढगांची गस्त वाढू लागते
उन्हही बेपत्ता झालेली असतात
नकळतच मन भरुन येत अन आभाळ
भर दुपारीच अंधाराच साम्राज्य पसरवतात

क्षणांत आठवणींच्या छतावर
ढगांची ये-जा असते
चम-चमणा-या विजेची
दादागीरीही कमी नसते

अनायसे अशावेळी मी
बाहेर पहात असतो
क्षणाचाही विलंब नसतो की,
जमीनीवर पाऊस तुटून पडतो

वातावरणात गारठा रेंगाळत राहतो
अंगावर काटा उठत राहतो
कड कडाट! ढुम! फSSट्टा
करत विजेच पात लकाकतो

आठवांणी मन ओल चिंब करतो
निगरगट्ट आठवांचा चिखल तुडवतो
वारा! वादळ घेवुन अंगावरच येतो
क्षाणातच मन भिजवायला अडवतो

कितीही आठवांच आभाळ भरल
तरी आज धुंद भिजणार नाही
क्षणा-क्षणात कितीही उरल
तरी आज मृदगंध दरवळणार नाही
.
मृदुंग
१६.०७.२०१०

@ किती कठीण असत नाही @

किती कठीण असत नाही
कुणावर प्रेम करण
कुणाच्या तरी आठवणीत
मनातल्या मनात घुटमळण

कुणासाठी तरी रोज साजन
आयुष्याची स्वप्न रंगवण
कुणालातरी खूप सतवण
अन गालातल्या गालात हसन

मिटलेल्या पापण्यात कुणालातरी पाहन
अन स्वताशीच खुदकन हसन
कुणासाठी तरी उशीत खूप रडण
अन कुणासाठीतरी रोज झुरण

ते फक्त एक स्वप्न होत
स्वतालाच समजावून सांगण
'स्वत:च' आयुष्य माझ कधीच नव्हत
कुणाचतरी स्वप्न म्हणूनच आता तुटण
.
क्षण
०३.०९.२०१०

!! होती एक स्वप्न वेडी !!

ओठांवर हसू देणारी
हृदयाचा ठेका चुकवणारी
सत्यातून स्वप्नात रमणारी
क्षणातच मनात डोकवणारी ........................ होती एक स्वप्न वेडी !!

गालातल्या गालात हसणारी
डोळ्यांनीच बोलत राहणारी
पापण्यांच्या कडा भिजवणारी
सुखात दुखाला विसरणारी ........................ होती एक स्वप्न वेडी !!

लाटेसोबत खेळणारी
वाटेवर नजर खिळवणारी
पावलांशी पावले मिळवणारी
मनाशी मन जुळवणारी ..............................होती एक स्वप्न वेडी !!

स्वप्नातच स्वताला हरवणारी
सत्य हेच एक स्वप्न म्हणणारी
वास्तवात "स्व" हरवून बसणारी
कल्पनेतच मन रमवत राहणारी .................... होती एक स्वप्न वेडी !!

तुटतील तरी स्वप्न पाहणारी
तुटलेल्या स्वप्नांची कारणे शोधणारी
कशी पडतात ही स्वप्ने चांदणीला विचारणारी
अशाच एक स्वप्नात रोज भेटणारी.....................होती एक स्वप्न वेडी !!

तुझे स्वप्न माझेच
म्हणून भांडत राहणारी
विस्कटलेल्या आयुष्याचा खेळ
नव्याने मांडत राहणारी................................ होती एक स्वप्न वेडी !!

घरभर पसरलेले मोती
क्षणा-क्षणात वेचणारी
शब्द वेड्याच्या कविता
पाना-पानात वाचणारी..................................होती एक स्वप्न वेडी !!
.
क्षण
१८.११.२०१०

जोकर बनून कुणाला हसवण खरच फार कठीण असत !!

जोकर बनून कुणाला हसवण खरच फार कठीण असत,
कारण हसणाऱ्या प्रत्येकाकडे हसण्यास खर कारण नसत...

जोकर बनून स्वतःच स्वतःची टिंगल मी उडवावी,
उद्देश इतकाच गालावरची खळी तिची अधिक गहिरी व्हावी..

आपल्याच छोट्या-छोट्या गोष्टींवर हास्याचे फवारे बहरत राहावे...
जीन्स-टॉपची सवय असलेल्या तिला एकदा नऊवारीत लहरताना पाहावे....

निखळ हास्याकरिता तिच्या मी अंतरीचे दुःखे झाकावीत....
भाळूनी त्या खळीवर प्रियेच्या सारी सुखे ओवाळून टाकावीत...

एक हसतमुख विदुषक म्हणून जन्मुनी तिच्या जगात हास्य पसरावे...
जोकर म्हणुनी का होईना स्मरूनी मला, तिने सारे दुःख विसरावे...
.
क्षण
१८.११.२०१०
काहीतरी चुकतंय......!!
.
पुढे जावून पावले मागे वळतात
क्षणात नजरा कासावीसच होतात
मनातच काहीतरी खूप खदखदत
काहीतरी चुकल्या सारखच वाटत

काय चुकलंय कळत नसत
का लहरी मन बेचैन असत
काय चाललंय लक्षात नसत
शून्यातच कुठेतरी मन असत

मनात विचारांची घालमेल अन
चटकन शंकेची मनात चूक-चुकते
काही बर वाईट तर नसेल ना
मनच मनाची समजूत घालते

काहीतरी चुकतंय पण काय
सगळं निट सुरळीत सुरु असतांना
मन कशात तरी राहिलंय हरवलंय
आयुष्याची पहिली सुरुवात असतांना
.
मृदुंग
०४.०२.२०११


"माझी मैत्रीण "

अल्लड खट्याळ बोल घेवडी
चंचल निरागस ती प्रेम वेडी

रागावून घालते हाताची घडी
स्वप्नात रमलेली प्रेम वेडी

तार प्रेमाची ह्रुदयात ती छेडी
प्रियसी प्रेमाची ती प्रेम वेडी

क्षणा- क्षणात ती नाती जोडी
क्षणी त्या आठवांची प्रेम वेडी

मनाला माझ्या तिची गोडी
निस्वार्थी मानाची प्रेम वेडी

स्वार्थ ना कशात तिला मोडी
स्वार्थी विश्वासाची प्रेम वेडी
.
मृदुंग
२४.०४.२०११