Powered By Blogger

Monday, October 26, 2015

कोजागरी म्हणजे..! :-)


कोजागरी म्हणजे...
जागृकतेचा, वैभवाचा, सुखाचा
आणि आनंदाचा उत्सव..
कोजागरीचे जागरण...
जीवनातील सकारात्मकतेला
वाढवून सौम्यतेने सुखाची
सौंदर्य अनुभूती देते..
कोजागरीच्या शुभ्र चांदण्या रात्री...
चंद्राच्या शीतल प्रकाशाच्या सानिध्यात
मधुर केशर मिश्रित आटीव दुधासारखा
गोडवा आयुष्यात भरणे..!

कोजागरीच्या आभाळभर शुभेच्छा..!
------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Monday, October 19, 2015

न पाठवलेलं पत्र..! :-)


♥ क्षण..! ♥

न पाठवलेलं पत्र..!

मला माहीत होतं तुझ्या पत्रात असाच काहीसा मजकूर असेल... म्हणून पत्र उघडून वाचावे असे मनात येऊ दिलेच नाही... मनावर जरी नियंत्रण असले तरी हृदयावर कुठं नियंत्रण मिळवता येते? पाण्याला बांध घालून निश्चित अडवता येत असतं पण आठवणींच्या उधाणलेल्या लाटांना काही करुन थोपवता येत नसतं...
ओझं बननं आणि ते पेलनं दोन्ही दुय्यम गोष्टी आहेत. आपण कुणावर ओझं बनत आहोत अशी आपली वैचारिकताही एक ओझंच आहे. मुळात जबाबदारी व आयुष्याच्या प्रवास सुखकर होण्यासाठी बांधली गेलेली गाठ ही ओझं वाहून घेण्यासाठी पडत नसते...
समजनं, स्वीकारनं आणि आपलं करणं या प्रेमाच्या हळव्या व्यवहारात आपलं ओझं-मन वाटून घेणं असतं. जेणेकरुन आयुष्याच्या प्रवास हसत खेळत पूर्ण होईल... गालावर ओघळलेल्या अश्रुमधुन तुला मोकळं आणि व्यक्त होता येतं..पण माझं काय? हताश, आधार आणि ढासळनं काही केल्या तुला रुचणारं नसतं...
स्वतःबद्दल तुझ्याकडूनच माझ्या एवढ्या चांगल्या कल्पना असल्यावर तुझं सात्वन आणि तुझ्या व्यक्त होण्याच्या वाटेवर अडगळ म्हणून मी माझं अस्तित्व का ठेवावं? गालावर ओघळलेल्या आसवांना ओठांनी टिपतांना समाधान मिळत नाही. उलट मनात पडलेल्या कोरडला थोडा ओलावा मिळतो...
खरंच शोधायचे असेल तुला तर समाधान हे ओठांवरच्या आणि नजरेच्या हसण्यात शोधून बघ! बंधारा भरला म्हणून धरणाची दारं ही उघडाविच लागतात कारण साठवणुकीची मर्यादा ही ठरलेली असते. वाहत जाणाऱ्या पाण्याकडून आपण फक्त प्रत्येक क्षणाला आणि घटकाला स्वीकारायचे कसे? हे शिकायचे असते..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Sunday, October 18, 2015

समाजाला काही देतांना सामाजिक मुल्यांचे भान असायला हवे..! :-)

समाजाला काही देतांना सामाजिक मुल्यांचे भान असायला हवे..!



Saturday, October 10, 2015

डोळा..! :-)


♥ क्षण..! ♥

डोळा..!

पहिल्या प्रेमाचं ते वय सोळा आहे
अन् आज ती सुवर्ण नक्षी तोळा आहे,

हटवली होती उगा सारी गर्दी त्यांनी
माझं वैभव बघण्यास गाव गोळा आहे,

फक्त एक कागदच होता माझा समोर
कितीदा शब्दांचा केला चोळामोळा आहे

ओठांनी हसत राहिलो मी आजसुद्धा
केरातून उचलला कवितांचा बोळा आहे,

शब्दांचे बैल म्हणोत मला हरकत नाही
माझ्या कागदाचा धनी मनवतो पोळा आहे,

कशाला माझी नजर असावी कुणावर
जेव्हा माझ्यावरच प्रत्येकाचा डोळा आहे..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

हसण्यावाचून ओठांवर काहीच उरत नसते...! :-)



हसण्यावाचून ओठांवर काहीच उरत नसते...! 


Wednesday, October 7, 2015

पुन्हा प्रेमात पाडण्यात मजा आहे…! :-)

पुन्हा प्रेमात पाडण्यात मजा आहे…!




पुन्हा होतो मी तुझा…! :-)

पुन्हा होतो मी तुझा…!