Powered By Blogger

Sunday, December 27, 2015

दैनंदिन..! :-)


♥ क्षण..! ♥

दैनंदिन..!

घरापासून मी असा दूर आहे
घरीही मला जाता येत नाही,
वाट पाहतात जी डोळे माझी
मिठी त्यांना मारता येत नाही..

दिवस राबतो रात्रसुद्धा झटते
स्वप्नातलं चित्र खरं दिसत नाही,
दमतं शरीर माझं मिळतो पैसा
सुखाचा आरामचं मिळत नाही..

एकदा येऊन भेट निरोप असतो
हसणारा ओठ माझा असत नाही,
रमणं होतं आहे त्या परिस्थितीत
सहवासात फारसे करमत नाही..

स्वतःशी स्पर्धा करुन जगणं होतं
जग जिंकण्याचा आनंद होत नाही,
गंध दरवळतो सतत मातीचा पण
अफाट गर्दीतला घाम जिरत नाही..

रोजच्या चढाओढीत वरचढ ठरतो
माझं माझ्याशीच हरणं होत नाही,
असचं परत फिरावे एकदा माघारी
उधारी उंबरठ्यांची बाकी देत नाही..

तू वेळेवर आठवणही काढत नाही
पोच पत्राचीही कधी पाठवत नाही,
स्वतःतच गुंग तू आहेस रे माणसा
इथे परकं आपलं कधी होत नाही..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Saturday, December 26, 2015

संकोचणं..! :-)


♥ क्षण..! ♥

संकोचणं..!

अम्म्म! बोलायला कुठल्यातरी एका विषयाने सुरुवात होते. बोलणं कमी आणि उत्तर द्यायलाच फार वेळ लावण्यात जातो. बोलायचं बरंच काही असतं पण वेळेवर जो तो बांधला जातो. कधी वेळ असतोही किंवा मिळतोही तेव्हा संकोच केला जातो. ही वेळ नाही आणि हा विषयही नाही आता बोलायचा! निव्वळ संकोचणंचं जे काही असेल ते फक्त साठवणं औपचारिक म्हणून बोलणं आणि कर्तव्य म्हणून निभावणं! एक नातं तुझं-माझं आणि संकोचाचं..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Friday, December 25, 2015

अडीच शब्द..! :-)


♥ क्षण..! ♥

अडीच शब्द..!

'प्रेम' हे लोकप्रिय अडीच शब्द आहेत हे सर्वश्रुत आहे. या अडीच शब्दांत बऱ्याच लेखकांचे संपूर्ण आयुष्यही गेले. काही हे तर कधी ते या अडीच शब्दांची पाठ कुणीच (धो)थोपटली नाही. या अडीच शब्दांच्याच तोडीचा अजून एक शब्द आहे 'लग्न' आता याचा मतितार्थ काय हे लग्न झालेल्यांना चांगल्याने ठाऊक आहे. प्रेमाचे ज्वर आणि लग्नाचे सोहळे हे 'निर्णय' शून्य करतात. कारण आपण नेमकं शोधत काय आहोत आणि भेटत काय आहे यावर तुलना होते. त्याचबरोबर अवस्था वाईट आणि बिकट होते. कुठे बोलायला जागा आपणच बुजवून बंद केली असते. शेवटी होईल जे काय व्हायचे आहे ते यावर अनेक आयुष्य त्यांच्या लेखी यशस्वीरित्या सुरु आहेत. आपलं काय? लग्न इथेच थोडी काही अडलेलं आहे. जसं प्रेमाच्या कडले तसं काहीसं लग्नाच्या पलिकडे अलिकडे मध्येच खड्ड्यात.. अडीच शब्द..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Wednesday, December 23, 2015

स्टेटस..! :-)


♥ क्षण..! ♥

स्टेटस..!

आपलं स्टेटस असं बनवायचं की, आपल्यामुळे कुणाला स्टेटस बनवता येईल! बाकी कुणाचं स्टेटस ढापूण गाढवपणा केल्याचा पश्चाताप होतो तो वेगळा आणि स्टेटस ढापला गेलाय हे कळतं तेव्हा वाढणारे स्टेटस प्रेस्टीजिअस असते..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Sunday, December 20, 2015

कळत नाही..! :-)


♥ क्षण..! ♥

कळत नाही..!

आपल्यांनीच दुखरी नस दाबून धरल्यावर ओठांनी हसण्याशिवाय दुसरी प्रतिक्रिया काय द्यायची असते? काहीच प्रतिक्रिया न देण्यामागचे कारण एकतर ज्याला ते दुखरी नस समजतात ती बधिर नस असावी किंवा संवेदना शून्य ते एक अस्तित्व तरी असावे याही पलिकडे यातना अथवा वेदना देण्याचे कसब अर्थशून्य झाले असावे... म्हणूनच हल्ली फरकच काय काही कळतही नाही..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Wednesday, December 16, 2015

फसणं..! :-)


♥ क्षण..! ♥

फसणं..!

निखळ गप्पा, मोकळा संवाद,
थोडा नव्हे! बराच मोठा वाद,
थोडं हसणं, बरचं रुसणं, मग?
जाणून घेणं, पुन्हा विसरणं अन्
पुढे चालणं, वाट पाहणं, थोडसं
थांबू थांबू जाणं, उगाच वैतागणं,
असाच आहे म्हणणं, जवळ येणं,
डोळ्यात वाचणं, आपलं ठरवणं,
पुन्हा चालतं होणं, कसलं जगणं?
तुझा तू, तुझी तू अजून भांडणं,
बसं! आता खूप झालं इथे थांबणं..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Tuesday, December 15, 2015

जात नाही..! :-)


♥ क्षण..! ♥

जात नाही..!

माणसांमध्ये माणूस विचारला जात नाही
बघ आता मंदिरात दगड पूजला जात नाही,

व्याभिचारसुद्धा करतोय कष्टाशी शेतकरी
साधी! मीठ-भाकरी घशाखाली जात नाही,

नजरा चोरतोय भरल्या पोटाने जो तो इथे
उपाशी निजलेली भूक पाहिली जात नाही,

धर्म विचारला जातो कुळ जोपासले जाते
कधी सहजच 'जात' सांगितली जात नाही,

गृहितके जोडून छत्तीस गुणं तापासली हो
मंगळाची दशा न दिशा बदलली जात नाही,

पैशांचे व्याजच काय हप्तेही दिली जातात
गरिबाला एकवेळ भिक घातली जात नाही,

फुकट शिक्षण चांगलं मिळत होतं मुलांना
पैसे देऊन परिस्थिती शिकवली जात नाही,

सांगतो, लिहितो, बोलतो शेवटचे मी आता
वृत्ती, बुद्धी, नशीबे, स्वप्ने वाटली जात नाही,

फार वाईट वाटतं पाहून एक नजर जगाला
अवस्था आता फारशी पाहिली जात नाही..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Friday, December 4, 2015

मला आठवण येते..! :-)


♥ क्षण..! ♥

मला आठवण येते..!

नदी, खोरे, दऱ्या, कपाऱ्या अगदी गावातल्या पाऱ्याचीही
जिथे बुद्धी खुंटते अशा अडगळीत असलेल्या धुळीच्या थरांचीही,
कित्येक चौकटी उभ्या राहिल्या त्या बंद-उघड्या दारांचीही मला आठवण येते..
प्रसावली जिथे ओठात वेदना अशा जिव्हारी लागलेल्या जखमांचीही,
मंजुळ नाद, हळवा संवाद टीपायची काने अशा पैंजणांचीही,
तृप्त व्हायची नजर, कापरे होयचे स्वर अशा निसटलेल्या क्षणांचीही, मला आठवण येते..
परिस्थितीची एक चाल, आयुष्य बेताल अशा सौख्यभऱ्या दुःखाचीही,
कोसळत्या पावलांची, भिजलेल्या वाटांची अशा
संपलेल्या भेटीचीही,
राख झालेल्या देहाची, परतून आलेल्या पावसाची अन् कोरड्या दिवसाचीही, मला आठवण येते..
लुटवलेल्या प्रेमाची, मोबदले दिलेल्या शरीराची अन् वांझ झालेल्या नशीबाचीही,
चालढकल करणाऱ्या श्वासांची, जाणीवा मेलेल्या प्रेताची अन् ओरखडे पडलेल्या मनाचीही मला आठवण येते..
उभ्याने जळणाऱ्या प्राजक्ताची, वठलेल्या गुलमोहराची अन् उसणं हसणाऱ्या रातराणीचीही,
बहरुन रुसलेल्या बागेची, काठावरच्या एकाकी लाटेची अन् उपरा झालेल्या किणाऱ्याचीही,
तुझ्यापेक्षाही खूप मला आठवण येते..!

सांग आता मी विसरायचं काय आणि कसं???
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Tuesday, December 1, 2015

नव्याने..! :-)


♥ क्षण..! ♥

नव्याने..!

दैनंदिनीत पुरुन उरता येत नसतं तेव्हा थकवा फार जाणवत असतो आणि पुरुन उरणं झाल्यावर उत्साह वाढत असतो. कसला? तीच भातुकली पुन्हा नव्याने मांडून जगण्याचा..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com