Powered By Blogger

Saturday, December 29, 2018

लपाचपी..! :-)


♥ लपाचपी  ♥

झाला मागे मी लपून बशली ओती,
आई शोबत लपाचपी केलत ओती

मोत्या झाला शमोल इवलीशी मी,
खूप वेल धाला ना शोध मला मम्मी

मम्मी तुला बगून खुदूखुदू हशेल ना मी,
घेशील जेवा मिठीत पापी घेईल ना मी

ये मम्मी लवकल आपिसातून तू घली
दंगा कलू मिलून आनंदाच्या झाला खाली..!

- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writer #author #books #stories #coffee #tea #childhood #she       

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/piyush-khandekar-snfs/quotes/lpaacpii-jhaalaa-maage-mii-lpuun-bshlii-otii-aaii-shobt-kelt-kzqs6

Friday, December 28, 2018

कफ_सायरप (लव्ह लेटर)



♥ क्षण..! ♥

प्रिय,
कफ_सायरप (लव्ह लेटर)

तसं तुझं अस्तित्व या जगात हजारो वर्षापासून आहे. त्यामुळे तू किती सदुपयोगी व गुणकारी आहेस याबाबत मी वेगळं सांगायलाच नको. अगदी माझ्या आज्जीच्या अशिक्षितपणातही तुझं रसायन कसं एकत्रित करुन गुणकारी ठरेल याचीही गणिते सहज सोडवलेली आहेत. तसं तुला रोज घ्यावं वाटतं पण दिवसातून तीनवेळा आणि ते ही फक्त दोन चमचे हे तुझे प्रमाण ठरलेले आहे. तुझ्या मिश्रणात विरघळून गेलेले जिंजर(अद्रक) म्हणजे माझ्या घश्याच्या आतल्या आत होणाऱ्या गळचेपीचे अगदी रामबाण उपायच!

पूर्वी तू पारंपरिक आणि सुसंस्कृत होतीस आता आधुनिक आणि फॅशनेबल झाली आहेस. तुझ्या गुणकारीपणाचे इफेक्टही आता साईड इफेक्ट झाले आहेत. दिवसातून तीनवेळा भेटणारी तू आता अगदी सकाळ संध्याकाळच भेटतेस आणि माझा गळा मोकळा करतेस! तसे या गळ्यावर बऱ्याच जणांचं प्रेम; म्हणून जो तो गळ्यात पडत राहतो. पण तू डगमगत नाही. खचत नाही. अगदी तटस्थपणे या गळ्यात पडलेल्या सर्व गोष्टींना तू कसबीने बाहेर काढते. तुझी चव पूर्वी कडवट होती ती आजही तशीच अबाधित आहे. बस्स! थोडा गोडव्याच्या भेसळीत तुझी गुणवत्ता ढासळली आहे. त्यात तुझे प्रतिस्पर्धी आणि तुझे उत्पादकही वाढलेत! हल्ली तुझी नवी फॅशन महागड्या मॉडेलसारखी झाली आहे. तू आहेस तशीच बरी आहेस. देखावे तुला शोभत नाही. तुला घेतल्याशिवाय रात्रीला चैनीची झोप येत नाही. तू आहेस तशीच राहा इतकंच माझ्या प्रेमाचं तुला मागणं आहे..!

तुझा प्रियकर
न थांबणारा खोकला..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writer #author #books #stories #coffee #tea #winter #loveletter

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/piyush-khandekar-snfs/quotes/kph-saayrp-lvh-lettr-ky5ob

Saturday, December 22, 2018

वैसे तो मैं_



वैसे तो मैं_
काफ़ी संभाल कर रहता हूं,
रिश्तेदार और जान पहचान-
वालों से दो कदम दूर ठहरता हूं,
अपना चेहरा साफ और सारी-
चीजे ठीक जगह पर रखता हूं,
समय पर जाता हूं आता भी हूं
फ़िर भी पता नहीं आज कैसे?
माँ ने टोका और कहां_
"अपना जॅकेट जिसे पहना कर आए?
उसके बाऊजी ढूंढते हुए आ रहे हैं..
हाथ मुंह धो लो ये सर्दियां शायद
तुम्हारी शादी तक लंबी चलेंगी"
तबसे सिट्टी पिट्टी गुम हो गयी हैं..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writer #author #stories #lovestory #coffee #tea #relationship

Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Friday, December 21, 2018

वाव..! :-)



चाफा, शेवंती, अबोली,
जास्वंद, मोगरा, जाई
कितीतरी तुझे स्वभाव,
मी एकाकी निवडुंग,
वठलेला गुलमोहर अन्
जळालेला प्राजक्त
एवढ्यांनाच देतो वाव..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writer #author #books #stories #coffee #tea #nature #paper

Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

शेकोटी..! :-)



♥क्षण..! ♥

शेकोटी..!

थंडीच्या ऋतुत बघ शेकोटी पेटली आहे,
याने त्याने नव्हे, तर प्रेमाने शेकली आहे..

आता कसली काळजी तू करू नकोस,
तुझी माझी गोष्ट गावभर पसरली आहे..

थोडं लोकांच्या शेरेबाजीला सांभाळून घे,
कोवळ्या वयाची खमंग चर्चा रंगली आहे..

प्रेमाला कधीही प्रेमळ शिक्षा मिळत नसते,
निखाऱ्यांनी भाजून मला पिडा दिली आहे..

अजूनही बसतात मला चटके इथे, तरीही
विस्तवाशी खेळण्याची सवय झाली आहे..

तू तुझ्या उचक्यांना सांभाळून घे, आज मी
आठवणींची विझली शेकोटी फुकली आहे..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Monday, December 17, 2018

त्या रात्रीनंतर..! :-)




त्या_रात्रीनंतर..

देहावर कितीतरी रेषा
जखमांचा दलाली पेशा..
हरले-जिंकले सारे बाद
कस्तुरीचा हलाली नशा..
घेत अडखळत उसासे
गावभर मवाली दशा..
म्हणू कसा चूल चीतेस
तिरडीसह कमाली हशा..
पहा झालो खरा उपरा,
या वाटा गुलाली कशा..?
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Saturday, December 15, 2018

चाय..! :-)



बरसात का मौसम
इंतजार का आलम..
ठंड में राह ताकते हम
और तुम..
पल्लू संवारते हुए हाथों में
चाय की प्याली ले आती हो,
तारीफ हम चाय की करते हैं
तुम अंगड़ाई लेती रहती हो..
बस..
और कुछ कहूं तो..
चाय ठंडी हो जाएगी,
हम दोनों एकही प्याली से पी लें तो?
उफ़_
सुबह का अखबार
दोपहर सर दर्द
और शाम की मुलाकात
चाय पर मुकम्मल होती हैं!
तुम बताओ_
चाय पर कब मिले?
एक आधी-आधी पी लें?
या अलग अलग चुस्की लें?
इंतजार रहेगा_..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writer #author #books #stories #tea #coffee #love #relationship

Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Friday, November 30, 2018

लाजाळू..! :-)



♥ क्षण..! ♥

लाजाळू..!

..त्या दिवशी लाजाळूने अखेरची पाने मिटली. कुठल्या एखाद्या पानावर अखेरचं प्रबोधन असेल, म्हणून माझं कुतूहल शिगेला पोहोचलं होतं. राहून-राहून मन त्याची पानं कुरवाळत होतं. मिटलेली पाने कदाचित कुरवाळून पुन्हा उघडतील म्हणून.. कुरवाळल्यावर पाने मिटणारा तो. त्याने त्याचा गुणधर्म काही सोडला नाही. शेवटी काय? मातीला पुन्हा मूठमाती देऊन कर्तव्य पार पडायचं. आपला शोक शोकांतिका होताच संपतो. मग ही मिमांस कुणाला सांगत फिरायची? ठेवायचं आपलं स्वतःलाच. जाणारा सांगून जात नाही आणि येणारा पूर्वकल्पना देत नाही. आलिया भोगासीमध्ये मतलबं बाजूला राहतात. तेवढ्यापुरता चालढकल होऊन जाते. थोड्या दिवसांनंतर सगळं स्थिर होतं. माती झालेल्या कितीतरी प्रेतांच्या स्मरणार्थ; पहाटे प्राजक्त स्वतःला मातीवर उधळून देत असावा अशी संकल्पना होते. याची प्रचिती यायला, तेवढं पुण्य आपल्या वाट्यात आहे का? मग पुन्हा एक लाजाळू त्याच मातीवर पुन्हा रोवला. सवड काढून अगदी एकेका पानासह सतावला. लाजाळू पानं मिटतांना दिसला कित्येकवेळा. पानं उलघडतांना मात्र नेमकी आपली पापणी मिटून जायची. फारसा दिसायचाच नाही. प्रत्येकाच्या भूतकाळाची अशीच लाजाळूची मिटलेली पाने दिसतात. पण ती पाने उलघडलेली दिसत नसतात. गुंतलेली असतात. त्यामुळे मग म्हटलं लाजाळूची मिटलेली आणि आपली दुमडलेली पाने बरी..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, November 22, 2018

हत्त्या..! 2014

:-)
क्षण..!

हत्त्या..! (विक्षिप्त)

तिला प्रसुतीच्या कळा फार असह्य झाल्या होत्या. नैसर्गीक सुटका तिची अजून होत नव्हती. सिझेरीनचा घाट मांडला. वेदनेतून शास्त्रीय सुटका तिची केली गेली. फार असे कुणाला तिच्याबद्दल माहीत नव्हते. विवाहित होती कि अविवाहित काही कळत नव्हते. एकटीच आली होती कळा सहन करत. स्वत:च स्वत:ला दवाखाण्यात दाखल केले. भल्या थोरल्या घरातली वाटत होती ती. अवघडलेल्या परिस्थितून तिची सुटका आधी करणे महत्त्वाचे. प्रश्नांच्या सरबराईतच तिची शुद्ध हरपली. शुद्धीत आल्यावर पुन्हा प्रश्नांची सरबराई. कदाचित खोटी उत्तरे देऊन सोडवणूक तिने केली. हातात तिच्या तान्हूलीला देत, दुध पाजा म्हणत नर्स निघून गेली. विस्मयीत होऊन ती तो तान्हूला देह पाहात राहिली. कुरकुरलं, चुळबुळलं जरासे ते. तेव्हा कुठे तिच्यातली माऊली जागी झाली. दुध पाजून निजली ती तान्हूली माऊलीच्या कुशीत. ती माऊली मात्र रडत राहिली उशीत. आठ दिवसांच ते नाट्य दवाखाण्यातच छान होत. नवव्या दिवशी स्वत:च स्वत:चा डिश्चार्ज घेऊन तान्हूलीसह ती बाहेर पडली. आनंदीत चेहरा वाटत होता तिचा. मनात वादळ मात्र उठलं होत. फसवणूक झाली होती प्रेमात तिची. पदरात घेऊन तान्हूलीला रस्त्यावर भटकत राहिली.

एकदा फोन करुन त्याला ही बातमी द्यावी. जमलेच त्याला तर पुन्हा एक सुरुवात व्हावी. नंबर बदलवून तो अलिप्त झाला. काय करावं आता तिला कळे ना. मंदीराच्या पायरीशी बसून ती रडत राहिली. सांज झाली तान्हूली तिच्या स्पर्शाने सुखावली. काय ओळख द्यावी तुला तिची माऊली म्हणाली. माझे कर्म आता शिक्षा तुला. काळीज तिचे दगड झाले. पायापासून धरत तान्हूलीला माऊलीने पायरीवरच आपटले. कोवळा तो जिव पहिल्याच आघातात चिमुरडा देह गेला सोडून. माऊली नव्हती भानावर निश्प्राण देह आपटतच राहिली. पोटाला असलेले टाके तिचे रुतले जरा. काय बुद्धी सुचली नखाने स्वत:चे पोट फाडले. मध्यरात्रीचे ते थरार नाट्य मंदीराच्या पायरीवर घडले. कोण कुठली? असेल अशीच, सकाळी जमावाच्या तोंडावर होते. गुन्हा होता तो हत्त्याही होती. चुक मात्र कुणाची होती. शिक्षा कुणी कुणाला दिली होती. दोन दिवस वर्तमान पत्रांचे खमंग झाले. पोलीसांचे थोडे काम झाले. न्याय कुणा देणार? अन्याय सहन करुन त्या दोघी गतप्राण झाल्या.

(नोंद:- पूर्ण लिखान काल्पनिक असून वास्त्वाशी ताळमेळ आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा)
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Saturday, October 20, 2018

#फ़िक्र..! :-)




#फ़िक्र..!

लिखते बैठता हूं कुछ ना कुछ
तब तुम्हारा खयाल आता हैं,
लिखूं ना लिखूं सोचता हूं और
मेरी कलम रुक सी जाती हैं,
किस्से तो कई ख़तम हो गए
कागज़ के दो हिस्से हो गए हैं,
हम अपने थे अब पराए हो गए
गलत से सारे हिसाब हो गए हैं,
जब लोग सवाल पूछते है तब
हम मायूस सा जवाब दे देते हैं,
ज़िक्र होता है तुम्हारा मैफिल में
हमें हमारी फ़िक्र तब होती हैं..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Friday, October 19, 2018

उसने बताया..! :-)



#उसने_बताया..

शीशे का गुरुर तब तबाह हुआ
जब बैर किसी पत्थर से लिया,
हर पत्थर तब मौम बन गया
जब अश्क-ए-दिल से बह गया,
गौर करो, ना करों मेरी बातों पर
मैं सिर्फ अल्फ़ाज़ समेट गया,
कल मेरे इन पुराने पन्नों पर
धूल कुछ ज्यादा ही थी, उसने बताया..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Sunday, August 19, 2018

खूबसूरत गलती..! :-)


खूबसूरत_गलती..

आज यूंही उसकी गली से गुज़र आया,
कई बदलाव थे, कई लोग अनजान थें,
फिर गलीके एक छोर आकर मैं रुक गया
उसके घर का दरवाजा एकदम से खुला
और सामने महबूब इतराते हुए खड़े थें..
ना मैंने अपनी पहचान दी, ना कोई
इशारा उनके तरफ़ रुखसत किया..
वो कयामत ढा ती रहीं और हम
कुछ पल मौसम का मजा लेते रहें..
बिना कुछ कहें उन्होंने पहचान लिया
नज़रों से नजरें मिली कई बातें हुई..
जानी पहचानी तकलीफ सीने में हुई,
ना हम उफ्फ कर पाए, ना अफसोस
सिलसिले बस ख़तम कर के आए हैं,
शायद हम फिर खूबसूरत गलती
आज दोहरा कर आए हैं..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Read my thoughts on @YourQuoteApp at https://yq.app.link/IumobxeTvP

#writer #author #stories #books #coffee #tea #storyteller

Wednesday, August 1, 2018

पंचाईत..! :-)




♥ क्षण..! ♥

पंचाईत..!

दररोज काही ना काही
कागदावर लिहितोस
सकाळी रात्रीचे कागद
घरभर शोधत राहतोस
किती दिवस असं चालणार
तुमचं काहीतरी करा आता
झालं ते पुरे झालं तुमचे
जोडून घ्या संबंध आता
गप्प गार तेव्हा झालो जेव्हा
आई म्हणाली उशात जी
तुझे कागद घेऊन झोपते
तिला एकदा घरी घेऊन ये..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Monday, July 30, 2018

सच हैं क्या..? :-)




सच हैं क्या_
आज हमारे हाथ में खाली कटोरा हैं
जेब में फूटी चवन्नी तक नहीं हैं और
खाली पेट की हलक में कविता हैं
फिर भी हमारे कागज़ को गुरुर हैं
मेरे घर की चौखट बड़ी मशरूफ हैं
चौराहे तक स्याही बिखरी हुई हैं
सुना हैं जलिल होना भी ज़रूरी हैं
तब शोहरत दरवाजे पर दस्तक देती हैं
और हिसाब रखने की फुरसत नहीं मिलती
सच हैं क्या..?
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Sunday, July 29, 2018

Poem - Prakaran

प्रकरण..! :-)


♥ क्षण..! ♥

प्रकरण..!

पत प्रतिष्ठेचा मग प्रश्न उभा राहतो,
सपाट चेहऱ्यावर मला डाग दिसतो..

बदलून जातात माणसे वचन देऊन,
शपथ मग मी ही गिळून घेत असतो..

अतृप्त गिधाडे लचके तोडतात माझी,
मी प्रेत होऊन हा तमाशा बघत राहतो..

मला वाटतं नाही काही, जाणवत नाही,
प्राक्तन माझं मी विषारी बनवून टाकतो..

कर्मठ चाड आसक्त बनवते माणसाला,
मी नास्तिक होऊन पाषाण पुजत जातो..

वलय असतात अवती-भोवती माझ्या,
या भ्रमात शिदोरी माझी वाटत राहतो..

हात पसरून माझंच मागणं मागतात,
मी ओठांवर उसने हासू ठेवत राहतो..

कधी वाटतं धुडकावून लावावे सगळे,
पायदळी मलाच मी तुडवून काढतो..

अवचित येतात अशी प्रसंगे अंगाशी,
प्रकरण माझंही मी निकालात काढतो..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Tuesday, July 24, 2018

अजूनही..! :-)



♥ क्षण..! ♥

अजूनही..!

पावले मोजत चालू लागतो,
स्वतःशीच मी बोलू लागतो..
कधी इथे कधी क्षणात तिथे
या सरीवर सरी झेलू पाहतो..
माहीत नाही नेमकं काय हे,
प्रेम, भ्रम, आभास की क्षण..
मी मनमुराद बागडू लागतो,
हिंडतो, फिरतो गुंतवतो मन..
ना उणीव भासते कशाची,
ना जाणिव असते माझीही..
चौफेर थेंबांचा उत्सव असतो,
कमतरता भासते ती तुझीही..
कधी नाहीही कधी आहेही,
दरम्यान काहीतरी अजूनही..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Monday, July 23, 2018

साधी माणसे..! :-)



♥ क्षण..! ♥

साधी माणसे..!

दुपारचं कधी झोपत नाही. आज झोपलो. कदाचित डोळा वैगेरे लागला असावा. जिवाभावाची फेसबुकची साधी माणसे पैकी सखीने नंबर फिरवला. पाच वर्षाच्या मुलाचा वाढदिवस आहे. ग्रिटींगसाठी मजकूर दे! प्रिंट थांबलीये लगेच व्हॉटसअप कर. मला काही सुचत नाहीये. झोप काही उघडली नव्हती. अर्ध्या झोपेतच मजकूर लिहून पाठवून दिला. आता मॅसेज फेर तपासले तेव्हा संभ्रमात पडलो. हे काय पाठवून बसलो? सखीला फोन केला. तीनवेळा केला छापलेस का म्हणून पण उचलला नाही. जरा वेळाने तिने फोन केला. रिसिव्ह करून कानाला लावून विचारणार होतो की, तिची बडबड सुरु झाली. मजकूर छान होता. प्रिंट आली की पाठवते. मी कपाळावर हात मारला. व्याकरण चुका होत्या काही त्या मजकुरात. सुधरवल्या मी! हे ऐकुन जीव भांड्यात पडला. चला, झालं. अर्ध्या रात्री जाहिरात पंच लाईनसाठी प्रिंटला असलेला पेपरही एकाने मध्यंतरी थांबवला. आमचा इजन्सिचा कॉपी रायटर माती खातोय. काही ओळी पाठव. क्लाएंटने विट आणलाय. त्यालाही अर्धवट झोपेतच मजकूर दिले. सकाळी पेपरात रात्रीचे उद्योग प्रसिद्ध झाले होते जाहिरात नॅशनल लेव्हलची होती. बरेच चांगले रद्दड लिखाण झोपेत पूर्ण होतात याची पोचपावती अशीही मिळते. यात अजून एक किस्सा असा एक मानलेली बहीण स्वतः लेखिका दोनचार ईबुक स्वतःच्या नावावर खपवलेली. माझ्या लग्नाच्या पत्रिकेसाठी ओळी दे, दोनचार मला चांगलं काही सुचत नाहीये. फोनवर बोलता बोलता मजकूर लिहायला लावला. सांगितला तसा मजकूर पत्रिकेत आला म्हणून लग्नाला जाने टाळले. एकंदरीत हे सांगण्याचा प्रपंच असा की, अर्धवट झोपेत खोळंबलेली कामे पूर्ण होतात. फक्त अशी साधी माणसे संपर्कात असणे आणि योग्यवेळी त्यांना तुमची आठवण होणे हितार्थ असते. आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवतात. लिहायला येत याचे श्रेय घेण्यापेक्षा लिखाण उपयोगात येतं हे खूप काही देऊन जाते..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Friday, July 20, 2018

चूड़ियां..! :-)




हर रात उनके तकिए के नीचे
मेरे सारे कागज़ मुक्कमल होते हैं,
मेरी शायरी, मेरी कविताएं और
उनका जिक्र भी.. दीदार भी..
फिर हम महफ़िल में आए भी तो क्यों?
दुनिया का सारा शोर-शराबा
घर पर ही उनकी चूड़ियां कर देती हैं..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Thursday, July 19, 2018

कस्तुरी गंध..! :-)




♥ क्षण..! ♥

कस्तुरी गंध..!

कधी चंद्र, चांदणे,
गुलाबाची फुले तर
कधी हळवा चाफा..
फुललेला मोगरा,
अबोली, शेवंती अशी
कितीतरी प्रलोभने..
मनमुराद, ओरबाडून,
हवे तसे लुटून, खुडून,
सुगंधाचीच लयलूट..
हव्यासाचे अस्तित्व
क्षणभंगुर असले तरी
आभासात भुलने..
अन् वास्तव गोष्टीत
कस्तुरीचा कुबकट गंध
दरवळत गेला होता..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Thursday, July 12, 2018

सुफी..! :-)




♥ क्षण..! ♥

सुफी..!

मी एखादा गुलाब घ्यावा हाती,
अन् सांज गुलाबी होऊन जावी..
आशा पल्लवित होऊन मनात
उभी रात्र शराबी होऊन जावी..
हल्ली जाणिव नसते मला माझी,
रसिकाची ही खुबी जमून यावी..
होऊन जावोत कित्येक आरोप,
गुन्हेगारी सबबी देऊन पहावी..
बावरे मन, हळवे क्षण जपतांना
एकदा खोटी तंबी देऊन बघावी..
तू असतांना सोबत माझ्या सये,
आयुष्यभर सुफी मी गात जावी..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Friday, July 6, 2018

नशीब..! :-)




♥ क्षण..! ♥

नशीब..!

रोज दिवसाची चाल- ढकल होते,
कागदाची काया बदलावी वाटते..
मनात जे येतं तसं आयुष्य नसते,
सगळे अघोरी षडयंत्र भासत जाते..
आतातरी बदलेल आशेवर मन ते,
भाळावरची रेघ घट्ट उमटत सांगते..
दया स्वतःची स्वतःला येत नसते,
दगडाची महिमा खोटी होत राहते..
देहातून विस्तव जाणार असतो कि,
त्याग करण्याची प्रबळ इच्छा मरते..
दोष मग कुणाला द्यायचे नव्याने?
सर्वकाही जर नशीब ठरवणार असते..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#stories #books #you #love #coffee #struggle #relationship
Follow my writings on @yourquoteapp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Thursday, July 5, 2018

दे..! :-)




♥ क्षण..!♥

दे..

जरा कळवळू दे थोड हळहळू दे,
उरात आक्रोश हा मला तळमळू दे..
कितीदा समजावून घेतलं स्वतःला,
या क्षणी मला कायमचं मौन पाळू दे..
नसतं कुणी कुणाचं या जगात सये,
तुझं असणंही मला उगाचच टाळू दे..
विसरुन जातो लक्षात काही येत नाही,
गालावरून तुझी आठवण ओघळू दे..
चारही दिशा मोकळ्या अंधारल्या वाटा,
नटलेल्या या क्षितिजावर मला भाळू दे..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Monday, July 2, 2018

हो जाए..! :-)



♥ क्षण..! ♥

हो जाए_

बैठे बैठे ऐसी कुछ बात बन जाए
किसिसे क्रॉस कनेक्शन हो जाए..
मैं तो हूं आउट डेटेड कुड़िए तू
मेरा लाईफ टाईम रिचार्ज डन हो जाए..
ना पी ओ बॉक्स में हो कोई लेटर
पिसिओ पे अपनी लंबी बात हो जाए..
रिसेशन में रिलेशन अपडेट कर दू
लव का सॉफ्टवेयर डाऊनलोड हो जाए..
अब सुन ले प्लानिंग मेरी परफेक्ट हैं
बस, सारी मेमरी तेरी रि-सेट हो जाए....!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Sunday, June 17, 2018

घड़ी..! :-)



देर रात तक जागते हो,
आख़िर चल क्या रहा है?
हर रोज अब घरवाले पूछने लगे हैं मुझसे..
तुम्हारा नाम मैं बता नहीं सकता और
मेरे लफ़्ज़ों का सफ़र भी बयान नहीं होता..
जब वक्त पे सब छोड़ दिया है,
तो ये वक़्त भी सिर्फ गुजर रहा हैं..
मैंने घड़ी भी कई बार पीछे कर के देखी,
घरवाले ही है, सारी चोरी पकड़ लेते हैं..
सुनो अब तुमही कुछ जवाब मुझे दे दो,
यूं रात में हम कब तक खयालों में मिलते रहेंगे..?
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#night #meet #love #dreams #coffee #clock_of_life #clock

Follow my writings on @yourquoteapp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Saturday, June 16, 2018

चिता..! :-)




अजूनपर्यंत तरी मी
कसलाच थांगपत्ता
लागू दिलेला नाही..
मनातलं तुझं नाव
डायरीच्या पानावर
उमटू दिलेलं नाही..
प्राजक्त कुरवाळत
तुळशी जवळ बसलो
निरंजन विझला तसा
व्याकुळ होऊन गेलोही..
"चिता आत जळतात
जळू देत, तुला फार
जगायचेय लक्षात ठेव".
निरंजन पुन्हा पेटवून
आई तुला जाळून गेली
मी काहीच केलं नाही..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#fire #mom #path #stable #dear #you #diary #lovestory
Follow my writings on @yourquoteapp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Friday, June 15, 2018

#समाधान..! :-)


♥ क्षण..! ♥

#समाधान..!

अमुक तमुक : ओ लेखक..
मी : (दुर्लक्ष करुन) वाळत टाकलेय.
अमुक तमुक : ओ लेखक महाशय.
मी : वाळीतच टाकलेय ना? (कनफर्म केलं)
अमुक तमुक : ओय हॅल्लो! (रागीट स्मायली)
मी : (चिडलं बेनं) हां, केकाटू नगंस. बोल काय ते...
अमुक तमुक : काही नाही सहज आपलं.
मी : हड.. मग! :-)
अमुक तमुक : typing... typing... typing.. बरं विचारतोच! तेच काय झालं..
मी : कुणाचं काय झालं. मला काय माहीत?
अमुक तमुक : typing.. typing.. ओ! दमा जरा..
मी : ठीक.
अमुक तमुक : typing.. typing..  तेचा तेच.. काय झालं की, बऱ्याच लेखक लोकांच्या थोबाड पुस्तकावर (फेसबुक) त्यांच्या वॉलवर लाईकचा पाऊस.  लय कचकच, मचमच करत कमेंटीच्या खिडकीत नळ उघडा सापडत्यो आन अगदी अा..बा.. च्या भाषेत लढाया आणि काय काय मिळत कमेंटीत.. तुमची वॉल धुतल्या तांदळावानी एवढी सोच्छ कशी ओ?
मी : मला नाही माहिती. (उडवून लावलं)
अमुक तमुक : सांगा की ओ.. प्लिज.. प्लिज.. प्लिज...
मी : दुसऱ्याच्या घरात इंडियन कमोड आहे आणि माझ्या घरात वेस्टर्न. कस बसायचं इथून सुरुवात.. कळलं?
अमुक तमुक : (शाळेत मुल म्हणतात ना एकसुरात) नाही!
मी : (च्यायला कसं कटवू या बेन्याला) तलवार माहीत आहे?
अमुक तमुक : युद्धाची ना?
मी : व्हय व्हय तीच! तिच्यावर टरबूज पडल तर काय होईल?
अमुक तमुक : टरबूज कपल!
मी : आणि तलवार टरबूजवर पडली तर काय होईल?
अमुक तमुक : तरीबी टरबूजच कपल!
मी : हुश्शार एकदम!
अमुक तमुक : ^_^
मी : मग आता.. माझी लेखणी माझी तलवार. या न्यायाने कोणी तरफडले तर त्येच काय व्हणार?
अमुक तमुक : टरबूज!
मी : परत वाचा आपलं हे संभाषण दहा वेळा..! करा सुरु..!

(*तळटीप* : मोबाईलमध्ये अगदी अदबीने मान झुकवून समाचार मी तरी यथा योग्य घेतो. वाटेला गेलं नाही, तर वाटेला आलं नाही. बाकी बरेच वाटेला न वाट लाऊन रवाना केले गेलेत. आपण भलं, आपलं भलं..!)
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Saturday, June 9, 2018

तेवत..! :-)




♥ क्षण..! ♥

तेवत..!

गुलमोहराची पानगळ अन् प्राजक्ताचे बरसणे,
अनवाणी पावलांनी बोथट काटे वेचून आणणे..

व्रण तसेच, घावही तसेच शोभतोही करंटेपणा.
मुक्त कसले? अगदी विभक्त घरट्यातले चांदणे..

फुलांवर भोवरा अन् पाण्यावर सरसर काजवा
रात्रीच्या काजव्यांची गोष्ट फुलपाखरांना  सांगणे..

मृत्युला आलिंगन देऊन जवळ काय बसवलं,
जन्मभर वैऱ्यासारखा माझ्याशी वागत जाणे..

वाळवंटाच्या कोरडेपणावर भाळलो या जन्मी,
निवडुंगाचे पुण्य कुचकामी कशास मग जागणे..

निजली असते, निजतही आहे माती मातीवर,
देह तुझाही सोन्याचा नव्हे, राखेचे होते म्हणणे..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#brokenheart #coffee #likeforlike #style #words #sideeffects #heartbreak #forsomeonespecial
Follow my writings on @yourquoteapp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Friday, June 1, 2018

ऐ.. गप्पे..! :-)



♥ क्षण..! ♥

ऐ.. गप्पे..!

माझ्यात मग दूषणंही अन्
मर्यादेपालिकडचे अवगुणही..
लक्ष्मण रेषा ओलांडून मी
जपलंय दायित्त्वही चारित्र्यही..
माझ्या नादाला लागू नकोस रे
नाद नादावून बरबाद करतोही..
ऐऱ्या गैऱ्याची याची अन् तुझी
पर्वा मी तमा बाळगून करतेही..
विचारले नाहीस तू माझे उत्तर
गृहीत धरलेस तर वरचढ होतेही..
ऐक शेवटचं, मी निपजते तशी
उभं गावसुद्धा जाळून टाकतेही..
खुशामत करुन भाव जपते मी
च्या'शिवाय आभाव राहतेही..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Wednesday, May 30, 2018

मैफलीतली एक गोष्ट.. :-)




♥ क्षण..! ♥

मैफलीतली एक गोष्ट..

चोरट्या नजरेने न्याहाळणे
बघता क्षणी टाळूनही जाणे..
थोडं अधीर होऊन उगाचच
बावरल्यासारखे वागून घेणे..
नजरेतलं काही कृतीत नसतं
स्पर्श होताच ओठांचे थांबणे..
प्रसंग भानावर कुठे आणतो
अवधान लाभून गुंतवून देणे..
एवढंच जमतंय मैफलीला
परिचय रेषांवर भान ठेवणे..
थोडी हुलकावणी देऊन बघ
आठवून मिठीतले चुरगाळणे..
कदाचित, असेल काही बाकी
नजरेचे नजरेला काही देणे/घेणे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Monday, May 28, 2018

सूर..! :-)


♥ क्षण..! ♥

सूर..!

मग एखादा सूर बेसूर लागतो
म्हणून दोष पूर्ण धूनेचा नसतो..
काही वेदना दडपून ओठांनी
हसण्यावर गोष्टी बनवत जातो..
सगळंच कळत असं नसतंच
म्हणून मग वाळीत ठेवून देतो..
गाणेच आवाज घेऊन जातात
कंठात आर्त स्वर राहून जातो..
पुन्हा तार छेडावी म्हटली तर
सूर तुझ्यावर अडकून पडतो..
स्वरातून सूर जाणला अपितु
सुरातून स्वर छळतो.. छेडतो..
तार घाव सुरांचे आरपार देतो
नाही गुणगुणत मी तुझे गीत
चल हे क्षण असेच राहू देतो...!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Image courtesy @in_tinas_world

Tuesday, May 22, 2018

ऋतू.. बहरता बहरलेला..! (कथा भाग-५) :-)


वाचा ब्लॉगवर
भाग-१
https://kshanatch.blogspot.in/2017/12/blog-post_21.html
किंवा फेसबुकवर
https://m.facebook.com/Kshanatch

♥ क्षण..! ♥

ऋतू..
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-५)

"..आवर्तन गळून पडते का? एखाद्या स्वप्नरंजनातल्या नाटकातून प्रेक्षक खडबडून जागा झालेला ऐकिवात तरी आहे का? नुसत्या कुजक्या कल्पना! प्रॅक्टिकल जगण्याचा पॉझिटिव्ह असण्याशी संबंध कळतो, पटतो देखील. साधी संकोचिंत मनोवृत्ती थोडीजरी आरूढ झाली तर मात्र सगळंच बिनसलं! किती निगेटिव्ह विचारसारणी वगैरे वगैरे! पुढ्यात असलेलं वास्तव जरी असले, तरी त्या वास्तवावर भूतकाळाची व्रण असणारच! सहज म्हणून एखादी ऑफर स्विकारता येते पण नातं? नातं ऑफर नसते ना कोणत्याही प्रॉफिट & लॉसची डील. नातं म्हणजे बॅलन्सशीटचे दोन स्तंभ "ती' ॲसेट & "तो" लॅबिलिटी! अकाऊंट टॅली होण्यासाठी भावनांसह शरीराचेही ट्रँझ्याक्शन व्हायलाच हवे असतात का? मग डेबिट-क्रेडिट करता-करता पर्सनल अकाउंट बॅड डेब्टस् म्हणून कधीच बुडीत निघालेलं असतं!

..व्यवहार न जमणाऱ्यांनी व्यवहार करूच नये. बाजारपेठेची जोखीम शिंगावर पेलता येत नसेल तर खुशाल बुडाऊ खाते म्हणून लौकिक मिळवून घ्यावा. पैसे कर्ज म्हणून देणारेही गप्प आणि आपले देणेही ठप्प! व्यवसाय आज ना उद्या जम बसवेल या आशेवरचे देणगीदार दिलखुलास तुमच्या व्यवसायात स्वतःचा पैसा ओतत राहतात. याच धरणीवर जर प्रेम फतकल मारुन बसले तर तुटपुंजा व्यवहार सुरू झाला. मराठी माणसाला एवढंच दिवास्वप्न स्वतःच संपूर्ण आयुष्य कंठायला पुरुन उरतं आणि ओसंडून वाहतंही. श्रेय लाटणारे जागावेगळं तुमच्याशी काही वागत नसतात. तुम्ही मात्र सगळ्यांना कोळून पियून अगदी रिचवून पूर्णतः बदलेले असता. अगदी सरड्यालाही स्वतःच्या रंग बदलण्याच्या कसबीवर तुमचे रंग पाहून लाज वाटावी इतके!..

..मनगटातली ताकद दाखवायला व्यवसाय कुस्तीचा आखाडा नसतो. गरुड झेप वगैरे मग भाकड कल्पनाच. काहीतरी करुन दाखवायला संधीसुद्धा मिळायला हवी. माणसांना स्वतःच्या बुडाखाली दाबून ठेवलेली बोटं सोडायला जमत नाही. संधी मिळता मिळत नाही. सरतेशेवटी हुकुमाचा एक तुक्का एक्का पोतडीतून बाहेर काढलाच तर महागड्या क्लबमध्ये मुरलेले रम्मिबाज तुमची मेंढी कर्जबारी करुन हलाल करतात. एका क्षणात राजाचं राज्य सगळंच गेल्यावर मग तुमच्यासारख्या जोकर जवळ "राणी" कसली टिकणार? ती केव्हाच खेळ ओळखून स्वतःला अलिप्त आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून पसार झालेली असते!..
..मग रडीचे डाव आपण खेळू लागतो. काही काळ राणीचे अपडेट्स जवळ बाळगतो. राणीही तुमच्यासारख्या जोकरचे स्वतःचे मनोरंजन म्हणून अपडेट्स ठेवत असते. सपोर्टला कुणीच नसतं! पासपोर्ट आणि ग्रीनकार्ड या जोरावर इंग्रज लूट आजही करतोय. थिंग्ज आर हॅप्पन! गोष्टी घडत राहतात. वेळ जात जाते तसे जोकरचा आदिमानव पुन्हा माणूस बनू लागतो. घडतो व स्वतःसोबत इतरांनाही घडवतो. जे जमत नव्हतं ते जमलेच नाही. जे जमतंय त्यातच परिपक्व होऊन स्वतःच वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होतं. फुटपाथवर काढलेल्या दिवसात भिकारीही शिकवून जातोच "हर कुत्ते का दिन आता हैं साब, मैं तो इन्सान हैं, आज खाली पेट के दुःख से मैं सो नहीं पा रहा हूँ, और खुशीवाली रात को कौन भला सोता हैं?

..माणसाच्या उपाशी पोटाने शिकवलेलं शहाणपण अजून कुणाला चांगल्याने शिकवता येत नसते. या उपासमारीची शिकवणीत काही नसलं तरी तुमची भूक कशाची आणि किती आहे हे मात्र कळतं! अर्थात समजून घेतलं तर. अन्यथा अधःशिपणा भोवतोच! तृप्तीची ढेकर निघता निघत नाही. अनुभवाची झालेली ॲसिडेटीचे औषध गुणकारी ठरत नाही. सुखाचे जे काही अजीर्ण व्हायचे ते होतेच यात अपवाद 'मी' ही नाही आणि 'तू' तर मुळीच नाही. कुरघोडीच राजकारण मग करावं तरी कुणावर? जे सिद्ध करुन दाखवायचं होते ते स्वतःहून सिद्ध झालेले असते. फळ मिळालेले असतांना भूक लागलेली आहे असे नसतेच! वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पाण्यातले मगर पाळून ठेवलेले आहे आणि स्वतःला व्यावसायिक शार्क मासे समजणाऱ्यांना कॅपिटल पुरवून भाडोत्री भांडवलशाहीची पुंजी बनवून ठेवली आहे. असत्या-नसत्या परिणामांची चिंता म्हणावी तशी काही एक नाही. आता काही आहेच किंवा असलंच तर "बदाम राणीचा" मोह तोही क्षणभंगुर ठरला की संपलं सगळंच..!
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

Sunday, May 20, 2018

क्या कहती हों..? :-)


♥ क्षण..! ♥

क्या कहती हों..?

एक बहोत खास बात है
अगर तुम कहों तो मैं बताऊं..
तुम्हारी आखों को पढकर
दास्तान-ए-इश्क तुम्हे सुनाऊं..
युंही उल्झी रहो तुम जुल्फों में
सवारते हुए मैं ये वक्त बिताऊं..
फिर थोडी देर और हो जाये
कुछ कदम साथ मैं चला आऊं..
तुम जाना चाहो पर जा ना सको
पल दो पल और तुम्हे देखता रहूँ..
तुम मूस्कुरा दो होटों सें बस!
इतनाही उस पल मैं समेटता रहूँ..
फिर अगली मुलाकात तक तुम
युंही मेरा इन्तजार करती रहो..
मैं थोडी देर और की वजह
अपने साथ ले आया करूं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३


Monday, May 7, 2018

कोट_फाट..! (फोनकॉल) :-)



#फोनकॉल
#कोट_फाट

(लॅण्ड लाईनच आहे टूर-टूरच रिंग जाताना ऐकू येत होते. चार-पाच टूर-टूरनंतर..)

आई - हॅलो?
मी - आई मी ये.
आई - एवढ्या भर दुपारी? का रे काय झालं? मुंबईत ऊन बिन लागलं का?
मी - (पडल्या आवाजात) तसं काही नाही. बस आयुष्याचा प्रश्न पडलाय!
आई - कसला प्रश्न? (गंभीरतेने)
मी - लहानपणी अगदी शिशू अवस्थेत नाटकं केली होती का गं मी?
आई - २९वर्षे मागे जावं लागतंय थांब. जरा टिव्हीवरची मालिका बंद करते.
मी - (होल्ड करत) बरं!
आई - (एक-दोन क्षणानंतर) हां, बोल आता.
मी - (गंभीरपणे) सांग ना लहानपणी काही नाटकं केली का मी?
आई - फार अशी नाहीस केली. कुणाजवळपण सहज राहायचास. रमायचास.
मी - तो स्वभाव झाला गं माझी आई. नाटकं सांग!
आई - आता काय आठवतंय रे ते सगळं. (दमलेल्या सुरात)
मी - (निराश होऊन) म्हणजे मी काय नाटकं केलीच नाहीत की काय?
आई - (आक्रमकतेने) केलीस की, पण ती नाटकं नव्हती, त्रास होता.
मी - त्रास? तो काय?
आई - एखादं खेळणं आवडलं की ते घ्यायचा हट्ट, त्यासाठी फतकल मारुन भोकाड पसरण्यापर्यंत आपले उद्योग व्हायचे. अख्ख दुकान डोक्यावर घ्यायचास.
मी - तो हट्टच पण मला नाटकं सांग की माझी. कधीतरी केली असतील.
आई - अम्म्म! आठवत नाही रे आता मला.
मी - श्या! एक नाटक नाही माझं?
आई - आठवलं बघ!
मी - काय ते..?
आई - पावसाळ्यासाठी नवी रेनकोट आणली होती. तुला न सांगता दप्तरात भरली मी. सकाळी दप्तर पाठीवर घेतलंस तेव्हा तुला जाणवलं आपलं दप्तर फुगलंय. उघडून पाहिलेस आणि दप्तरच रिकामं केलंस.
मी - मग?
आई - रेनकोट काढलास आणि घातलास बाहेर पाऊस नसतांनाही. कौतुक तुला रेनकोटच.
मी - नंतर काय केलं?
आई - काय करणारेस? रेनकोट घालूनच शाळेत बसलास.
मी - काय..?
आई - नाहीतर काय? दुपारी शाळा सुटल्यावर आपण नवा रेनकोट दोन तुकड्यात सांभाळून बाबांसह घरी परत आलात. मान खाली घालून. बोलतोस कसा. कोट फाट.
मी - काहीतरीच काय?
आई - धड बोलताही यायचं नाही. पण उद्योग एक से बढकर एक होते आपले.
मी - ही उद्योग म्हणजे नाटकं का..?
आई - हो. या उद्योगांनाच नाटकं म्हणतात. पण तू का हे विचारलेस आज?
मी - काही नाही स्पर्धेसाठी लिहीत असलेलं नाटक परत एका प्रवेशात अंधारात गेलं. म्हणून तुला फोन केला. संभ्रमात होतो ना मी की, नक्की नाटकं हीच असतात का म्हणून. तू पुष्टी दिलीस. झालं माझं.
मी - तुझं काही खरं नाही. जमत असेल तर बघ. अन्यथा काही गोष्टी राहू दिलेल्याच बऱ्या असतात.
मी - ठीक आहे. बाकीच संध्याकाळी बोलतो. ठेवतो गं आता.
आई - हम्म, ठीक आहे. (फोन ठेवता-ठेवता काही खरं नाही कारट्याचं!)
मी - कुठून फोन केला..?
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Wednesday, May 2, 2018

जिन्दगी..! :-)


जिन्दगी_

उधर उनकी जुल्फे बिखर गयी,
इधर हमारी हालत बिखर गयी..
उन्हे गुरुर हो गया हमें अफसोस,
युं नजरों सें नजरें जब मिल गयी..
कुछ देर कर देते तो बात और थी
ये जल्दबाजी रिश्तों में बिखर गयी..
ना उन्हे इल्म था, ना हमें। वो मूडकर
चल दिए और जिन्दगी आगे बढ गयी..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Wednesday, April 18, 2018

बसेरा-ठिकाणा..! :-)



♥ क्षण..! ♥

बसेरा-ठिकाणा..!


ना जाने कितनी हसरते हैं उनकी,

एकदा बघितलं अन् बघतच राहिलो,
तुझी तू, माझा मी शोधतच राहिलो..

कभी शिकवा की तो कभी नफरत की,

म्हटलं आता सगळंच सये ठीक होईल,
तू ही येऊन जाशील अन् मी पूर्ण होईल..

हद तो तब हुई जब यें रिश्ता तय हुआ,

आपल्या तेव्हा एवढंच तर लक्षात आलं,
तू-मी सोडून सगळंच विरोधी पक्षात गेलं..

अब और क्या? इतनाही बहोत काफी हैं,

मी अगदी सहज दोन कप कॉफी मागवली,
तू मात्र सये उठून माफी मागून चालली गेली..

फितरत बदली शहर तक मैंने बदल दिया,

चारही दिशा माझ्या केल्यास तू मोकळ्या,
ओंजळीत आता फक्त सुकलेल्या पाकळ्या..

फिर एकबार मुलाकात हुई और होती रहीं,

पाऊस होऊन मी थेंब-थेंब बरसत राहिलो,
ओंजळ झुगारुन इतःस्त: तरसत राहिलो..

जो हुआ भूल जाओ, फिर अजनबी बन जाओ,

तुला मग आठवत राहिलो पानं पलटत राहिलो,
कधी उशात कधी मनात उगाच दाटत राहिली..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Friday, April 13, 2018

जय भीम..! :-)

:-)
जय भीम..!

नेहमी मला वेगळ ठेवलं
जागो जागी कमी लेखलं,
शुद्र म्हणूनच दुर केलेलं
अभद्र म्हणत हिनवलेलं..

माणूस म्हणून विचारलं
तर तुच्छच जात म्हणालं,
ढुंगन धुवायलाच लावलं
स्मशाना जवळ घर केलं..

पाण्यासाठीच तरसवलं
विहिरीवरच नागड केलं,
मागासलो तर का चुकलं
कुत्र त्यांच दारात बांधलं..

घर त्यांच रोजच सावरलं
आज उभ जाळून टाकलं,
चौकटीत शिळंपात खाल्ल
अन् म्हणे ते दिवटं माजलं..

हाणून पाडली त्यांची प्रथा
मुस्काट शेकते माझी कथा,
पुजत नाही कधी दगडाला
माणुसकीतच माझी आस्था..

शोषू नकोस या समाजाला
पोसू नकोस त्या रे शंढाला,
ठेचूनच काढा रे या विंचूला
जे धर्म म्हणे पुजला पाचवीला..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

"महामानवास विनम्र अभिवादन..!"
..भीमराज का बेटा मैं जय भीम वालां हुं..!

Sunday, April 8, 2018

विरक्ती..! :-)



♥ क्षण..! ♥

विरक्ती..!

पायरीपासून गाभाऱ्यापर्यंत लागलेली धाप..हापापले होऊन प्रसादासाठी ओंजळ पुढे करताच लागलेली ठेच..शेंदूर फासून खुशाल कितीतरी अभंगांचा स्वामी बनलेला तो..पोरका, उपरा करुन गेल्यावर मागणं घ्यायला झोळीत पडतं काय?.. प्रथा, कृती कितीतरी आकृतींच सृजन करुन वंचित राहिलेलं..क्रोधाची गर्भधारणा होऊनही व्यक्ततेच्या प्रसूतीनंतर निपजले दूषणं..अनावृत्त करावं म्हटलं तेव्हा पद्धत चुकली..प्रसारित करावं म्हटलं तेव्हा बांधणी खचली..पटलांवरचे वलय आवर्तन समजून ओढले तेव्हा..ते ही तर मुखवटेच!..भक्त मग कुणाचा आणि देवही कुणाचा?..वाटणी करुन झाल्यावर हवं ते न मिळाल्याची आर्तता आतल्याआत..प्रसन्नता मग कोणत्या मातीने घडवावी?..दाहकतेच्या उंबरठ्यावर अतृप्त आत्मा तो ही आहे आणि हा ही आहे!..तहानलेला, कोरडा पडत आलेला कंठ तरीही खर्जात सुमने गात येतो..श्रवण करणे त्या क्षणी कानांना सुचते कुठे?..तल्लीनतेच्या भावबंधावर प्रबोधन रचिते कुठल्याही प्रांताचे नसतात..तेव्हा ही विरक्ती शाबूत राहून पत्करावी..कारण यहींच सच हैं बाकी सब मोह माया हैं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Saturday, April 7, 2018

कंचणी..! :-)




♥ क्षण..! ♥

कंचणी..!

ए हाड हाssssड
थोडीही नाही चाड,
ढळला पदर अन्
जमली कुत्री भ्याड..
काही अंगलट येऊन
देह ओरबाडून गेले,
खुडून कोवळी कळी
फूल निष्प्राण झाले..
त्राण एकवटून कंठात
दबली वाघिणीची दहाड,
लांडग्यांची पैदास अन्
अवसेची एकादस आड..
दोष काय होता सांगा
आक्रोश आज अंगणी,
गळ्या भोवती भोवली
स्वतःच्या वेणीची कंचणी..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Thursday, April 5, 2018

आतलं..! :-)



♥ क्षण..! ♥

आतलं..!

एकदा मग असं झालं
मनातलं मनात राहिलं,
वाटलं वाचू लिहिलेलं..पण
पानातलं पानात राहिलं..

मागे पुढे पाऊल पडलं
दूरवर चालणं होत गेलं,
काही अंतरावर भेटलो..पण
पुढचं पान पलटत गेलं..

सहज मग गोष्टीतून कळलं
चारचौघात मी बोलून पाहिलं,
गोष्टच होती गोष्टच ठेवली..पण
शब्दांत श्वासांना कोंडलं गेलं..

जमवत गेलो जमतही गेलं
दारामागून दार बंदही झालं,
गोष्टच होतो सांगत मी..पण
गोष्टीतून मलाच वजा केलं गेलं..

तेव्हा तिथेच मग माझं ठरलं
मांडू क्षणभंगुर क्षणी क्षणातलं,
बरंच काही आतल्याआतलं..अन्
सर्वकाही थोडं यातलं थोडं त्यातलं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

का कळे ना..! :-)




का कळेना
असे का व्हावे
तू सतत बोलावे
मी मुकाट ऐकावे

का कळेना
असे का व्हावे
थांबलेल्या क्षणाने
आठवांना उजळावे

का कळेना
असे का व्हावे
हृदयातली स्पंदने
पुन्हा नव्याने स्मरावे

का कळेना
असे का व्हावे
का कळेना
असे का व्हावे....!
- मृदुंग®

Friday, March 30, 2018

ऋतू.. बहरता बहरलेला..! (कथा भाग-४)




♥ क्षण..! ♥

ऋतू..
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-४)

..आपल्यासारखे वेड आणखी कुणाला तरी आहे. मग ते नाटक करण्याचे असो, नृत्य करण्याचे किंवा स्वतःचे वेगळेपण जपण्याचे. एकाच मताच्या दोन माणसाचं सूत कधी जुळत नाही. एकमेकांना पूरक असण्यासाठी विरुद्ध दिशेची दोन टोक एकत्र यावी लागतात. सर्वगुणसंपन्नतेची अशी नैतिकता आहे.

..सतत ना शोध चालू असतो आपला. काही तरी हवं असतं. अर्थात काय शोधत असतो आणि काय हवं असतं याचं उत्तर स्वतःकडे नसतं. पावलाखाली आलेल्या अनाहूत पाऊलवाटेच अहोभाग्य म्हणत ज्याचा-त्याचा प्रवास सुरु राहतो. काही मैल चालून होतं. काही वर्षांची कॅलेंडर बदलून होतात. प्रवास काही रंगतदार होत नसतो. झालेला प्रवास मात्र ओझं राहून गेल्यासारखा रुतत राहतो.

..आणि मग.. नियोजित नित्यक्रमाला फाटा देणारा एक दिवस उगवतो. मनातल्या बंद खोलीत धूळ साचलेलं एक नाव जे "तुझं" असतं ते स्पंदनात नकळत धडधडत. तेव्हा शरीराने थंड पडायचा निर्णय स्वतःच घेतला असतो. डोळे भूतकाळात आणि वर्तमानात काय बदल झालाय याचा शोध घेत राहतात. बदलणं निसर्गाचा नियम असूनही तू कधीच बदलू नये. अशी इच्छा मनातल्यामनात मी तरी "श्रे" तुझ्या बाबतीत करत असतो.

..बोलण्यात तू पटाईत आहेस. आज जवळपास आठ वर्षांनी मला असं पाहून तसंच खिळून बघण्याची सवय काही तुझी गेली नाही. तू ही काय करशील म्हणा या सौंदर्याचं हे खिळून राहणेही दाद देणेच आहे. अन्यथा काजळाच तीट लाऊनही दृष्ट लागायची ती आपल्याच माणसाची लागते. तू वाटतोस त्यापेक्षा जरा जास्तच रसिक आहेस "धृ." तुझ्या या रसिकतेची मिळणारी ही दाद जागेवर खिळून पेलवण माझ्यासाठी अवघड आहे.

..आठ वर्षांनी समोर आलेलं खरं की खोटं? तसही या आठ वर्षात फक्त एकदा डोळे भरुन बघायचं यासाठी कितीतरी दगडांना नवस लावले. आज ते फळफळले तर आतून ओसंडत न जाता स्वतःला अन् मनाला आवरण का आणि कशासाठी होतं? मागितलं होतं ते झालं. आता पुढे काय? की आज इथे शेवट? नजरेत दाटून आलेले प्रेमाचे भाव बदलून नजरेचा एक भ्रम एवढंच शाश्वत ठरतं. पाठ दाखवून चालावं लागणारच आहे तसही.

..आयुष्य या पुलावरुन आणि पुलाखालूनही एवढं पाणी वाहत गेलंय की त्याच्या प्रवाहात मनासारखपेक्षा प्रॅक्टिकल जगणं खूप झालंय. याची सवय एवढी दांडगी झाली की समोर आलेलं पाहूनही ते पाहून न पाहिल्यासारखे करणे अवघड गेलेच नाही. वास्तवात सांगायचं झालंच तर पुन्हा ती प्रश्न तो मनाचा गुंता नकोच.

.."श्रे" सुद्धा वेगळं असं काही वागत नाही. तिनेही पाठमोरी होऊन स्वतःच मन आवरलं असतं. मनात भडकलेल्या आगीत पाणी स्वतःच स्वतःला टाकावं लागतं. ते कसं तेवढं नाटकीय आणि प्रासंगिक असतं. समजदार वागण्याची पडलेली सवय मूर्खासारखं कुठे वागू देत नाही. मग एकमेकांपेक्षा स्वतःच स्वतःची जिरवावी लागते. पण एकदा भेटून सगळं सांगायचं होतं त्याचं काय? म्हणून पडतं घेतलं जातं. वळून बघावं तर "धृ" चालता झालेला असतो. टांगणीला मात्र जीव तेवढा उरलेला असतो.
..प्रेमाचं प्रॉडक्ट् नसतं म्हणून अन्यथा मार्केटिंग स्ट्रॅटेजी काहीशी वेगळी करून गोष्टी आपल्या माथ्यातून समोरच्याच्या माथी मारता आल्या असत्या. पण नाही ना होत नेहमी आपल्या मनासारखं. हे माहीत असून आपण स्वतःला का पटवून देत नाही? की स्वतःच स्वतःला आरसा दाखवू नये म्हणून असं? पण दररोज सकाळी आरसा आपण बघतोच तेव्हा हे असलं काही वाटतं नाही. पण आपलं कोणीतरी तुटक वागून आरसा दाखवला की मग तळपायाची आग मस्तकात.

..एकदा जवळ येऊन विचारायला हवं होतं का आपण? काय 'श्रे' कशीयेस? छे.. छे.. त्या मांजरीचे नखं मला ठाऊक आहेत आणि खमंग बोलणे तर आई..आई.. उभा फाडून खाऊनही ढेकर त्या बयेने काही दिली नसती. आज थोडी ओळखतो. चांगल्याने ओळखतो. आता जिथं जाईल तिथं आमनासामना निश्चित आहे. माझ्या पाठ दाखवून निघून जाण्याने घायाळ वाघीण झाली असणार आहे. हे सावज आता एवढ्या सहजासहजी तोंडाशी नाही येणार म्हणावं. आठ वर्षांच्या तपश्चर्येची उपासमार आहे. क्षुधा अशी सहजरित्या शमणार नाही. बोलावं तर लागेल हे लिखित आहे. कसं आणि कुठे ते अधोरेखित अजून व्हायचं बाकी आहे. तोवर जळ तिकडे आतल्याआत. अबोलीची धुंद वेडी भाषा एवढ्यात पुन्हा शिकावी लागणार आहे. जरा जपून..
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

Friday, March 23, 2018

आयुष्यावर..! :-) मराठी सुफी ८



♥ क्षण..! ♥

आयुष्यावर..!

..समज आली तेव्हा गोष्टीला सुरुवात झाली... काही वादळे स्वप्ने बेचिराख करुन गेली... सावरत? आवरत आलो स्वतःलाच स्वतःपासून... कधी तू निमित्त झाली तर कधी कारण विनाकारण... बोलणं मग माझं तारण झालं... सजलेलं गाव राख झालं... अंगणातला गुलमोहर उभ्याने वठवला मी... तुझ्या आवडीचा परिजातकही जाळला मी... सुगंधाचा गंध दर्प करुन टाकला... पुसता आलं ते पुसलं... जे हाती आलं ते उधळलं... उरलं मग निव्वळ शरीर... असतील-नसतील तेवढ्या यातनेत मनाला बांधलं... आजवर मग तू किंवा मी काय साधलं..?

आयुष्यावर काही बोलतांना
माझी दातखिळी घट्ट बसली,
सांभाळून बोलता-बोलता मी
जीभ सहजच छाटून टाकली..

नको पुन्हा त्या आणाभाका
नकोच स्वप्नांचीही आश्वासने,
असेल नसेल सर्व ओवाळून
खुशाल वैरागी होऊन जगणे..

काही मागणं नाही घेणं नाही
स्वतःला लुटणं लुटावण नाही,
आर्जवे ना कसली ना अभंग
बंद श्वासांचेही उसासण नाही..

वेदना माझं कर्मही अन् धर्मही
टाहो कसलाही फुटलाच नाही,
वलयांच्या गर्ततेत शोध एकदा
आर्त मी मलाही वाटलाच नाही..

..क्षण कुठल्या क्षणावर बोलू?.. आयुष्यात पुढे येणाऱ्या?.. हातून निसटलेल्या?.. की सहज आयुष्यातून वेगळं केलेल्या?.. शतकी आयुष्यही क्षणभंगुरच असतं... बेरकी वेळ प्रत्येकक्षणी स्वतःचा पदर ढाळत जाते... स्वतःचे डोळे मिटले तरीही जाणिवांत सगळं आढळत जाते... उणीव मग कसलीच राहत नाही... प्रवासाची चिंता उरत नाही... चितेवर निजून मन मरत नाही... लाचार आयुष्य सरता-सरत नाही... योजणं मग कसली कशासाठी करावीत?.. फसव्या नाट्यप्रयोगाचे प्रयोजणं काय मांडावीत?.. करमणूक म्हणून जगण्याचं नाटक प्रत्येकाला करावं लागतं... भूमिका कोणती? ज्याचं त्यानंच ठरवावं लागतं...

बेरकी लुटारू आयुष्याची वृत्ती होती
थोडी याची अन् त्याची आववृत्ती होती,

मी समजत होतो साधं सरळ सोप्पच
कपटी नीच माणसाची प्रववृत्ती होती,

वळणावर वळवलं सावरलं आयुष्याला
ढोबळ बेढब जगण्याची आकृती होती,

निश्चिल झालो प्रवाही स्थिर होऊन गेलो
वेगवान लाटांसह मी वाहनं प्रकृती होती,

माणसात येऊन माणसात मिसळलो मी
दंश झाले कित्येक सर्पांची ती कृती होती

विषारी ना बनलो माझी शाबूत स्मृती होती
स्वतःच सर्प असण्याची मला विस्मृती होती..

..इच्छा नसते पण आयुष्यावर बोलावं लागतं... झालं-गेलं मातीत मिसळावं लागतं... तरीही माती वर उकरली जाते... पुरलेलं थडगे पुन्हा नासवले जाते... कुणाचाही दोष नाही यात... नव्याने उगवायला बिजालाही मातीत रुजावे लागते... अंकुरने स्विकारुन वृक्षाची आवरणे झाकावी लागतात... कर्म म्हणून फळांची देणगी द्यावी लागते... अंती धर्म म्हणून चिंतेचे लाकुडसुद्धा व्हावेच लागते..!

स्वतःच्या आयुष्यावर काही बोलतांना
मुक्या वेदनांचा आधार घ्यावा लागतो,
मनालाही सुखाचा नव्हेच तर दु:खाचा
अचुक पत्ता माहिती असावा लागतो..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

वेदनेची एक कळ..! :-)


:-)
क्षण...!

"............." (मथळ्याला नाव तुम्हीच द्या...!)

तुझे तरी बरे आहे रे, लिहून मोकळा तरी होऊन जातोस.. आमचे काय बोलायलाही नाही जमत अन् कुणाला काही सांगायचे ठरवले तर शब्दही तिथेच साथ सोडतात... काय अन् कसे काय बोलायचे समजतच नाही बघ... खरे तर मनातले व्यक्तच करता येत नाही. नकळत काय अगदी ठरवून देखील नाही... काय विचार करशील, काय समजशील नुसते विचार मनात येतात अन् मनातच राहून जातात. असे का होतेय हल्ली कळत नाही...
सांगायचे नाही असे काही नाही पण उगाच तुला का म्हणून सांगावे माहित नाही.. तुला तसही काही वाटत नाही म्हणुन असेल कदाचीत, जे मी तुझ्याजवळच सहज व्यक्त होते. अगदी माझे मनही मोकळे होऊन जाते.. तुझं नंतर काय झाले? तुला काय वाटले? साधा विचार तेव्हा काय कधीच कुणाला पडत नाही. असे कसे रे तुझ्या बाबतीत होते... काय करतोस काय आमच्या या बोलण्याचे...?
अगदी सुरुवातीपासून विचार करायचा म्हंटले ना तर एक विचार हमखास आधी येतो. तो हा की "आज काही तरी बिनसले आहे तुला काहीतरी अगदी मोकळेपणाने सांगायचे आहे" हे तुला कसे रे कळते? अगदी वेळ काही ठरलेली नसते. म्हणतोस तरी ऐकून घ्यायला तू सवडही लगेच कशी रे काढून घेतोस? तुझा वेळ खराब करतोय की काय अजिबाद जाणवू देत नाहीस. असा कसा रे तू आता विचारत आहे, बोलत आहे तरी घुम्यासारखा फक्त ऐकत आहेस... तुला नाही वाटत का असे कधी? की आम्ही उगाच तुझ्याशी बोलतो, तुला काही सांगतो, तुला काही विचारतो ? नक्कीच काहीतरी वाटत असेल ना तुला? मग कधी तू तुझ मन का मोकळ करत नाहीस? कसे जमते तुला सगळे मनातच ठेवायला? गुदमरत नाहीस का? इतके बोलूनही तू एवढा शांत कसा राहू शकतोस सांग की...!
काय सांगू आता...?
प्रश्नही तुमचेच आणि उत्तरेही तुमचेच.. बस प्रश्नानंतर उत्तर देण्यात जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर माझ्या शांत असण्यात आहे..! वाटलेच तर भरभरून बोलून मोकळा होऊन जाईल पण नंतर काय? आपल्यामध्ये काही बाकी अन् शिल्लक ठेवले नाही तर जगण्याची मजा काय असणार आहे? अधूरीच ठेवतो मी प्रत्येक गोष्ट. का ते यासाठीच कारण पुढे काहीही नसते. बस आपले मन पुढे काही असेल, आहे याची वाट पाहत तरी राहते. खोटी आशा बाळगून... माझंही असेच आहे. काही बाकी अन् शिल्लक ठेवायचे व्यक्त न करता. मग कोणी काहीही विचार करो, जे समजायचे ते समजो... मनात मात्र काहीच नसते व्यक्त करायला. मग शांतता जिव घेणी होत आली का बदलायचा विषय आणि आशय! नकळत मग पुन्हा सुरूवात करायची स्वत:च्या प्रत्येक प्रश्नाची स्वत:च्याच उत्तरा सोबत..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Wednesday, March 21, 2018

फेसबुक लव्हलेटर..! :-)


♥ क्षण..! ♥

फेसबुक लव्हलेटर..!

फेस बुक स्टेटस सारखे
कधी मलाही तू लाईक कर,
फ्रेंड रिक्वेस्ट सारखे तू
कधी माझे प्रेम एक्सेप्ट कर..

माझ्या ऑनलाईन येण्याची
वाट बघत तुझी नजर भिर-भिरते,
"क" पासून सुरु होणाऱ्या प्रश्नांचा तू
चॅट नावाच्या ऑप्शनमध्ये ढीग लावते..

प्रत्यक्षात बोलत नाही तेवढे
कि-बोर्डवर खट-पटत असतात,
चेहरे वाचणे हरवले आहे आता
शब्दांमागच्या भावना दिसतात..

कोण कुठले काहीच घेण-देण नाही
तुझे माझे वॉल टू वॉल अपडेट,
तुझ्याशी बोलून छान वाटलं मला
रोजच स्क्रीनवर फेस टू फेस भेट..
------------------------ ✍️ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Tuesday, March 20, 2018

शेजारी..! :-)



♥ क्षण..! ♥

शेजारी..!

तुला बघितलं न बघतच राहिलो
माझा मी तर कणभरही ना उरलो..

देखणं सौंदर्य तुझं भाळी चंद्रकोर
ओठांवरच्या लालीत आर्जवे हरलो..

छटा यौवणाच्या कितीतरी देहावर
रेष-अन्-रेष बोटांनी स्पर्शत गेलो..

कंपने कितीतरी झाली स्पंदनांची
गतिमान हृदयाशीच एकदम भिडलो..

ओठांच्या आव्हानात्मक हुंकारांना
गालांच्या प्रदेशावरून ओघळत आलो..

देहाचा मादक गंध जणू कस्तुरीच
ठराव शय्येचा व्यवहारी बनवत गेलो..

बोटांची गुंफण अन् मिठीचे विळोखे
ओरखडे रातींच्या रतीवर ठेवत गेलो..

धुंद बेधुंद होत गेली कितीतरी रात्र
तुझ्या रोमारोमात मी ठसकत राहिलो..

चेहरे संतुष्ट न् तप्त देह तृप्त झाले
विलग ओठांसह मिठी सोडवता झालो..

विसरभोळे अंदाज कायम ठेवून मी ही
हातभर अंतरावरचा शेजारी बनता झालो..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Sunday, March 18, 2018

गुढीपाडवा..! :-)



♥ क्षण..! ♥

गुढीपाडवा..!

ग्रंथांचा आधार घेता पुराणात पाडव्याबद्दल ब-याच कथा प्रचलित आहेत. यात सर्वश्रुत असलेली कथा अशी की, चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू राम-लक्ष्मण सितेसह अयोध्येला परतले होते. रावणाचा वध करुन शांतीचा आणि एकोप्याचा धर्म पुन्हा प्रस्थापित झाला होता. चौदा वर्षानंतर प्रजेला पूजनीय असलेल्या त्यांच्या राजाच्या स्वागत प्रित्यर्थ संपूर्ण नगरात प्रत्येक घरी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. त्या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरु होते ते राम नवमीला संपते अशी प्रथा आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान उरकून गुढी उभारली जाते. गुढी अर्थात एका शुचिर्भूत काठीला नवं कोरं कापड किंवा नवी साडी बांधली जाते. त्यावर साखरेची किंवा गोड गाठीची माळ, कडूनिंबाची पाने बांधली जातात आणि वरून कलश पालथा घातला जातो. हळदी-कुंकवाच्या साक्षीने चाफ्याची माळ चढवली जाते. अशी गुढी घरातल्या अंगणात पाटावर उभी केली जाते. गुढीला 'ब्रम्हध्वज' असेही म्हणतात कारण ब्रम्ह सृजनाचे प्रतिक आहे. सूर्याची किरणे गुढीच्या स्पर्शाने घरात पडली जावीत आणि त्यायोगे आनंद अन् नवचैतन्याने आगमन आपल्या घरात-मनात व्हावे असा यामागे हेतू असतो. आणि म्हणूनच मराठी मनामध्ये ह्या सणासाठी एक ममत्वाची आणि अस्मितेची भावना खूप आधीपासून रुजत आली आहे.

विधिवत पूजा झाल्यावर कडूनिंबाच्या पानांचा प्रसाद दिला जातो. आयुर्वेदात कडूनिंबाच्या पानांना विशेष महत्व आहे. पुढे उन वाढत जाऊन उष्माघातात वात, पित्त, कफ यांच्यात संतुलन ठेवण्याचा पूर्वजांच्या ह्या पुरोगामी बुद्धीचा कल आपल्या लक्षात येतो. नवीन वर्षाचं स्वागत हर्ष-उल्हासाने व्हावे, साखरेच्या माळेसारखा गोडवा घरात असावा असा उद्देश माळेचा असतो. सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी गुढीला गुळ-खोबर्‍याचा नैवैद्य दाखवून नारळ फोडून गुढी उतरवली जाते. साखरेची माळ लहान-मोठ्यांना प्रसाद म्हणून दिली जाते.

या सोबत गुढी पाडव्याला मराठी अस्मितेचीही जोड आहे. गुढीपाडव्याचा सर्वात जुना उल्लेख हा शालिवाहन म्हणजेच सातवाहन याच्या काळातील. याने परकीय शकांचा पाडाव केला आणि जनतेचे राज्य स्थापन केले. याच दिवशी त्याने आपल्या राज्याचा नवीन शक चालू केला जो आजतागायत चालू आहे आणि शिवकाळातही याच शकाच्या आधाराने सर्व नोंदी केलेल्या आढळतात. सातवाहनाची राजधानी होती 'प्रतिष्ठाण' म्हणजे महाराष्ट्रातील 'पैठण'. तर अशा या सातवाहनाने ज्या दिवशी नवीन शक चालू केला तो दिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातही गुढीपाडवा या नावाने साजरा केला जातो. म्हणजेच या सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. सातवाहन हा एका कुंभाराचा मुलगा होता. जे कार्य छत्रपती शिवरायांनी परकीय मोगलांना हरवून केले तेच कार्य सातवाहनाने पहिल्या शतकात करून महाराष्ट्रातील सर्वात पहिले साम्राज्य स्थापन केले. याच दिवशी सातवाहनाने परकीय शकांना धूळ चारली आणि महाराष्ट्र भूमी स्वतंत्र केली.

हुतात्म्यांचे पुण्य स्मरण करुन आजही आपण नवी उमेद डोळ्यापूढे ठेवून आगेकूच करत आहोत. यात सणाची पार्श्वभूमी जाणून घेणं अन् ते पचवणं थोड कठीण होऊन जातं तरीही नावीन्याची मुहूर्तमेढ प्रकर्षणाने मागचाच आधार घेऊन रोवली जाते हे विसरून चालणार नाही. कधीकधी भूतकाळ जरी कटू वाटत असला तरी आज आपण सर्वार्थाने स्वतंत्र असून महाराष्ट्राला प्रगतीपथावर बघत आहोत हे विसरून चालणार नाही. अर्थात घडून गेलेल्या गोष्टी निश्चित बदलणार नाहीत पण जर काही बदलू शकेन तर तो 'आज' आहे. त्यामुळे हा आपला अखंड सांस्कृतिक वारसा आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करायचा आहे. आणि सोबतच मनात मांगल्य जपताना स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा दानवी वृत्तींचा नायनाट करून उज्वल आणि पवित्र महाराष्ट्र घडवायचा आहे.

एक मुलगी शिकली तर एक घर शिकते. आपल्याला आपल्या विचारांना अजुन परिपक्व आणि बळकट करावे लागणार आहे. जळगावच्या बहिणाबाई ते वर्धा जिल्ह्यातिल गाव पिंपरी मध्ये जन्मलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या कर्तृत्वाच्या पणत्यांना प्रत्येक घरात उजेडासाठी झटावे लागणार आहे. जिद्द कधीच संपत नसते आणि हरतही नसते. सणासुदिच्या दिवसांचे महत्व असेच असते. पुन्हा एक नवी उमेद अन् नविन ध्येय उराशी बाळगून महाराष्ट्राचा पुढचा ढाचा अजुनच-अजुन सुदृढ तसेच कार्यसक्षम बनवावे लागणार आहे. अर्थात फ़क्त विचार मांडून अथवा त्यांना फ़क्त सांगून काही बदल त्वरित दिसुन येणार नाहीत. विचारांवर ठाम राहून आपण आपलंच घर आधी सुधरवायला सुरुवात करायला हवी आहे. आपल्या एका घरापासुन सुरु झालेली सुधारणा अजुन दोन घरात पोहोचत जाते. कासव गतीने का असे ना पण सुरुवात करायलाच हवी आहे.

सध्याच्या घडामोडी पाहाता फक्त वादच उरले आहेत. घरघुती वादापासुन, समाजवादा पर्यंत. या सोबतच राजकिय वादही हल्ली चर्चेत आहेत. निवडणुका जवळ आल्यावर बर्‍याच गोष्टींना तोंड फुटत असते. या वादात न पडता महाराष्ट्र घडवायला कसा हातभार लावता येईल इकडे लक्ष दिले पाहिजे. तरुण पिढीचा कल पाहाता 'स्त्री' मनाचा उलगडा फारसा झालाच नाहीये. चुल-मुल याच्यापुढेही 'स्त्री'ची कर्तबगारी वखाणन्यासारखी आहे. अत्याचाराविरोधात न्याय मागण्याचाही तिला पुरेपुर हक्कही आहे. दरवेळी 'स्त्री'कडे उपोभोगाच्या अन् सहानुभुतीच्या नजरेने न बघता त्यांना स्वरक्षणासाठी प्रेरीत करुन 'स्व' रक्षणाचे मार्ग उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. चांगल्या प्रववृत्तीची वाईट प्रववृत्तीवर झालेला विजय दिवस अन् झालं-गेलं विसरुन घरात नव्याने रचलेला आयुष्याचा खेळ हसत खेळत, मतभेद गळून एकमताने आनंदाने साजरे करण्यात सुखाचा खरा अर्थ आहे.

आनंद घ्यावा अन् आनंद द्यावा,
आनंदात व्यवहार कधी नसावा..!

- पियुष प्रकाश खांडेकर (✍ मृदुंग®)
kshanatch@gmail.com
khandekar.piyush@gmail.com
7387922843


Saturday, March 17, 2018

बोथट..! :-)




♥ क्षण..! ♥

बोथट..!

आपलं नेमकं काय बिनसलं
शक्य होतं तेवढं सारं सावरलं..

तुझं तू पण मी शाबूत ठेवून
माझं मीपण मात्र मी झुगारलं..

सांभाळून सांभाळायचं किती
शहाणं होणंच वेंधळेपण झालं..

तुझी पावलं पुढे गेली अंतरभर
चौकटीचे नियम मी ही आखल..

जाणिव झाली तुला माझी तेव्हा
मी तुझं सगळं अस्तित्व उधळलं..

हवा तेवढा वेळ दिला अन् संधीही
तरीही तू तुला जे हवं तेच तर केलं..

आता पुन्हा कसला प्रश्न अन् उत्तर
तू भूतकाळ होती एवढीच शक्कल..

एकदा दोनदा मागायलाही आलीस
सगळंच ओवाळून तुला चालतं केलं..

आता कसलं नातं अन् नात्यांची वीण
आपलं नातं सडलंय हे सत्य स्वीकारलं..

पुन्हा गाठ नको अन् गुंतागुंतही नको
तुटलं-तोडून टाकलं हे चांगलंच झालं..

ना कसली खंत आणि कसलीच पर्वा
तू मागितलं मी दिलं अन् सगळं संपलं..

तुझा निर्णय न् त्यानंतर माझा निर्णय
या विषयात मग आणखी काय उरलं..?
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Wednesday, March 14, 2018

मी - मृदुंग..! :-)





♥ क्षण..! ♥

मी - मृदुंग..!

निंदा प्रिय अन् स्वतःचा निंदकही मी
स्तुतीच्या बोलक्या शब्दांवर भाळणाऱ्या
उथळ प्रेयसीचा सदैव कट्टर वैरीही मी..

आभूषणे माझी असतात मग दूषणेही
मला मग खवचटपणे ते वादळही बोलतात
अन् वास्तवात पसरलेलं रुक्ष काजळही..

असण्यापेक्षा नसून माझा समाचार
प्रत्येक घटनेचा अति वैचारिक अंदाज
काही बांधण्यापेक्षा मोकळाच संसार..

स्पर्धा असते कायम माझी माझ्याशीच
जग स्वतःला फरफटत ओढत आणत
दखल घेत बेदखल करणं ख्याती अशीच..

मोकळं स्पष्ट वागणं माझं कधीच नसतं
'स्व'जाणीव होईपर्यंत गप्प बसणं इष्टचं
जाणवल्यावर स्पष्टीकरण कारण असतं..

मी अहं वाटतो अन् कर्तृत्वही भासतो
नामनिराळं अलिप्त वेगळाही मी उरतो
नव्याने क्षणभर जगून अनेकवेळा मरतो..

आयुष्याचे सोडून मरणाचे माझे गुणगान
वेदनेला पुढ्यात ढकलून आर्ततेत स्थान
निव्वळ वलय आभासी तेवढंच समाधान..

मी असतो नसण्यातही अन् असण्यातही
स्वार्थी-अभिमानी-उत्कट अन् उद्धटसुद्धा
तटस्थ कागदाच्या शब्दरूपी परिस्थितीतही..

कधी-कधी माझं सहज आकलन करता येतं
या आकलन शून्यतेतही अजाण उरावं लागतं
गुणधर्मी किंवा अति समंजस जगत् भगत्..

कमवायला गमावल्याचा चोख हिशेब असतो
अर्थ-भावार्थ अन् अर्ध्यसुद्धा वाहत नेत जातो
क्षुधा शमवत माझीच उपासमार करत राहतो..

अर्थात अनेक अनर्थ कुटून ठेवत भावशून्यच
माणसे ओळखून पारखून कायम अंतरराखून
दुखावलपेक्षा दुखावलं न् दुखलं न्यायसंगतच..

संबोधायला हे एकच असे माझे नाव नाही
ओळखायला डोक्यात जायला वावही नाही
समजलं तर खूप काही अन्यथा काहीही नाही..

बाजारबसव्यात हा शब्द तेवढा महाग आहे
क्षणाच्या व्यवहारात परवडला-खपवला आहे
विझल्या राखेतली आग एवढा महाभाग आहे..

केल्याची पर्वा नाही अन् जाणसुद्धा नाही
वाटेतील अनाहूत वाटसरू साधी गिणती
तुमच्यासाठी मी माझ्यासाठी तुमची-तुम्ही..

मी ओळखुन फक्त शब्दांचीच रग आहे
तेवढ्यावरच प्रत्येकाची माझीही धग आहे
थोडं आतापूरता बाकी सगळं काही मग आहे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Tuesday, March 13, 2018

तह..! :-)


♥ क्षण..! ♥

तह..!

श्वासांच्या रणाचा व्यर्थ
एक प्रण माझाही होता,
तुला जिंकवता-जिंकवता
देह एक व्रण झाला होता..

देहावर डागण्या देऊन
कितीतरी सण उधळले,
बिशाद सर्पांच्या दंशावर
संमोहित माझे मन झाले..

काळानीळा देह सजवून
हे अश्रू जरासे गौण झाले,
कायेची अबोल बोलकी
मुखात उसासे मौन झाले..

फुंकला शंख परत-परत
हे षंढ देह गपगार झाले,
देहांचे अन् श्वासांचे तह
शब्दांसह एवढेच उरले..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Friday, March 2, 2018

लायकीत : भाकित..! :-)




♥ क्षण..! ♥

लायकीत : भाकित..!

हाती प्याला सोमरसाचा
ओठी उद्याचं भाकित आहे..
नशा मदिरेत नव्हे सख्या
तर कोवळ्या साकीत आहे..

तू खयालांचे पुलाव शिजव
मी स्वरांचे बैल हाकीत आहे..
थेरं असतात हे लांडग्यांचे
वणवा चौकी-चौकीत आहे..

लावण्य स्वाभिमानी असतं
अंग-प्रत्यांग झाकीत आहे..
प्रमुख लाजिरवाणे सौंदर्य
सायंकाळी बैठकीत आहे..

भुलथापांची चंगळ करु या
रिते प्यालेही मालकीत आहे..
हा असेल, तो असेल नशेत
मी तेवढाच लायकीत आहे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३