Powered By Blogger

Wednesday, May 30, 2018

मैफलीतली एक गोष्ट.. :-)




♥ क्षण..! ♥

मैफलीतली एक गोष्ट..

चोरट्या नजरेने न्याहाळणे
बघता क्षणी टाळूनही जाणे..
थोडं अधीर होऊन उगाचच
बावरल्यासारखे वागून घेणे..
नजरेतलं काही कृतीत नसतं
स्पर्श होताच ओठांचे थांबणे..
प्रसंग भानावर कुठे आणतो
अवधान लाभून गुंतवून देणे..
एवढंच जमतंय मैफलीला
परिचय रेषांवर भान ठेवणे..
थोडी हुलकावणी देऊन बघ
आठवून मिठीतले चुरगाळणे..
कदाचित, असेल काही बाकी
नजरेचे नजरेला काही देणे/घेणे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Monday, May 28, 2018

सूर..! :-)


♥ क्षण..! ♥

सूर..!

मग एखादा सूर बेसूर लागतो
म्हणून दोष पूर्ण धूनेचा नसतो..
काही वेदना दडपून ओठांनी
हसण्यावर गोष्टी बनवत जातो..
सगळंच कळत असं नसतंच
म्हणून मग वाळीत ठेवून देतो..
गाणेच आवाज घेऊन जातात
कंठात आर्त स्वर राहून जातो..
पुन्हा तार छेडावी म्हटली तर
सूर तुझ्यावर अडकून पडतो..
स्वरातून सूर जाणला अपितु
सुरातून स्वर छळतो.. छेडतो..
तार घाव सुरांचे आरपार देतो
नाही गुणगुणत मी तुझे गीत
चल हे क्षण असेच राहू देतो...!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Image courtesy @in_tinas_world

Tuesday, May 22, 2018

ऋतू.. बहरता बहरलेला..! (कथा भाग-५) :-)


वाचा ब्लॉगवर
भाग-१
https://kshanatch.blogspot.in/2017/12/blog-post_21.html
किंवा फेसबुकवर
https://m.facebook.com/Kshanatch

♥ क्षण..! ♥

ऋतू..
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-५)

"..आवर्तन गळून पडते का? एखाद्या स्वप्नरंजनातल्या नाटकातून प्रेक्षक खडबडून जागा झालेला ऐकिवात तरी आहे का? नुसत्या कुजक्या कल्पना! प्रॅक्टिकल जगण्याचा पॉझिटिव्ह असण्याशी संबंध कळतो, पटतो देखील. साधी संकोचिंत मनोवृत्ती थोडीजरी आरूढ झाली तर मात्र सगळंच बिनसलं! किती निगेटिव्ह विचारसारणी वगैरे वगैरे! पुढ्यात असलेलं वास्तव जरी असले, तरी त्या वास्तवावर भूतकाळाची व्रण असणारच! सहज म्हणून एखादी ऑफर स्विकारता येते पण नातं? नातं ऑफर नसते ना कोणत्याही प्रॉफिट & लॉसची डील. नातं म्हणजे बॅलन्सशीटचे दोन स्तंभ "ती' ॲसेट & "तो" लॅबिलिटी! अकाऊंट टॅली होण्यासाठी भावनांसह शरीराचेही ट्रँझ्याक्शन व्हायलाच हवे असतात का? मग डेबिट-क्रेडिट करता-करता पर्सनल अकाउंट बॅड डेब्टस् म्हणून कधीच बुडीत निघालेलं असतं!

..व्यवहार न जमणाऱ्यांनी व्यवहार करूच नये. बाजारपेठेची जोखीम शिंगावर पेलता येत नसेल तर खुशाल बुडाऊ खाते म्हणून लौकिक मिळवून घ्यावा. पैसे कर्ज म्हणून देणारेही गप्प आणि आपले देणेही ठप्प! व्यवसाय आज ना उद्या जम बसवेल या आशेवरचे देणगीदार दिलखुलास तुमच्या व्यवसायात स्वतःचा पैसा ओतत राहतात. याच धरणीवर जर प्रेम फतकल मारुन बसले तर तुटपुंजा व्यवहार सुरू झाला. मराठी माणसाला एवढंच दिवास्वप्न स्वतःच संपूर्ण आयुष्य कंठायला पुरुन उरतं आणि ओसंडून वाहतंही. श्रेय लाटणारे जागावेगळं तुमच्याशी काही वागत नसतात. तुम्ही मात्र सगळ्यांना कोळून पियून अगदी रिचवून पूर्णतः बदलेले असता. अगदी सरड्यालाही स्वतःच्या रंग बदलण्याच्या कसबीवर तुमचे रंग पाहून लाज वाटावी इतके!..

..मनगटातली ताकद दाखवायला व्यवसाय कुस्तीचा आखाडा नसतो. गरुड झेप वगैरे मग भाकड कल्पनाच. काहीतरी करुन दाखवायला संधीसुद्धा मिळायला हवी. माणसांना स्वतःच्या बुडाखाली दाबून ठेवलेली बोटं सोडायला जमत नाही. संधी मिळता मिळत नाही. सरतेशेवटी हुकुमाचा एक तुक्का एक्का पोतडीतून बाहेर काढलाच तर महागड्या क्लबमध्ये मुरलेले रम्मिबाज तुमची मेंढी कर्जबारी करुन हलाल करतात. एका क्षणात राजाचं राज्य सगळंच गेल्यावर मग तुमच्यासारख्या जोकर जवळ "राणी" कसली टिकणार? ती केव्हाच खेळ ओळखून स्वतःला अलिप्त आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून पसार झालेली असते!..
..मग रडीचे डाव आपण खेळू लागतो. काही काळ राणीचे अपडेट्स जवळ बाळगतो. राणीही तुमच्यासारख्या जोकरचे स्वतःचे मनोरंजन म्हणून अपडेट्स ठेवत असते. सपोर्टला कुणीच नसतं! पासपोर्ट आणि ग्रीनकार्ड या जोरावर इंग्रज लूट आजही करतोय. थिंग्ज आर हॅप्पन! गोष्टी घडत राहतात. वेळ जात जाते तसे जोकरचा आदिमानव पुन्हा माणूस बनू लागतो. घडतो व स्वतःसोबत इतरांनाही घडवतो. जे जमत नव्हतं ते जमलेच नाही. जे जमतंय त्यातच परिपक्व होऊन स्वतःच वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होतं. फुटपाथवर काढलेल्या दिवसात भिकारीही शिकवून जातोच "हर कुत्ते का दिन आता हैं साब, मैं तो इन्सान हैं, आज खाली पेट के दुःख से मैं सो नहीं पा रहा हूँ, और खुशीवाली रात को कौन भला सोता हैं?

..माणसाच्या उपाशी पोटाने शिकवलेलं शहाणपण अजून कुणाला चांगल्याने शिकवता येत नसते. या उपासमारीची शिकवणीत काही नसलं तरी तुमची भूक कशाची आणि किती आहे हे मात्र कळतं! अर्थात समजून घेतलं तर. अन्यथा अधःशिपणा भोवतोच! तृप्तीची ढेकर निघता निघत नाही. अनुभवाची झालेली ॲसिडेटीचे औषध गुणकारी ठरत नाही. सुखाचे जे काही अजीर्ण व्हायचे ते होतेच यात अपवाद 'मी' ही नाही आणि 'तू' तर मुळीच नाही. कुरघोडीच राजकारण मग करावं तरी कुणावर? जे सिद्ध करुन दाखवायचं होते ते स्वतःहून सिद्ध झालेले असते. फळ मिळालेले असतांना भूक लागलेली आहे असे नसतेच! वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पाण्यातले मगर पाळून ठेवलेले आहे आणि स्वतःला व्यावसायिक शार्क मासे समजणाऱ्यांना कॅपिटल पुरवून भाडोत्री भांडवलशाहीची पुंजी बनवून ठेवली आहे. असत्या-नसत्या परिणामांची चिंता म्हणावी तशी काही एक नाही. आता काही आहेच किंवा असलंच तर "बदाम राणीचा" मोह तोही क्षणभंगुर ठरला की संपलं सगळंच..!
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

Sunday, May 20, 2018

क्या कहती हों..? :-)


♥ क्षण..! ♥

क्या कहती हों..?

एक बहोत खास बात है
अगर तुम कहों तो मैं बताऊं..
तुम्हारी आखों को पढकर
दास्तान-ए-इश्क तुम्हे सुनाऊं..
युंही उल्झी रहो तुम जुल्फों में
सवारते हुए मैं ये वक्त बिताऊं..
फिर थोडी देर और हो जाये
कुछ कदम साथ मैं चला आऊं..
तुम जाना चाहो पर जा ना सको
पल दो पल और तुम्हे देखता रहूँ..
तुम मूस्कुरा दो होटों सें बस!
इतनाही उस पल मैं समेटता रहूँ..
फिर अगली मुलाकात तक तुम
युंही मेरा इन्तजार करती रहो..
मैं थोडी देर और की वजह
अपने साथ ले आया करूं..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३


Monday, May 7, 2018

कोट_फाट..! (फोनकॉल) :-)



#फोनकॉल
#कोट_फाट

(लॅण्ड लाईनच आहे टूर-टूरच रिंग जाताना ऐकू येत होते. चार-पाच टूर-टूरनंतर..)

आई - हॅलो?
मी - आई मी ये.
आई - एवढ्या भर दुपारी? का रे काय झालं? मुंबईत ऊन बिन लागलं का?
मी - (पडल्या आवाजात) तसं काही नाही. बस आयुष्याचा प्रश्न पडलाय!
आई - कसला प्रश्न? (गंभीरतेने)
मी - लहानपणी अगदी शिशू अवस्थेत नाटकं केली होती का गं मी?
आई - २९वर्षे मागे जावं लागतंय थांब. जरा टिव्हीवरची मालिका बंद करते.
मी - (होल्ड करत) बरं!
आई - (एक-दोन क्षणानंतर) हां, बोल आता.
मी - (गंभीरपणे) सांग ना लहानपणी काही नाटकं केली का मी?
आई - फार अशी नाहीस केली. कुणाजवळपण सहज राहायचास. रमायचास.
मी - तो स्वभाव झाला गं माझी आई. नाटकं सांग!
आई - आता काय आठवतंय रे ते सगळं. (दमलेल्या सुरात)
मी - (निराश होऊन) म्हणजे मी काय नाटकं केलीच नाहीत की काय?
आई - (आक्रमकतेने) केलीस की, पण ती नाटकं नव्हती, त्रास होता.
मी - त्रास? तो काय?
आई - एखादं खेळणं आवडलं की ते घ्यायचा हट्ट, त्यासाठी फतकल मारुन भोकाड पसरण्यापर्यंत आपले उद्योग व्हायचे. अख्ख दुकान डोक्यावर घ्यायचास.
मी - तो हट्टच पण मला नाटकं सांग की माझी. कधीतरी केली असतील.
आई - अम्म्म! आठवत नाही रे आता मला.
मी - श्या! एक नाटक नाही माझं?
आई - आठवलं बघ!
मी - काय ते..?
आई - पावसाळ्यासाठी नवी रेनकोट आणली होती. तुला न सांगता दप्तरात भरली मी. सकाळी दप्तर पाठीवर घेतलंस तेव्हा तुला जाणवलं आपलं दप्तर फुगलंय. उघडून पाहिलेस आणि दप्तरच रिकामं केलंस.
मी - मग?
आई - रेनकोट काढलास आणि घातलास बाहेर पाऊस नसतांनाही. कौतुक तुला रेनकोटच.
मी - नंतर काय केलं?
आई - काय करणारेस? रेनकोट घालूनच शाळेत बसलास.
मी - काय..?
आई - नाहीतर काय? दुपारी शाळा सुटल्यावर आपण नवा रेनकोट दोन तुकड्यात सांभाळून बाबांसह घरी परत आलात. मान खाली घालून. बोलतोस कसा. कोट फाट.
मी - काहीतरीच काय?
आई - धड बोलताही यायचं नाही. पण उद्योग एक से बढकर एक होते आपले.
मी - ही उद्योग म्हणजे नाटकं का..?
आई - हो. या उद्योगांनाच नाटकं म्हणतात. पण तू का हे विचारलेस आज?
मी - काही नाही स्पर्धेसाठी लिहीत असलेलं नाटक परत एका प्रवेशात अंधारात गेलं. म्हणून तुला फोन केला. संभ्रमात होतो ना मी की, नक्की नाटकं हीच असतात का म्हणून. तू पुष्टी दिलीस. झालं माझं.
मी - तुझं काही खरं नाही. जमत असेल तर बघ. अन्यथा काही गोष्टी राहू दिलेल्याच बऱ्या असतात.
मी - ठीक आहे. बाकीच संध्याकाळी बोलतो. ठेवतो गं आता.
आई - हम्म, ठीक आहे. (फोन ठेवता-ठेवता काही खरं नाही कारट्याचं!)
मी - कुठून फोन केला..?
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Wednesday, May 2, 2018

जिन्दगी..! :-)


जिन्दगी_

उधर उनकी जुल्फे बिखर गयी,
इधर हमारी हालत बिखर गयी..
उन्हे गुरुर हो गया हमें अफसोस,
युं नजरों सें नजरें जब मिल गयी..
कुछ देर कर देते तो बात और थी
ये जल्दबाजी रिश्तों में बिखर गयी..
ना उन्हे इल्म था, ना हमें। वो मूडकर
चल दिए और जिन्दगी आगे बढ गयी..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३