Powered By Blogger

Tuesday, April 28, 2015

शून्य..! :-)


♥ क्षण..! ♥

शून्य..!

आधी मला स्वतःपासून वेगळ करायचं. ते मी मुकाट सहन करायचं. त्याच पार्श्वभूमीवर साधी ओळखही मी चौकटीसारखी उचकटून फेकल्यावर जिव्हारी झालेल्या जखमेसारखं विव्हळत पुन्हा मलाच उपरं करायचं. तेव्हा त्या क्षणाला बेवारश्यासारखं मी सोडून दिल्यावर पुन्हा मझ्याकडून अपेक्षा करायला होणारं धाडस मतलबीपणाचं मी म्हणून दाखवल्यावर उफाळून आलेला त्वेष सुकल्या व पिकल्या पानांसारखं पावलाखाली मी चिरडल्यावर उरलेलं सावरायला असलेलं म्हणजे "शून्य"..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Wednesday, April 22, 2015

ओठ..! :-)


♥ क्षण..! ♥
ओठ..!

“ बालपणाची दुधाची ओढ होती. पुढे तारुण्याच्या उंबरठ्यावर दारूची आणि सिगारेटची ओढ होती. त्यात अजुन स्वत:चा स्वाभिमान जपण्याची भर पडली. दुधाची साय दारूच्या नशेत न्हाऊन, सिगार्ल्टच्या धुर्क्कत उडवून अख्ख्या आयुष्याला ढवळून गेल्यावर; दारूच्या नशेने अस्तित्त्वावर रंग चढवला. आता या ओठांना आणखी ओठ सांभाळण्यास फुरसत आहे कुठे..?''

नोंद : ओठांचा चमू करून चुंबणाचे आवाहन देऊ नये, प्रस्ताव धुडकावले जातील..!

काय होतं ते... हां...

चल पप्पी दे... पप्पी दे... पप्पी दे..!
!------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Tuesday, April 14, 2015

महामानवास विनम्र अभिवादन..! :-)


♥ क्षण..! ♥

महामानवास विनम्र अभिवादन..!

ना पुजाला अजून कुठला दगडाचा देव मी
सोंग-ढोंग करणारे इथे कित्येक भोंदू पाहिलेत मी,
हाड-तुड करणाऱ्यांना तसलेच वागवले मी
मान-स्वाभिमान वगळून अभिमान बाळगलेत मी,
माणूस म्हणून जगतांना माणसे जोडले मी
माणसे थोडी माणसातली श्वापदे पाळली आहेत मी,
माणसासारखी वागली तीच माणसे जपली मी
माझी-माझी तुझी-तुझी चौकटी बाहेर ठेवलीत मी..!
------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Sunday, April 12, 2015

आधुनिक जीवनशैली..! :-)


♥ क्षण..! ♥

आधुनिक जीवनशैली..!

रस्त्याने जाता-जाता सहज एक घरटे दिसले. घरासाठी माझे घरसोडून जाने नकळत आठवले. नवे घर भेटले, कसे-बसे चरितार्थ चालले, माझ्यासोबत माझ्या घराचे पोट भरू लागले. मग असच एक भिंत उभी केली आणि मी...माझ्याशीच वेगळा राहू लागलो..!
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com