Powered By Blogger

Saturday, May 31, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-9)

:-)
क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-9)

जरा वेळाने येवून धारा अंबरचा शेवटचा मॅसेज वाचते. वाचताच क्षणभरात तिची नजर जुन्या विश्वात हरवते. आठवन एक ती, आठवताच पापणी स्वत:च मिटून जाते.

धारा : हात काढ तो डोळ्यावरचा मला माहित आहे तुच आहेस ते!...

(......) : श्या!... तुला सप्राईझ करणे कठीन आहे...

धारा : ज्या दिवशी वेळेवर येशील ना तेव्हा होईल मी सप्राईझ...

(......): हो का! उद्याच करतो बघ मग...

धारा : हा राहू दे! गेल्या दिड वर्षात तुझा तो उद्या आलाच नाही. बाकी तुझ्यामुळे मलाही रोज घरी जायला उशीर होतो अन् रोज घरी नवी थाप मारावी लागते. & i hate you for this..

(.......) : हेट मी ऑर लव्ह मी यु'विल ऑलवेज थिंक अबावूट मी.....

लॅप्पीची बॅटरी अखेरचा श्वास घेत डिसचार्ज होते. अन् भानावर येते..खिडकीत बसून विचारात गुंतत जाते. प्रेमात मोठे-मोठे हेवे-दावे करणारा हा आयुष्याच्या त्या वळणावर सोडून गेला. जिथे मला त्याची सर्वात जास्त गरज होती. पण! जेव्हा जन्मदातेही माझ्यावर विश्वास नाही करु शकले तर... विचारांच्या वादळात एकदम तिव्रतेने आठवतो तो तिचा एकमेव आधार... जो मोठे नाही देवू शकले पण त्याने लहान असुन दिला. धाराचा लहान भाऊ 'आलोक'..!

फोन वाजतो... आलोकचाच असतो.. नाव पाहाताच हिरमुसलेली कळी खुलून येते... हसत फोन घेते... हॅल्लो!.. अरे आत्ता तुझीच आठवन काढत होते... अरे खरच... हो अरे मी करणार होते फोन तुला पण काम इतके ना की... हो बाबा नाही मी हलगर्जीपणा अजिबाद करत नाही... वेळेवर जेवते वेळेवर औषध घेते अन् काळजीही ओके! आता तुझे लेक्चर झाले असेल तर मी बोलू?... कसा आहेस आणि अभ्यास करतो ना?.. अरे हो मी विसरलेच माझ्या भावाला स्टार होयचे आहे मग तो का अभ्यास करेल?.. गप्प बस नालायका अभ्यास करत जा... मलाही बंर वाटले तुला नालायक बोलून... बंर ठेव आणि काळजी घे तुही स्वत:ची... आणि ऐक... आई-बाबांचीही घे!...

फोन ठेवून फ्लॅट मधल्या भिंतीवर फ्रेम करुन लावलेले आलोक अन् धाराचे लहानपणापासूंचे फोटो बघत आठवणींचा उजाळा करत घड्याळाकडे लक्ष जाते... फारच उशीर झालाय... काम आवरायला घेते... काम आवरुन आज आलोकच्याच आवडीची खिचडी खाऊ असे म्हणत खिचडी बनवून फ्रेश होवून येते... खिचडीचा आस्वाद घेत अंबरला रिप्लाय द्यायला स्वत:ला सज्ज करते..

धारा : ओह! तर तुला असे वाटते कि, मी सतत तुझा विचार करावा? Is that so... एंटर करुन News feed चाळत रिप्लायची वाट बघते..

अंबर : I'm so glad to heaired Your wish, i don't mind.. करु शकता माझा विचार :-)

धारा : इतके तुमचे नशीब चांगले नाही... आणि मलाही तितका वेळ नाही..

अंबर : मी कुठे म्हणालो मला वेळ द्या तुमचा? एक क्षण पुरुन उरेल एव्हढी माझी वृत्ती समाधानी आहे.. :-)

धारा : मी तो क्षण ही का देवू तुम्हाला?..

अंबर : या क्षणावर अंकुश लावणे हे तुमच्या हातात नाही ना... नियतीच्या बाहूल्या देवून जात आहेत... :-)

धारा : वाह!... लेखक आहात का आपण..?

अंबर : हो! म्हणून भाव खायची माझी इच्छा नाहीये... छंद होता कधी काळचा एक... पण असते काही काही व्यक्तीमत्वातील छाप जी माझ्या स्वत:त हरवून गेलेल्या लेखकाला जागे करते...

धारा : पण! त्या लेखकाला झोपवलेच का आहे... जागेच राहू द्या ना छान लिहिता म्हणून म्हणते...

अंबर :
माझे लिखाण हल्ली
मलाच आवडत नाही,
काय लिहितोय माझे
मलाच कळत नाही..!.... म्हणून झोपवले....

धारा : अहो! आपण कसे दिसतो ते आरश्यात पाहिल्याशिवाय कळत नाही...आणि लेखकाचा आरसा त्याचा वाचक असतो. आधी लिखाण कुणाला तरी दाखवून तर बघा आणि मग ठरवा झोपायचे कि नाही...

अंबर : एका झटक्यात माणसाला ओळखता बघा तुम्ही... निष्कर्शही त्वरीत काढता... डायरी पुरता मर्यादीत ठेवले आहे अजुन तरी...पण माहित नाही इथे कसे लिहिले गेले... Sorry चौकट चुकली माझी...

धारा : ओके... मी काय बोलू शकते मग आता...

अंबर : तुम्हालापण आवडते ना लिहायला?,नव्हतो तेव्हा माझ्या प्रोफाईल पिक वर केलेल्या चारोळ्या वाचल्यात मी तुमच्या...

धारा : आवड आणि कला यात फरक असतो.. तुमच्याकडे कला आहे. माझी फक्त एक आवड आहे जी जेमतेम पुर्ण करते...

अंबर : आवड जपणे सुद्धा तर एक कला असते ना..?

धारा : Really?....

अंबर : May be..! कारण बरेचदा स्वत:ची आवड सोडून दुस-याची कला कुणी तरी, कुठे तरी कसे तरी जपत राहातो...

धारा : पण! त्याला जास्त हिम्मत लागते. आपली आवड सोडून दुस-याची पुर्ण करणे कठीनच असते नाही का?...

अंबर : जर ते दुस-याचे न समजता आपले समजले तर सोपे आहे...

धारा : कसे काय..?

अंबर : तर! एक लहान लेकरु घ्या उदाहरनार्थ... इतर कुणाला त्याचे लाड-हट्ट पुरवणे कठीनच असते पण... पुरवणारी व्यक्ती जर त्याची आई-बहिण किंवा हक्काची असेल तर त्या व्यक्तीसाठी ते सहज असेल... असे मला तरी वाटते...

धारा : ते लेकरु लहान असे पर्यंतच त्याचे हट्ट पुरवण्याला अर्थ असतो. मोठं झाले कि त्या अमुल्य प्रेमाची किंमत मोजायलाही कमी करत नाही... मग अश्यावेळी वाटते कि आज पर्यंत मी जे केले ते व्यर्थ होते का? माझे प्रेम माझ्या भावना त्यांचे काहीच नाही का महत्व राहिले...

अंबर : चोचीने दाणे भरवले, मायेने पंखात बळ दिले, पंख पसरुन प्रेमाचे मुक्तविहारी पाखरं उडून गेले, तर परत फेड म्हणून कर्तव्यात पाखराचे काय बंर चुकले, जर जाता-जाता त्याने एकटेपणा पुन्हा असेल दिले? निस्वार्थ प्रेमाचा मोबदला शेवटी एकटेपणातच चुकता होतो. का? असेल-नसेल कदाचित परोपकार म्हणून एव्हढे उपकार केले तर वावगं काय..?

धारा : (मॅसेज सीन करते फक्त)

अंबर : (स्वगत) पंधरा मिनिटे झाली मॅसेज वाचून. कदाचित वेळ लागेल सैरभैर झालेले मन सावरायला..!

ओघवता प्रवाह मनातलं
व्यक्त करतोच असे नाही,
थोडे बाकीच राहून जाते
अन् अव्यक्त असते काही..!
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
.
(नोंद : कथा काल्पनिक आहे. याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!)

Thursday, May 29, 2014

फेसबूक ढाबळ..! :-)

क्षण..!

फेसबूक ढाबळ..!

(पात्रे : स्टेटस, लाईक, कमेंट, शेअर, पोक)

स्टेटस : what's on your mind? लय उकडतंय..! फिलिंग hot.. hot..hot..! :-(

लाईक : आलास मुडद्या? आता गर्दी होईल अन् माझा घाम निघेल. >:(

कमेंट : सेम हिअर..! या लाईकच्या समुद्रात मी तरंगासारखी असते हलकी-फुलकी. ^_^

शेअर : लिहायचा कंटाळा करणारी माणसे मला कामाला लावतात. :-/

पोक : काही काम नाहीये का तुम्हा लोकांना? घामाच्या धारा निघतांना दिसतायेत तरी तिथे माझं बोट... शी! किळस येतेय..! :-|

लाईक : थम्स अप करुन ठेंगा दाखवायला काय मजा येतेय कळत नाही मला. असे वाटते लहानपणी अंगठा चोकण्याची हरवलेली सवय अथवा इच्छा पुर्ण करत आहेत. (y)

कमेंट : होत असं कधी कधी..! बेकार असलेला माणुसही घामात भिजतो एव्हढ काय विषेश..?

स्टेटस : अगं कमेंट तू अशी टिकटॅाक टिकटॅाक चालत बोलत असतेस मला आवडते..! <3

कमेंट : हो का? पण तु मला अजिबाद आवडत नाहीस? :-/

स्टेटस : का बुवा?

कमेंट : तू आलास ना कि सगळ्यांना तोंड फुटते आणि ही बावळट लाईक आरसपाणी सौंदर्य समजून स्वत:चे भाव खाते. एकदा काही चांगलं वाईट बोलले कुणी तरच तू दखल घेतो माझी अन्यथा तिथेही लाईकच करतो तू..!  :-/

लाईक : (मध्ये तोंड मारत) जळतंय कुणी तरी..! :-D

शेअर : रताळे यांचे काय शेअर करु हाड..! :x

स्टेटस : असे नाही गं कमेंट! माझ्या मागे तुझंच नाव घेतात सगळे..!

कमेंट : नो उल्लू बनावींग.. नो उल्लू बनावींग..! >:o

पोक : (उतावळेपणाने) मी काही बोलू..? मी काही बोलू..? -_-

स्टेटस, लाईक, कमेंट, शेअर (एकत्र) : नको, एव्हढे पुरे आहे..! :-) :-)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, May 27, 2014

अंतर गळून पाडतांना..! :-)

क्षण..!

अंतर गळून पाडतांना..!

सश्याच्या गतीने भर वेगात पुढे धावणार आयुष्य; एकदम कासवाच्या गतीवर येवून ठेपतं. हिशेब कसलाच लागत नाही अन् शिल्लकही काही असत नाही. उरलं-सुरलं असेल काही बघावे तर शिळं-पातंही असत नाही. पुन्हा पदर खोचून अन् शर्टाच्या बाह्या वर करुन, आयुष्य जगायला स्वत:ला जुंपावे तर प्रवासाचा उत्कंठा मिश्रीत उत्साह फार असत नाही. मुंगीने विंचवाशी लढा द्यावा एव्हढ कुतुहलही वाटत नाही.

वर्ष दोन वर्षात दुराव्याची पडलेली भेग सहज भरुन येत नाही. काळाच्या ओघात आपल्यात इतके बदल झालेत अन् अंतर वाढलेत कि मित्रत्वाची पडलेली गाठ तेव्हढीच आठवते. मनात खुप दाटून येते बोलायचे आहे बरेच काही. कुठून न कशी सुरुवात करावी काही कळत नाही. आपापल्या चौकटीत एव्हढे एकरुप झालो आहोत ना कि, जरा अवघडल्या सारखे वाटते. कदाचित आपलं दु:ख, आपली संवेदना स्वत:पुरताच असलेली घुसमट हक्काच्या मानसाजवळ व्यक्त करुन आपण सहानभुतीची अपेक्षा करत आहोत का? कि, आधाराची सल मनात तशीच सलत ठेवत आहोत कळत नाही.

इतके झपाट्याने अंतर वाढवून मोकळे झालोत ना कि, हे अंतर गळून कसे पाडावे सुचत नाही. विचारले तेव्हढे बोलून पुन्हा अबोल आपण राहू लागतो. काय करावे या परिस्थित खरंच कळत नाही. "तू माझ्या जागी, मी तुझ्या जागी" असतो तरी हे असेच झाले असते, तर तू काय केले असते? तुझ्या जागेवर सतत उभी राहून विचार करते. तुला काही ना काही सुचते, पण मला! तुझ्या जागी उभे राहून सुद्धा फक्त अंधारच दिसतो. काय करु सांग ना रे! कसे बोलू अन् कसे सांगू ? बांध घालावा नदीवर तशी अडखळून गेली आहे मी. दिशा भले बदलली असो अथवा वाट सोडली असो. कुठे तरी या छोट्याश्या जगात छोटेसे प्रसंग एका क्षणाची भेट घडवून भल्या मोठ्या पेचात टाकतात. सांग आता तुच बोल ना काही तरी.

कळत-नकळत असे होणार होतेच. दिसतेही तशी तू छानच आहेस. तरी विचारावे काही तरी म्हणून विचारलेच मी 'कशीयेस तू..?' पण उत्तरही अपेक्षीत होते तेच दिलेस. सरळ तुझ्या जखमेला हात घालावा अन् खपली ओढून यातनाच देवून अलिप्त व्हावे. सहज जमत असले मला तरी; आज माझीच मात्रा माझ्यावर-तुझ्यावर लागू पडेल असे नसते ना! कुठे तरी आपण आपल्या मनावर पायबंद घालून आतल्या आतच मनाला जायबंद करुन घेतले आहे. वाटतेय तरीही माझ्याशी बोलावे, सगळे सांगावे पण आपल्यातला ओलावा जरा कोरडा झालाये म्हणून काही बिघडलेय असे नाहीये.

जिथुन ज्या गोष्टी आपण सोडून दिल्या किंवा सोडून द्याव्या लागल्या; वाटलं तर तिथुन एक सुरुवात आपण करु शकतो. आपल्यातली हरवलेली ती सहजता नकळत तिथे पुन्हा भेटेल अन् अव्यक्त राहिलेले तुझ्या-माझ्या मनातले ओघानेच व्यक्त होईल..!

"अंतर गळून पाडतांना अंतर अजुन-अजुन वाढत जाते,
होती कधी पाऊले इथे त्या पाऊल खुणांवर सुरवात होते..!"
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

कोई मेरे जिन्दगी से..! :-)

कोई लौट कर गया
कोई लौटाकर गया
कोई जांच कर गया
कोई जांचकर गया
कोई पेहचान कर गया
कोई पेहचानकर गया
कोई युं ही हो कर गया
कोई युं ही होकर गया
कोई मेरे जिन्दगी से..;
खुद निकल कर गया
खुद को निकाल कर गया..!
----------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, May 26, 2014

मुझ से मेरा कुछ..! :-)

कोई भुल कर गया
कोई भुलाकर गया,
कोई मिलकर गया
कोई मिलाकर गया,
कोई जानकर गया
कोई नाम कर गया,
कोई मांग कर गया
कोई मांगकर गया
मुझ से मेरा कुछ..;
कोई दे कर गया
कोई ले कर गया..!---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Sunday, May 25, 2014

तू कधी प्रेम केलयेस कुणावर..? :-)

तू कधी प्रेम केलयेस कुणावर..?

हो..!
ही नजर भिर-भिरली
ओठांना कोरड पडली
श्वास अनियंत्रीत झाली
न असंख्य वादळं उठली
मनाला सैरभैर करुन गेली
पाऊले वेडी वाकडी चालली
वचा माझी खुंटून गेली
क्षणभरातच तू आठवली
लाटां मागूनच लाट आली
वाटां मागूनच वाट सोडली
वळणावर चुकामुकच झाली
न आल्या पाऊली तू परतली..!
------------------ © मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, May 24, 2014

अवघडून..! :-)

क्षण..!

एकटेपणाचे तेव्हढे काही वाटत नाही, जेव्हढे शब्दांच्या सभोवती नजरेची उपस्थिती अवघडवून सोडत असते..!
------------------ © मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, May 23, 2014

धन्यवाद Vs आभार..! :-)

:-)
क्षण..!

सहज परोपकाराच्या कृती नंतर उच्चारलेला 'धन्यवाद' माणसाच्या आकृती सोबत हरवून जातो; पर्यायाने त्याच कृतीत 'आभार' बिंबवला गेला तर माणसाच्या आकृती व्यतिरिक्त, त्याच्या सावलीतल्या अनेक आकृत्या त्यांच अस्तित्व जोडून विश्वासाने सानिध्य दिर्घकाळ किंवा दररोज किंवा पुन्हा पुन्हा स्वैच्छेने उपोभोगत राहातात..!
--------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

उद्धार..! :-)

क्षण..!

रस्त्याच्या मधोमध अर्धवर्तुळाकार असलेला वळसा वळण असतो; सुसंस्कारीत स्वत:ला म्हणवणारी माणसे मात्र चंगळ म्हणून माऊली जवळ याचा उल्लेख 'उद्धार' स्वरुपात करतात..!
----------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

शप्पथ..! :-)

क्षण..!

अवघडलेल्या परिस्थितीत भुकेल्या माणसाला हमखास भरपेट जेवन मिळाल्याचा आनंद देणारा एकमेव पदार्थ म्हणजे 'शप्पथ'..!
-------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Thursday, May 15, 2014

निर्णय..! :-)

क्षण..!

निर्णय..!

स्वत: घेतलेल्या एखाद्या निर्णयात इतरांकडून बदलाची अपेक्षा जन्म घेणे, याहून अपमानास्पद काही एक नसते. त्या एका निर्णयाची दखल घेवून; आखून ठेवलेल्या चौकटीत दोलायमान असणे स्वत:ची खिल्ली उडवण्यासारखेच असते. निर्णय घेतांना फारसा सन्मान कुणी कुणाचा करत नाही. वाटलं म्हणून घेतलेल्या फोल निर्णयावर 'ठाम' राहाणे स्वभावाला जमत नसते. ओढून ताणून परिस्थिती स्वत:च बिकट करुन त्रागा स्वत:चाच होत असतो. तरी खापर 'तुझ्यावर' फोडण्याची आयती महत्वकांक्षा कुणी सहज सोडत नसतो. जे निर्णायाचा सन्मान करुन दुर्लक्ष करुन जातात. त्यांच्यावर सहज आरोप केला जातो, 'काहीच वाटत अथवा फरक पडत नाही ना तुला". असू दे! मग असाच हा निर्णय..!
------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, May 12, 2014

कथेला रुचकर कसे बनवू..? :-)

क्षण..!

कथेला रुचकर कसे बनवू..?

कथा-मालेत घडामोडी कमी झाल्या तर कागदावरचे लिखाण वाचकाला कमीच वाटते. वाचकांची तंद्री लागून सविस्तर केलेले निवडक प्रसंग फारसे मनात रुतुन बसत नाहीत. तेव्हा महत्व शुन्य असलेला प्रसंग शक्यतो वगळून घ्यावा. अथवा तोच प्रसंग नकरात्मक भुमिकेत मांडून तिरसटतेचा रुचकर नमुना बनवून सादर करावा लागतो. ते ही रुचते असे नसतेच मग सकारात्मकतेचा एक परिच्छेद लिहून उत्कंठा शिगेला ताणून ठेवावी लागते. जरा जरा वेळाने काही एक तथ्य नसलेला शब्दांचा व्यवहार असा अमुल्य ठेव्यात जमा होवून जातो. विनोद म्हणून अथवा विचारांची दिशा म्हणून..!
-------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-8)

क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-8)

प्रवासाचे तणाव अन् एकटेपणाच्या झळेचे परिणाम तब्बेत ढासळून दिसू लागतात. बंडखोर मन त्या अवस्थेतही स्वत:ला सोडून शरिराला जमेल तितक कामात गुंतवून घेतं. आठवणींच मुजोर सावट इतक सहज कुठे पिच्छा सोडणार असतं? जरा उसंत अन् थोड स्वस्थ होताच नजरेसमोर सगळ्या प्रतिमा तरंगू लागतात. गेल्या दिवसातल्या खोळंबलेल्या कामांची वाट मोकळी करुन दिल्या नंतर पुढे फार अशी कामेही नसतात. मग वाट्याला आलेल्या दिवसाचा संथ प्रवास सुरु होतो अन् निवांत मिळालेल्या क्षणात आठवणी हक्काने येत-जात राहातात.

स्वत:शी झगडू लागतो, झटकून बाजुला करु लागतो. कुठे तरी गुंतून राहावे आता अन् झालं-गेलं एखाद्या अडगळीत कोंडून ठेवावं. भुक मेलेली असते इच्छा फारशी नसते. गुढ होवून स्वत:च एक कोडं बनून जाते. अनइच्छेने फ्रेश होण्याचे सोपस्कार पार पडतात. छताकडे शुन्यात नजर खिळून राहाते. जाणीव स्वत:चीच मग एक यंत्र करुन देतो. अंबरचा भ्रमणध्वणी गुणगुणू लागतो. क्लायेंट्सचे रेफरन्स मेल चेक करुन पुढे पाठवण्याचे आदेश Boss नावाच्या खडूस इसमाकडून येतात. डिस्चार्ज झालेला लॅप्पी चार्जींगला लावून अर्ध्यातासात तेही काम हातावेगळे होते. ऑफिसिअल साईट साईन-ऑउट करुन फेसबूकवर साईन-इन होते.

नोटीस्फीकेशन क्लिअर करुन मॅसेजसकडे मोर्चा वळवतो. धाराचा 'Ok, Take care..!' वाचतो. जरा शांत अन् पुर्ववत वाटू लागते. पुन्हा सुरुवातीपासून झालेले संभाशन वाचून काढतो. ओठांवरचे हरवलेले स्मित विषन्न अवस्थेत परत ओठावर उमटते. अनामिक चैतन्याने कि-बोर्डवर सराईत बोटे फिरू लागतात.

"h! मिस ऑक्सफर्ड हाऊ आर यू..? बरीच आठवन काढलेली दिसतेय माझी तुम्ही. काय चाललेय सगळे ठीक ना..? एंटर करतो अन् काही तरी खायला हवेय आता याचा साक्षात्कार होतो. लॅप्पी तसाच सुरु ठेवून किचन मध्ये धुडगुस घालतो. coffee & न्युडल्स वर ताव मारत जुण्या हिंदी गाण्यांची मैफल लॅप्पीत प्ले करतो.

ऑफीसची धावपळ संपवून धाराही निवांत coffee न ब्रेडचे लचके तोडत फेसबूक साईन-इन करते. नोटीस्फीकेशन क्लिअर करुन मॅसेजेस चेकवते. आलेत तर साहेब बडबडत ओठांनी हसत मॅसेज वाचते.

धारा : आठवण?...अम्म्मम्म्मम्म्मम dnt knw पण हा आता तुमचा मॅसेज वाचून एव्हढे नक्की कळाले कि, इतक्या दिवसात कमतरता वाटत होती. ती ही कि, या दिवसात माझे डोक खायला कोणी नव्हते. (मॅसेज एकदा वाचून एंटर करत हाताची घडी घालून रिप्लायची वाट बघत बसते..)

अंबर : (तोंडात लटकलेल्या न्युडल्सचा अवशेष मुखात पुर्ण ओढतो.) अच्छा! म्हणजे डोक्याचा साठे बाजार करुन ठेवला आहे माझ्यासाठी. अलभ्य लाभ! पण काय चार्जेस काय या ॲन्ग्री डिशचे..? कि मंदीरातल्या प्रसादासारखे आज फ्री वाटप आहे..?

धारा : ब-याच दिवसांनी भेट झालीये तर आज फ्रि ठेवू उद्यापासून बघू काय चार्जेस लावायचे ते..!

अंबर : दिसतोय दिसतोय आनंद अगदी उठून दिसतोय..!

धारा : खाली या..! जास्त नका उडू पडाल तर लागेल अन् उगा माझ्या नावाने ओरडाल..! :-)

अंबर : तुमच कसेय ना वारा जोरात करुन आधी हवेत नेवून ठेवता मग माझ्यासारखा गरिब बिचारा दिन दुबळा त्या क्षणभंगूर हवेवर हेलकावे खात राहातो..!

धारा : हो का..? येव्हढे हलके-फुलके असाल वाटले नव्हते. पाय जमिनीवर अन् मस्तक आभाळात ठेवावे माणसाने म्हणजे तो अधांतरी अन् अवलंबून राहात नाही कुणावर..!

अंबर : ते झालेच! पण असते ना सवय एखाद्याची आधार बनन्याची अथवा दोर बनून बांधून ठेवण्याची. मग हिरमोड कशाला करु ना..?

धारा : आहाहा हा ! किती कौतूक नाही स्वत:चे. इच्छा स्वत:ची असते उडण्याची अन् दोष मात्र इतरांना देण्याची..!

अंबर : दोष कुठे हो आरोप आहे..! पण या आरोपांचा समारोप मात्र तुम्ही स्वत: जवळ सुरक्षीत ठेवले आहे..!

धारा : यूssss! यू आर जस्ट impossible आय हेट यू बाय..! :x (रागाच्या भरात ऑफलाईन होते)

अंबर : हाssssय! "लव्ह मी ऑर हेट नो मॅटर बट यू आर स्टिल थिंकिंग ऑफ मी दॅट्स मॅटर..!" :-) टेक केअर बाय..! :-)
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

(नोंद : कथा काल्पनिक आहे. याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!)

Thursday, May 8, 2014

कशीयेस तू..? :-)

क्षण..!

कशीयेस तू..?

गेल्या काही दिवसांपासून तिच्या मनात काय आहे? जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. उलट-सुलट विचारुन शब्दात पकडण्याचा खटाटोप करतो आहे. आयुष्य जगतांना खरंच आपण किती सराईत होवून जातो ना! आपल्या मनात जे आहे ते तसंच घुसमटत ठेवून निश्चिंत असल्याचा अविर्भाव; हसणा-या मुखवट्या मागे लपवून संकोचीत मनाने सगळे ठीक आहे बोलून जातो.

साधे-सुधे प्रश्न विचारतांना अवघडलेल्या अवस्थेत मिळणारे; एखादे उत्तर बंरच काही दडलंय याची चिंता देवून जाते. काळजी घे अन् काळजी करु नकोस इतकेच ओठ पुटपुटत राहातात. वास्तवीक जितके झटकण्याचा प्रयत्न बुद्धी करु म्हणते, तितकेच अधीक मन त्याच-त्याच विचारात गुंतुन शंका-कुशंकांनी स्वत:ला जखडून घेते.

सर्व ठीक असणं अन् तसे भासवणं कुशल नट-नटीलाही जमत नाही. ओळखणं काय बाजुलाच राहिले. बोलत एक असतो समजत दुसर असतो. कदाचित नको त्या गोष्टींचा अथवा परकं समजत असलेल्या व्यक्तींचा फार विचार करतो. 'चलता है यार' म्हणत स्वत:ची समजुत तरी किती काढावी? फार झाले! एकदाचे सरळ स्पष्ट विचारावे आता तर पुन्हा तेच उत्तर 'ठीक आहे'.

मान्य प्रतिकुल परिस्थितीतून ज्याला त्याला स्वत:ला मार्ग काढावा लागतो. जवळची मानसे हळवीच असतात तिथे निर्दयाने सर्व आतल्या आत गिळून तटस्थ असण्याचा निर्णय स्वत:लाच त्रास देत असतो. 'चल असु दे', काही नाही. ठीक आहेस तू तर अजुन काही विचारत नाही. वाटले तर नको वाटलं तर कळव "कशीयेस तू?"
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

Wednesday, May 7, 2014

चिमुरड्यांच्या विश्वातून..! :-)

क्षण..!

चिमुरड्यांच्या विश्वातून..!

आवडीने चाखते ती मी भरवलेली मलाई
चोळत येते डोळे अन् म्हण म्हणते अंगाई,

घेवून तक्रार चुळबुळत कुशीत अशी शिरते
ऐकत तोतळे बोल निज पापण्यांवर फिरते,

निरागस तिचा चेहरा न्याहाळत मी असतो
लांबडच लावत रातीला एक क्षण मी जगतो,

कुरबुर करत पाहाट होते समज दिली जाते
रातीला भेट होईल या आशेवर सांज झुलते,

देवून आढावा पुर्ण दिवसाचा पापणी जडावते
नखरे करत अंथरुनात चिमुकली मिठी पडते,

खर्जातली अंगाई या ओठातून बाहेर निसटते
नाद घेवून चांदण्यांचा पाकळी पापणी मिटते..!
.
--------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, May 5, 2014

निश्फळ..! :-)

क्षण..!

निश्फळ..!

काही मानसे मला एकट सोडतात. काही मानसांना मी एकट सोडतो. कुठे तरी समजदार ते असतात. कुठे तरी जबाबदार मी ठरतो. अडले नाही कधीच कुणाचे काही. हलगर्जीपणाने अन् निश्काळजीने यालाच निश्फळ असे म्हणतात..!
----------------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, May 3, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-7)

:-)
क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-7)

साईन ऑउट करुन धारा रुमची दशा बघत बसते. अशीच काहीशी माझी परिस्थिती झालीये. जर हा गोंधळ असाच वाढत राहिला तर सगळेच कठीन होवून बसेल. हा गोंधळ सोडवण्याची सुरुवात तर करावीच लागेल. रुमचा गोंधळ सोडवायला सुरुवात करण्यापुर्वी एक coffee घेवू  म्हणत किचनकडे मोर्चा वळवते. पाणी उकळायला ठेवून coffee चा डबा घेते. रिकामा आहे! गॅस बंद करुन पुर्ण किचनचे सामान बघते. काय काय नाही ते बघून चेंज करुन चावी पर्स उचलत रुमला lock करते. जवळचे इंडीयन फुड shop गाठते. हवे असलेलं सर्व बास्केटीत घेवून कॅश काउंटर जवळ येते. तर तिथे तिच्यापुढे एक चिमुरडी तिच्या बाबांसोबत आलेली दिसते.

नजरेने त्या चिमुरडीला न्याहाळत राहाते. shop बाहेर पडतांना कडेवर घेण्याचा तिचा बाबांजवळ होणारा हट्ट बघते. बाल हट्ट कुठल्या बापाला चुकलाय? सर्व सामानाच ओझ एका हातावर घेवून. बाप लाडक्या चिमुरडीला कडेवर घेत रमत-गमत घराकडे चालू लागतो. ति दोघे नजरे आड होई पर्यंत धारा त्यांना एकटक बघत राहाते. काउंटर वरील व्यक्तीच्या कणखर आवाजाने भानावर येते. बिल चुकते करुन सरळ घर गाठते. किचन मधल्या सामानाची ज्याच्या त्याच्या जागेवर नेमणूक करुन रुम आवरायला घेते. सगळे सोईचे अन् पुर्ववत करण्यात दिवस जातो. फ्रेश होवून coffe घेवून फेसबूक साईन-इन करत स्वत:शीच बोलते "I hope रिप्लाय आला असेल", ओपन होताच मॅसेज चेकवते. शेवटी आला एकदाचा रिप्लाय. अंबरचा रिप्लाय दहादा वाचून नेमक काय उत्तर देऊ? हे सुचे ना! फक्त "Ok!... take care & come soon.." टाईप करुन पुन्हा एकदा वाचते. 'come soon' delete करुन एंटर करते. साईन-ऑउट करुन नजर फोनकडे जाते. उगाच रागवले...स्वत:ला ओरडत आईला फोन करते. "हॅल्लो! आईss! अम्म्मम्म्म, Sorry..!"

कॅफे मधुन निघून अंबर घर गाठतो. वडीलांच्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतो. आईची माया तर वयाच्या पाचव्या वर्षीच हरवली. बाबा तुमचे छत्रही इतक्या लवकर हरवेल वाटले नव्हते. गेल्या पंधरवाड्यात तुमच्याशी साधे बोलणेही माझे झाले नव्हते. तुम्हाला होणारा त्रास, वेदना कशी तुम्ही स्वत:च जवळ ठेवली हो? मुलगा म्हणून तुमचा आधार होतो मी तर मलाही तुम्ही तुमचा आधार बनू दिले नाही. "जिथे जायचे तिथे जा म्हणालात, स्वत:च्या मनासारखे जग म्हणालात". बाबांच्या स्टडी टेबला जवळ येतो, त्यांच्या खुर्चीवर बसत टेबलाचा खण उघडतो. एक बंद पाकीट वरच दिसते. 'बाळ अंबर..!', पाकीट उघडून पत्र काढत वाचू लागतो.

" बाळ अंबर अनेक आशिर्वाद." माहित आहे मला तुला माझे असे अचानक जाणे सहन होणार नाही. तुझी आईपण वर एकटीच आहे तर मला जावेच लागेल ना! हां थोडी घाई झाली म्हण हवे तर पण उशीर नाही झाला. तुला ज्या दिवशी इटलीची ऑफर आली त्याच दिवशी माझ्याजवळ जास्तीत जास्त दोन वर्ष आहेत हे कळले होते. तुझ्या स्वप्नांच्या आणि इच्छेच्या मध्ये मला यायचे नव्हते. तुला तडजोड कधी मी करु दिली नाही. पुढेही तू करावी असे मला आजही वाटत नाही. स्वप्न अन् इच्छा पुर्ण करायला जी किम्मत मोजावी लागते, ती ऐपत तुझ्यात होती आणि आहेही. धाडसी तू आहेसच माझ्या जाण्याचा स्वत:ला दोष देत बसू नकोस. तू जे करत आलायेस आजवर त्यातच माझे सुख आणि समाधान आहे. तुला बेडीत बांधून घुसमटवायचे नव्हते.

तारुण्याच्या उंबरठ्यावर आभाळ दाखवले तुला अन् ते तू गाठले एव्हढीच अभिलाषा होती तुझ्याकडून. फार काळ शोक करत बसू नकोस. तू आनंदात असल्यावर मी ही संतुष्ट असेल. कर्तव्ये अन् तुझ्या उत्तरदायीत्वापासून तू कधी पळ काढला नाहीयेस. निर्णय माझा होता तुला तुझ्याबळावर जगात सोडायचे. कुठल्याही टोकावर राहा, जग पण भरभरुन मुक्तहसते असावे तू. आयुष्यात व्यवहारासाठी तडजोड कर पण प्रेमात आणि जगण्यात कसर बाकी ठेवून तडजोड करु नकोस. तुझ्यासोबत अन् तुझ्यापाठीशी मी सदैव असेल. पोकळीक वाटली तुला तर तो तुझा दुबळेपणा असेल अजुन काही नाही.

माहित आहे तू गंभीर झाला असशील या क्षणाला. डगमगलाही असशिल पण कोसळू नकोस मला ते आवडणार नाही. आयुष्याकडे त्याच नजरेने अन् जिद्दीने तू बघ ज्या आत्मविश्वासाने मी तुला घडवले आहे. आयुष्याचा एक जोडीदार तुझ्यासारखाच बेफिकीर निवड. घर बनव भिंती नको. चौकट ठेव पण बंदीश नको. कधी कुठे काही सुचले नाही तर फक्त तुझ्या मनाचे ऐक आयुष्य सुंदर होईल. माझ्या मागे तुला एकटे ठेवले असे नाही. तुझ्यात मी मला आणि तुझ्या आईला कायम ठेवले आहे. काळजी घे! सावर स्वत:ला या दु:खातून तुझा बाबा आणि मित्र..!

अंबर पत्र हातात घट्ट धरतो अन् थोपवून ठेवलेला बांध तुटतो. मुखातून बाबाssss! आरोळी ठोकतो. अश्रूंना मोकळी वाट करुन देतो. जखामांवर आठवणींची खपली चढवून प्रवास पुन्हा सुरु होतात. थांबणे नसते अन् धावनेही नसते. फक्त जरा विसावा आहे का वळणावर इतकेच पाहाणे असते. अंबर आई-बाबांच्या वस्तु जवळ घेवून, उघडे घर बंद करुन इटली गाठतो. एका नव्या प्रवासाची सुरुवात करायला अवधी असा कितीक लागतो..?

आयुष्य छान असते तेव्हा
जरा ते छोट वाटत राहाते,
सुख दु:ख असतात सोबत
उगाच ते खोट वाटत जाते..!
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

(नोंद : कथा काल्पनिक आहे. याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!)