Powered By Blogger

Friday, November 27, 2015

वाया..! :-)


♥ क्षण..! ♥

वाया..!

नात्याचं पापुद्र अलवार काढायचं आणि अश्रूंच्या तेलात फोडणी द्यायची... आठवणींची रेसिपी थोडी बिघडते आणि बऱ्याचदा तर वायाच जाते..!

वाया जाणाऱ्या वेळातून वेळ काढलेला..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

प्रसंग..! (व्यासंग) :-)


व्यासंग वरुन एक प्रसंग आठवला
कोणता?... :-) सांगतो... ;-)

♥क्षण..! ♥

प्रसंग..! (व्यासंग)

तो दिवस तुझ्या-माझ्या भेटीचा
नाव नसलेल्या हळव्या नात्याचा,
पेलायचा अन् बराच त्यागायचा
हृदयावरच्या अलवार जखमेचा,
ओल्या अश्रूंच्या मुक्या वेदनांचा
स्थिर अस्थिर बदलत्या स्थितीचा
खोटंच करणाऱ्या परिस्थितीचा,
थट्टा मांडणाऱ्या षंढ नशिबाचा
स्पर्शाला मोहवणाऱ्या ओढीचा,
विस्मयात नेणाऱ्या एका प्रसंगाचा
वास्तव सांगणाऱ्या अतिप्रसंगाचा,
शुद्ध प्रेम करणाऱ्या शुद्र दुनियेचा
भेसळ होणाऱ्या दीर्घ श्वासांचा,
तो एक क्षणभंगुर 'क्षण' क्षणांचा
गळून गेल्या कित्येक पानांचा
अन् आठवांच्या बऱ्याच व्यासंगांचा..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Thursday, November 19, 2015

विचारांचा नागडेपणा..! ( फटकळ तडका) :-)


♥ क्षण..! ♥

विचारांचा नागडेपणा..! (फटकळ तडका)
चारित्र्य, शील आणि अब्रू वैश्येलाही असते. सुसंस्कृती मुलगी, स्त्री आणि बाई यांची मर्यादा ठेवत असते. तर शब्दांच्या चारित्र्याची मर्यादा मर्यादेतच ठेवायची असते. तिला सभ्यतेचे मुखवटे लावून कागदाला उगाच बाजार बसव्यात आणून ठेवायचं आणि प्रदर्शनासाठी बोली लावायची असा प्रसिद्धीचा लिलाव दर्शवणारा प्रकार हा निच्च, गलिच्छ, वावगं आणि अश्लीलच असतो. भलेही यासाठी अनेक शद्ब प्रचलित असतीलही त्यांचा भावार्थ सदुपयोगासाठी करावा लागतो आणि त्यांचा संदर्भ हा जागृतीसाठी मांडावा लागतो. स्वतःची आवड उर्फ चॉईस यासाठी एकत्रित बांधल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाला स्पष्ट शब्दाचा विचारांचा नागडेपणाच म्हणणे उचित असते..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Monday, November 16, 2015

गुडबाय..! :-) (1)



♥ क्षण..! ♥

क्षण संदर्भचित्र :  प्रसाद वाघ यांच्या भिंतीवरुन
चित्रकाराची कलाकारी २०१२ सालची
कलाकार : Yuliya Vladkoska

१)(प्रेस नोट) बातमी : प्रेयसीला गुडबाय कार्यक्रम संपन्न..!

जळगाव, दि.१६- येथील प्रख्यात प्रियकर असलेले आणि प्रेमाचे अभ्यासक "अमुक तमुक" यांच्या विद्यमाने प्रेयसीला गुडबाय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्व प्रेमाच्या गुप्त गोष्टी व्यक्त न करण्याच्या अटीवर अनेक प्रेमवीरांनी "प्रेयसीला गुडबाय' कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. प्रेयसीच्या ओठांवर बोट ठेवत प्रेयसीला शेवटचा निरोप देण्यात आला. 'अमुक तमुक' संस्थेच्या वतीने प्रियकरांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन 'टिंब टिंब'येथे 'तमक्या'वेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सतराशे साठ ब्रेकअप झालेले श्रीयुत श्रीमान प्रियकर हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी तमाम प्रेमवीरांना प्रेमात पडून अनाहूत बळी जाऊ नये असा संदेश दिला. त्यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन अनेक प्रेमवीरांनी आपली आत्मकथा व्यक्त केली असून लवकरच "अमुक तमुक" संस्था त्यावर पुस्तक प्रकाशित करणार आहे. प्रियकरांना हक्काचे व्यासपीठ मिळावे असा हेतू आयोजकांचा होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमके नी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तामक्यांचे विशेष सहकार्य लाभले.
......
२) जाहिरात पंचलाईन..! :
प्रेमात पडल्यावर पुढे काय..
फक्त शेवटचा एक गुडबाय..!
......
३) गुडबाय ग्रिटींग..! :- (कविता)
नकळत भेट झाली अन्
पुन्हा प्रेमात पडणे झाले..
पूर्वी मनमोकळे होते अन्
आज गालात हसणे झाले..
जा आज तू खुशाल निघून
मनापासून हे सांगणे झाले..
स्पर्शून ओठांना एकदाच
प्रेयसीला गुडबाय करणे झाले..!
.......
४) चारोळी
पुन्हा पुन्हा नाही फक्त
आता शेवटचे सांगितले,
हाय-हॅल्लो सारखेच इथे
गुडबायही कॉमन झाले..!
.......
५) मृदुंग इस्ताईल..!
क्षण..! :-
नजरा नजर झाली... प्रेमाची लहर आली... सगळ्यांनीच केले म्हणून प्रेमात हृदये बरबाद झाली... प्रत्येकाची इच्छा होते... प्रेमात शेवटी वेदनाच उरते... सांगत होतो जरा कुठेतरी थांबायला हवे... चक्क शेवटचा गुडबाय करायला हे कसले कारण होते?... सहवासाचा काळ खूप छान गेला... नुकसानीत मात्र उभे आयुष्य गेले... न राहावून एक निर्णय मी घेतला गुडबाय करायचा... तर तुझ्या का एवढे जीवावर आले..?
..........
६) मृदुंग इस्ताईल एका ओळीचे पत्र..! :-
प्रिय प्रेयसी,
माझी दारं तुझ्यासाठी कायमची बंद झाली, गुडबाय नावाची पत्रे निनावी तुला पाठवली..! (बस कुणी पाठवलंय शोधत)
..........
७) मृदुंग इस्ताईल जाहीर पंचनामा..!(सूचना)
माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची भीक मागायला आल्यावर दारा बाहेरुन जोरात बेंबीपासून ओरडावे आवाज हृदयात पोहोचला तर भीक मिळेल अन्यथा समोरची दारं वाजवून पाहावी. प्रेमाची चेष्टा करायची आल्यास जाहीर अपमान केला जाईल. काळजाला भोकं पडतील अशा विषारी शब्दांचा जीवघेणा प्रयोग यशस्वीरीत्या केला जाईल. सर्व नियमांचे काटेकोर पालन झाल्यावर प्रेमात बाय बोलणे झाल्यावर पूर्व कल्पना न देता थेट गुडबाय कोणत्याही क्षणी बोलले जाईल याचा आयुष्यावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाईल..!
...........

हुश्श! दमलो अर्ध्या तासात काय काय लिहिले काय माहीत ठरवा तुम्हीच कसे जमलंय :-) परिणामांची चिंता मी आजही करत नाही..!

आणि हो गुडबाय बरं..! :-P
....------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Tuesday, November 10, 2015

उत्सवाचा शुभ पर्व..! :-)


♥ क्षण..! ♥

उत्सवाचा शुभ पर्व..!

प्रसन्न प्रातःचा कोवळा संघर्ष..
सप्तरंगांचा उगा अंगणात हर्ष..
नात्यांचा - आपलेपणाचा सुखद वर्ष
सरुन गेल्या दुखावर सुखाचा नवा संदर्भ..
लक्ष दिव्यांनी सजलेला उत्सव शुभ पर्व
मणी गोंदलेला एकात्मतेचा उत्साह अपूर्व..!

दीपोत्सवाच्या आभाळभर शुभेच्छा..!
-------------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Monday, November 9, 2015

हॅप्पी दिवाळी..! :-)


♥ क्षण..!
सन उत्सवाचा...
अंधाराला उजाळण्याचा..
संस्कृतिच्या परंपरेचा..
उटण्याच्या सुगंधाचा..
मनस्वी आनंदाचा..
तेजोमय सुखाचा..
उज्ज्वल भविष्याचा..
अतूट नात्यांचा अन्
ऋणानुबंधाचा..!

दिपोत्सवाच्या आभाळभर शुभेच्छा..!
----(मृदुंग™)पियुष खांडेकर आणि सहपरिवार
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३