Powered By Blogger

Sunday, March 31, 2013

विस रुपये...!








क्षण...!

विस रुपये...!

आज सहजच बाजारात जाण्याचा योग आला, रविवार म्हणून मटणाचा बेत सो थोडी कोथिंबीर, आले आणि उद्या बाबांच्या डब्यासाठी पावभर वांगे घेण्यानिमित्त गाडीचे वळण बाजारा कडे झाले, नेहमीचीच थोडी घासाघीस करून वजनात थोड जास्तच घेतलं. सगळ लवकर आटोपून एखादी सिगरेट प्यायला सवड मिळावी म्हणून आधी सांगितलेली कामे हाता वेगळी केली, सगळे गाडीच्या हॅंडलला आरामात झुलत ठेऊन जवळच्याच टपरीवाल्या कडून माझ्या ब्रॅंडची एक सिगरेट घेतली तिचे पण पैसे लगेच देऊन टाकले उगा मधेच फोन वाजला तर लगेच निसटायला बंर... झुरक्यांचे आस्वाद घेत, गडद धुराचे वलय सोडत टपरीच्याच बाजूला सावलीत मस्त रमत गमत आजूबाजूला बघत उभा राहिलो, काही क्षणांनंतर एक मध्यम वयस्क स्त्री थोडे जीर्ण झालेले लुगडे, एका हातात खेडूत साधारण परवडेल अशी नायलॉनची विजीर्ण झालेली पिशवी, हातात एक छोटी जर्मनची प्लेट.... हळद अन् कुंकू मुळे प्लेट नेमकी कशाची आहे ते कळले नाही पण जाडी वरून अन् कडेला असलेल्या अर्ध गोल रिंग वरून बहुदा जर्मनचेच असावे त्यात बहुतेक पितळ्याची लक्ष्मीची मूर्ती ती पण नक्की पितळ्याची का तिला पण बरेच दिवस हळदीच्या सहवास झाल्याने तिने घेतलेला तो पिवळा रंग माहित नाही, ती बाई माझ्या जवळ आली आणि दक्षिणा / दान मागू लागली, माझी निरीक्षणाची नजर त्या बाईला कळली असावी पेहराव्या वरून शेतात मोल-मजुरी करणारी वाटली अन् दान मागायची कला नुकतीच आत्मसात केली असावी अस बोलण्यात अवघडलेल्या शब्दांमुळे वाटले मी आपला सहज सुटे आहेत का म्हणून खिसे चाळू लागलो, खिसे चाळता चाळता सहज विचरले माऊशी दुष्काळा मुळे का दान मागता, जणू तिच्या दुखर्‍या जखमेवर नकळतच मी बोट ठेवलं, तिच्या डोळ्यात राग दिसला थोडी संतापाने कापुही लागली मी तसच बाजूला झालो माझी सिगरेट फेकली आणि पाण्याच पाऊच घेऊन आलो अन् तिला दिले, तिने ते निमूट घेतले आणि उभ्या असलेल्या जागेवरच बैठक मारून पाणी पिऊ लागली, जरा तरतरी आली वाटत तिला की बंर वाटल माहित नाही एव्हढंच बोलली स्वताची शेती आहे भाऊ पण कर्ज आहे सरकारने माफ केलंय पण कलेक्टर हापिसात कोणी दाद देत नाही गरीब म्हणून लाथाडले जातो, उपोषणावर बसलोही त्याच झाल काय आमची सोडून इतरांची रक्कम परत केली आमची ठेवली तशीच अजून अडकवून आम्ही पण किती निर्लज्ज म्हणून जायचं आम्हाला नाही का लाज? शेवटी दिले पत्रक देयची तेव्हा द्या आमची रक्कम, सरकार दरबारी पण तक्रार अर्ज केला पण दाद काय लगेच मिळते होय शेतकर्‍याला? सतत आमचाच हक्क वारंवार मागायची आता लाज वाटते,  लोकांकडे घर कामाला जायचे म्हंटले तर या घरकामवाल्या बायकांची युनियन त्यात त्यांची ठरलेली घरे ठरलेली कामे आम्ही पण करू म्हंटले तर नका आमच्या पोटावर लात मारू म्हणतात त्यांचही बरोबर मग उरल काय भिक मागायची तर हल्ली कोणी देत नाही ही देवाची मूर्ती पाहून दिवस दोन दिवसाचा गुजरा होईल इतक मिळते दोन दिवसांनी फिरते काय करू हेच एक साधन आहे मी फ़क्त सुन्न देवाच्या ताटाकडे पाहिले पाकीट काढून तिला विसची नोट देयला काढली तर तिने ताट पुढे केलं, मी हटकले! मी देवाला तस मानत नाही माणूस म्हणून देतोय हातात घ्या ताटात मी टाकणार नाही तिचा प्रश्नार्थक चेहरा अजूनही डोळ्यापुढून हलत नाही तिने मुकाट्याने हातात घेतले पैसे अन् गेली मी होतो तिथेच क्षणभर थबकलो कुणाची पिळवणूक देवही किती करतो...अन् स्वतःच्याच दगडी रूपाने पोट भरून श्रेयही घेतो वाह रे तुझी लीला... बरय माझा तुला अन् तुला पुजणार्‍यांना दुरूनच नमस्कार...!
.
© मृदुंग
३१.०३.२०१३


Friday, March 29, 2013

ही ठेव मर्म बंधातली...






क्षण...!

ही ठेव मर्म बंधातली...

दिनांक :- ०१.०९.२०१२
स्थळ :- जळगाव जिल्हा बॅंक सभागृह
निमित्त :- दिव्य मराठी वृत्तपत्राचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त..!


कार्यक्रम :- मल्हार महोत्सव..!

तसं तर शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला मी ७वी पासून सुरुवात केली. हार्मोनियम वादनाची जाण आणि रागांची ओळख फार लहान वयातच झालेली. हार्मोनियम वादनाच्या 'इंदिरा संगीत अकादमी, खैरागड' तर्फे घेण्यात येणार्‍या शास्त्रीय संगीताच्या काही परीक्षाही उत्तीर्ण केल्या, पण काही कारणामुळे त्यात हवे तसे यश मिळाले नाही. पुढे वेस्टर्न गिटार शिकलो पण त्यातही सातत्य नसल्यामुळे सारंच आलबेल. पण कुठला स्वर कुठे लागला अन् निसटला असा एक माझ्यातला रसिक जागा झाला आणि जाणकारही! त्याच रसिकाला व्यक्त करायचे हे निमित्त...

नेहमीप्रमाणे पैसे न देता फुकट एखाद्या कार्यक्रमाचा आस्वाद घेणारे माझ्यासारखे काही दर्दी रसिक असतील किंवा अगदी नाममात्र शुल्क मोजणारेही असतील. पण खरच काही काही कार्यक्रम आपल्या जुन्या अधूर्‍या आवडी अन् आठवणी फार प्रखरतेने आठवून देतात आणि त्यात आता मी हार्मोनियम अन् गिटार वादकाचा झालोय "मृदुंग", अशा वातावरणात मला काही लिहायला नाही सुचले असं कसं होणार? त्यातही मी वेंधळा पेन घेऊन गेलो पण डायरी घरीच विसरलो. आता काय करावं ह्या विचारात होतो तर बाजूलाच पत्रकार महोदय बातमी लिहित बसलेले. त्यांच्याकडे लेटर पॅड मागू की नको अशा अवघडलेल्या अवस्थेतही निर्लज्ज बनून एक नवे कोरे करकरीत लेटर पॅड मागितलेच आणि बसलो शब्दांना गिरवत... मात्र कानांची तृप्ती पूर्ण करण्याच्या ओघात सगळे भान हरपून गेले.. सुरुवातीला "मंजुषा कुलकर्णी-पाटील" यांचे बहारदार गायन, त्यानंतर "पंडित अतुलकुमार उपाध्याय" यांनी व्हायोलिनवर छेडलेले सुरेल सूर अहाहा... अन् शेवटी तिन्ही सप्तकात फिरणारा "बेगम परवीन सुलताना" यांचा आवाज माझ्या शब्दांना कागदावर कवितेच्या रुपात व्यक्तच करून गेला...

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोनच ओळी सुचल्या..


"मैफल सजली आहे, श्रोते जमले आहे,
शब्दफुले घेऊन काव्य माझे सजले आहे..."


पुढे कार्यक्रम जसा रंगत गेला शब्दही उमटत गेले...!


वादळ सुरांच अस मनात उठलंय
आठवणींना माझ्या झंकारून गेलंय ||१||

स्वरांचा मेघ मल्हार असा भरून आलाय
देहावरून माझ्या थेंबांना ओघळवून गेलाय ||२||

पावसातला तो मेघ मल्हार तन फुलवूनी गेला
माझ्या आठवणीतल्या गुलमोहराला मोह्ररूनी गेला ||३||

आठवणींची बंधीश आज मनात संचारली आहे
जोडणी घेऊन शब्दांची मैफल इथे रंगली आहे ||४||

मेघ मल्हाराची ओढ आज अशी उपळून आलीये
कधी नव्हे ते मनातली सुरावट धुंद करून गेलीये ||५||

.
© मृदुंग
२९.०३.२०१३

Tuesday, March 26, 2013

क्षणात सारे तुटले...!







 क्षण...!

क्षणात सारे तुटले...!

शेवटी उरलो
एकटाच, राहीलोही एकटाच शेवटी तेच झाल ज्याची कल्पना केली नव्हती, सजलेली
सारी स्वप्ने इतस्तः पसरली माहित नाही अस का झाल, नव्हतोच कधी एकमेकांचे
होणार तर का एकमेकांना भेटलो? जर दुरावणारच होतो तर जवळ तरी का आलो? काही
काही कळत नाहीये उद्या रंगपंचमी आठवते सोबत खेळायचं ठरवलं होत, एकमेकांच्या
रंगात रंगायच ठरलं होत कुणाला नाही पण उगाच ठरवलं कारण सगळंच तुटलं आणि
तेही अस तुटलं की पुन्हा जोडायची पण फार भीती वाटते, तरी मनात विचार येतो
तुटणार होत म्हणून तुटलं आता पुन्हा मागे वळून पहायचं नाही बस पुढे चालत
राहायचं पण पुढे लगेचच तू येतेस, पुन्हा तिथेच तशीच अगदी कधी गेलीच नाहीस
अशी...उगचचं एव्हढ्या पुढे गेलो (प्रेमाच्या) नात्यात, आपण येव्हढ पुढे
जायलाच नको होत, आता होतात त्या फक्त वेदना, नकळत ओघळतात ते अश्रू, ढासळतात
ती खंबीर पावले, आवरावे लागतात स्वतःच स्वतःचे हुंदके, अन् आवाज करतात तीच
तुटणारी स्वप्ने, बेचीराखं मने... का मला तू अशी घट्ट बिलगतेस पुन्हा की
सोडायचं नावच घेत नाहीस, त्याचं माझ्या कुशीत झोपायला तुझा हिरमुसलेला
चेहरा मला बघवत नाही, तुझ ते काकुळतीला येऊन मिठीला तरसने सहन होत नाही पण
हतबद्ध मी उघड्या डोळ्यांच्याच स्वप्नात... हताश मी मागासलेल्या समाजात,
उपरा मी अपुराच तुझ्या सुखात, कणाकणाने अजून किती तुटायचं एक क्षण जगायला
किती क्षण मरायचं आता मी स्वतःला समजवले आहे तुला विसरायचं एक सुखद स्वप्न
म्हणून, तुला आठवायचं एक गोड आठवण म्हणून, अन पुन्हा तुला जाऊ देयच एक वाट
एकटीच म्हणून...अन् मागे मी उरणार एक शब्द ओठातच अडलेला, मनातच आलेले अन्
कोर्‍या पानातच विरून गेलेला...  प्रत्येक अक्षराने घायाळ होत राहणारा...
एक शब्द बनायसाठी अक्षरांचे घात-प्रतीघात सहन करणारा तो एकच शब्द मी
बर्‍याचदा तुटून नव्याने पुन्हा बनणारा... आणि तू तीच अश्रूंची भिजरी
पायवाट कायम माझ्या पावलांसाठी तरसलेली, ओसाड झालेली वळणावळणावर दिसेनाशी
होत गेलेली...
.

© मृदुंग
२७.०३.२०१३

Friday, March 22, 2013

तुला आठवून चूक केली...!

क्षण...!

तुला आठवून चूक केली...!

माहित नाही हल्ली कुणाची साधी आठवण काढणेही गुन्हा केल्यासारखेच का होऊन जाते, एक तर आठवण नाही काढली तिकडूनही समोरचा मारतो आणि काढली तरीही, दोन्ही कडून जर मरणारच असणार आहे तर मग या आठवणी तरी का म्हणून जपायच्या तेच कळत नाही, शेवटी मानसही एक आठवणच आहेत, त्यांच्या सवई, ढेकर देण्यापासून ते शिंकन्या पर्यंत, त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट कुणाची तरी आठवणच आहे तर मग त्यांना असा का समज होतो की समोरचा व्यक्ती आपल्याला विसरला असेल, बराच काळ झाला आता तो ओळखही नाही दाखवणार, असे गैरसमज का होतात तेही आपल्यांनाच, ज्यांच्या कडून कशाचीही अपेक्षा करत नाही सध्या स्वर्थाचीही नाही, मग आधार तर दूरच, कशी हेकेखोर वागतात ही मानस मला खरच कळत नाही, कधी नव्हे ते आठवण आली आठवण आली म्हणून फोन, मॅसेज ऑनलाईन पिंग केल तर त्या बदल्यात काय मिळत एक स्वस्थ शांत रिप्लाय "माझी आठवण येते हे तू खोट बोलतोस" अरे आठवण आली म्हणून सांगितलं आणि तसाही टाईम पास करायला बर्‍याच दिवसांनी मुद्दाम कुणाला फोन, मॅसेज ऑनलाईन पिंग करायला मला ती वेड लागलं नाहीये, तरी आज हा मूर्खपणाच झाला माझा अस वाटत, किती सहज बोलून जातात लोकं पण समोरच्याला त्या बोलण्याच कधी विचारच करत नाही, असो झालं गेलं होतंच राहत, माझ्या सोबत तरी आज हे झालं तुमचाही कधी कुणासोबत झालं असेल आणि स्वतालाच दोष दिला असेल सालं उगाचंच फोन, मॅसेज ऑनलाईन पिंग केलं अन चांगल्या दिवसाच खोबरं झालं, मी आता ठरवूनच टाकलंय स्वताहून आता कुणालाच फोन, मॅसेज ऑनलाईन पिंग नाही करायला आपल आपण ऍव्हेलेबल स्टेटस ठेवायचा जेव्हढा वेळ मिळेल तेव्हढा अन् नंतर लपून बसायचं अथवा आपल्याला खरच आलेल्या कामात गुंतून जायचं पण स्वताहून कुणाची आठवण आली कितीही अनावर झालं तरी आठवून घेयच रडून घेयच पण त्या व्यक्तीला चुकूनही तोंडावर सांगायचं नाही आज तुझी खूप आठवण आली... तुझी आठवण काढली हीच माझी चूक झाली...
.
© मृदुंग
२२.०३.२०१३

Monday, March 11, 2013

"दर्द में भिगे लब मुस्कुरा जाते है, बिते लम्हे हमे जब भी याद आते है"






क्षण...!

"दर्द में भिगे लब मुस्कुरा जाते है, बिते लम्हे हमे जब भी याद आते है"

काही गाण्यांच्या ओळी नकळतच आठवणीत नेऊन सोडतात, वेदना सहन करणार्‍या हृदयाला काही क्षणांसाठीच रमवून देतात... भूतकाळातली काही सोनेरी पाने डोळ्यासमोर उघडू लागतात झाल्या गेल्या आठवणी एक एक करत मनात फेर धरतात... खरच तेव्हा जर मनासारखं जगत आलं असत तर किती स्वच्छंदी आणि बेधुंदी असती सध्याच्या आयुष्यात अशीच तुलना मन करू लागत... पण... जस आहे जेव्हढ आहे तेव्हढच आता पुरे आहे...कोणाच्या तरी नसण्याचा रितेपणा सध्या मनात जास्त जन्म घेतो अन् पुन्हा एक सॉंग कानावर येत "अक्सर इस दुनियामे अनजाने मिलते है, अनजानी राहो पर मिलके खो जाते है, लेकिन हमेशा वो याद आते है..." खरच आहे मानसं हरवून जातात पण त्यांच्या आठवणी हृदयावर कायमच लिहून जातात...असच अनायासे मग आठवणींत मन रमत, झालं-गेलं विसरून ओठ हसायला लागतात, मनही मग स्वताला आठवणींच्या कैदेतून सोडवून घेतो, पावले सांजवेळी त्याच दिशेने वळतात जिथून सुरुवात झाली होती, संध्याकाळच्या रंगाच्या उधळणी नंतर रात्रीच्या गडद अंधारात पुन्हा एक प्रवास सुरु होतो उद्याचा... आजचा एक क्षण तर गेला उद्या कसा जाईल याच विचारात... गुणगुणत.... "जिंदगी कैसी ये पहेली हाssय, कभी ये रुलाये, कभी ये हसाये..."

...फिर कोई याद मेरा रस्ता रोक कर उन हसीन लम्हो में मुझे ले जायेगी, फिर कोई चेहरा मेरे आखोंके सामने आयेगा, फिर किसीका खिलखिलाकर हसना कानो में गुंजेगा, फिर कोई मुझे युंही अकेला छोड कर चला जायेगा, फिर किसी गझल में अपनी याद मुझे दे जायेगा, और मै यादोंकी गेहराई में उनका वाजूत ढुंढता रेह जाऊंगा फिर उनही लाम्हो में खो जाऊंगा इसी तरह वक्त का पैया चालता जायेगा यादे किसीकी किसीको दे जायेगा ख्वाब किसीके तोड जायेगा तो किसीको दिखा जायेगा... वक्त युंही चालता जायेगा...वक्त युंही चालता जायेगा... और हम कहेंगे काश के अब वक्त रुक जाये, दूरिया मिट जाये, ख्वाब पुरे हो जाये... और जिंदगी ऐसीही चालती जाये...

"मै तो जिंदगीका साथ निभाता चला गया, हर फिकर को धुयेंमे उडाता चला गया.....!"

.
© मृदुंग

Sunday, March 10, 2013

निघूनच जावसं वाटत कायमच....!







क्षण...!

निघूनच जावसं वाटत कायमच....!

खरंच इतक दूर निघून जावसं वाटत ना कि परतायचाही रस्ता सापडायला नको, कधी कधी वाटत नात्यांच्या रोजच्याच कटकटीचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष "स्वताचा" लावूनच टाकावासा वाटतो, मनस्थिती इतकी विचलित होते ना कि आपल्या जवळचीच मानस दुखावली जातात अर्थात दुखावण्याचा हेतू नसतो पण परिस्थिती व्यक्तच होत नाही सगळच मग आलबेल होत, आपलं म्हणवनारेही मग हळूच एकट सोडून जातात, एकटच सोडायचं असत शेवटी तर स्वताच्या सहवासाची, आधाराची सवय तरी का लावतात? अन्
जाता-जाता म्हणतात "समजलं काय समजायचं ते" आणि आपण "ठीक आहे" येव्हडच बोलून मार्गाला लागतो जर ऐकून घेणारच नसेल तर का म्हणून तोंड उघडावं? उघडल तरी नडत अन् नाही उघडल तर जरा जास्तच नडत, असो ज्यांना जे कळायचं ते कळाल सोडा आता पुन्हा माघारी ढुंकूनही पाहू नका अस मनात येत...आपलं कोणी मागे राहील नाहीये आपण नसल्यामुळे कोणाच काही अडणार नाहीये, मग इथे थांबण्यात अर्थ काय? जाऊ आपण आपल्याही मार्गाला काही न बोलताच, काही न सांगताच, काही न कळवताच...

.
© मृदुंग