Powered By Blogger

Sunday, June 27, 2021

नैराश्य..!

 .. बितनाऱ्या परिस्थितीतून आणि घटनांमधून आत्महत्येचे पर्याय माणसाच्या समोर येऊन निर्णय होत असावेत. असून चिंता आणि नसून काळजी यात माणसाची जिंदगी घासली जात असल्यावर कुणाचा विचार आणि परिणामांची फिकीर करण्याची इच्छा माणसाला होत नाही एवढं नैराश्य त्याला घट्ट चिकटले असते..!

- ✍ मृदुंग®

 

 



Friday, June 25, 2021

अधिकार..! :-)

 आज गोष्ट अधिकारांची..!


नाण खरं असेल तर त्याच्या दोन्ही बाजूंना किंमतही असते आणि महत्त्वही. खोटं असलेल्या आणि चलनातून बाद झालेल्या नाण्याची अवस्था काय झालीय हे मागील नोटबांदित पहिलेच आहे. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाचे अधिकार प्रत्येकाला असतात. जे अधिकार गाजवतात त्यांना वाटत सगळे अधिकार आपल्याला आहेत. पण जे गप्प राहतात त्यांच्याकडे दिलेले आणि बहाल केलेलं अधिकार काढून घेण्याचे स्वामित्त्व असते. त्यामुळे आपण नात्यांच्या बाजारात आहोत हे लक्षात ठेवायला हवं..!

- ✍ मृदुंग®

 



Wednesday, June 23, 2021

व्याज..! :-)

 प्रत्येक समाजात विविध पद्धती असतात. पण त्या पद्धतींना पद्धतशीरपणा तेव्हाच येतो जेव्हा स्वतःच्या ऐपतीनुसार औदार्य, मान, सन्मान करण्याची इच्छा जाणीव म्हणून निर्माण होते. यथा औकात नसणारे आणि नात्यांना निव्वळ व्यवहार समजणारे व्यापारी पद्धत सांगून "आमच्याकडे अशी पद्धत नाही", घोकत राहतात. त्यांच्यासोबत नातं जुळत ते व्यवहार म्हणून! अपेक्षा, आपुलकी आणि माणुसकी व्यवहारात नसते. अशा व्यवहारात काही असते तर ते परतफेड होणारे व्याज..!

- ✍ मृदुंग®


#lifelessons #relationships #maturity #immunity #tonic #titfortat