Powered By Blogger

Wednesday, February 25, 2015

नाटक : गुलमोहर..! (प्रवेश पहिला) :-)


♥ क्षण..! ♥

नाटक : गुलमोहर..! (प्रवेश पहिला)

{ सध्यातरी 'तो' आणि 'ती' म्हणूया. पुढे-पुढे दोघांचा जसं-जस्सा रंग चढेल, रंगतदार पात्रांची त्यांच्याच कडून मांडणी होईल..!}

मध्यम वर्गीय उच्च 'भृ' वस्तितले एक घर. 'तो' आणि 'ती', "नुसता पसारा कसा आवडतो तुला?" बडबडत(पुटपुटत) 'ती' बेडरुमचा दार उघडून दिवान-खाण्यात (हॉल मध्ये) येऊ लागते. 'तो' सुद्धा तिच्या मागे-मागे घुटमळतो. ती बैठकावरची (सोफ्यावरची) उशी व्यवस्थीत करते. तो पुन्हा पसरवतो. इकडे-तिकडे विखुरलेला वर्तमानपत्र एकत्र करुन 'ती' बैठकावर आसनस्थ होते. पसरवलेल्या उशीला पाहून रागाने त्याच्याकडे पाहाते (रोखून).
'तो' उशी निट करुन तिच्या पुढ्यात धप्पकण बसतो. 'ती' बसल्या-बसल्या टि-प्वॉयवर जमलेला सगळा पसारा आवरून स्वस्थ बसते. 'तो' तिला न्याहाळत शांत 'गुणी बाळ' बणून बसला असतो..!

ती : (त्याच्याकडे न पाहाता) चहा घेणार..?
तो : (होकारात) मान वर-खाली करतो.
ती : (त्याच्याकडे न पाहाता किंतू आवाज चढवून) चहा घेणार आहेस का..?
तो : (पुन्हा मुद्दाम, होकारात) मान वर-खाली करतो.
ती : (चिडून वैतागलेल्या अवस्थेत) चहाss..
तो : (सावरून..! मध्येच तिचे वाक्य तोडत) होs! हो! घेईल.
ती : मांडून ठेवलाय मी गॅसवर. जाऊन कपात ओतून आण. तुझ्यासाठीही आणि माझ्यासाठीही. स्वस्थ बसते.
तो : (पाय आपटत ओठातल्या ओठात पुटपुटत जावू लागतो) बायकोशी कुठलाच नवरा जिंकू शकत नाही..!

(फोन वाजतो 'ती' घेते) हॅल्लो..(ऐकते) हॅल्लो मॅ'म टाटा स्काय मधून सुप्रीया बोलतेय. हा क्रमांक कुलकर्णींचाच आहे ना? आपण आमचे जुणे ग्राहक आहात. आपण उपभोगत असलेल्या सेवेत काही अडचन तर नाही ना? या संदर्भात हा कॉल केला गेलाय..? (ती दिर्घ श्वास घेऊन सोडते) नाही काही अडचन नाही. फोन करुन विचारल्या बद्दल धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो, क्रेडल फोनवर आपटते.
'तो' चहाचे कप घेऊन येतो. तिला अजुन वैतागलेले बघून गालात हसतो. स्वत:चा कप घेऊन तसाच तिच्यासमोर बसतो. कपातल्या चहाचा झुरका घेतो. ( ती तो आवाज ऐकून) हातातला पेपर त्याला फेकून मारते.
ती : शिssss कसलेही घाणेरडे आवाज काढू नकोस.
तो : (हसतो),कुणाचा फोन होता? (विचारतो)
ती : (सांगते) टाटा स्काय वालीचा होता. (चहाचा घोट घेते) सुविधेपासून संतुष्ट आहात का विचारत होती.
तो : होतीssss! 'ति' होती का? श्याsss! पुन्हा चान्स गेला. (चुळबुळतो जागेवर)
ती : हम्म्मम..!
तो : तू मुद्दाम पाठवलेस ना मला चहा गाळायला? तुझ्यामुळेच चान्स गेला. लग्न झाले तेव्हा पासून कोणी विचारले नाही. बायको नावाच्या सुविधेपासून नवरा म्हणून तू संतुष्ट आहेस का? निदान ते टाटा स्काय वाले तरी विचारतात बघ. जळतेस तू, नाही सहन होत नवर्याचे पर'स्त्री बरोबर बोलणे. तुम्ही बायका असताच संशयी, चुगलखोर आणिsss...

ती : (रागाने) उगाच (फोनकडे पाहात) एका बाईसाठी सगळ्या बायकांचा उद्धार करायलाच हवाय का? एकट्या बायकोशी स्पष्टपणे बोलायचे धाडस नाहीच ना! म्हणून सगळ्या नवरोबांच्यावतिने (प्रेक्षकांत अर्थपुर्ण नजर फेरून) हा नवरोबा, एकट्या बायकोला सगळ्या बायकांबद्दल सांगतोय. वाs! शोभत नाही हां..!
तो : (नरमतो, तोंड वाकडे करतो) बायको नवर्याला फार बोलू देत नसते.
ती : (उसळते) नवरा फाजील जास्त बोलतो म्हणून बायको त्याला गप्पच ठेवणे योग्य समजते.
तो : (हतबल! कप ठेवून वर्तमान पत्रात काही तरी शोधू लागतो,) नाही सापडत आहे. कुठे गेल काय माहित? (पेपर आपटून गप्प गुमान तिला बघत बसतो.)
ती : पेपरात पुढची ओळ सापडली नाही वाटत. (त्याच्याकडे बघते)
तो : (दोन्ही हात गालावर ठेवून डोळे वटारून तिला बघत असतो)
ती : (त्याला पाहून) खुप गोड दिसतंय पिल्लू (खळखळून हसते).
तो : पिल्लू..? (प्रश्नचिन्ह) आजवर या नावाने मला कधी संबोधले नाहीस तू. 'बाळ' या नावाच्या पुढची श्रेणी आहे का ही पिल्लू..?
ती : गंभीर होते. सॉरी म्हणते..चहाचे कप उचलून लगबगीने किचन मध्ये पळ काढते.
तो : (पुन्हा पेपर उचलून एक ओळ वाचतो) "भुतकाळाच्या आठवणी तुमच्या नकळत ओठांवर येतात."
ती : फ्रेश होऊन येते. त्याच्या पुढ्यात बसते.
तो : (पेपर बाजुला ठेवतो. तिच्याकडे रोखुन बघत एकदम विचारतो) 'हा पिल्लू म्हणजे तुझा "मंदार" ना.?'
ती : (पदराशी चाळा करत) हो..!
तो : धक्का बसल्यागत शुन्यात हरवतो.
ती : (पदराशी चाळा करत सैरभैर होते.) बोल ना बाळा, काय झाल? अस्स काय करतो? (जवळ जाऊन हातात हात घेते.)
तो : (तिचे हात झिडकारून उठून उभा राहातो. दोन पाऊले समोर येतो. पाठमोरंच तिला विचारतो.) आपलं नातं पवित्र आहे ना? नक्की प्रामाणिक आहेस ना तू या नात्याशी? (खोल आवाजात) माझ्याशी? या घराशी? या घरातल्या छोट्याश्या संसाराशी..?
ती : गप्प..! शुन्यात हरवलेली.
तो : अंधारात..!
(परदा पडतो)
क्रमश:
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
+91-7387922843

Monday, February 23, 2015

मागची पाने..! :-)


♥ क्षण..! ♥

मागची पाने..!

कधी-कधी मागची पाने उलटून बघायचे. पुढे-पुढे धावत जाणारे आयुष्य; जगणे कसे झाले स्वत:लाच कळू द्यायचे. कधी-काय-कशी-केव्हा-का-कशाला? आज पुढच्या पानावर उमटत नाही. मागच्या पानांवर मात्र सगळे आहे. मागच्या त्या पानांमुळेच पुढच्या पानाला अर्थ आहे. पण! मागच्या पानावर काय आहे त्यावर मात्र पुढच्या पानाचे भवितव्य आहे..!

आठवणे असेल कि भेटणे असेल? तुटणे असेल कि जोडणे असेल? आवरणे असेल कि सावरणे असेल? गुंतणे असेल कि मोकळे सुटणे असेल? बोलणे असेल कि एकचित्त होऊन ऐकणे असेल? सुख असेल कि दु:ख असेल? कसलाच पुरावा नाही काय आहे मागच्या पानावर. पण मागे एक पान आहे. त्या पानावर आयुष्याच्या वेळेचा अथवा उपभोगलेल्या क्षणांचा बंदिस्त शब्दात कोरीव कालखंड आहे..!

पुढे आल्यावर मागे असतेच काही तरी. खरे तर मागे असायलाच हवे काही तरी. पुढे आलोय याची पण स्वत:शीच खात्री करावी लागते. मागे पुन्हा जाणे होत नाही. जाणे झालेच तर फार काळ मन तिथे रेंगाळत नाही. पुढे असलेला वास्तव त्याचे अस्तित्व उमटवून ठेवायला मागून पुढे ढकलत आणतो. शाबूत अवस्थेत कसलीच धुंदी असत नाही..!

मागच्या त्या पानावर तरी बोटे फिरवावी वाटतात. प्रियकराणे दिलेल्या गुलाबाला प्रेयसी जशी हळूवार कुरवाळते-गोंजारते तसेच त्या मागच्या पानांसोबत करावे वाटते. छान असेल म्हणून किंवा वाईट असेल म्हणून नव्हे, तर 'ते माझ्याच आयुष्याचे एक अस्तित्व आहे म्हणून'..!

पुढे जाऊनही मागे रेंगाळणा-या पावलांत कोसळावे किती? मागच्या संदर्भांचा आधार घेऊन विस्कटलेलं आयुष्य सावरावे किती? सतत मागे-मागेच राहाणारे मन एकदम पुढे तरी किती लोटावे? मागच्या पानांवर असलेल्या जखमांची खपली ओढून पुढचे कोरे पान रक्तरंजित वेदनांच्या सोहळ्यानी सजवावे किती..?

मागे राहिलेलं-झालेलं-केलेलं-अनुभवलेलं पुन्हा पुढच्या पानावर आणून ठेवावे कशाला? जगणे सोपे व्हावे उद्देश जरी असला तरी पण मागचा आढावा श्वासांचा अजुनच कोंडमारा करतो. थोड फार ठीक असलेलंही मग आलबेलच्यापलिकडे गेलेलं असते. स्वत:वर नियंत्रण ठेवणे मग जमवायचे कसे?

ति-हाईत होऊन मागच्या पानांचा तिरस्कार करावा तर ते ही शक्य नाही. क्षणभर डोळे मिटून ती धुळ झटकून टाकावी तर मळभ म्हणून मनावर चिकटलेले त्या धुळीचे कण स्वत:चे अस्तित्व विसरत नाही. आयुष्याची चुक म्हणून ते व्रण तसेच राहातात. पुढे पाने वाढत जातात आणि नशिबाच्या पुला खालून बरेच पाणी वाहून जाते. सल म्हणून राहिलेली मागची पाने तशीच असतात वाट बघत. शब्दांवर धुळीचे थरांवर थर रचत. उलघडून देखील आयुष्य एक कोडंच ठेवत. मागच्या पानावर त्या प्रत्येक पुढच्या पानाचे उत्तर घेऊन अलिप्त-दुर्लक्षीत..!
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Thursday, February 19, 2015

आठवणीची कळ(बटन)..! :-)


♥ क्षण..! ♥

आठवणीची कळ(बटन)..!

कुणाची आठवण नावाची कळ कधी दाबू नये... अडकलेल्या CD सारखी स्वत:ची गत होऊन तिथल्या तिथे तेच-तेच हसर्या ओठांनी पाहावे लागते... इथे कंटाळा आला तरी कुणाला तुमची पर्वा नसते..!------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Wednesday, February 18, 2015

आज-काल..! :-)


♥ क्षण..! ♥

आज-काल..!

तस्सं! दिसायला सगळेच किती छान दिसतंय...रात्रीच्या नभावर विखुरलेलं चांदणं, मंद लहरीत अंगावर रेंगाळणारा वारा, लुकलुकत्या चांदण्यात अलगद किनारी आलेली लाट आणि हळूवार कानांनी टिपलेलं खळखळणे ते पाण्याचे कि, ही चाहूल तुझ्या भासाची..?

छेs! स्वप्नं असेल किंवा भासच. चेष्टा करण्याची सवय तुला आता राहिली नाही. ठरवलेस तरी आणि ठरले तरी पुन्हा उनाड वारं होणं तुला जमायचे नाही. मला कस्सं ठाऊक? माझ्याशिवाय तुझ्याबद्दल तुला तरी कुठे ठाऊक आहे?  बस्सं! शब्दात पकड पण मिठीत घेऊ नकोस..!

ओठांना शिवन ओठांची, पावलांना चौकट मर्यादेची आणिss तुलाच पर्वा जगाची! जवळ येऊन बसू का? परवांगी मागतेय. अनुमती द्यायच्या आधीच हक्क गाजवून मोकळी होतेस. अजुन कशासाठी ही औपचारिक्ता सगळे ठाऊक असतांना? अस्संच तुला त्रास द्यायला..!

माझे उत्तर तुला तोंडपाठ असतांना त्रास आणि मला? खरा तर तणाव तुझ्या मुखावर आहे बघ जरा. पुरेss! जावू का मी निघून? जातांना दार बंद करुन जा. परत तुलाही यायला जमू नये अस्सं! बोलवलेस तरी येणार नाही बघून घेs! पाठमोरं उभं राहूनही डोळ्यासमोर तोच एक चेहरा शास्वत म्हणून कायम असल्यावर पुन्हा बघण्याचा मोह कितीसा उरतो..?

अंगणात अबोलीची शांतता रेंगाळते. प्राजक्त वेचतांना ते गुणगुणनं कानी पडते. उनाडतो मध्येच वारा पानांवर अन् त्याच पानांच्या सळसळण्यात बंद ओठांवर आज-काल तुझे नाव येऊन थांबते. होs का? होs! तर. एव्हढं कल्पणेत जगणं शोभत नाही हं. बेढब ढोबळपणा खटकला हेच खुप झालं..!

प्रत्येक प्रश्नाच उत्तर तयारच. उत्तर तयारच नाही समोर हजरच. असे किती काळ चालायचे अजुन? खिडकीत उभे राहून शुन्य नजरेने मला बघणे? हे तू एकदा स्वत:लाच विचार. माझा उंबरठा ओलांडून अंगणातली रातराणी बनने तू का पसंत केलेस? बस्सं! उत्तर नसलेला एक प्रश्न विचारला कि, तू आपली गप्प होतेस आजकाल. उत्तरासाठी फार मागे लागणे मलाही इष्ट वाटत नाही मग आजकाल. माझा आजही हा अस्साच आहे आणि माझा कालही अस्साच आहे. आज-काल कस्सं काय चालूये मग?? विचारलेसच तर 'एकदम मस्त..!'
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Sunday, February 15, 2015

तेव्हा..! :-)


♥ क्षण..! ♥

तेव्हा..!

ओघळले या डोळ्यांतून अशृ जेव्हा
डोळे पुसायला का हाते आली तेव्हा,

कधी विचारत नव्हते कुणी प्रेताला
चितेवर न्यायला का खांदे आली तेव्हा,(!)

टाळत होती जी लोकं मला नजरेने
सावरत आक्रोश का सोबत आली तेव्हा,

विव्हळलो होतो मी असह्य वेदनांनी
यातनांना माझ्या का ओठे हसली तेव्हा,(!)

मुखावर होती माझी खरी स्मित रेषा
पडताळले मुखवटे का असली-नकली तेव्हा,

खुशाल निजलो नेसून प्रेत-वस्त्रे मी
मोकळ्या श्वासांची का आठवण झाली तेव्हा,(!)

जगले असते शब्दातही अबोल क्षण
कोरी का'गदे चुगली लावत आली तेव्हा,

अ'न्याय कसला करू मी गुन्ह्यावर
न्यायाने मोबदले का देण्यात आली तेव्हा..(!)
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Wednesday, February 11, 2015

माझेच होते..! :-)


♥ क्षण..! ♥

माझेच होते..!

रुतलेले मनात शब्द माझेच होते
नेसुन कागदात वस्त्र साधेच होते,

घेऊन अभंगात मी कृष्णाचे नाव
ऐकलेले कानांनी फक्त राधेच होते,(!)

ठेवली माझ्यापासून मी दुर अंतरे
स्मशानापर्यंत दुखवले सांधेच होते,

भरलेला वेदनेचा कुंभमेळा मनात
आसवांची ओंजळीत ठेचाठेच होते,(!)

तुझे-माझे काही स्वप्ने पाहातांना
नशिबाची हृदयाशी रस्सिखेच होते,

चल राहू देतो आता जैसे थे मला
परत जगायला आयुष्य हेच होते,(!)

ना गेलो मी माझ्या चौकटी बाहेर
हे पाऊले ओढणारे आप'लेच होते,

ना ठेवले पाऊल मी उंबरठ्यात
उलगडून देखील माझे कोडेच होते,(!)
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Sunday, February 8, 2015

प्रपोज..! :-)


♥ क्षण..! ♥

प्रपोज..!

कळत तिलाही नाही
कळवत मी ही नाही,
सांगणे का असच होत..?

समजत तिलाही नाही
समजवत मी ही नाही,
कळणे का असच होत..?

बोलत ती ही नाही
बोलवत मलाही नाही,
प्रेम का असच असत..?

प्रेम करत ती ही नाही
प्रेम करत मी ही नाही,
म्हणनं मग काय उरत..?
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Sunday, February 1, 2015

रिफिल-रि-फिल-रिफील..! :-)


♥ क्षण..! ♥

रिफिल-रि-फिल-रिफील..!

रिफिल या शब्दाचा अर्थ मला आजवर निटसा कळला नाही. पेनात(लेखणीत) असते ती रिफिल रि-फिल न होता बदलली जाते. त्याच पार्श्वभुमीवर मग एकदा मनात दाटून आलेली आणि मनातून ओसरून गेलेली भावना-संवेदना-वेदना-कणवं-प्रेम मला पुन्हा माझ्यात रि-फील करता आले नाही. अथवा या सगळ्याला अपवाद म्हणून समज-गैरसमजाच्या विलोभनिय जंजाळातून स्वत:ला अलिप्त मला करता आले नाही. दृष्टीकोण बदलायचा भलेही फुकटचा सल्ला किरकोळ 'स्व' भावाने देऊनही बरबाद झाल्या आयुष्याला पुर्ववत किंवा नव्या वळणावर मला स्वत:लाच स्वत:च्या स्वाधीन नव्हे आधीन करता आले नाही.

"ना मी ऋतू होतो, ना लहरी वादळ". एक पर्याय म्हणून स्वत:लाच निवडायची माझी ऐपत नव्हती. जाहिर दर्शवलेली दयनिय अवस्था माझी स्वत:चीच आहे मला स्वत:ला मान्य असुनही माझ्या या दाव्यावर आक्षेप नोंदवलेल्या 'भाकड लोक चर्चेला' थांबवता मला आले नाही. तू-तुझ्यासारखे बरेच असतील या दुनियेत एक तुच नाही. माझ्या असलेल्या दुनियेवरही हुकूमत माझी चालली नाही.

रिफिल - पुन्हा अनुभव सारेच एकदा काय बिघडलेय? का..? कशाला..? स्वार्थाच्या प्रलोभनांची भुरळ झटकून श्वास घेणं जमायला लागल्यावर पुन्हा एकदा त्याच वाटेवर स्वत:चे पाऊल ठेवायला 'लाज' स्वत:चीच वाटत असेल तर असा फाजिलपणा पुन्हा-पुन्हा करावा कशाला..?

झुगारलेय हो! स्पष्टपणे रोख-ठोक मोलभाव न करता म्हणेल त्या किम्मतीवर पुन्हा या आयुष्याचा सौदा करणे मला पटत नाही. गरज आहे म्हणून पुन्हा एक संधी कशाला म्हणून द्यावी? ती सुद्धा दुनियेसाठी? अरे हट! काही एक अर्थ नाहीये या रिफिल- रि-फिल-रिफीलचा..!
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com