Powered By Blogger

Monday, February 13, 2017

अंबाड्यातली एक... :)


♥ क्षण ♥

अंबाड्यातली एक...

तिने कातिल अदांनी स्वतःच्या केसांच्या बांधलेल्या अंबाड्यात. माझ्या हृदयाची स्पंदने गुंतली आहेत. ती केस मोकळे सोडत नाही. मी स्पष्ट बोलून दाखवत नाही. तिचं जगणं होतं. माझं अजूनही गुदमरनंच होत आहे. समजण्याचा अवधी नजरेने काय कृतीनेही देऊ केला. ती वेंधळी समजते हा अंबाडा मला खूप आवडला. कुणी सांगा जरा तिला "केसांनी गळा घोटला आठवून द्या". अन्यथा नव्हतो माझा मी तेव्हाही आताही. थोडा माझा मी तेवढा तरी मोकळा सोडून दे म्हणावं..!
(अंबाड्यातली एक लिख किंवा उ)
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, February 2, 2017

मर्यादा ओलांडून..! :)


♥ क्षण..! ♥

मर्यादा ओलांडून..!

चालढकल करण्यात दिवस तर जातो. रात्रीच मात्र काय करायचं कळत नाही. कुशिवरून कुशी बदलते आणि उशी भिजते. बेमोसमी पावसाचे ढग वर्दी देत नाहीत. कळत असत पण वळत नसतं. पावलांनी संथ चालतांना मन वेगात पळत सुटत. अंतर अजून वाढतात...
अंतर अजून वाढतात उत्तर नंतर सांगू म्हणत टाळली जातात. वेळ शतपावली करत असते आणि मध्यरात्री दाराशी पैंजणे रुणझुणतात. शब्द मुके होऊन डोळ्यांच्या काठाशी धुके दाटली असतात. अंधुक दिसत असतं. कोणीतरी उभे आहे वाटतं. ओळख मात्र होतं नसते व ती पटत सुद्धा नसते. कसं बसं धाडस करून दार गाठल्यावर दरवाज्यात स्वतःशिवाय कोणीच नसते. पुन्हा पाठ फिरवून अंथरून पाहिल्यावर...
पुन्हा पाठ फिरवून अंथरून पाहिल्यावर चादरसुद्धा चुरगाळली नसते. पाठीमागेच दार सहज बंद होऊन जातं. पावले खिडकीशी येऊन मग थांबतात. मंद वाऱ्याने उडणारी परदे हातात धरुन; कितीतरी आठवणी मुठीतून निसटल्या असतात. बरीच स्वप्ने बेचिराख झालेली असतात. तरीही असंही अन् तसंही जगण्याचा कायदा मोडला गेलेला नसतो. पापण्यांची कवाडं झुगारुन मात्र साधा अश्रू मर्यादा ओलांडून गेलेला असतो..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३