Powered By Blogger

Friday, November 21, 2014

22/11/2011 ते 22/11/2014..!


♥ क्षण..! ♥

22/11/2011 ते 22/11/2014

गेल्या तिन वर्षात बराच काळ लोटलाय...घडामोडीही बर्याच वेगात घडल्या आहेत...परिणाम स्वरुप बदल देखील दृष्टीपथात आहे...तरीही वाटते कुठे तरी आहे तसेच आहे सगळे...जस्से होते तस्सेच आहे...पण येणारा काळ नाविन्य घेवून येणारा असतो म्हणतात...अजुन वेगळं पण सगळं सारखच काही असते ना...अगदी तसेच...हा आज आहे...हाच तो उद्याही आहे...पुढे-पुढे सरणारा...या कालखंडात झालेल्या जखमेपासून असह्य वेदनेचा एक वेगळाच भाग तयार झालाय...कदाचित काही गोष्टी टाळता येणे शक्य नसतात म्हणतात...म्हणून त्यांना स्विकारावे लागते...आणि त्यांच्या सोबतच पुढे चालत राहावे लागते...मागे वळून नजर जातेच हो...पण तोवर आपल्यावर रोखलेली नजर, सावरुन अलिप्त आणि लुप्त झालेली असते...अर्थात यात कुणाचा दोष आहे किंवा नाही माहित नाही...पण निर्दोषही कुणी नाही एव्हढे नक्कीच..."क्षण" या सदराचा हा तिसरा वार्षीक सोहळा...हे सदर सुरु करुन आज कुठवर आलेय? आणि कुठवर पोहोचून उभे राहिलेय? या अहंकारी वृत्तीत नक्कीच गुरफटणार नाही...आपणा सर्वांचे या शब्दांवर प्रेम असेच अबाधीत राहो...मला माहित आहे माझ्या पुढच्या वाटचालीचा काय विचार आहे? हा प्रश्न मी इथे उत्तर देवून सोडवायला हवा...परंतू ठरवून कुठे काही करता येते? काही गोष्टी गुलदस्त्यातून एकदम बाहेर येवून संभ्रमात टाकतात...भ्रम-संभ्रम आजही माझ्या बाबद बरेच आहेत...पण मी ते अजुन तरी दुर नाही करणार...थोडक्यात असे कि, आजवर होते तसेच पुढे चालत राहिल...बाकी अपेक्षा/सुप्त इच्छा माझी काहीच नाही...तुमचे शब्द प्रेम असेच भर-भरुन (फक्त)माझ्या शब्दांवर ठेवा...आपणा सगळ्यांचा व्यक्तिगत-व्यक्तिश: आभारी आहे..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Thursday, November 13, 2014

बाहूली..! (बालदिना निमित्त..!) :-)


♥ क्षण..! ♥

बाहूली..! (बालदिना निमित्त..!)

राजरोस अंगनात ती भातुकली खेळायची
टकामका बघत इटुकली बाहुली सजवायची,

बाहूला बघून कौतुक ती बाहूलीचे करायची
थाटा-माटात बाहूलीचे लग्न लावून द्यायची,

पंगत बसल्यावर ती बाहूलीला बिलगायची
बाहूली का बंर जाते घर सोडून विचारायची,

मुकी बाहूली काहीच नाही मग बोलायची
बोलेल बाहूला काही म्हणून ती तरसायची,

कधी पुढे-पुढे कधी मागे-मागे असायची
सावली म्हणत स्वत:लाच वेल असायची,

चौकटीत अडखळले पाऊले जे घराची
उभे वृंदावन ते पैंजणांतच रुणझुणायची..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Wednesday, November 12, 2014

लिहायला घेवू नये ! :-)


♥ क्षण..! ♥

लिहायला घेवू नये..!

लिखाणाच कसं असतं? स्वत:ला येत असल्यावर इतरांच लिहिणे तुच्छ वाटतं. इतरांनी लिहिलेल्या पानभरातलं एखाद दुसरीच ओळ आवडते. त्यातल्या त्यात स्वत:च लेखक असल्यावर, स्वत:च्या मनाचा न शब्दांच्या रतिबाची घरंदाज ओळख झालेली असते. वाचायची आवड असते पण समोर असलेला किंवा आलेला शब्दांचा ढाचा कंटाळवाना वाटतो. वेगळं शोधण्याचा प्रयत्न केला तर काही एक वाचनेबल नसतेच. सुरुवातीची ओळ वाचताच पुढच्या ओळीचा अंदाज लागतो. वाचायची भुख तर सपाटून लागली असते. पण..!  हवे तसे व्यंजन पुढ्यात येत नाही. शोध सुरु असतो इथून तिथून पाने बदलायचा. पण संदर्भ बदललेलेच नसतात तर पान बदलून काय मिळणार आहे? या उपर स्वत:चाच विचार केला तर या व्यतिरिक्त अजुन वेगळं चविष्ट इतर जावू द्या स्वत:च लिहायला बसल्यावर कागद-शब्द-प्रसंग-वेळ सगळेच अवसान गळून बसतात मग कुणाला काही बोलावे किंवा कुणाचे काही ऐकून घ्यावे हा निव्वळ टाईम पास अन् विषयांतर..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, November 10, 2014

दुतर्फा..! :-)


♥ क्षण..! ♥

दुतर्फा..!

तिला कळत नव्हतं. त्याला कळून वळत नव्हतं. साध गणित एकमेकांच जुळत नव्हतं. आयुष्याच्या गाडीचे दोन चाके वेग-वेगळे धावत राहिले. जगण्याचा वेग होता पण आवेग नव्हता. कुठे थांबावे असा विसावा नव्हता. कदाचित पावसानंतरचा ओलावा हरवला होता. सुखाची वृष्टी मग झालीच नाही. दु:खाची दृष्टी बदललीच नाही. एका मागून एक नुसते वाद. पाठमोर्या आकृतींचे मुके संवाद. लुडबूड करायला काही एक उरलंच नाही. सोबत प्रवास केल्या नंतर, सहवासाचा-उपभोगाचा संपुष्टात आलेला व्यवहारच होता तो दुतर्फा..!
--------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, November 4, 2014

मेडिसिन्स..! :-)


♥ क्षण..! ♥

मेडिसिन्स..!

निघालो जेव्हा प्रवासाला
थोडी फार केली होती चिल्लर
दुखले जर डोके किंवा अंग
सोबत ठेवली होती पेनकिलर

वाटेत वाढली थोडी शुगर
दिमतीला होती मेट्सोफ्लेम
तुटलं अंग-अंग जेव्हा सारं
आठवली होती कॉम्बीफ्लेम

ठणकून निघाले हे डोके
नजरेसमोर फिरली सॅरेडॉन
वाटेत झाली जी ॲसेडीटी
इनो ऑन ॲसेडिटी गॉन..!
--------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, November 3, 2014

आठवणीतली पाने..! :-)


♥ क्षण..! ♥

आठवणीतली पाने..!

आज पुन्हा मागची काही पाने उलटली. कुठे कोमेजलेला गुलाब तर कुठे गंधाळलेल्या प्राजक्ताची फुले भेटली. अगदी तस्संच्या तस्सं वाक्यात उमटलेलं. जगणं होतं एका काळाचे ते नजरेसमोर आलेलं. काळोख पिवून उजेडाणे त्याचे अस्तित्व सांगावे तसेच रातराणीचे लुभावणे होते.
गुलमोहराचे वठून जाणे, मोगर्याचे बाधीत असणे. ओंजळीतल्या चाफ्यात मग दोन अशृंचे ताफेही नसणे. प्रत्येक शेवटा नंतर सुरुवात वेगळीच होते कदाचित..! ऋतू नसतांना श्रावण आठवतो. भर दिवसाच्या उजेडात काळोख हवाहवासा वाटतो. गत काळाच्या स्मृती तजेल होवून, परिस्थितीचे मापदंड आलबेल होतात. चौकटीतल्या नियमांचा आधार घ्यावा तर प्रेमाची समिकरणे चुकीची वाटतात.
नजरेच्या कक्षेत येणारा प्रत्येक शब्द कागदाचा गुलाम झालेला दिसतो. आठवणींचे हळवे वादळ दिशाहीन सैरभैर झालेला उरतो. प्रभावी वाटण्याखेरीज उधारीची खेळ गम्मत भासतो. मोबदल्यात मग प्रत्येक नात्याची मांडणी होते. स्वत:साठी काही एक शिल्लक न ठेवता स्वप्नांची वाटणी होते. कुठल्या त्या एका पानावर स्थिर उभे राहून बिथरणे होते..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com