Powered By Blogger

Monday, October 13, 2014

आयुष्य गुलजार आहे..!(3) :-)


♥ क्षण..! ♥

आयुष्य गुलजार आहे..!(3)

सैपाकाच्या खोलीत तिची तारेवरची कसरत सुरु होती. मुलांच दुध, त्याचा नाष्ता नंतर जेवणाची रोजचीच उठाठेव चालली होती. विना तक्रार अगदी आनंदाने कसलीच पोकळीक जाणवत नव्हती. संसारात काही कमी पडतंय तिच्या मनातही येत नव्हतं..!
दोन-तिन वर्षाच्या संसारात उत्कृष्ट बायको-सुन-गृहिणी नंतर आई या पदवीचा अभ्यासक्रम सुरळीत सुरु होता. भरल्या घरात सुखाचे दुध अगदी उतू जात होतं. घराला फक्त चार भिंती असतात पण त्या चार भिंतीना घर म्हणायला आणि बनवायला आपली माणसे लागतात..!
दैनंदिन प्रमाणे तिचे पाक गृहात हसत मुखाणे गुणगुणत राबणे सुरु असते. तो त्याचे नित्याक्रम आवरुन ऑफिससाठी तयार होवून डायनिंगवर विराजमान होतो. समोर तिनेच आणून ठेवलेला पेपर उचलत एक नजर तिला पाठमोरीच न्याहाळून घेतो. बातम्यांची हेडलाईन बघत असतो आणि तिचा स्वर उमटतो.
"जेवन तयार आहे वाढू गरम-गरम?" जरासा पेपर बाजुला करुन घड्याळात वेळ बघत हं! वाढ बोलुन त्याच-त्याच बातम्या म्हणून पेपर बाजुला ठेवून बडबडत बसतो. कधी सुधरणार लोकं काय माहिती. तो त्याच्या तालात असतो. ती तिच्या गुणगुणन्यात तव्यावरुन गरम पोळी ताटात ठेवून त्याचे ताट वाढून देते. ताट वाढून पुन्हा त्याची पोळी संपण्या आधी, दुसर्या पोळीला लाटायला घेण्याची तिची चुणचुणीत लगबग असते. अर्ध्या पोळीचा आस्वाद घेवून, 'भाजी छान झालीये' एव्हढी दाद त्याच्या कडून येई पर्यंत तिची दुसरी पोळी तव्यावर ठेवली जाते.
कधी नव्हे ते सहज जेवता-जेवता तिचे निरिक्षण सुरु होते. तापलेल्या तव्यावरची पोळी पलटवतांना, तव्याचे तिच्या बोटांना बसलेले चटके, तिच्या मुखाच्याच हलक्या फुंकरवर, स्वत:चा पराभव स्विकारतांना दिसतात. कधी जास्तच वाफ आली तर बोटांचे झटकणे न मुखातून स्स्स करत फुक मारुन क्षणभर थांबलेलं गुणगुणने पुन्हा सुरु होते.
तो तिला पाहातोय तिला माहित नसतं. तिची दुसरी पोळी त्याच्या ताटात वाढायची आहे. या आपल्याच तंद्रीत ती पोळी घेवून, त्याला हवं नको पाहात पोळी ताटात वाढून पुन्हा माघारी वळते. तिसर्या पोळीलाही स्स्स करत फुक मारुन पुन्हा गुणगुणने...चौथ्या पोळीलाही तसेच... त्याच्या विचारांच्या अंदाजानुसार, आजवर केलेल्या प्रत्येक पोळीसाठी एव्हढे चटके तिला तव्याने दिले असावे निष्कर्श त्याचा निघतो. आजवर साल! तिचा हात बघतांना मग बोटांवर व्रण-डाग किंवा हात भाजला कुरबुर करतांना दिसली कशी नाही..?
आताही भाजलं असेल पण मुखावर एक रेष नाही. तिच्या जवळ येण्याची संधी साधत तिच्या हाताची बोटेही दोन नाही चार वेळा निरखून बघतो. काहीच नाही तशीच मऊ मखमली असतात. ती संभ्रमात अचानक काय झाले? काय बघतोय हातावर? काही न कळून ती विचारतेच..!
तो जागेवरुन उठतो तव्यावरुन हात फिरवत त्याच्या तापमानाचा अंदाज घेतो. अनोळखी अतिक्रमण म्हणून तवाही त्याला इंगा दाखवतो न त्याचा हात भाजतो. आई-आऊच! ती लागलीच जवळ येते न थंड पाण्याखाली त्याचा हात धरते. काय चाललेय तुझे? मुर्ख-बावळट आहेस का? हसणार नाहीस ना तर सांगतो..!
हम्म! बघू सांगा आधी. झाला प्रकार तो तिला कसं न कुसं तोंड करत सांगतो. सरते शेवटी बघुया सहज हात फिरवून तव्यावर म्हणून फिरवला तर भाजला. रोज तुझा नाही भाजता आला तव्याला म्हणून, माझा हात भाजून तव्याने त्याचा गुणधर्म पाळत, थोडा काळपट रंगही चटक्या स्वरुपात मला दिला. हे बघ! हे बघ! हे बघ! अर्रर्रर्रर्रर्र, अवघड आहे तुला समजुन घेवून सांभाळणं. वेडी होवून त्याची ती हसत सुटते. हसू नकोस म्हणून तो खोटा रुसुन बसतो. त्याचे ते उतरलेलं तोंड पाहून तिचे हसणे अजुन खळखळून वाहात भिंतीत रुतत राहाते. जा आता काही सांगणार नाही म्हणत लेकरासारखा तो वागू लागतो. तिचे हसणे सुरुच असते न त्या दोघांची चिमुरडी धावत येते. चिमुरडीला अलवार उचलून तिला तो खोट-खोट दटावू लागतो. तिला तिचे हसणे थांबवणे शक्य नसते. मोकळे हास्य पसरुन ती दोघांच्या जवळ येते. लज्जा घेवून नजरेत पापण्यांचे झुकते माप होते. त्याला वाटणारी आणि असणारी तिची काळजी अशीच व्यक्त होते. क्षण-दोन क्षण ऐकमेकांच्या नजरेत हरवले असतांना चिमुरडीचे तोतळे बोल भिंतीत रुततात. "आयुछ्य गुलदार आहे" ही ही ही ही..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment