Powered By Blogger

Wednesday, February 18, 2015

आज-काल..! :-)


♥ क्षण..! ♥

आज-काल..!

तस्सं! दिसायला सगळेच किती छान दिसतंय...रात्रीच्या नभावर विखुरलेलं चांदणं, मंद लहरीत अंगावर रेंगाळणारा वारा, लुकलुकत्या चांदण्यात अलगद किनारी आलेली लाट आणि हळूवार कानांनी टिपलेलं खळखळणे ते पाण्याचे कि, ही चाहूल तुझ्या भासाची..?

छेs! स्वप्नं असेल किंवा भासच. चेष्टा करण्याची सवय तुला आता राहिली नाही. ठरवलेस तरी आणि ठरले तरी पुन्हा उनाड वारं होणं तुला जमायचे नाही. मला कस्सं ठाऊक? माझ्याशिवाय तुझ्याबद्दल तुला तरी कुठे ठाऊक आहे?  बस्सं! शब्दात पकड पण मिठीत घेऊ नकोस..!

ओठांना शिवन ओठांची, पावलांना चौकट मर्यादेची आणिss तुलाच पर्वा जगाची! जवळ येऊन बसू का? परवांगी मागतेय. अनुमती द्यायच्या आधीच हक्क गाजवून मोकळी होतेस. अजुन कशासाठी ही औपचारिक्ता सगळे ठाऊक असतांना? अस्संच तुला त्रास द्यायला..!

माझे उत्तर तुला तोंडपाठ असतांना त्रास आणि मला? खरा तर तणाव तुझ्या मुखावर आहे बघ जरा. पुरेss! जावू का मी निघून? जातांना दार बंद करुन जा. परत तुलाही यायला जमू नये अस्सं! बोलवलेस तरी येणार नाही बघून घेs! पाठमोरं उभं राहूनही डोळ्यासमोर तोच एक चेहरा शास्वत म्हणून कायम असल्यावर पुन्हा बघण्याचा मोह कितीसा उरतो..?

अंगणात अबोलीची शांतता रेंगाळते. प्राजक्त वेचतांना ते गुणगुणनं कानी पडते. उनाडतो मध्येच वारा पानांवर अन् त्याच पानांच्या सळसळण्यात बंद ओठांवर आज-काल तुझे नाव येऊन थांबते. होs का? होs! तर. एव्हढं कल्पणेत जगणं शोभत नाही हं. बेढब ढोबळपणा खटकला हेच खुप झालं..!

प्रत्येक प्रश्नाच उत्तर तयारच. उत्तर तयारच नाही समोर हजरच. असे किती काळ चालायचे अजुन? खिडकीत उभे राहून शुन्य नजरेने मला बघणे? हे तू एकदा स्वत:लाच विचार. माझा उंबरठा ओलांडून अंगणातली रातराणी बनने तू का पसंत केलेस? बस्सं! उत्तर नसलेला एक प्रश्न विचारला कि, तू आपली गप्प होतेस आजकाल. उत्तरासाठी फार मागे लागणे मलाही इष्ट वाटत नाही मग आजकाल. माझा आजही हा अस्साच आहे आणि माझा कालही अस्साच आहे. आज-काल कस्सं काय चालूये मग?? विचारलेसच तर 'एकदम मस्त..!'
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment