Powered By Blogger

Monday, July 26, 2021

राजा आणि रंक..! :-)

 ..आपल्या घरात आपण राजा आणि आपणच रंक असतो. त्यामुळे आलेल्या राजाचे राजासारखे आणि रंकाचे रंकासारखेच आदरातिथ्य करावे. कारण घर आपल्या कष्टाचं, संस्कारांच आणि पिढीचं वडिलोपार्जित आहे. त्यात हुकूमशाही पण आपलीच आणि राज्यही आपलेच असते. कारण चौकटीत आलेली शूर्पणखा आणि रावण आपला मृत्यू सोबत घेऊन गेले होते. दान मागितले म्हणूनच मिळते हे विधीलिखित दानपत्रात खोडले जाऊन मृत्यूने अधोरेखित केले जाते. त्यामुळे एखाद्याच्या घरात पायतानासकट वावरण्यास मुभा मिळाली याचा अर्थ त्यांच्या घराची दार बाहेर जाण्यासाठी उघडे आणि पायातली पायताने चिखलाने भरलेला रस्ता तुडवण्यासाठी सुसज्ज असावी असे सुचवितात. कारण काही मनावरची लक्तरे रुतलेल्या खिळ्यासारखी आयुष्यभर वागवावी लागतात. ती प्रवासात थांबून काढताही येत नाही आणि पुढे चालताही येत नाही. जे थांबले ती जोडपी एकटी होतात आणि जी चालत राहतात ती सोबत असतात एकमेकांकडे विरुद्ध तोंड करुन..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#writer #author #books #stories #attitude #igo #culture #doublestandard 

 



No comments:

Post a Comment