Powered By Blogger

Wednesday, May 20, 2015

प्रमाण..! :-)


♥ क्षण..! ♥

प्रमाण..!

अस्तित्वाचे श्वासांवर काय प्रमाण होते
बरबटल्या नाशिबावर काय समान होते,

करून मी चोख हिशेब प्रत्येक क्षणावर
उरले आयुष्यावर काय एकसमान होते,

दिली-पेललीत हजारो लक्तरे आजवर
हैरान धिंडवड्यांवर काय सन्मान होते,

माझे क्षण लूटवले मी जगाच्या पाठीवर
लचके तोडण्यात यार काय रममाण होते,

चालत-वाढवतचं गेलो मी अंतरे निरंतर
माझ्या षंढ रुतब्यावर काय ईमान होते,

भाकड स्वप्नांचेही काय स्वाभिमान फार
रुतले बाण हृदयावर काय बेईमान होते..!
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment