Powered By Blogger

Wednesday, December 7, 2016

मनावर..! :-)


♥ क्षण..! ♥

मनावर..!

हल्ली माझं बोलणं त्यापेक्षा जास्त माझं लिहिणं तिच्यासह सगळेच फार मनावर घेतात. मला काय वाटलं? नव्हे तुझ्याकडून काय हवं यात अपेक्षांची मग कोंडी होते. तुम्ही जेवढं मनावर घेता! तेवढं मी कागदावर पण ठेवत नाही. हे माझं सत्य आहे. माझ्या जाणिवा अजून जिवंत आहेत. पण तेवढ्याच उणिवा मी संवादासाठी मांडून ठेवल्या आहेत.
आपल्याला एकमेकांशी बोलायला एवढं एकच माध्यम आता उरलेलं आहे. अर्थात चौकट माझी मला जपायची आहे. तुझी/तुमची तुला/तुम्हाला यात अतिक्रमण कुणालाच करायचे नाही. निव्वळ ओघवते काही लिहून झाल्यावर येणारं सर्व काही अपेक्षित असते. हे ठरवून म्हणता येईल.
सोशल होतांना पब्लिकची काय टेस्ट आहे? हे कळायला यापेक्षा दुसरं माध्यम कागदावर तरी नसतं. सगळं काही ताटात वाढून बघावं लागतं. नेमकं काय आवडत? हे उघड माहीत असूनही नावडतच कागदावर लिहून पुढे वाढलं जात असतं. मुद्दाम कारण ज्याला तुम्ही वाचताय हे त्याचं कर्तव्य आहे की तो तुमची चॉईस आणि लाईक या दोघांच्या चक्रव्यूहापेक्षा सहज नजर गेली न वाचलं गेलं अथवा रिमाईंड झालं. चुकलं आणि ओढून ताणून बुद्धीला ताण दिलाय असं वाटतं ना! त्यापेक्षा जाणवतं. तेव्हा लिहिलेलं काहीही न समजणारेही स्वतःची उपस्थिती कागदावर नजरेतून देतात.
रटाळ अर्थहीन असलं तरी. वाचक असतो. श्रोता जागरूक असतो. रसिक नाराज असतो आणि प्रेयसी रुसली असते. कारण अनपेक्षित मांडलेलं अपेक्षाभंग करत असते. तरीही अपेक्षेवर आणि वेळेवर सर्वस्वी सोपवून चालढकल होत असते. चॉईस आणि लाईकच काहीतरी मिळेल म्हणून. व्हेरिएशन आणि व्हरायटी यातली कॉन्टिटी मार खाते. कारण ते कॉन्स्टंट नसतं. स्टेबल नसतं. ओघवतं असतं. म्हणून काही आवडलं नाही तरी ते आपल्याला आवडलेलं नसतं हे खरंय. तरी भावना आणि मनाचा विचार करून दुखापतीवर सॉरी ही फुंकर निर्थक असते.
मनावर घेतलं सरळ साधं सोपं ते तिथंच फुलस्टॉप लावतं. जे कळत नाही. आवडत नाही. तेच मनावर नजरेसमोर सतत येत. काय असेल? म्हणायचं काय असेल? काहीतरीच काय हे? असं का पण? प्रश्न तयार होतात. उत्तर माहीत असूनही. सहज विसरलं जातं थोडं लक्षात राहायला फार चुकावं लागतं अगदी असं तेव्हा कुठं कागदावरच असं मनावर घेतलं जातं. नाही का..?
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

No comments:

Post a Comment