Powered By Blogger

Monday, December 26, 2016

स्पंदने.. त्या फुलपाखराची..! :)


♥ क्षण..! ♥

स्पंदने.. त्या फुलपाखराची..!

गॅलरीत बसल्या बसल्या कळलं नाही की काय होतंय आणि काय चाललंय? पण जे काही होत त्या रात्री भयंकर होतं. एक-एक थंड घाव होत असल्याचा भास. शरीराची शुद्ध तर नाहीच. थंड श्वासांचेही मग भान राहिले नाही. सुरु होत काहीतरी आतल्याआत. पण बाहेरच्या बाहेर सगळं गार पडत चाललं होतं. रगात वाहणार रक्तसुद्धा गोठतांना आपला प्रवाह थोपवत होता. पण झालं एकदाच काय व्हायचं ते. सगळं थांबलही आणि सुन्नही पडलं. जाणिवा पण बोथट होत गेल्या. नजेरेसमोरचा अंधार अलंकार होऊन लुप्त झाला. काही कळलं नाही मग पुढे काय झालं. डोळे उघडले तेव्हा बरंच काही तसंच होतं. जरा उजाडलं होतं. दुरुन कोणीतरी धावत येत होतं. त्राण नसलेलं शरीर एखादा बाण होऊन गप्प गार पडलेलं होते. नजर धूसर झाली होती आणि वाचा खुंटली होती. वेदना नव्हती ना संवेदना जाणवत होती. बस! स्पंदने त्या वेंधळ्या फुलपाखराची चुकत गेली आणि मग बंदच पडली..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

No comments:

Post a Comment