Powered By Blogger

Sunday, March 9, 2014

सोडली मला..!

____/|\____
क्षण..!

सोडली मला..!

वेळ संध्या 07:45 दिनांक 09.03.2014
सहज सांजेचा अन् विषेश रविवारची गजबज अनुभवायला स्टेशनवर निघालो. तसा तर माझ्या मनातही गोंधळच सुरु होता म्हणून शांततेतला तळ्याचा काठ सोडून स्टेशनवरच जायला निघालो. बाईकच्या वेगावर वाटलं सगळे उडून शांत होईल पण कसले काय गोंधळ अजुन वाढतच गेले.
गोंधळलेले, थकलेले, सामानाच्या ओझ्यात घामेघुम झालेले चेहरे पाहात थोडा वेळ गेला. फलाटावर गाडी कुठली आली माहित नाही. स्टेशन बाहेरच्या गर्दीत अजुन आतली गर्दी येवून एकत्र झाली. येणारे जाणारे वाट काढत पायी चालणारे तर वाटेतून बाजुला व्हा! म्हणून केकाटणा-या भोंग्याचीही आज वरचढ होती. रिक्षावाल्यांशी घासाघीस सोबत अजुन भर म्हणून अपडावून वाल्यांच्या गाड्या दिवस भर पार्कींग मध्ये गारठल्यामुळे त्यांचेही या गदारोळात गाड्या सुरु करुन एक्सलेटर वाढवत फाटलेल्या सायलेंसरचा अजुन जिव घेणे चालू होते.
घाई म्हणतात ना तसेच काहीसे. हल्ली पाऊस असुनही भारतीय रेल गाड्या वेळेत धावतायेत विषेशच. आलेली गर्दी पंधरा विस मिनिटात ओसरली. तुरळक गर्दी तेव्हढी उरली. मी ही गोधळलेलो जागेवर आलो. निघुया म्हणत माझ्या गाडी जवळ आलो. पुन्हा एक स्त्री नायलोनच्या विदीर्ण झालेल्या पिशवीत बोचक्यासारखे भरलेले कपडे. हातात पंधरा विस दिवसाच अर्भक. चेहरे वाचायची घाण सवय माझी. तिच्या उतरलेल्या तोंडावरुन वाटलेच प्रकरण वेगळे आहे. इकडे तिकडे बघत होती पण वाट वगैरे बघत असेल असे वाटले नाही. दयेने याचनेने भिरभिरत्या डोळ्यानी पाहात होती. विचारावे कि जावू द्यावे? विचारले नाही तर मलाही चैन पडणार नव्हते.
काय झाले मावूशे? (गरीब खेडवळ कुठलीही वयस्क अथवा मध्यम वयस्क स्त्री साठी सहसा संबोधनाला अशीच भाषा वापरली जाते [भाजी विक्रेत्याच्या माध्यमातून]) गोंधळली जराशी न तिचे अर्भक चुळबुळलं. क्षणभर बघत राहिली माझ्याकडे. माझ्या सपाट चेह-यावर (उसणं) हसु आणत तिला पुन्हा विचारले काय झाले? भुक लागलीये भाऊ पण पैसे नाहीत. येव्हढेच ना वडापाव खाल काय? अडखळतच हो म्हणाली. ठेल्यावाल्याचे वडे तळणे चालू होते. सहज विचारले मी तिला बाळ मुलगा आहे कि मुलगी आहे? म्हणाली मुलगी आहे. नवरा काय करतो? सटपटली आधी नाही म्हणाली मानेने. मी विचारले पुन्हा नवरा नाही काय? तर क्षणभर थांबून बोलली आहे. मग पुन्हा विचारले कुठे असतो? काहीच बोलली नाही. ठेल्यावाल्याचे वडे तळूण झाले एक सोडून दोन वडापाव घेवून त्या बाईला दिले. ठेलेवाल्याचा व्यवहार चुकवून मी निघणार होतो पण थांबलो क्षणभर. पायापाशी पिशवी ठेवून एका हाताने मुलीला सांभाळत त्या गरम वड्यांची थंड होण्याची वाट ती बघत उभी होती. स्वत:च बोलली मग नवरा आहे भाऊ दारुड्या आहे सुरतला असतो हात मजुरी करतो. मुलगा नाही पहिला मुलगी आहे म्हणून सोडली मला. किती वर्ष झालेत लग्नाला? दोन वर्ष. सासु-सासरे नाहीत का? नाहीत. तुमचे आई-बाबा? आई आहे म्हणून तिच्याकडेच चाललेय. कुठल्या गावात राहाता? रिधुर(जळगाव जिल्ह्यातील एक गाव). कसे जाणार? शांतता. भाड्याला पैसे आहेत का? नाही. बस जाते ना? हो. किती भाडे आहे बसचे? पस्तिस रुपये. वडापाव खाऊन घ्या! बस स्टोपवर देतो सोडून.
बसचे तिकिट काढून त्या बाईला बसवून दिले. घरी येवून मनात तेच मुलगी झाली म्हणून सोडून दिली. झटकावे पुन्हा हा विचार म्हणून डिआयडी लिटिल मास्टरचे दिल्ली ऑडीशन बघत बसलो त्यातही हाच विषय आला 'सिया सिंह' अकरा वर्षीय कंटेस्टंटचे नाव. ज्यांनी रविवारचा एपिसोड पाहिला त्यांना माहित असेलच.
एक सोडून दोन वेळा हा विषय काही तासांच्या अंतराने एकाच दिवसात समोर आला एक वास्तविकतेत न दुसरा टि.व्ही.वर स्त्री सुरक्षेच्या बाबतीत सरकारची जी दयनिय अवस्था आहे तिला बघता या विषयावर कायद्याचीही दयनिय अवस्था समोर आलीये. वर्ग भले वेगळा असो उच्च-निच्च-मध्यम अथवा उच्च मध्यम गावापासून शहरापर्यंत कथा न म्हणता शोकांतीका सारखीच आहे. जणजाग्रूती थांबवून आता काय कमिटी स्थापन होण्याची वाट बघावी लागेल घराघरात जावून मुलगी आहे म्हणून सोडले कि पोसताय-स्विकारताय विचारून अहवाल सादर होण्याची. या सोबतच आहेच आपले शिक्षक मंडळी मदतीला मतदान तोंडावर असतांना आणि जण गणना करायला तयार आता हा पण एक लोकपाल बिल पास करुन घ्या लगे हाथ. प्रत्येक समस्येवर लोकपाल बिल असलेच पाहिजे असे वाटते त्याशिवाय आपणही सुधरत नाही न देशही. सरकार तर काही बोलायलाच नको. आवरते घेतो आता चु.भु.द्या.घ्या..!
.
© मृदुंग
kshanatach@gmail.com

No comments:

Post a Comment