Powered By Blogger

Sunday, March 30, 2014

निश्फळच..!

क्षण..!

निश्फळच..!

उगाच काळजी करणं अन् काळजीत पडणं, खंरच कळत नाही असे का वाटणं? तुला माझ्याबद्दल अन् मला तुझ्याबद्दल. इकडून थोडा मी चालत येतो, तिकडून थोडी तू चालत येते. पुन्हा मग पाऊल माघारी जातो अन् सार उगाच होते. चिंता भेडसावत असतेच परी उगा का असे घडत असते?
तुझी समजदार दुनियादारी कि माझी अनुभवी फितूरी. दोन्ही मनात एकच भाव-भावना मग उगाच का एकमेकांच्या हातावर तुरी? समजून उमजून तुही घेते अन् अजान मी उगाच राहातो. लगट करुन भुतकाळाशी वर्तमान थोडा अवदासी होतो.
चालायचेच म्हणत पुन्हा सगळे विस्कटून घेतो. माझ्या मोकळ्या हातांनी स्वार्थी मी होतो. काही आहे कि काहीच नाही. थोडे असुन फार नाही. तुझ्या-माझ्यात अंतर उगाच नाही.
थोड थांबून बघायचे खुप आजमावून पाहायचे. निसटत असलेले क्षण थोडे सावरुन पाहायचे. आयुष्याचे उन्हाळे दुष्काळात फुलवायचे गुलाबी दिस ओसरल्यावर असे होत राहायचे. माझी तू तुझा मी वेग-वेगळे होवून पुन्हा एकत्र यायचे. उगाच अंतर ठेवले जे आसवांत गळून जायचे. नकळत दोघांच्याही एकदा वळून पाहायचे. सर्व तसेच आजही व्यक्तीसापेक्ष परिस्थिती साजेशी. कुठे तरी पाणी मुरतंय अन् कुठे तरी काही अंकुरतंय. जाणून बुजून अंतर जपलं असतंय. नेमक काय आहे अन् काय नसेल शेवटी फोल ठरणार आहे अन् वाटणार आहे 'निश्फळच'..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment