Powered By Blogger

Monday, March 10, 2014

विश्वास..!

क्षण..!

विश्वास..!

विश्वास कसा असतो रे सांगतोस? विश्वास कुठल्या चौकटीत अथवा बंधनात नसतो. विश्वास हा पावसाच्या थेंबांसारखा असतो. थेंब-थेंब होवून होणारे पाणी, साचणारे डबके, होणारे तळे, बनणारी नदी अन् शेवटी वाढणारी सागराची पातळी. हे कसे? पावसाचा थेंब कुठे पडतोय हे त्याला माहित नसते. त्याचा तो फक्त थेंबच असतो. घाणीत, नाल्यात, साठवलेल्या कच-यातही तो पडतो. स्वच्छ मोकळी जागा पाहून तो पडतच नाही. त्याच्या वाटेत आलेलं प्रत्येक वळन तो स्विकारतो. अस्वच्छ जरी असले तरी स्वत:साठी प्रत्येक क्षण तो स्वच्छ अन् नवा बनवतो. उदा. निसर्गाची नवी पालवी. सुरुवातीला गढूळ असलेलं पाणी थोड्या दिवसात काचेसारख चकाकतांना दिसते. निर्माल्य न इतर घटक जरी एकरुप झाले त्यात तर वाहात राहून त्याच जागेवर चांगलं पाणी लगेच दिसत असते. कारण माहितीये का? कारण त्याचा स्वत:वर विश्वास असतो. साचुन तो प्रवाह बनतो सागरात एकत्रीत आल्यावर तोच थेंब लाट बनतो. कारण तो घटक अन् माध्यम कसा आहे ते बघत नाही. त्याच्या अस्तित्वाने काय बदल होईल त्याला माहित असत नाही. त्याचे तो कर्तव्य तरी निभावतो. पुढे काही नसेल असेच समजुन जगतो. मातीत मुरतो अन्यथा जमिनीवर साचुन स्वत:चे अस्तित्व ठेवतो. विश्वास असाच असतो उडतो तरी पुन्हा पाण्यासारखा विरघळून आपण करतो. मग वाटेत अडचणीचे तापलेली जमिन, जमिनिवरची रेती, मोठमोठे खडक आलेत तरी प्रवाह त्याचा एकदिवस त्याच्याच वाटेने-दिशेने सगळे तत्व अस्तित्वात स्विकारुन एक निसर्ग स्वर्गासारखा पाण्यातच विश्वासातून निर्मान होतो. फरक येव्हढाच अन् शेवटही येव्हढाच आपण तो खरंच स्विकारतो कि स्विकारल्याचा आव आणतो आपल्यावर आहे..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment