Powered By Blogger

Thursday, July 10, 2014

थोडासा पाऊस ढगात राहून जातो..! :-)

क्षण..!

थोडासा पाऊस ढगात राहून जातो..!

थोडासा पाऊस ढगात राहून जातो... आठवण म्हणत तुझी सोबत घेवून जातो... आडवा उभा थेंब पडत सरळ निसर्ग करुन जातो... वेंधळा पाऊस ऐपत न पाहाता दाराबाहेर उभा राहातो... खिडकीत असतो मी ही, खिडकीत असते तू ही... गारवा मनात थोडासा रेंगाळून जातो... पाऊस येतो जरा वेळ बरसून निघून जातो... झटकून मनाला व्यापात जो-तो पुन्हा गुंतुन जातो... काही क्षण जातात अन् रिपरिपत पुन्हा पाऊस येतो... काय खेळतोयेस का आता तू ही? मनात प्रश्न येतो... खिडकीची फाटके बंद होतात... दाराकडे सहज नजर जाते... थोड दाराजवळ जाताच मंद गारठलेला वारा अंगावर हळवी झेप घेतो... प्रसन्न वाटते आपलीही कुणी दखल घेतो... मोकळेपणाने गडगडत हसून आभाळ पावसाचा जोर वाढवतो... विजा कडाडतात अन् मार्ग दाखवतात... पावसापर्यंत पाऊले स्वत:च चालत नेतात... उधान वारा शरिराशी सलगी करु लागतो... पापणी मिटून वादळ मनात घोंगावू लागतो... विजेसारखीच पापणी लखकण उघडते... कोरडाच आहे पाऊस अजुन ओले शरीर बोलून जाते... मनसोक्त भिजुन जातात दारं-खिडक्या... हवा असलेला पाऊस थोडा ढगात राहून जातो... विनवण्या केल्या कितीही नंतर खोटा दिलासा तेव्हढाच तो देवून जातो... पुन्हा भेटू असेच अधुरे आपण... थोडा तू तुझ्यात राहून जा, थोडा मी माझ्यात राहून जातो..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment