Powered By Blogger

Saturday, July 12, 2014

गुरु पौर्णिमेच्या आभाळभर शुभेच्छा..! :-)

क्षण..!

गुरु पौर्णिमेच्या आभाळभर शुभेच्छा..!

अपयशासारखा दुसरा एखादा गुरु मला तरी रुचला नाही. सातत्याने मानसांचे चेहरे वाचत मानसांबाबदचा माझा अनुभव फारसा चुकला नाही. सगळं असुन देखील वेगळं कसं राहावं; वर्तुळात राहून आपलं-परकं बाजुला कसं काढावं? वर्ण-भेद-जात स्विकारत, स्वत:च्या वेगळेपणाचे वर्चस्व ठासून सांगत, अलिप्त राहून 'मी पणाचा' स्वाभिमान वगळून, अंहकाराचा संभ्रम अबाधीत कसा ठेवावा? शिकवणारे तुम्ही-आम्ही सारखेच बोलून-डावलून बाजुला ठेवणारे मानसे गुरु म्हणन्यासारखीच आहेत.
आयुष्य तसा एक हळवा शिक्षकच असतो. मुखवटा ओढलेले चेहरे दाखवणारा. त्याहून अचरट प्रसंग उत्तम गुरु ठरतो. स्वभावात काही दोष नसतो. अंतरंगात चिकटलेली मानसांची नालायक वृत्ती वेळेवर तो समोर आणून ठेवतो. सक्षमता-बलाढ्य-सामर्थ्य एकत्रीत करुन जगण्याची अन् मनासारखे वागण्याची किंम्मत मानसाला हातभर लांब करुन मोजावी लागते. उपहास तरी होतोच 'हे सर्व अनपेक्षीत आहे' च्या मथळ्याखाली. प्रत्येकाच्या आयुष्याची भलेही पुस्तकं असो, त्यातली काही पाने वगळलेलीच असतात. जगासमोर येतात ते स्वच्छ सदरेच. कुठे तरी डाग लपवून ठेवलेले.
मार्ग दाखवणारा इथे गुरु कधीही नसतो. मार्गात आलेल्या संकटांना तोंड द्यायला सक्षम आणि सिद्ध करणारा खरा गुरु असतो. तोंडासमोर विनयशिल राहून पाठीमागे निंदा-नालस्ती करणारा एखादा शिष्य असतोच. आदर आचरणात असावा लागतो. उपकार आणि आधाराच्या कुबड्या नाकारुन 'वाईट' आपणच होत असतो. प्रत्येकाला सन्मान देवून 'देव' बनायची पात्रता कुठे कोण जपतो? परिस्थितीही ती जपू देत नाही. चालत राहायचे ठरवल्यावर अडवायला समोर मग भलेही आपलेच येवो. बेदखल करत वाटेवरुन पुढे जाण्यात शहाणपणच असते. चुकीच असे कधी कुणी नसतेच. जो-तो स्वत:च्या जागेवर बरोबर असतो.  दाखवलेला मार्ग अन् स्वत: निवडलेला मार्ग एव्हढाच काय तो मोठेपणाच्या पावसाळ्यांचा प्रभाव असतो. यात कमी लेखणे अथवा स्वत:ची फुशारकी मारणे विचारांचेच वावंटळ असते.
बोट धरुन सोबत चालत येणारा गुरु असण्यापेक्षा, झटकून बाजुला करुन तुमच्या क्षमतेवर आंधाळा विश्वास करणारा गुरु नेहमी योग्यच असतो. जग तर कुणाचीही सहज दखल घेतं, पण जगात असलेल्या मानसांना कुणाची दखल घ्यायला जरा वेळ लागतो. जगासारखे दुसरे घमंडी आणि स्वाभिमानी गुरु त्यांच्या विद्यार्थ्यांची निवड त्यांच्याच पद्धतीने करतात. नाही का..?

"जगासारख्या गुरुला जगासारख्याच गुरु पौर्णिमेच्या आभाळभर शुभेच्छा..!"
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment