Powered By Blogger

Saturday, November 26, 2016

फ्लॅटमेट..! (2)

#पुणे
#समजदारफ्लॅटमेंट

(जोशी काकुंकडून आल्यानंतर)
तो : ए साल्या! काल जोशींकडून आल्यापासून तू एक अवाक्षर बोलला नाहीयेस. तिकडे ती प्रार्थना फोन उचलत नाही. इकडे तू बोलत नाही. समजू काय मी? वाट बिट लावलीस की काय? ए मेल्या बोल ना! पाया पडू का? (पाया पडतो)
मी : तथास्तू..!
तो : बोल ना भाई... काय झालं तिकडे?
मी : पुणेकर आणि पु. लं. चे परिचित जवळचे लोकं त्यांना #भाई म्हणायचे. अगदी त्यांची बायकोसुद्धा.
तो : तू कुठं कमियेस मग? माझा अंत नको पाहूस सांग पटकन.
मी : काही नाही रे, घर शोधण्यातच १ तास गेला. या जोश्यांच सदाशिवपेठ म्हणजे कुंभ मेळाच आहे तो ही दुसरा-तिसरा एकत्र.
तो : असं का म्हणतोस?
मी : नाही तर काय? कुलकर्णी किराणा दुकानाच्या बरोबर खाली थांबून जोशी काकूंना फोन केला. इथं थांबलोय. अपार्टमेंटच नाव आणि फ्लॅट नंबर सांगा. ते म्हणतात काय? कुलकर्णी किराणा दुकानात कोण येतं जातं सगळं दिसतं आम्हाला. तू थांबलेला कुठंच दिसत नाहीये. मी 8व्या मजल्यावरून खिडकीतून बघतेय.
तो : म्हणजे तुझं गटार अजून तुंबलं.
मी : नाहीतर काय? म्हटलं जोशी काकू असं मोठ्या आवाजात ओरडू का? साधारण किती जोशी काकू जमतील? त्यावर म्हणतात अख्ख सदाशिवपेठ एकत्र येईल. पुढं मी म्हणालो तरी तुम्ही आठव्या मजल्यावरची खिडकी सोडणार नाही हो ना? हो म्हणते बाई. सगळं दिसतं ना!
तो : मग काय खरंच आवाज ठोकलास काय?
मी : तुझी अपेक्षा तीच होती ना? पण नाही चिंटू दिसला. तुझा होणार साला बाईक कॉर्नरवर थांबवून खिडकीतून दिसणार नाही अश्या आडोश्यात सापडला!
तो : कोण होती सोबत?
मी : मला काय करायचंय? जी होती ती वात्रट होती. पण चिंटू चपापला रे मला पाहून!
तो : चला काहीतरी सापडलं.
मी : चिंटूला घरी चल म्हणालो. आलाच नाही. घरी काही सांगू नको म्हणाला. म्हटलं पत्ता दे तासभर झाला घर शोधतोय. त्याने पत्ता दिला तर नाही पण बिल्डिंग दाखवली दुरुनच. मग तो आणि ती वात्रट गेले निघून.
तो : मग एकदाचा घरात घुसलास ना?
मी : हो, पायातल्या जोड्यांसकट घुसलो.
तो : काहीच बोलल्या नाहीत?
मी : मी बोलू दिलंच नाही. घुसल्या घुसल्या प्रश्न डागले त्यांच्यावर. नको ती, नको ते अर्थहीन सगळे प्रश्न सोडले एकदम. उत्तर ऐकायची इच्छा नव्हती म्हणून पुढची प्रश्न सोडत गेलो. अशीच प्रश्न प्रश्न सोडत अर्धातास झाला. तेवढ्यात चिंटू पण आला. प्रश्न झाडत मी दाराबाहेर निघालो आणि लिफ्ट मधून जोशी काकूंना चिंटूचा आणि त्या वात्रटचा फोटो व्हॉट्सअप केला. मी लिफ्ट मधून बाईक जवळ येता येता आठव्या मजल्यावरून लय रडारड ऐकू येत होती खाली.
तो : कप्पाळ! करायला काय गेला होतास आणि करून काय आलास?
मी : असं झालं म्हणून सांगत नव्हतो.
तो : प्रार्थना पण फोन उचलत नाहीये.
मी : मी माझा फोन चेकवला प्रार्थनेचा मॅसेजमध्ये मला प्रसाद होता. "आईचं बीपी आता ठिके. बाबा उदास आहेत आणि मी मजेत. घरात पहिली मुलगी पर जातीतली येणार आणि मी पर जातीतील मुलाच्या घरात जाणार. माझ्या ठोंब्याला काही सांगू नकोस. संध्याकाळी थेट येऊन भेटणार आहे. तेव्हा सांगते मी माझ्या सोनूला..
#तेदोघेफ्लॅटबाहेरपडल्यावर
#इतकंच..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment