Powered By Blogger

Friday, April 25, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-6)

क्षण..!

अ फेसबूक लव्हस्टोरी..! (कथा) (भाग-6)

'Sorry..!' बोलून गेलेल्या अंबरला गायब होवून आता आठ दिवस झाले होते. या आठ दिवसात आवरलेलं असलेलं धाराच घर पुरते विस्कळीत झाले होते. एव्हढेच काय जागेवर सहज मिळणारी वस्तू तास भर शोधा-शोध केल्यावर मिळू लागल्या. प्रॅक्टीकल अन् सोफेस्टीकेटेड आयुष्याचे ध्येय उराशी बाळगणारे मनापुढे हारुन बरेच इमोशनल अन् पझेसीव्ह झाले होते.
अटॅचमेन्ट काय साधी ॲजस्टमेन्टही तिथे काहीच नव्हती. मग जी उलथा-पालथ होत होती तिचे तरी काय समिकरण असेल? नियतीच्या मनातलं कुठे कोण काही जाणू शकतो का? ज्या वळणावर नियती नेईल त्या वळणावरुन दिसेनासे व्हावेच लागते.
बराच वेळ धाराचा फोन खणखणत शांत होत असतो. जागेवर मिळेल तर काही खरे ना! मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत घराची पसारा होवून जी अवस्था होते त्यात रोज वापरात येणारी वस्तूच गहाळ झालेली असते. जिद्द न सोडता शोधा-शोध सुरुच राहाते अन् शेवटी रायटींग टेबलवरच्या पुस्तकांच्या गर्दीत फोन सापडतो अगदी शांत अवस्थेत.
मिस्ड called लिस्ट चाळत, आईचे फोन?...करु कि नको फोन या दोलायमान विचारात असतांनाच पुन्हा फोन खणखणतो.
धारा : हॅल्लो!... अगं, फोन सापडत नव्हता म्हणून... तू बोल कशी आहेस?... हो मी मजेत आहे... अगं, रेंज नाहीये म्हणून आवाज निट ऐकू येत नसेल... मी ठीक आहे... बाबा कसेत?... (जरासा आवाज वाढतो) आई, मी तुला किती वेळा सांगीतले माझे मत तू त्यांना का नाही समजवत? तुला जमत नसेल तर मला सांग मी बोलते त्यांना...आई! मला आता वेळ नाही बाय.. फोन बंद करुन पुन्हा त्या पुस्तकांच्या गर्दीत झोकवून देते...स्वत:शीच बडबडत राहाते...जो तो मला स्वत:च्या तालावर नाचवू का पाहातोय?... लॅप्पीकडे नजर जाते...आणि एक हा अंबर... 'Sorry' म्हणाला तेव्हा वाटले कि हा तरी... पण हा तर 'Sorry' बोलून असा निघून गेला जसे माझ्यावर उपकारच केलं आहे... फेसबूक पेज साईन इन करते अन् उघडताच पहिली धाव अंबरच्या प्रोफाईलवर घेते... गेल्या आठ दिवसात आठशे वेळा मी याची प्रोफाईल चाळली असेल... जरासा विचार करुन बोलते... आता बस्स! अजुन नाही...एक मॅसेज करते 'कहा हो?'... आज रात्री पर्यंत रिप्लाय आला तर ठीक नाही तर... पाच मिनिटे वाट बघून ऑफलाईन होवून ऑफिसची तयारी करायला निघून जाते..!

परतीचे टिकीट बुक करायला म्हणून अंबर कॅफे गाठतो. सहज एक नजर फेसबूक बघून घ्यावे म्हणत अंबर साईन इन करतो. आठ दिवसाचे नोटिस्फीकेशन क्लिअर करुन अंबर फ्रेंड रिक्वेस्ट चाळतो. धाराची रिक्वेस्ट पाहून जरा संभ्रमात पडतो. प्रस्ताव स्विकारत मग मॅसेजेसकडे त्याचा मोर्चा वळवतो. दहा पंधरा जनांचे मॅसेजेस वाचून उत्तर कुणाला न देता सरळ धाराची प्रोफाईल चाळत बसतो. तिचे आलेले मॅसेजेस पुन्हा पुन्हा वाचून काढतो. उत्तर तर द्यायचेय पण हे आयुष्याच्या दु:खाचे वादळ आपलं छे! माझं असतांना वाटेकरी का म्हणून हवे असावे? तरी काही बोलावेच लागेल. काही न बोलता होणारे समज-गैरसमज असण्यापेक्षा काही तरी बोलून वाढणारे गैरसमज अन् संभ्रम तसेच ठेवावे लागतात.

h! मिस ऑक्सफर्ड, आय एम ग्रेट इन इंडीया. कधी कधी परिस्थिती अशी बिकट होते कि त्या परिस्थित साधे कळवताही येत नसते. आताही घाईतच आहे, चार-पाच दिवसांनी पुन्हा इटली गाठायची आहे. त्यामुळे निवांत अन् मोकळे आता मला बोलता येणार नाही. अर्थात याचे वाईट तुम्हाला वाटणार नाही अशी अपेक्षा करतो. सरळ स्पष्ट बोलावे हे कळतेय मला पण...

आज पाऊले जरा
डगमगलेली आहेत,
कोसळून पुन्हा ती
उभी राहिली आहेत..!

थोडा वेळ हवाय अजुन एकांतात. कदाचित त्याची गरजही असते म्हणतात. परत आल्यावर कळवतो. Thank you for your masseges & care. पुन्हा एकदा "Sorry..!" स्वत:ची काळजी घ्या. मी जातो, जावेच लागेल. "उत्तरक्रिया अन् कर्तव्ये पार पाडायची आहेत". बाय..! इतर कुणाला मॅसेज न करता तुम्हाला तरी मी का मॅसेज करतोय माझे मला कळत नाहीये. काही चुकले असेल माझे तर मनावर घेवू नका. एंटर करुन ऑफलाईन होतो..!
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

(नोंद : कथा काल्पनिक आहे. याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!)

No comments:

Post a Comment