Powered By Blogger

Friday, April 11, 2014

मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक : सहा)

क्षण..!

मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक : सहा)

पुन्हा दिवस जरा वेगात सरत आहेत. एखादी वेळ एखादा क्षण कधी सरुच नये वाटत असते, तोच क्षण तिच वेळ लागोपाठ सरुन जाते. थांबवावे वाटते अन् क्षणभर पुन्हा जवळ घ्यावे वाटते. गुंतली होती बोटात बोटे तशीच आज वेग-वेगळी बेटे. तू ही तिकडून चालत नाही. मी ही इकडून चालत नाही. अंतर तसेच अबाधीत आजही काही केल्या कमीच होत नाही..!

(मी)
नको जावूस सोडून आज
मैफलीत ठेव माझी लाज,

होवू दे झालीच जरी सांज
बनू नकोसच तू दगाबाज,

कैक होते इथेही सरताज
तू फक्त माझ्यातच गाज,

अजुन काही नको आज
रंग तुझे ओंजळीने पाज..!

(ती) तू वेडा आहेस का? उशीर होतोय माहित आहे तुला. निघते वेळी तुझे रोज असेच असते. एक-एक क्षण करत रातीला गडद करायचे असते. मला सोडून चांदणं मग बघत राहातोस. चंद्र दिसला कुठे तर मला दाखवत राहातोस. माझं आभाळ माझं चांदणं तुच तर आहेस स्पर्शाचे अंतर मिटवून तुझ्याच मिठीत मला ठेवले आहेस. सैल करुन मिठी खांद्यावर डोक ठेवून शतपावली करत घराची वाट धरते..!

किती बंर असतो रे तुझा शब्द खरा
जेव्हा बघावं तेव्हा तुझा हा नखरा

मागे-पुढे घुटमळत तू करतो पसारा
पदराच्या आभाळात फुलवतो पिसारा

रागावते तुला मारतेही शब्दांचा मारा
फक्त मिठीत घेवून देतोस मला शाहारा

सुखावतो तू माझा रोम-रोम रे सारा
नकळत डोळ्यात अश्रू घेतो रे आसरा..!

एकमेकांच्या भरुन आलेल्या डोळ्यात बघत, शुन्यात हरवून दोघेही चालत राहातात. प्रेमाचे वेडे सगळेच असतात. एकतर्फी असो अथवा दुतर्फी सजलेली वाट असो, हवं कुणाला नको असतं..?

(कोरस)

एक वाट सजलेली असते
एक लाट तहानलेली असते
अनोळखी सारे प्रवासी इथे
प्रवासच तर बनून जात होते

(मी)
काय होते माझ्याजवळ
काय होते तुझ्याजवळ
बनुन आपण एकमेकांचे
घडवले आयुष्याचे वादळ

(ती)
तुझं-माझं करु नकोस
आपलं हे अस्तित्व आहे
आयुष्याच्या एका गाडीचे
हे दोन चाकं वास्तव आहे

(मी)
नाही कुठे बंर मी म्हणालो
तुझ्यातच तर मी सामावलो
विरोधात नाहीच गं मी गेलो
आजच जरा भानावर आलो

(ती)
आयुष्य तुझ्यासोबत सुंदर
श्वासांच कुठे रे आहे अंतर
हौस-मौज पुरवतोस माझी
तरी उगाचेच म्हणते नंतर

(मी)
हा प्रवास कधीच संपला
पाय घरालाच आहे लागला
दुर तू नाही जवळच आहे
उंबरठा माझा तू ओलांडला

(ती)
भलतेच लाड तू पुरवले
शब्द अन् शब्द गिरवले
हिरवले नाही रे मी तुला
तू मलाच तर तुझे केले

(कोरस)
अशी अंधारली ती खोली
मिठीही पुन्हा चुरगळलेली
बनूनच साखर आयुष्याची
मनातच आहे विरघळलेली

प्रवाह वाहात राहातो अन् आयुष्याला पुढे नेत राहातो. दिवसा मागून एक दिवस येतो, रात्री मागून एक रात्र येते. चालढकल करत रस्त्यावरच घर लागत असते. प्रवास सुरुच असतो झालं-गेलं नवंच समोर असते. नकळत भरुन येतात डोळे स्वत:चे, स्वत:लाच जेव्हा स्वत:चे सुख भर-भरुन मिळत असते..!
.
------- समाप्त -------
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment