Powered By Blogger

Saturday, May 31, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-9)

:-)
क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-9)

जरा वेळाने येवून धारा अंबरचा शेवटचा मॅसेज वाचते. वाचताच क्षणभरात तिची नजर जुन्या विश्वात हरवते. आठवन एक ती, आठवताच पापणी स्वत:च मिटून जाते.

धारा : हात काढ तो डोळ्यावरचा मला माहित आहे तुच आहेस ते!...

(......) : श्या!... तुला सप्राईझ करणे कठीन आहे...

धारा : ज्या दिवशी वेळेवर येशील ना तेव्हा होईल मी सप्राईझ...

(......): हो का! उद्याच करतो बघ मग...

धारा : हा राहू दे! गेल्या दिड वर्षात तुझा तो उद्या आलाच नाही. बाकी तुझ्यामुळे मलाही रोज घरी जायला उशीर होतो अन् रोज घरी नवी थाप मारावी लागते. & i hate you for this..

(.......) : हेट मी ऑर लव्ह मी यु'विल ऑलवेज थिंक अबावूट मी.....

लॅप्पीची बॅटरी अखेरचा श्वास घेत डिसचार्ज होते. अन् भानावर येते..खिडकीत बसून विचारात गुंतत जाते. प्रेमात मोठे-मोठे हेवे-दावे करणारा हा आयुष्याच्या त्या वळणावर सोडून गेला. जिथे मला त्याची सर्वात जास्त गरज होती. पण! जेव्हा जन्मदातेही माझ्यावर विश्वास नाही करु शकले तर... विचारांच्या वादळात एकदम तिव्रतेने आठवतो तो तिचा एकमेव आधार... जो मोठे नाही देवू शकले पण त्याने लहान असुन दिला. धाराचा लहान भाऊ 'आलोक'..!

फोन वाजतो... आलोकचाच असतो.. नाव पाहाताच हिरमुसलेली कळी खुलून येते... हसत फोन घेते... हॅल्लो!.. अरे आत्ता तुझीच आठवन काढत होते... अरे खरच... हो अरे मी करणार होते फोन तुला पण काम इतके ना की... हो बाबा नाही मी हलगर्जीपणा अजिबाद करत नाही... वेळेवर जेवते वेळेवर औषध घेते अन् काळजीही ओके! आता तुझे लेक्चर झाले असेल तर मी बोलू?... कसा आहेस आणि अभ्यास करतो ना?.. अरे हो मी विसरलेच माझ्या भावाला स्टार होयचे आहे मग तो का अभ्यास करेल?.. गप्प बस नालायका अभ्यास करत जा... मलाही बंर वाटले तुला नालायक बोलून... बंर ठेव आणि काळजी घे तुही स्वत:ची... आणि ऐक... आई-बाबांचीही घे!...

फोन ठेवून फ्लॅट मधल्या भिंतीवर फ्रेम करुन लावलेले आलोक अन् धाराचे लहानपणापासूंचे फोटो बघत आठवणींचा उजाळा करत घड्याळाकडे लक्ष जाते... फारच उशीर झालाय... काम आवरायला घेते... काम आवरुन आज आलोकच्याच आवडीची खिचडी खाऊ असे म्हणत खिचडी बनवून फ्रेश होवून येते... खिचडीचा आस्वाद घेत अंबरला रिप्लाय द्यायला स्वत:ला सज्ज करते..

धारा : ओह! तर तुला असे वाटते कि, मी सतत तुझा विचार करावा? Is that so... एंटर करुन News feed चाळत रिप्लायची वाट बघते..

अंबर : I'm so glad to heaired Your wish, i don't mind.. करु शकता माझा विचार :-)

धारा : इतके तुमचे नशीब चांगले नाही... आणि मलाही तितका वेळ नाही..

अंबर : मी कुठे म्हणालो मला वेळ द्या तुमचा? एक क्षण पुरुन उरेल एव्हढी माझी वृत्ती समाधानी आहे.. :-)

धारा : मी तो क्षण ही का देवू तुम्हाला?..

अंबर : या क्षणावर अंकुश लावणे हे तुमच्या हातात नाही ना... नियतीच्या बाहूल्या देवून जात आहेत... :-)

धारा : वाह!... लेखक आहात का आपण..?

अंबर : हो! म्हणून भाव खायची माझी इच्छा नाहीये... छंद होता कधी काळचा एक... पण असते काही काही व्यक्तीमत्वातील छाप जी माझ्या स्वत:त हरवून गेलेल्या लेखकाला जागे करते...

धारा : पण! त्या लेखकाला झोपवलेच का आहे... जागेच राहू द्या ना छान लिहिता म्हणून म्हणते...

अंबर :
माझे लिखाण हल्ली
मलाच आवडत नाही,
काय लिहितोय माझे
मलाच कळत नाही..!.... म्हणून झोपवले....

धारा : अहो! आपण कसे दिसतो ते आरश्यात पाहिल्याशिवाय कळत नाही...आणि लेखकाचा आरसा त्याचा वाचक असतो. आधी लिखाण कुणाला तरी दाखवून तर बघा आणि मग ठरवा झोपायचे कि नाही...

अंबर : एका झटक्यात माणसाला ओळखता बघा तुम्ही... निष्कर्शही त्वरीत काढता... डायरी पुरता मर्यादीत ठेवले आहे अजुन तरी...पण माहित नाही इथे कसे लिहिले गेले... Sorry चौकट चुकली माझी...

धारा : ओके... मी काय बोलू शकते मग आता...

अंबर : तुम्हालापण आवडते ना लिहायला?,नव्हतो तेव्हा माझ्या प्रोफाईल पिक वर केलेल्या चारोळ्या वाचल्यात मी तुमच्या...

धारा : आवड आणि कला यात फरक असतो.. तुमच्याकडे कला आहे. माझी फक्त एक आवड आहे जी जेमतेम पुर्ण करते...

अंबर : आवड जपणे सुद्धा तर एक कला असते ना..?

धारा : Really?....

अंबर : May be..! कारण बरेचदा स्वत:ची आवड सोडून दुस-याची कला कुणी तरी, कुठे तरी कसे तरी जपत राहातो...

धारा : पण! त्याला जास्त हिम्मत लागते. आपली आवड सोडून दुस-याची पुर्ण करणे कठीनच असते नाही का?...

अंबर : जर ते दुस-याचे न समजता आपले समजले तर सोपे आहे...

धारा : कसे काय..?

अंबर : तर! एक लहान लेकरु घ्या उदाहरनार्थ... इतर कुणाला त्याचे लाड-हट्ट पुरवणे कठीनच असते पण... पुरवणारी व्यक्ती जर त्याची आई-बहिण किंवा हक्काची असेल तर त्या व्यक्तीसाठी ते सहज असेल... असे मला तरी वाटते...

धारा : ते लेकरु लहान असे पर्यंतच त्याचे हट्ट पुरवण्याला अर्थ असतो. मोठं झाले कि त्या अमुल्य प्रेमाची किंमत मोजायलाही कमी करत नाही... मग अश्यावेळी वाटते कि आज पर्यंत मी जे केले ते व्यर्थ होते का? माझे प्रेम माझ्या भावना त्यांचे काहीच नाही का महत्व राहिले...

अंबर : चोचीने दाणे भरवले, मायेने पंखात बळ दिले, पंख पसरुन प्रेमाचे मुक्तविहारी पाखरं उडून गेले, तर परत फेड म्हणून कर्तव्यात पाखराचे काय बंर चुकले, जर जाता-जाता त्याने एकटेपणा पुन्हा असेल दिले? निस्वार्थ प्रेमाचा मोबदला शेवटी एकटेपणातच चुकता होतो. का? असेल-नसेल कदाचित परोपकार म्हणून एव्हढे उपकार केले तर वावगं काय..?

धारा : (मॅसेज सीन करते फक्त)

अंबर : (स्वगत) पंधरा मिनिटे झाली मॅसेज वाचून. कदाचित वेळ लागेल सैरभैर झालेले मन सावरायला..!

ओघवता प्रवाह मनातलं
व्यक्त करतोच असे नाही,
थोडे बाकीच राहून जाते
अन् अव्यक्त असते काही..!
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
.
(नोंद : कथा काल्पनिक आहे. याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!)

2 comments: