Powered By Blogger

Saturday, May 3, 2014

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-7)

:-)
क्षण..!

अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-7)

साईन ऑउट करुन धारा रुमची दशा बघत बसते. अशीच काहीशी माझी परिस्थिती झालीये. जर हा गोंधळ असाच वाढत राहिला तर सगळेच कठीन होवून बसेल. हा गोंधळ सोडवण्याची सुरुवात तर करावीच लागेल. रुमचा गोंधळ सोडवायला सुरुवात करण्यापुर्वी एक coffee घेवू  म्हणत किचनकडे मोर्चा वळवते. पाणी उकळायला ठेवून coffee चा डबा घेते. रिकामा आहे! गॅस बंद करुन पुर्ण किचनचे सामान बघते. काय काय नाही ते बघून चेंज करुन चावी पर्स उचलत रुमला lock करते. जवळचे इंडीयन फुड shop गाठते. हवे असलेलं सर्व बास्केटीत घेवून कॅश काउंटर जवळ येते. तर तिथे तिच्यापुढे एक चिमुरडी तिच्या बाबांसोबत आलेली दिसते.

नजरेने त्या चिमुरडीला न्याहाळत राहाते. shop बाहेर पडतांना कडेवर घेण्याचा तिचा बाबांजवळ होणारा हट्ट बघते. बाल हट्ट कुठल्या बापाला चुकलाय? सर्व सामानाच ओझ एका हातावर घेवून. बाप लाडक्या चिमुरडीला कडेवर घेत रमत-गमत घराकडे चालू लागतो. ति दोघे नजरे आड होई पर्यंत धारा त्यांना एकटक बघत राहाते. काउंटर वरील व्यक्तीच्या कणखर आवाजाने भानावर येते. बिल चुकते करुन सरळ घर गाठते. किचन मधल्या सामानाची ज्याच्या त्याच्या जागेवर नेमणूक करुन रुम आवरायला घेते. सगळे सोईचे अन् पुर्ववत करण्यात दिवस जातो. फ्रेश होवून coffe घेवून फेसबूक साईन-इन करत स्वत:शीच बोलते "I hope रिप्लाय आला असेल", ओपन होताच मॅसेज चेकवते. शेवटी आला एकदाचा रिप्लाय. अंबरचा रिप्लाय दहादा वाचून नेमक काय उत्तर देऊ? हे सुचे ना! फक्त "Ok!... take care & come soon.." टाईप करुन पुन्हा एकदा वाचते. 'come soon' delete करुन एंटर करते. साईन-ऑउट करुन नजर फोनकडे जाते. उगाच रागवले...स्वत:ला ओरडत आईला फोन करते. "हॅल्लो! आईss! अम्म्मम्म्म, Sorry..!"

कॅफे मधुन निघून अंबर घर गाठतो. वडीलांच्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतो. आईची माया तर वयाच्या पाचव्या वर्षीच हरवली. बाबा तुमचे छत्रही इतक्या लवकर हरवेल वाटले नव्हते. गेल्या पंधरवाड्यात तुमच्याशी साधे बोलणेही माझे झाले नव्हते. तुम्हाला होणारा त्रास, वेदना कशी तुम्ही स्वत:च जवळ ठेवली हो? मुलगा म्हणून तुमचा आधार होतो मी तर मलाही तुम्ही तुमचा आधार बनू दिले नाही. "जिथे जायचे तिथे जा म्हणालात, स्वत:च्या मनासारखे जग म्हणालात". बाबांच्या स्टडी टेबला जवळ येतो, त्यांच्या खुर्चीवर बसत टेबलाचा खण उघडतो. एक बंद पाकीट वरच दिसते. 'बाळ अंबर..!', पाकीट उघडून पत्र काढत वाचू लागतो.

" बाळ अंबर अनेक आशिर्वाद." माहित आहे मला तुला माझे असे अचानक जाणे सहन होणार नाही. तुझी आईपण वर एकटीच आहे तर मला जावेच लागेल ना! हां थोडी घाई झाली म्हण हवे तर पण उशीर नाही झाला. तुला ज्या दिवशी इटलीची ऑफर आली त्याच दिवशी माझ्याजवळ जास्तीत जास्त दोन वर्ष आहेत हे कळले होते. तुझ्या स्वप्नांच्या आणि इच्छेच्या मध्ये मला यायचे नव्हते. तुला तडजोड कधी मी करु दिली नाही. पुढेही तू करावी असे मला आजही वाटत नाही. स्वप्न अन् इच्छा पुर्ण करायला जी किम्मत मोजावी लागते, ती ऐपत तुझ्यात होती आणि आहेही. धाडसी तू आहेसच माझ्या जाण्याचा स्वत:ला दोष देत बसू नकोस. तू जे करत आलायेस आजवर त्यातच माझे सुख आणि समाधान आहे. तुला बेडीत बांधून घुसमटवायचे नव्हते.

तारुण्याच्या उंबरठ्यावर आभाळ दाखवले तुला अन् ते तू गाठले एव्हढीच अभिलाषा होती तुझ्याकडून. फार काळ शोक करत बसू नकोस. तू आनंदात असल्यावर मी ही संतुष्ट असेल. कर्तव्ये अन् तुझ्या उत्तरदायीत्वापासून तू कधी पळ काढला नाहीयेस. निर्णय माझा होता तुला तुझ्याबळावर जगात सोडायचे. कुठल्याही टोकावर राहा, जग पण भरभरुन मुक्तहसते असावे तू. आयुष्यात व्यवहारासाठी तडजोड कर पण प्रेमात आणि जगण्यात कसर बाकी ठेवून तडजोड करु नकोस. तुझ्यासोबत अन् तुझ्यापाठीशी मी सदैव असेल. पोकळीक वाटली तुला तर तो तुझा दुबळेपणा असेल अजुन काही नाही.

माहित आहे तू गंभीर झाला असशील या क्षणाला. डगमगलाही असशिल पण कोसळू नकोस मला ते आवडणार नाही. आयुष्याकडे त्याच नजरेने अन् जिद्दीने तू बघ ज्या आत्मविश्वासाने मी तुला घडवले आहे. आयुष्याचा एक जोडीदार तुझ्यासारखाच बेफिकीर निवड. घर बनव भिंती नको. चौकट ठेव पण बंदीश नको. कधी कुठे काही सुचले नाही तर फक्त तुझ्या मनाचे ऐक आयुष्य सुंदर होईल. माझ्या मागे तुला एकटे ठेवले असे नाही. तुझ्यात मी मला आणि तुझ्या आईला कायम ठेवले आहे. काळजी घे! सावर स्वत:ला या दु:खातून तुझा बाबा आणि मित्र..!

अंबर पत्र हातात घट्ट धरतो अन् थोपवून ठेवलेला बांध तुटतो. मुखातून बाबाssss! आरोळी ठोकतो. अश्रूंना मोकळी वाट करुन देतो. जखामांवर आठवणींची खपली चढवून प्रवास पुन्हा सुरु होतात. थांबणे नसते अन् धावनेही नसते. फक्त जरा विसावा आहे का वळणावर इतकेच पाहाणे असते. अंबर आई-बाबांच्या वस्तु जवळ घेवून, उघडे घर बंद करुन इटली गाठतो. एका नव्या प्रवासाची सुरुवात करायला अवधी असा कितीक लागतो..?

आयुष्य छान असते तेव्हा
जरा ते छोट वाटत राहाते,
सुख दु:ख असतात सोबत
उगाच ते खोट वाटत जाते..!
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

(नोंद : कथा काल्पनिक आहे. याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!)

No comments:

Post a Comment