Powered By Blogger

Friday, August 29, 2014

गरळ..! (स्वगत..!) :-)

क्षण..!

गरळ..! (स्वगत)

कोरे कागद समोर पाहिल्यावर, बरेच विचार शब्दांत उमटायला आतुर झालेले असतात. मनासारख चंचल अजुन कोण असतं? आता हे तर लगेच ते! चौकटीतली मर्यादा मनाला लागू नसते. अवाक्या बाहेर आणि कल्पनेच्या पलिकडे, 'सुचणं' हे प्रासंगिक तत्वावर व्यक्त होत असते.
लिहून तर सहज जाते लेखणी. त्या लिखाणा मागे प्रश्न धावत राहातात. हे असंच का लिहिलं? हे तसंच का वाटलं? वाचायला निट-नेटकं होतं पण! ते आहे तसंच स्विकारायला मन का तयार नव्हतं? कधी चपखल अन् रास्त सुचल्यावर, "अरे! यात काय विषेश होतं?" व्यक्ती अनेक कल्पना अनेक. जसा गडबडीत थोडा फार वेळ मिळेल, तसे माझा शब्द रुपी कागद चाळून मोकळे.
पुर्वी दहा लोकं वाचतील असे मनात यायचे. आता हजार लोकं वाचतील त्याचे दडपण येते. थकवा वाटायला लागलाय आताशा, कि, मनात काहीच शिल्लक नाही? कुणाला प्रश्न नंतर पडतील पण मला नंतर द्यायच्या उत्तराचा आताच विचार करायला हवा. एक ना अनेक! लिखाणाचा विषय मांडून झाल्यावर, बोलायला अजुन एखादा विषय काढून ठेवावा लागतो. बरोबर मग उरायचे तरी काय? चुकांवर तोंडभर बोलायला असंच करावं लागतं. कदाचित, लोकांना त्यांच्यापेक्षा जास्त ओळखून पुढची रचलेली पायरी माझी असावी. पुन्हा मग दुखणं वर येतं. समज होण्यापेक्षा गैरसमज वाढत जातात. ज्याला मी स्वाभिमान म्हणतो त्याला ही लोकं अहंकाराच्या श्रेणीत बसवतात. फटकळ होवून विचारावे का मग मी त्यांना, तुमच्या लेखी स्वाभिमानाची परिभाषा काय आहे? झालेच मग मुसक्या बांधल्यास आमच्या तोंड पण उघडू दिले नाहीस. काय बोलावे तुला खरंच कळत नाही. चुकीच आहे पण ते व्यक्त करता येत नाही.
हाडाचा कवि आणि जन्मजात लिखाणाचा पिंड माझाही नाही. डोक्याचा वापर करुन लिहायला सुपिक बुद्धीही माझी नाही. डोक्यापेक्षा मनात जे येतं ते लिहून मोकळा होतो. स्वत:ला बुद्धीने हुशार समजणारे मग असे तर्क-वितर्कात का गुरफटले जातात कळत नाही. चार लोकांसारख वागण्यापेक्षा एक स्वत:सारख वागणं, सो कॉल्ड मला ओळखणा-या लोकांच्याही पचणी पडू नये तर म्हणावे काय? धरुन बाजुला केले तर तुझ्याकडून हे अपेक्षीत नव्हते. इथेही दिडमुढ होवून विचारले, मग काय अपेक्षीत आहे तुम्हाला माझ्याकडून? झालं विषयांतर! पिच्छा सोडला नाही पुन्हा विचारले तर शांतता. अपेक्षेच्या नावाने गरळ ओकण्या ऐवजी आतल्या आत गिळले सगळे. एव्हढे सर्वे असुनही मग पुन्हा दखल मी तरी का घ्यावी? चार लोकं सोडून देतात तसेच मी ही सोडून दिले. यातही चुकले माझेच तर 'हुशार' पुन्हा कोणी नाहीच या जगात.

----------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment